इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

Submitted by प्रमोद् ताम्बे on 21 April, 2014 - 03:26

इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत. या दोन वर्षात जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटण्यासाठी त्यांचेकडे गेलो त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. परंतु असे जीवन संपवणे याला कायदेशीर मान्यता नाही व तसे केल्यास ती आत्महत्या ठरेल व आयुष्यात त्यांनी कधीही कायदा मोडला नाही त्यामुळे तो मार्ग त्यांना वापरावयाचा नाही. जे काही करेन ते कायदेशीरच असले पाहिजे हा त्यांचा निश्चय आहे.
यावर आपले व्विचार काय आहेत ?
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथली चर्चा वाचून माझ्या ओळखीच्या मुलीची ही कथा .अवांतर आहे पण तरीही.
तिचे सत्तरीचे सासरे बरेच दिवस हॉस्पिटलमधे आहेत.आतापर्यंत हॉस्पिटलचे बील सहा लाखांवर गेले आहे.सासूने सांगितले की काही होवो, उपचार करू या.ही मुलगी, तिचा नवरा व दीर यांनी एकत्रात जागा बुक केली आहे.त्याचा हप्ता जात आहेच.दिराला चांगला पगार असून ३ लाखांपर्यंत खर्च त्याच्या ऑफिसच्या मेडीक्लेममधून केला आहे.ही मुलगी, तिचा नवरा यांना त्यामानाने पगार कमीच आहे. सासू-सासर्‍यांकडे फारसे काही नाही.(मात्र सासूने दोघा मुलांच्या नावावर लहान का होईना जागा घेतली आहे.) दोघा नातेवाईकांचे कर्ज आहे.
पण हे तिघेही म्हणतात की बाबा, आम्हाला हवेत.अगदी अडलंच तर बुक केलेली जागा विकायचा, शेवटचा ऑप्शन
त्यांनी ठेवला आहे.

मी सामान्य आहे (विनोबा/सावरकर/जैन संत नाही) त्यामुळे मला प्रायोपवेषन करणे अवघड आहे.
- नातेवाइक नाहीत (किंवा त्यानी सोडून दिले आहे) म्हणून भीक मागण्याची वेळ आहे. अशावेळी अर्धपोटी जगण्यापेक्षा मरावे असे मला वाटले तर ते सोपे करावे का?
- जेंव्हा इच्छा असूनही शारिरिक असाहयतेमुळे प्रायोपवेषन वैगेरे सारखे मार्ग स्वतः आचरता येत नाहीत किंवा आचरण करू दिले जात नाहीत तेंह्वा मरण ते सोपे करावे का?
- शारिरिक व्याधीमुळे आत्यंतिक वेदना होत आहेत. तर मरण सोपे करावे का?
- अपघातामुळे शरीर लूळे पडले आहे, फक्त मेंदू काम करतू आहे तर मरण सोपे करावे का?

मला वाटते हो करावे. तेच माझ्यासाठी कायदेशीर इच्छामरण. किमान असा नियम करावा की आत्महत्येच्या प्रयत्नाला देहदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आरोपीच्या इच्च्छेनुसार असावी.

- नातेवाइक आहेत पण त्यांचे प्रेम नाही अशावेळी कुढत जगण्यापेक्षा मरावे असे मला वाटले तर ते सोपे करावे का? नाही.

कधी नव्हे ते लिंबु आणि ईब्लिस यांच्याशी एकाचवेळी असहमत!

इच्छा मरणामधे इच्छा कोणाची हे पहाणं गरजेचं आहे.
संथारा 'देण्या'च्या पध्दती मधे आणि अकु च्या लिंक मधिल 'thalaikoothal' मधे ती त्या व्यक्तीची नसुन देणार्‍याची आहे. मग त्याला वेगळ काहीही नाव ठेवल तरी शेवटी मर्डरच आहे.

सुसुकु, तुम्ही अगदी थोडक्या शब्दात कसलेही भावनिक पाल्हाळ न लावता नेमके मुद्दे मांडले आहेत. Happy

>>>> कधी नव्हे ते लिंबु आणि ईब्लिस यांच्याशी एकाचवेळी असहमत! <<<< हे असे होणे कदाचित इब्लिसरावान्ना पटणार नाही, आवडणार नाही!

अन तर मग तुम्ही लगोशी नक्कीच सहमत होऊ शकाल Wink

सन्मान इच्छामरण या विषयावर पुण्यात यशवंतराव नाट्य गृह कोथरुड येथे सोमवार दि १३ ऑक्टोबर २०१४ ला सायंकाळी ५.३० वाजता एक परिसंवाद झाला. विद्या बाळ, डॉ शिरिष प्रयाग, मंगला आठलेकर, अ‍ॅड असीम सरोदे , ज्योति सुभाष त्यात सहभागी झाले होते. इंडियन सोसायटी ऒफ क्रिटिकल केअर मेडिसीन पुणे व सहयोग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. त्यात लिव्हिंग विल बाबत एक मार्गदर्शक स्वरुपाचा नमुना देण्यात आला तो आपण खालील लिंकवरुन डाउनलोड करु शकता.
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7IU0ZLNzdrcTdJaWs/view?usp=sh...

घाटपांडेजी, फारच अस्पष्ट दिसते आहे इमेज साईज वाढविला किंवा झूम केले तरीही, वर्ड मधे नाही का मिळायचे आपल्याला? फारच उपयुक्त आहे हे!

इच्छा मरण कायदेशीर असावे का ? नाही.माझ्यामते जन्म हा जसा आपल्या हातात नसतो.त्याचप्रमाणे मृत्युही आपल्या हातात नसावा कारण प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याचे श्वास हे कुणीही हिरावु शकत नाही अगदी ती व्यक्ती देखील.

रेयरेस्ट ऑफ द रेयरेस्ट केस जरी कायदेशीर मरण द्यायचे झाले तरी रेयरेस्ट ऑफ द रेयरेस्ट कसे ठरवणार व त्याचा दुरुपयोग होउ नये हेही कसे पाहणार त्यामुळेच बहुतेक कायद्याने इच्छा मरणाला भारतात बंदी असावी .
तुमच्या स्नेही विषयी वाइट वाट्ते आहे .पण त्यांचा निश्चय योग्य ,कायदाविरोधात कोणीही जाउ नये.

बंगलोरात 'Live well, leave well' नामक संस्था याच संदर्भात काम करायची.

सन्मानानं जगता येणं जितकं आवश्यक आहे तितकंच मरता येणं देखिल. जेव्हा यातनांमध्ये, विकलांग अवस्थेत, सहनशक्तीच्या पलिकडलं जगणं वाट्याला येतं, तिथून परतीचा कुठलाही मार्ग नाही याची जाणीव होते, तेव्हा हे सगळं संपावं,असं वाटणं आणि ते योग्य मार्गानं आंमलात आणता येणं शक्य व्हावं असं मनापासून वाटतं.

यासाठीचे कायदे कडक असावेत, पळवाटा नसाव्यात, अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. जोवर आपण त्या परिस्थितीत जात नाही तोवर काठावर बसून विरुध्द बाजूनं मुद्दे मांडणं सोपं आहे याची जाणीव आहे.

धाग्यावरील वाचकांना यासंबंधी असलेली अन्यत्र चर्चा वाचता यावी म्हणुन काही लिंक्स
१) परमसखा मृत्यू : किती आळवावा....
http://www.mr.upakram.org/node/1386

२) सुखांत
http://www.mr.upakram.org/node/2168

३) पुन्हा एकदा सुखांत!
http://www.mr.upakram.org/node/2491

४) सन्मानाने मरण्याचा हक्क
http://www.aisiakshare.com/node/3317

एकदम घरगुती घटना. आजी. वय वर्षे ९४. एक मधुमेह सोडला तर बाकि कसला आजार नाही. त्रास नाही. एक दिवस अन्न खाणे बंद केले. गोळ्या सुरुच. साखर एकदम कमी झाली. डोळे पांढरे झाले. लोकांना ओळखणे बंद केले. थोडी साखर दिल्यावर सगळे व्यवस्थित सुरु झाले. सगळ्यांना निरोप पाठवला. भावाने सांगितले कि दवाखान्यात न्यायला लागेल. बाकिच्यांच्या प्रतिक्रिया, आता तीची जगायची इच्छाच नाही. दवाखान्यात नेउन हाल कशाला करायचे? भावाने आणि मी निर्णय घेतला. भावाच्याच दवाखान्यात हलवले. सगळ्या टेस्ट केल्या. ४ दिवसात बरी झाली. तोंडावाटे अन्न घ्यायला सुरवात केली. आता ओके. पण दवाखान्यात नेली नसती तर बाजार संपलाच होता.

तर असा एक वेगळा इच्छामरणाचा मार्ग...... आणि खेडो पाडी प्रचलित. आता ९४ म्हणाल तर जो कायदा १४, २४ , ३४ , ...... तोच ९४ ला पाहिजे ना. पण या वयात तो थोडाफार वाकवला जातो.

रच्याकने: तिचे रिपोर्ट बघुन आय वॉज जलस. सगळे व्हायटल ऑरगन्स एक नं होते. माझे तरी या वयात इतके चांगले असतील का म्हणुन. द ओन्ली डिफरन्स इज स्ट्रेस डिफर्न्स कॅरीड / कॅरिंग.

Professor Goodall a 104 year old Australian was euthanased yesterday in Switzerland because in his state of Western Australia this procedure may not have been possible. My concern is essentially the same as expressed above and that is that the heirs can take decision to euthanase their old parent to lay their hands on the estate if the parent had any money or because they do not want to look after the parent because of medical costs or cannot afford to put the parent in a retirement home.

अक्षरनामामधे आलेला लेख:
http://www.aksharnama.com/client/article_detail/2070

आणि बिगुलमधे वाचलेली फेसबुक पोस्ट:
खूप हिंमतीनं आयुष्य जगलेली, मरणाला अनेकदा सामोरी गेलेली निधड्या छातीची वीर डेअरडेव्हील माणसं आत्महत्या करतात ते मरणाला घाबरून किंवा जीवनाला कंटाळून नाही, तर बंधनात जगणं आणि सहानुभूतीला नाकारून. ते जसं सुंदर आणि हवं तसं बेडर आयुष्य जगले तसं यापुढे त्यांना जगता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय असतो. त्यात पळपुटेपणा, भेदरटपणा किंवा घाबरण्याचा लवलेशहि नसतो. मला वाटत नाही या अवस्थेला डिप्रेशन म्हणता येईल. आपल्या स्वभावाप्रमाणे आता जगता येणार नाही आणि गलितगात्र होऊन इतरांवर, अगदी जवळच्या नातेवाइकांवर अवलंबून जगणं जमणार नाही, याची ती परखड जाणीव आणि कबुली असते. जगणं सुंदर कोणासाठी? जो हाती पायी धडधाकट त्यांच्यासाठी. प्रत्येक क्षणात वेदना अनुभवणाऱ्याला निराशेच्या गर्तेत गेलेला नाही म्हणता येत. कायदयाचं पालन व रक्षण करण्यात आयुष्य गेलेल्यांना असा आत्मघात बेकायदेशीर आहे हे काय समजत नसणार? पण स्वतःच्या जगण्याचा भार व निर्णय इतरांवर सोपवण्याची त्यांची तयारी नसावी, कारण तितकी सुद्धा कोणाचीहि सहानुभूती त्यांना सहन होत नसावी. खूप विचारांती असा टोकाचा निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी केली गेली असणार. पॉइंट ऑफ नो रिटर्न. कायदा जिवंत असेपर्यंतच लागू होतो. पलीकडे गेल्यावर नाही.
- समीरण वाळवेकर

अजून एक नुकतीच घडलेली कॅनडा तील घटना.

एका वृद्ध जोडप्याने ( वये ९५ व ९४) तेथील कायाद्यनुसार इच्छा मरण स्वीकारले. जर एखाद्याच्या गंभीर आजारामुळे मृत्यू अटळ असेल , असे डॉ चे मत असेल तर तिथे गोळ्या देऊन मृत्यू घडवण्यास परवानगी आहे.

अमेरिकेतील 2 राज्यांमध्ये साधारण असाच कायदा आहे. तिथे संबंधित व्यक्ती ही मरणासन्न अवस्थेत असावी लागते आणि मृत्यू 6 महिन्यांत होणार असे 2 डॉ चे प्रमाणपत्र लागते.

खरतर ईच्छामरण म्हणजे तरी काय आत्महत्याच ना आणि आत्महत्या हा असा गुन्हा आहेकी गुन्हा यशस्वी झाला तर शिक्षा काहीच नाही आणि असफल झाला तर मात्र कायद्याची कटकट मागे लगली म्हणून समजा ।ईच्छा मरणाला परवानगी देण्याचा प्रश्नच नाही कारण ज्याला मरणाची ईच्छा आहे तो सरळ परवानगी मागण्यापेक्षा सरळ आत्महत्या करतोच की पण मला वाटते की कायद्याने अशी परवानगी देवूच नये कारण याचा गैरवापरच जास्त होईल।

Pages