इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

Submitted by प्रमोद् ताम्बे on 21 April, 2014 - 03:26

इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत. या दोन वर्षात जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटण्यासाठी त्यांचेकडे गेलो त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. परंतु असे जीवन संपवणे याला कायदेशीर मान्यता नाही व तसे केल्यास ती आत्महत्या ठरेल व आयुष्यात त्यांनी कधीही कायदा मोडला नाही त्यामुळे तो मार्ग त्यांना वापरावयाचा नाही. जे काही करेन ते कायदेशीरच असले पाहिजे हा त्यांचा निश्चय आहे.
यावर आपले व्विचार काय आहेत ?
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्यमेव जयते च्या मागच्या सीझनमध्ये वृद्ध व्यक्तिंची काळजी आणि त्यांचे जीवन यासंबंधी एक एपिसोड होता. त्या मध्ये साऊथ इंडियामध्ये कुठेतरी म्हातार्‍यामाणसांना कसे मारतात हे गाववाल्यांनी सांगितले होते.

इच्छामरण कायदेशीर असावे.

अकु तुम्ही दिलेला परिच्छेद संदर्भ सोडून वाचला तर खात्या पित्या घरची मुले आपल्या घरातील वृद्ध माणसांना मारून टाकतात असे चित्र निर्माण होते जे खरे नाही. प्रचंड गरीबी हे कारण आहे ज्याचा लेखात उल्लेखही आहे. ज्या महिलेचा फोटो आहे तीही आपल्या मुलांना दोष देत नाहीये. कुम्भमेळ्यातही अशा काही वृद्ध व्यक्तींना सोडून देण्यात येते.

एस्किमो लोकात अशी पद्धत आहे की घरातील एखादी व्यक्ती अतिशय वृद्ध झाली तर रात्री त्या व्यक्तीच्या उशाशी एक दिवा लावून ठेवण्यात येतो. सकाळी त्या व्यक्तीने दिवा पाहिला की ती काय समजायचे ते समजते आणी घरातून बर्फात एका दिशेने वाट फुटेल तिथे चालत जाते. सारी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही हेच खरे.

आमच्या नात्यातील एका व्यक्तीला दीर्घायुष्याचा शाप होता. वाचन आणी लेखनात सारे जीवन व्यतीत करणार्‍या त्या तत्वनिष्ठ लेखकाला आयुष्याची शेवटची तीन एक वर्षे नरकयातना सहन कराव्या लागल्या. एखादे इंजेक्शन देऊन मला सोडवा आता अशी विनंती ते वारंवार करत. ऐन तिशीतला आपला एकुलता एक अविवाहीत मुलगा आपल्या उपचारावर पाण्यसारखा पैसा खर्च करतोय हे पाहून त्यांना संतापही येत असे.

सावरकरांनीही प्रायोपवेशन केलेच होते.

असा भारतात कायदा आला तर बरेच चेक्स आणी बॅलंसेस ठेवता येतील. दुरुपयोग होईल हा मुद्दा असेल तर असलेले सारेच कायदे बाद करावेत काय?

खालचा व्हिडिओ शॉकिंग वाटेल पण स्वित्झर्लंड मध्ये ही संघटना आहे. आपण तिथे गेलो की आपल्या आवडीच्या पदार्थात ( मी सिंगल माल्ट घेणार) एक जालीम औषध देतात आणी अर्ध्या तासात आपण वर जातो. On our Terms !

http://vimeo.com/45117068

पाळीव कुत्रे, मांजरे, घोडे यांनाही दयामरणाचा अधिकार आहे मग माणसांनीच अगदी शेवटपर्यंत तळमळत राहावे आणी आपल्या आप्तेष्टंना त्रास द्यावा हा अट्टाहास कशाला? त्यातून भारतात एकटे रहाणार्‍या वृद्ध व्यक्तींची संख्या वाढतच जाणार आहे. सारे अभिनिवेश आणी इमोशनल विचार बाजूला ठेवून या समस्येचा तर्कशुद्ध विचार होणे जरूरीचे आहे. भारतीय दर्शनाप्रमाणे तर आपल देह हा आत्म्यावर पांघरलेला केवळ एक कपडा आहे. एखाद्या माणसाने जुने जीर्ण कपडे टाकून नवे घेतात तसेच आत्म्याभोवतीचा हा जीर्ण कपडा टाकून नव्या जन्माकडे किंवा मोक्षाकडे प्रयाण केले तर तो त्याचा अधिकार असायला हवा.

vijaykulkarni ,

व्हिडिओ मनाविरूद्ध का होईना पण आवडला.मरणाचे ग्लोरिफिकेशन छान केले आहे.पण अंतिमक्षणी मला वाचव, जगायचे आहे असे म्हट्ले तर काय?

पण तरीही माझ्या आईला मी अशी संपवू शकणार नाहीच.

Uhoh व्हीडीओ आवडला????????

मरणाची आत्यंतीक इच्छा हे फक्त डीप डीप्रेशन असु शकतं. रस्त्यावर चौका चौकात जर बघितलेत तर कितीतरी म्हातारे भिकारी अगदी चालता हालता न येणारे भिक मागुन जगत असतात. हा व्हिडीओ म्हणजे जस्ट कॉम्बो ऑफ स्विसाइड अँड मर्डर..... जमल तर इथुन काढुन टाका..... बॉर्डर लाइनवाल्यांना उगाच काहितरी घरच्या घरी इन्स्पिरेशन नको.

अकू, भयानक आहे हे सगळे.

(अन याला धर्मशास्त्रीय आधार नाही! त्यामुले उगाच कुणी लगेच हिन्दुधर्माबद्दल बोम्ब मारायची सन्धी साधू नये)

>>>>> भारतीय दर्शनाप्रमाणे तर आपल देह हा आत्म्यावर पांघरलेला केवळ एक कपडा आहे. एखाद्या माणसाने जुने जीर्ण कपडे टाकून नवे घेतात तसेच आत्म्याभोवतीचा हा जीर्ण कपडा टाकून नव्या जन्माकडे किंवा मोक्षाकडे प्रयाण केले तर तो त्याचा अधिकार असायला हवा. <<<<<
विकु, सोईपुरते हिन्दुधर्मातील भारतीय दर्शनाचे अर्धवट दाखले नकोत. एक शरीर जाऊन दुसरा देह/शरिर धारण होणे ही पुनरपि जननं पुनरपि मरणं कल्पना असलि तरी "दुसर्‍यान्चे मदतीने/संमतीने देहत्याग" वगैरे कल्पना मान्य नाहीत. ती कृती सम्पुर्णतः व्यक्तिगत आहेच, शिवाय ये जन्मीची सर्व कर्तव्ये पार पाडल्यानंतर "वानप्रस्थाश्रम" नामक प्रकारात जाऊन करायची आहेत.
या देशात एकेकाळी प्रथा होती/अजुनही खानदानी घरात आहे की दारची गुरे म्हातारी झाली तरी दावणीलाच मरु द्यायची, तोवर त्यान्ना खाऊपिऊ घालायचे, कसाई/खाटकाचे हाति सोडायचे नाही वा मरायला मोकाट सोडायच्वे नाही. गुरांची ही कथा तर माणसांचे बाबतीत त्यान्ना त्यान्चा आता "व्यावहारिक" उपयोग नाही म्हणून युज अन थ्रो या स्टाईलने मरु द्यावे ही कल्पनाच मुळात भारतीय नाही, अन त्याला सोईस्कररित्या शरिर म्हणजे कपडा वगैरे तत्वज्ञान ढिगळासारखे चिकटवणे अमान्य होते. कारण हे तत्वज्ञान माणसाचे मनातील मृत्युची भिती घालविण्यासाठी आहे, पण उठा अन जाऊन उठसुठ मरु लागा असे सान्गण्याकरता नाही, किम्बहुना आत्महत्या हे पापच मानले गेले आहे.

आत्यंतिक गरिबी हे देखिल कुटुम्बातील मानूस मारण्याचे कारण ठरत नाही, सोईने ते वापरले जाते. अन्नान्न दशा असलेल्या आमच्या मागच्या पिढ्यान्च्या इतिहासात डोकावले तर कुणी घरच्या म्हातार्‍यान्ना मरायला सोडले/मारले असे झालेले नाही, तर एक तीळ सात जणात वाटून खावा या धर्तीने जे आयुष्य गरिबीचे वाट्या ला आलय त्यातच सुखाने कोन्ड्याचा मान्डा करुन लोक जगलेत. उगा कोणत्या अपवादात्मक विकृत लोकान्चे प्रथान्ना/चालिरितीन्ना व्यावहाराची झूल चढवौन नियम बनवायला जाणे घातक ठरेल असे मला वाटते.
असो.
यापेक्षा, स्वातन्त्र्यानन्तर ६० वर्षान्नीदेखिल "अन्नसुरक्षा" नामक प्रकल्प का राबवायला लागतात याचा व्यावहारिक विचार केला तर बरे! स्वातन्त्र्यानन्तर ६० वर्षान्नी वैद्यकीय शिक्षण अन उपचार केवळ "श्रीमन्तान्नाच" परवडू शकतील अशी परिस्थिती का याचा इव्चार व्हावा, न की जीवन्त माणसान्ना मारण्याच्या नियमान्चा!

हां, एक खरे की कम्युनिस्ट राजवट जर आली तर मात्र अमुक वर्षानन्तर व्यक्ति जशी नोकरीतून निवृत्त होते तसे अमुक वयानन्तर "जीवनातुन" "निवृत्त" होण्याचा कायदा आला तर मला विशेष वाटणार नाही. कम्युनिस्ट अन जोडीला आत्यन्तिक नफेखोर अशा भान्डवलशाही विचारसरणीला असले कायदे करण्याचे विचार सुचू शकतात. Happy
माझे मते कम्युनिस्ट अन भान्डवलशाही व्यवस्था एकमेकान्चे जोडीने, एकमेकान्वर अवलम्बुन समान्तर जात रहातात. त्या एकमेकान्चे उगमाचे निमित्त ठरतात, व एकमेकान्चे विध्वन्सालाही कारणीभूत ठरतात. व दोन्ही व्यवस्थेमधे सामान्य माणसाचे स्थान केवळ अन केवळ के उपयोगी वस्तू, उपयोग होतो तोवर कमितकमी मोबदल्यात्/खर्चात वापरा अन नन्तर फेकुन द्या असे असते.

कायदा हा कायम लोकांच्या मागणीतून, सांगोपांग चर्चा-विवाद व जागृतीतून, त्या त्या वेळची परिस्थिती पाहून व त्या कायद्याच्या दीर्घकालीन परिणामांची चाचपणी करून निर्माण केलेला असावा. तसेच त्या कायद्याचा गैरवापर होणार नाही यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली असावी. अशी परिस्थिती सध्या तरी भारतात दिसून येत नाही.
मथुरेला किंवा वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना / क्षेत्रांना भेट दिलीत तर तिथे घरच्यांनी सोडलेले अनेक वृद्ध दिसतात.
वृद्ध हे 'व्हल्नरेबल ग्रुप' मध्ये (भारतात तरी!) येतात असे माझे मत. दक्षिण भारतातल्या प्रथेमध्ये तेथील लोकांची गरीबी हे मुख्य कारण आहे असे मानण्यास कारण आहे. पण मग खडतर आर्थिक परिस्थितीतील वृद्धांसाठी एक कायदा आणि धनवान वृद्धांसाठी दुसरा कायदा असे करून चालणार नाही. गरीब वृद्धांचे मरण हे खरोखरी 'इच्छामरण' किंवा 'स्वेच्छामरण' होते की त्यांना तसे करण्यास भाग पाडले गेले याचा निवाडा करणे अशा वृद्धांच्या संख्याबळामुळे अवघड व अशक्य होईल.

एस्किमोंबद्दल (त्यांच्यातल्या प्रथेबद्दल) बरेच वाद प्रतिवाद आहेत. त्यांच्याकडे असे उपाय बिकट परिस्थितीत केले जायचे व तेव्हाही अनेक 'सोडलेले' वृद्ध आपल्या टोळीकडे परत जाऊ शकायचे व पुन्हा आपल्या कुटुंबाबरोबर राहू शकायचे. संदर्भ : http://www.theinitialjourney.com/features/eskimos_01.html

मरणाची आत्यंतीक इच्छा हे फक्त डीप डीप्रेशन असु शकतं.
हे खरे आहे.
सारे अभिनिवेश आणी इमोशनल विचार बाजूला ठेवून या समस्येचा तर्कशुद्ध विचार होणे जरूरीचे आहे. असा भारतात कायदा आला तर बरेच चेक्स आणी बॅलंसेस ठेवता येतील. दुरुपयोग होईल हा मुद्दा असेल तर असलेले सारेच कायदे बाद करावेत काय?

या दोन्ही मुद्द्यांशी सहमत!

विकु, सोईपुरते हिन्दुधर्मातील भारतीय दर्शनाचे अर्धवट दाखले नकोत.
अगदी बरोबर. उगाचच आपण बुप्रा वादी म्हणवून घ्यायचे, धर्माचा अभ्यास करायचा नाही, नि अर्धवट दा़खले द्यायचे. गीतेत स्पष्ट म्हंटले आहे,
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय, शितोष्णसुखदु:खदा
आगमापायनानित्यं तांतिक्षस्व भारत.
घ्या, याचा अर्थ मुकाट्याने देहाचे भोग सहन करा.
ताकद नसते अंगात धर्म नीट पाळण्याची, मग बुप्रा वादी म्हणवायचे. पण कुठल्या ना कुठल्या धर्माची कुबडी लागतेच. मग त्यांचे अर्धवट वाचन करायचे. नि काय वाट्टेल ते लिहायचे.

ज्यांच्याजवळ खूप पैसे आहेत त्यांच्याबाबतीत कोर्टकचेर्‍या होऊ शकतात. जे खूप विचारवंत, ज्ञानी, अत्यंत सहृदय असतात त्यांना भावनिक अडचणी येतात जसे वरील
आमच्या नात्यातील एका व्यक्तीला .......... संतापही येत असे.

मी पण माझ्यासाठी हा विचार बराच केला आहे, नि काय करायचे हा निर्णय घेऊन टाकला आहे. व तो माझ्या आजूबाजूच्या सर्वांना नीट समजावून सांगितला आहे.
सुदैवाने माझे आयुष्य अत्यंत साधे. लोभ व्हावा एव्हढा पैसा नाही, मी विचारवंत, सहृदय वगैरे नसल्याने असल्याने त्यात या दोन्ही अडचणी येऊ नयेत असे वाटते.

वि.सू. मला हिंदूच काय कुठलाच धर्म नीट समजला नाही. म्हणून मी मा़झाच एक धर्म फक्त माझ्यापुरता केला. अर्थातच नवीन काहीच नाही त्यात. सगळे काही सगळ्या धर्मात सांगून झालेच आहे. आपण आपल्यापुरता त्यातून अर्थ शोधावा.

>>मरणाचे ग्लोरिफिकेशन छान केले आहे.पण अंतिमक्षणी मला वाचव, जगायचे आहे असे म्हट्ले तर काय?

हे मरणाचे ग्लोरिफिकेशन नाही. ते औषध देण्यापूर्वी वेटिंग पिरियड असतो आणी व्यवस्थीत मुलाखत घेतली जाते. औषध देण्यापूर्वी पुन्हा एकदा विचारतात. नको म्हणले तर लग्नातल्या पंगतीसारखा आग्रह करत नाहीत.

> पण तरीही माझ्या आईला मी अशी संपवू शकणार नाहीच.
हे कळले नाही. हे औषध घ्ययचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीचा असतो. एखाद्या मुलाने आमच्या आईला हे औषध द्या असे सांगितले तरीही ते देत नहीत.

>मरणाची आत्यंतीक इच्छा हे फक्त डीप डीप्रेशन असु शकतं.

हे विधान इतक्या छातीठोकपणे कसे करता येइल? एखादे संशोधन किंवा पहाणी झाली आहे का?
परिस्थितीमुळे आलेल्या क्षणिक उद्वेगाने आलेला आत्महत्या करण्याचा विचार आणी आयुष्यात जे करायचे ते करून झाले आता माझा इतरांना त्रास नको या भावनेतून विचारपूर्वक आलेला निर्णय यात काहीच फरक नाही? सावरकर डीप दिप्रेशन मध्ये होते ? अध्यात्मिक क्षेत्रातील कितितरी लोकांनी आपले अवतारकार्य संपल्यावर स्वेच्छेने संजीवन समाधी घेतली आहेच. सुदैवाने ते याला धर्मशास्त्रीय आधार आहे का हे विचारायला माबोवर आले नव्हते.

हे कळले नाही. हे औषध घ्ययचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी त्या व्यक्तीचा असतो. ............माझ्या आईने जरी
हा निर्णय घेतला तरी मी तो अंमलात आणू देणार नाही एवढाच त्याचा अर्थ! अशावेळी तिची इच्छा गेली उडत!
नको म्हणले तर लग्नातल्या पंगतीसारखा आग्रह करत नाहीत....औषध घेतल्यानंतर जर एखादा/एखादीला वाटले
नको ,मला जगायचे आहे तर काय उपाय आहे?

ते औषध देण्यापूर्वी वेटिंग पिरियड असतो आणी व्यवस्थीत मुलाखत घेतली जाते>>>>> काय राव स्टेटमेंट करताय. आता किती लोक असतील (मला तर वाटतय कोणीच नसेल) कि ज्यांना वाटत्य कि माझ कार्य समाप्त झालय आता माझा अवतार आवरता घ्यावा. या लेवलला येणारे १०० % लोक हे त्रस्तच असु शकतात. कशानेही अगदी सगळे आपल्याला 'इग्नोर' करतात यानेही. अश्या व्यक्तीची मुलाखत घेण्यार्‍या व्यक्तीला देखिल डिप्रेशन येउन घेणारी व्यक्तीदेखिल त्यांच्याबरोबर जायला तयार होइल. जोक अपार्ट पण त्या मानसिकतेत घेतलेल्या निर्णायाला त्यांचा 'योग्य' निर्णय म्हणता येणार नाही.

>मरणाची आत्यंतीक इच्छा हे फक्त डीप डीप्रेशन असु शकतं.>>> दुसर काय असत पटवुन द्या फक्त पुराणातले दाखले सोडुन. तुम्हाला पट्त नसेल तर अगदी उदाहरणासह पटवुन देतो . याचे माझ्याकडॅ ताज ताज उदाहरण आहे.

>>>>> सावरकर डीप दिप्रेशन मध्ये होते ? अध्यात्मिक क्षेत्रातील कितितरी लोकांनी आपले अवतारकार्य संपल्यावर स्वेच्छेने संजीवन समाधी घेतली आहेच. सुदैवाने ते याला धर्मशास्त्रीय आधार आहे का हे विचारायला माबोवर आले नव्हते. <<<<
विकु, सोईस्कररित्या या हिन्दुत्ववाद्यांची/ अध्यात्मिक दृष्ट्या प्रगत व्यक्तिंची उदाहरणे चुकिच्या पद्धतीने चुकीच्या जागी द्यायचे काही तुम्ही थाम्बवीत नाही! Proud

सावरकर किन्वा अध्यात्मिक क्षेत्रातिल व्यक्ति मायबोलीवर आल्या नाही, पण अशा कोणत्या "कायद्याच्या" अंमलात येण्याचीही वाट बघत बसल्या नाहीत. व्यक्तिशः त्यांचा त्यांनी निर्णय घेतला व धर्मशास्त्रीय सुयोग्य अशा पद्धतींचा वापर करीत देहत्याग केला, तुमचे इच्छामरणाचे कायदे बनण्याचि वाट बघितली नाही हे सोईस्कर विसरु नका.

देहत्यागासाठी ज्यान्ना कायद्याच्या वा अन्य कोणत्या कुबडीचा आधार लागतो, तर त्यामागिल मानसिक स्थितीची तुलना वरील सावरकरादिक व अध्यात्मिक अधिकारी व्यक्तिंशी करायची चूक करु नका

डीप डिप्रेशनवाले तर तुमचा तो वेटीन्ग पिरियड इतकेही थाम्बु शकत नाहीत, तत्काळ आत्महत्येची कृति करुन मोकळे होतात! आता या तत्काळ कृतिला जरा "नियमबद्धता - प्रोसिजर - प्रथास्वरुप" व "सरकारी कोन्दण" देण्याची कुणाची इच्छा असेल व म्हणून असले आचरट व अवसानघातकी कायदे मागत असाल तर बाब वेगळी.

माझ्या नजरेसमोर दृष्य तरळले कि सुलभ शौचाल्यासारखे जागोजागी सुलभ आत्महत्यालय उभारलीहेत, अन मरणाची "घाई" झालेले लोक रान्गा लावुन आपला नम्बर येण्याची वाट बघताहेत........ Proud
आत्यन्तिक भान्डवलदारी वा कम्युनिस्ट वा माऑवादी वा अशाच कोणत्या टोकाच्या ब्रिगेडी राजवटीत असे घडूही शकेल, कुणी सान्गावे? Wink

घरादारातील भन्गार गोळाकरुन, वा निरुपयोगी कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जशी व्यवस्था असते, तशी "निरुपयोगी, म्हातार्‍या कोतार्‍या, खायला काळ अन भुईला भार, नातेवाईकान्वर "बोझ" बनलेल्या, आजारी , खुरन्गटलेल्या, काडीचाही उपयोग नसलेल्या, भन्गार" लोकान्च्या विल्हेवाटीची "रास्त कायदेशीर व्यवस्था लावण्याचे" कार्य मात्र अशा कायद्यान्नी नक्की साध्य होईल.

सोईपुरते हिन्दुधर्मातील भारतीय दर्शनाचे अर्धवट दाखले नकोत. एक शरीर जाऊन दुसरा देह/शरिर धारण होणे ही पुनरपि जननं पुनरपि मरणं कल्पना असलि तरी "दुसर्‍यान्चे मदतीने/संमतीने देहत्याग" वगैरे कल्पना मान्य नाहीत.

कै तरीच काय लिंब्या! तुमचे रामभाऊ धडधाकट शरीर असताना नदीत स्वतःला बुडवून संपले. कुंती- गांधारी - ध्रुतराष्ट्र हेही स्वमर्जीने वणव्यात गेले. सावरकरही प्रायोपवेशन करुन गेले. जर हिंदु धर्मात अशा प्रथा नव्हत्या , तर या प्रथा कोणत्या देशातील / धर्मातील ? आणि जर अशा प्रथाच तुमच्या धर्मात नाहीत , तर प्रायोपवेशन हा शब्द तरी तुमच्या धर्मात का निर्माण व्हावा नै का?

आपल्या धर्मातील लोक ' आत्महत्या ' करुन गेले तर ती आत्महत्या नव्हती, देहत्याग होता , वगैरे बडबड आणि आता कुणी असे करु पहातोय, तर त्याला मात्र ब्रिगेडी, समाजवादी, कम्युनिस्ट .. काहीही लेबल लावून घोर पातक ठरवायचे.. लिबू, असा दुजाभाव का करतोस?

लक्ष्मी, त्यांनी केली तर 'आत्महत्या' आम्ही केली तर मात्र तो 'देहत्याग'. त्यांनी केली तर ती 'लबाडी' आम्ही केली तर मात्र स्ट्रॅटिजी. त्यांनी केले तर ते 'चाळे' आम्ही केले तर ती क्रीडा/लीला
आत्महत्येला आपल्याकडे पळपुटे पणा म्हटले गेल्याने एक काळी छटा आहे. साने गुरुजींचा मृत्युचा उल्लेख टाळला जातो.
जन्माला घालण्यात वैद्यकशास्त्राचा हस्तक्षेप चालतो तर मरताना का नको? जगण्याचा अधिकार आहे पण मरण्याचा नाही हा भोंगळपणा फार काळ चालणार नाही. काही काळाने ( किती ते माहित नाही) इच्छामरण व दयामरण हे समाजात मान्य होणार आहेच.

सगळेजण इच्छामरणाबाबत बोलत आहेत.

पण डी एन आर बाबत कुणीच कसे लिहिले नाही?

एखादा गंभीर आजारी पेशंट दवाखान्यात अ‍ॅड्मिट असेल, तर डी एन आर ची कायदेशीर सुविधा आहे. म्हणजे डू नॉट रिससिटेट . गंभीर आजारी असलेल्या पेशंटलाही इमर्जेन्सी उपचार देऊन जगवण्याचा प्रयत्न हॉस्पिटल करते. तसे करु नये, म्हणून ही लेखी कन्सेंट असते. म्हणजे पेशंटवर अगदी किमान उपचारच सुरु ठेवावेत. त्याला डी सी शॉक, आय सी यु वगैरे देऊ नये. शांतपणे वॉर्डातच मरु द्यावे. याबबत ती लेखी कन्सेंट असते.

ही कन्सेंट पेशंट किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक साइन करु शकतात.

ही प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर आहे.

( लिंबुसाठी विषेष सूचना : सर्व जाती धर्माच्या लोकांनी अशी कन्सेंट दिल्याचे मी पाहिले आहे. यात ब्राह्मण, क्षत्रिय, परधर्मीय , मोदीवाले, हातवाले, धनुश्यवाले... सर्व सर्व असतात. ही केवळ ब्रिगेडी, कम्युनिस्ट, भांडवलशाहीवाले... इ इ कुणाची मक्तेदारी नाही. )

माझ माहेर हे तीर्थक्षेत्री आहे . अतिशय वृद्ध लोकांना त्यांच्या घराचे लोक अगदी चकाचक चारचाक्या मधून आणून सोडतात हे पाहिलं आहे . फार कीव यायची . Sad सगळ्यांनी जमल्यास अतुल कुलकर्णी अभिनित सुखांत हा पिक्चर जरूर पहा आणि मग पुन्हा चर्चा करायला या . अंथरुणावर खिळून पुढे किती आयुष्य आहे हे माहित नसताना जगणे म्हणजे नरक यातनाच वाटत असाव्यात . काय सुंदर काम केल आहे सगळ्यांनीच त्या चित्रपटात . दुर्दैवाने असे चित्रपट जास्ती जास्त लोकांसमोर येत नाहीत . कधी येउन जातात ते कळतही नाही . मी इथे कुठल्याही गोष्टीच समर्थन करत नाही पण मी अस आयुष्य कधीच जगू शकणार नाही हे ही तितकच खर . किती दिवस आजूबाजूचे लोक आपल अगदी प्रेमाने आनंदाने करतील ? आणि खरतर माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला चित्रपट पाहून .

>>सगळ्यांनी जमल्यास अतुल कुलकर्णी अभिनित सुखांत हा पिक्चर जरूर पहा आणि मग पुन्हा चर्चा करायला या .<<
दिव्यश्री ,वरच्या प्रतिसादात सुखांत विशयी उल्लेख केला आहे. http://www.maayboli.com/node/12105 इथे सुखांत चा परिचय व परिसंवादाची माहिती दिली आहे.

आपल्या धर्मातील लोक ' आत्महत्या ' करुन गेले तर ती आत्महत्या नव्हती, देहत्याग होता , वगैरे बडबड आणि आता कुणी असे करु पहातोय, तर त्याला मात्र ब्रिगेडी, समाजवादी, कम्युनिस्ट .. काहीही लेबल लावून घोर पातक ठरवायचे.. लिबू, असा दुजाभाव का करतोस?

खरे आहे.

या विषयात धर्म, राजकारण यांचा दुरूनहि संबंध नाही असे मला वाटते.
धर्म नक्की काय आहे हे कोण ठरवणार? निदान हिंदू धर्मात तरी, पोप सारखे जे शंकराचार्य म्हणतात, त्यांचे तरी कोण ऐकतो. नि पोपला सुद्धा अनेक ख्रिश्चनच मानत नाहीत.
राजकारणाबद्दल तर बोलूच नये.
कायदा म्हणावे तर कुणिहि मनुष्याने कायदा केला तरी त्यात पळवाटा काढणारा मनुष्य दिसतोच. तो शेवटी स्वतःच्या मनासारखेच करून घेतो.
तेंव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घ्यावेत.
प्रत्येक जीवनाला काही ना काही अर्थ असतो, पण त्याला हि कालमर्यादा असतातच. नि त्या मर्यादा ओलांडल्यावर त्या जीवनाचा अर्थ जर आपला आपल्याला कळले नाही तर जे व्हायचे ते होणारच.
तेंव्हा जगण्याची मानसिक, शारीरिक क्षमता नष्ट होण्यापूर्वी एव्हढे तरी समजून घ्यावे.

ही कन्सेंट पेशंट किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक साइन करु शकतात. <<
ही कन्सेंट पेशंट स्वतः चांगल्या अवस्थेत असतानाच साइन करू शकतो का?
म्हणजे अश्या वेळेला जेव्हा पेशंटला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, आपण निरोगी आयुष्य जगू शकणार नाही याची कल्पना आहे, मृत्यू जवळ आहे हे ही माहितीये पण मेंदू ढासळायला सुरूवात झालेली नाही. त्या परिस्थितीत पेशंट स्वत:च डि एन आर साइन करू शकतात का?

म्हणजे अश्या वेळेला जेव्हा पेशंटला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, आपण निरोगी आयुष्य जगू शकणार नाही याची कल्पना आहे, मृत्यू जवळ आहे हे ही माहितीये पण मेंदू ढासळायला सुरूवात झालेली नाही. त्या परिस्थितीत पेशंट स्वत:च डि एन आर साइन करू शकतात का?<<<

हे काही परदेशात होते हे नक्की माहीत आहे, खरे तर आजारी अजिबात नसतानाही मनुष्य स्वतःसाठी असे लिहून ठेवू शकतो (हेरॉईक मेजर्सने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू नये).

अकु ने जे लिहिल आहे ते सत्यमेव जयते च्या एका भागात दाखवल होते
माझ्या आठवणीप्रमाणे दक्षिणेकडील राज्यात ही प्रथा आहे

लिविंग विल आणि जोडीला ड्युरेबल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देऊन हे करता येते. यात आपण खूप आजारी झाल्यास काय करावे ते लिहिता येते तसेच आपल्या ट्रिटमेंट संबंधी शेवटचा निर्णय कुणी घ्यावा त्या बाबत नातेवाईकास अधिकार देता येतात.

स्वाती२ - +१
माझ्या आजोबांनी त्यांच्यावर असे कोणत्याही प्रकारचे फ़क़्त जिवंत ठेवण्यासाठी उपचार करू नये असे लिहून ठेवले होते. शक्यतो रुग्णालयात हलवू नये असे सांगून ठेवले होते. दुर्दैवाने ते घरात पडले, आणि मेंदू मध्ये रक्तस्त्राव झाला (हे निदान रुग्णालयातच झाले) काही अल्प काळासाठी त्याना तेथे ठेवले.
पण अपघातानंतर रुग्णालयात हलवावे का कसे? हा निर्णय घेताना आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो, ते अर्धवट शुद्धीत होते, तेव्हाची आजी/आई/ मामा आणि सगळ्याचीच मनस्थिती फार विचित्र होती. त्यांच्या इच्छेचा मान ठेवत आपल्या जवळच्या माणसाला असं बघण खूप जास्त कठीण आहे. आजीने पुढाकार घेउन त्यांची इच्छा हा निर्णय घेतला.

Pages