तुझी तीच तीच उदयाची स्टोरी इथे रिपिट होणार नाही. कसा राजेश खन्ना अस्ताला गेला आणि कसा दीवार आणि जंजीरमुळे तू महानायकपदाच्या मार्गाला लागलास ते अख्ख्या भारताला आणि जगालाही माहीत आहे.
मी ज्या पिढीत जन्मलो ती संपूर्ण पिढी निव्वळ तुझ्या प्रभावात वाढलेली आहे. तेव्हा चित्रपट हे जीवनातील प्रमुख आकर्षणांपैकी एक होते. त्यातच एकदा तर अशी अवस्था होती की एकाचवेळी अनेक थिएटर्समध्ये तुझे एकामागोमाग एक पिक्चर्स येऊन सुपरहिट्ट जात होते. तुझ्या यशाच्या आलेखाची चढती कमान होती. सुवर्णकाळ होता तो तुझ्या कारकीर्दीचा! लहानपणी घडलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनेचा अनेक वर्षांनी सूड घेणे अशा प्रकारचा प्रवासही अनेक चित्रपटांमध्ये आला. संजीवकुमार, दिलीपकुमार, प्राण ह्या असामान्य आणि तुझ्या पिढीतील इतर सामान्य अभिनेत्यांना तू पडद्यावर तुझ्या भव्यदिव्य प्रतिमेने खाऊन टाकायचास.
राजकारणातही उतरलास. चक्क बहुगुणांनाच हरवलेस. अलाहाबादच्या तरुणी तुझी प्रचाराची गाडी जाणार असेल त्या रस्त्यावर स्वतःचे दुपट्टे अंथरून ठेवायच्या. बोफोर्समध्येही नांव आले.
तुला अपघात झाला तेव्हा भारत हळहळला. लाखो लोकांनी तुझ्यासाठी प्रार्थना केल्या.
तुझी एबीसी कंपनी जोरात सुरू झाली आणि त्यापेक्षा जोरात कोसळली.
मग त्या कंपनीचे कर्ज डोक्यावर असताना तू कौन बनेगा करोडपतीने घराघरात पोचलास ते एक नवीनच रुपडे घेऊन! प्रौढ वयाचा महानायक, पांढरी दाढी, चष्मा वगैरे! वयामुळे जादू कमी होण्याऐवजी तुझी जादू दसपटीने वाढली. तुझे सगळे कर्ज तर फिटलेच, वर तू पुन्हा अब्जाधीशही झालास. एका टीव्ही मालिकेचा टी आर पी इतका झाला की त्या काळात सुपरस्टार समजले जाणारे यच्चयावत हिरो पुन्हा सामान्य वाटू लागले.
अरे हो, मनातले एक सांगायचे राहिलेच! तुझे नव्वदच्या सुमारास आलेले दोन चार टुकार सिनेमे आणि तुझे दिसू लागलेले वय जेव्हा चित्रपटसृष्टीने निरखले तेव्हा उतरती कळा लागल्याचे सर्वांनी मान्य केले. तर मनातील गोष्ट अशी, की केवळ तुझ्या कारकीर्दीला उतरती कळा लागली म्हणून सगळे अनिल कपूर्स, जॅकी श्रॉफ्स, सनी देवल्स, संजय दत्त्स, खानावळ, कपूर्स, कुमार्स, शेट्टीज, देवगण्स, ऋत्विक्स हे सहन करून घ्यावे लागत होते. नंतर नंतर तेच फक्त उपलब्ध असल्यामुळे आपोआपच ते केव्हा गोड वाटू लागले कळलेच नाही. तुझे चिरंजीवही शेवटी कारकीर्द आटोपून शांत झाले.
पण केबीसीने इतिहास घडवला व ती तो घडवत राहिलीही! आजही घडवत आहे. पण आजकाल केबीसीमध्ये येणारे सामान्य नागरीक तुझी खुषमस्करी थोडी कृत्रिम व अतीच करत आहेत. पूर्वी तुझी होत असलेली स्तुती पाहून आमच्याच अंगावर मुठभर मांस चढायचे. हल्ली त्यांनी केबीसीमध्ये तुझी स्तुती करणे हे जणू यू एस पी झालेले आहे.
तर ते असो! मुद्दा असा..... की....
आता तुझा उबग आला आहे. कधी वाटले नव्हते तुझाही उबग येईल असे! पण नवरत्न तेल काय, मोबाईल काय, स्कूटर काय, न्हावी काय होतोस, लीकेज प्रूफ मटेरिअल काय, अक्षरशः वाट्टेल त्या जाहिराती करत सुटला आहेस. इतके करून प्रत्येक जाहिरातीतील तुझी बोलण्याची शैली तीच, जी वर्षानुवर्षे केबीसीमध्ये आम्ही पाहत आलेलो आहोत. एक ठरवून बनवलेली मिश्कील शैली, डोळे बारीक करून मिश्कील हसत काहीतरी उद्बोधक विधाने करणे, हलकासा उपहास वगैरे!
नटवरलाल, डॉन, दिवार, जंजीर, त्रिशुल, शराबी व तत्सम चित्रपटांमधील तू अजूनही डोक्यात रुतून बसलेला आहेस. तसे परत होणे शक्य नाहीच कारण आता वय झाले, पण निदान भलतेच काहीतरी तरी होऊ नकोस.
========
तुझा एक निस्सीम, निस्सीम चाहता
>>हा शहारुख की शहामृग कोण?
>>हा शहारुख की शहामृग कोण? तोच का ज्याला अमेरिकेत अतिरेकी म्हणून येउ देत नाहीत? मग त्याचे सिनेमे कशाला बघता?<<
(वर्ल्डकप मध्ये अब्दुर रझाकने तेंडल्याची कॅच सोडल्यावर संतापलेल्या वसिम अक्रम्च्या रिअॅक्शन्चा संदर्भ)
नंदुशेट, तुम्हे पता है तुमने किस्को फुल्टॉस दिया है...
>>दत्तू +1
>>दत्तू +1
मला अस वाटत की आपल्याला कधी
मला अस वाटत की आपल्याला कधी ना कधी तरी काम बंद करून आहे त्या पुंजीवर जगायला लागणार आहे याचा विचार जर तरुण पणात केला असता तर अमिताभ यांना अशा जाहिराती करून पोट भरायची वेळ आली नसती. >> नाही हो! तस काही नसत, ही सगळी व्यावसायिक गणीत असतात, मुबैत दोन बन्गले आणी अनेक फ्लॅटस , अनेक लक्झरी गाड्या, इतरही देशात घर हे काय पोट्भरु लोकान्ची काम आहेत का?(जया बच्चान राज्यसभा सभासद आहे त्याना त्याचा पगार असणार आणी )त्यावर काय कुटुन्ब चालत का? तो सतत दिसतो म्हणून तक्रार करण्यापेक्षा यावयातही इतका डिस्प्लिन आहे , उत्साही, अॅलर्ट आणी डाउन टु अर्थ आहे.
५-१० मुव्हिज मधे ओव्हरअॅक्टिन्ग करुन यच्चयावत अॅवार्ड आणी इन्टर्व्युज मधे माजोरडा मीपणा करणार्या स्वयशोषित बासशाहपेक्षाहा खराखुरा शहेनशहा आजही शतपटिने उजवाच आहे.
त्याने फुटकळ जाहिराति का कराव्यात याबाबत त्याच्या काही वेग्ळ्या कमिट्मेन्ट असतिल , ४ जाहिराती आवडल्या नाही म्हणून बच्चन मोडित निघत नाही.
४ जाहिराती आवडल्या नाही
४ जाहिराती आवडल्या नाही म्हणून बच्चन मोडित निघत नाही.
>>>
या चार जाहीराती त्याच्या तारुण्यात आवडल्या नसत्या तर मोडीत निघाला नसता. पण तेच दुसरया टप्प्यात झाले तर हा निष्कर्श काढायची लोकांना घाई होते. अर्थात हे हुमायुन नेचर आहे. हे असेच होते.
क्रिकेटचा संदर्भ देत उदाहरणे द्यायचे झाल्यास सचिनच्या प्रदीर्घ कारकिर्दीत वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याला बॅडपॅच आला तर लोकांचा विश्वास असतो की हा फक्त बॅडपॅच आहे. हा काळ जाईल. सचिन कमबॅक करेलच. पण हाच बॅडपॅच वयाच्या तेहतिसाव्या वर्षी येताच आता सचिन म्हातारा झाला आहे. त्याचे रिफ्लेक्सेस मंदावलेत. बॉडी थकली आहे. आता त्याने निवृत्त व्हावी अशी चर्चा सुरू होते आणि गंमत म्हणजे सचिनच्या चाहत्यांनाही ते पटते. पण खरे काय ते सचिनलाच ठाऊक असते. आणि त्यामुळेच तो लोकांच्या टिप्पणीला न जुमानता खेळत राहतो आणि कमबॅक करतो.
हे प्रत्यक्षात सचिनशी सुद्धा घडले आहे, आणि आता धोनीशीही घडत आहे... सचिनबाबत मी सुद्धा एकेकाळी सचिन संपला असे समजणारयांमध्ये होतो. पण धोनीबाबत मात्र मला अक्कल आली. जर धोनी स्वत: ठरवतोय तो खेळू शकणार तर तो पुढचा वर्ल्डकप खेळणारच. आणि मधल्या काही वाईट काळानंतर तो पुन्हा रंगात आलेला आता दिसतेच आहे. दूर कश्याला जा परवाचाच सामना ज्यांनी पाहिला त्यांना वेगळे काही सांगायला नको..
बाकी चाहत्यांच्या उलटसुलट चर्चा चालूच राहणार. हिच तर खरी मजा आहे. फक्त ती पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करणारी नसावी..
एका मुलाखतीमधे (बहुतेक सिमी
एका मुलाखतीमधे (बहुतेक सिमी गरेवालने घेतलेल्या) बच्चनसाहेबांनी ९०च्या दशकात काही आर्थिक गणितं चुकल्यामुळे परीस्थिती किती कठिण झाली होती ते सांगितले होते. ही आर्थिक गुंतवणूक त्याच्या भविष्यासाठीच होती. "पैशांसाठी कुणी फरशी पुसायला सांगितली असती तर त्यालाही माझी तयारी होती" हे त्याचे शब्द आहेत. लोक घरी, कार्यक्रमांना बोलवायचे नाहीत. तोंडावर अपमान करायचे. कामं नव्हती, रोजचा खर्च कसा चालवायचा याच्या विवंचना होत्या. घरं गहाण पडली होती. एकदा इतक्या कठिण परीस्थितीमधून गेल्यानंतर मानपान, लोक काय म्हणतील वगैरे नंतर आधी स्वतःचं आर्थिक भविष्य सुरक्षित करावं अशी त्यांची मानसिकता झाली. आणि त्यात गैर काय आहे? त्याच्याजागी कोणीही असतं तरी हाच विचार केला असता. लोकांनी त्याला दिवाळं जाहीर करायला सांगितलं होतं. त्याला नकार देऊन लोकांची पै न पै त्यानं परत केली. धिरूभाई अंबानींनी त्याचं पूर्ण कर्ज फेडायची तयारी दाखवली होती असं नुकतंच त्यानं जिओ च्या कार्यक्रमात सांगितलं. त्याला नकार देऊन स्वबळावर त्यानं कर्ज फेडलं. हजारो कोटींचे घोटाळे करून परदेशात पळून जाणार्या तथाकथित उद्योजकांपेक्षा हे उदाहरण लोकांसमोर आदर्श नाही का?
दारू, सिगरेट वा रंग गोरा करण्याचा दावा करणार्या क्रीमच्या जाहिरातींपेक्षा च्यवनप्राश आणि लिकेजप्रूफ मटेरीअलच्या जाहिराती केव्हाही बर्या नव्हे चांगल्याच म्हणायच्या.
अंजली, प्राजक्ता, स्वाती२,
अंजली, प्राजक्ता, स्वाती२, ह्यांच्याशी सहमत.
अमिताभ मध्ये ह्या वयातही इतका स्टॅमिना, एनर्जी आहे हे बेस्टच आहे की. त्याचं वय आणि कपडे मला जरा अनॉयिंग होतात पण मी इंडियन टिव्ही पहात नसल्यामुळे जाहिराती पाहिलेल्या नाहीत.
1) त्याला नकार देऊन स्वबळावर
1) त्याला नकार देऊन स्वबळावर त्यानं कर्ज फेडलं. हजारो कोटींचे घोटाळे करून परदेशात पळून जाणार्या तथाकथित उद्योजकांपेक्षा हे उदाहरण लोकांसमोर आदर्श नाही का?
2) दारू, सिगरेट वा रंग गोरा करण्याचा दावा करणार्या क्रीमच्या जाहिरातींपेक्षा च्यवनप्राश आणि लिकेजप्रूफ मटेरीअलच्या जाहिराती केव्हाही बर्या नव्हे चांगल्याच म्हणायच्या.
>>>>
एक्झॅक्टली!
दोन्ही मुद्द्यांना +786
माझ्या आधीच्या काही पोस्टमध्ये वेगळ्या भाषेत हे मुद्दे मांडले आहेत.
अमिताभला लिहिलेल्या पत्रात हे
अमिताभला लिहिलेल्या पत्रात हे मुद्दे लिहिलेले नाहीत.
१. तू उतारवयात काम करू नयेस
२. तू उतारवयात फिट राहू नयेस
३. तू सेटवर वेळेवर येत नाहीस
४. तू कामाच्या वेळी प्रोफेशनली वागत नाहीस
५. इतका मोठा नायक असल्यामुळे तू माजोर्डेपणा करतोस
६. तुझा तुझ्या पडत्या काळात नातेवाईकांनी तोंडावर अजिबात अपमान केलेला नव्हता
७. वेळ पडली तर मी फरशीही पुसेन असे वाक्य तू कधीही बोललेला नाहीस व हे तुझे भयंकर चुकले
वगैरे!
तेव्हा वरील वाक्ये पत्रात आहेत असे उगीचच गृहीत धरून आलेल्या प्रतिसादांना माझा विनम्र पास!
एक मुद्दा मात्र मला प्रतिसादांमधून मिळाला व पटला की अमिताभला वयानुसार जर आता कोक, पेप्सी, लक्झरी कार्स अशा जाहिराती मिळत नसतील व स्टेटस राखण्यासाठी पैसे मिळत राहावेत म्हणून तो कोणत्याही उत्पादनांची जाहिरात करत असेल तर ते योग्यच आहे.
त्यामुळे, 'तू कुठल्याही उत्पादनाची जाहिरात करतोस'ह्या अर्थीची पत्रातील वाक्ये असायला नकोत हे पटले. मात्र त्याने संवादफेकीची शैली बदलायला हरकत नसावी. कंटाळा तर प्रामुख्याने त्या शैलीचा आलेला आहे.
धन्यवाद!
अमिताभला वयानुसार जर आता कोक,
अमिताभला वयानुसार जर आता कोक, पेप्सी, लक्झरी कार्स अशा जाहिराती मिळत नसतील...
>>>>
हा अंदाज झाला बहुतेक..
त्या माणसाची पर्सनॅलिटी खूप भारी आहे. जगातल्या कुठल्याही भारी प्रॉडक्टची जाहीरात त्याला शोभावी आणि मिळूही शकते. त्याच्या जाहीराती त्याचा चॉईस असेल. त्याचा नाईलाज आहे असे का गृहीत धरत आहात?
Submitted by अंजली on 27
Submitted by अंजली on 27 April, 2018 - 04:13 >> प्रचंड अनुमोदन!
(पहिल्यांदा) ऋन्मेष शी सहमत!!
(पहिल्यांदा) ऋन्मेष शी सहमत!!
बच्चन साहेब जाहीरातींची शान वाढवतात.
ते दारु/गुटखा/फेअरनेस क्रिम च्या जाहीराती करत नाहीत तोवर मला कोणत्याही (हार्पिक च्या पण) जाहीरातीत बघायला आवडेलच.
अमिताभच्या अॅंग्री यंग मॅन
अमिताभच्या अॅंग्री यंग मॅन इमेज काळातील चाहत्याने लिहिलेले हे पत्र आहे. त्या काळातील चाहत्यांच्या अमिताभबद्दलच्या भावना अश्या असणे शक्य आहे.
आमच्या पिढीने अमिताभची सेकंड इनिंग पाहिली. त्यामुळे लाल बादशाह, ईन्सानियत, मृत्युदाता वगैरे लेव्हलला गेलेला अमिताभ आज जिथे आहे त्याचे आम्हाला तरी अप्रूपच आहे.
माझ्यामते या देशात तीन कलाकार / खेळाडू एका वेगळ्याच लेव्हलला आहेत.
अमिताभ, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर
त्यांच्याबद्दल काही चर्चा करणे म्हणजे सुर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे
पण तो दाखवावा, चाहते असण्याची हिच खरी मजा आहे
Submitted by अंजली on 27
Submitted by अंजली on 27 April, 2018 - 04:13 >> यातल काही काहि माहित नव्हत म्हणजे लोक अपमान करायचे वैगरे, ही पोस्ट वाचल्यावर तर महानायकाविषयी आदर अजुनच वाढला, त्याच्या डाउन टु अर्थ असण्याच रह्स्यही कळल
कंटाळा तर प्रामुख्याने त्या
कंटाळा तर प्रामुख्याने त्या शैलीचा आलेला आहे. >> शैली अशी अचानकपणे एखादा कलाकार बदलु शकतो का? असे घडल्याचे उदाहरण अगदी विरळा असावे.
मिमिक्री तर करू शकतो
मिमिक्री तर करू शकतो
मी फारश्या जाहिरातीच बघत नाही
मी फारश्या जाहिरातीच बघत नाही. पन इतर कलाकारांपेक्षा अमिताभला बघायला जरा बरे वाट्ते. अरे लोक्स लोकसत्ताच्या२०१७ दिवाळी अंकात अमोल पाले कर ह्यांनी अमिताभ वर लेख लिहिला आहे तो जरूर वाचा. त्यांना अनेक वर्शे निद्रानाशाचा विकार आहे. रात्री सतारचा रियाज करत बसतात. पहाटे डोळे जड होतात असे त्या लेखात आहे. मुंबईत अनेक उच्च पदस्थ व्यक्तींना असा विकार आहे. कारन एकदा कामाच्या ठिका णी गेले कि ते असे उरावर बसते की विचार करायला वे ळ मिळ त नाही. वैयक्तिक असा वेळ फक्त रात्री १२ च्या प पु ढे. त्यात कायतो भविश्याचा स्वतःचा दिवसभराच्या कामाचा आपल्यावरील भावनिक ओझ्याचा विचार करायचा उत्तरे शोधायची. मी एक साधी नोक र दार स्त्री असून माझी अशी अवस्था आहे तर ते तर महान स्टार... किती काँप्लेक्स जीवन जगतात. त्यामुळे सहानुभूतीच वाटली खरेतर वाचून.
जे लोक सिस्टिम चालावी म्हनून जबाबदार असतात त्यांना तर सिस्ती म सुरू होण्या आधी एक दी ड तास हजर राहू न सर्व चक्रे सुरू करून द्यावी लागतात. मग बारके एंप्लॉई, स्टाफ लेव्हलचे लोक्स येउन ते मोठे कामाचे मशीन चालू ठेवतात. सात ची शिफ्ट तर पाच ला सेट वर हजर त्या आधी घरातून तयार होउन निघायचे कारने का होइना पण प्रवास कामाचे तास सुरू झाल्यावर अंगावर येइल इतका जनसंपर्क.
प्रत्येकाला हसून न चि डता उत्तर देणे, होइल तुमचे काम हा विश्वास देणे, त्यात तब्येतीच्या तक्रारी संभाळ्णे ही तंत्रे रोज रोज करणे खूप
अवघ ड आहे. मोठे पणाचे पन एक ओझे असते व ते सांभा ळावे लागते. जरा प्रेशर लेट ऑफ करायला काही केले तर तेव्हाच फो टो घेउन पोस्त करनारे , जजमें टल कमेंट . करणारे लोक्स असतातच आजू बाजूला.
मुं बईत काम करणे सर्वाइव्ह होने व यशस्वी होणे ते टिकव णे यासाठी खरेच खूप फोकस व मेहनत लागते. कामाच्या प्रती एक जुनून तयार होतो. पैसे आले तरी ते उपभोगायला वेळ मिळ त नाही. रोज हपीसला जाताना मला दोन मो टि वेटर्स आहेत. एक तर रस्त्याच्या क डेला उन्हात काम करनारे तरूण घामेजलेले लोक जे अती कमी पैशासा ठी शारीरिक मेहनत करून ध ड प ड करत आहेत. ( मग तुला एसीत बसून काम करयला काय हरकत आहे ग!!!) आणि अमिताभ ( तो ह्या वयात मेहनत करतोय तर तू को ण?) मं डे टू फ्रायडे ग्राइंड सुसह्य करायला मी अमित सहेबांच्या मेहनती क डे बघते.
अमा + (१/०)
अमा + (१/०)
पत्रातल्या भा.पो.
पत्रातल्या भा.पो.
but all product cos want him to endorse. Trying to see anything more beyond that is bit like complaining of too much rain in the rainforest!
पण जजमेंटल होणे टाळता आले असते. Big B remains an insipration for all ages, for his work and professionalism.
I am sure he is not going door to door asking for adverts
या जाहिराती तो पैसे
या जाहिराती तो पैसे मिळवण्यासाठीच करतो कशावरून? त्याच्याकडे बक्कळ पैसा असावा. शौचालय किंवा पोलिओ ची जाहिरात ही सामाजिक जागृती म्हणून तो करतो आणि त्यासाठी पैसे घेत नाही.
बाकी जर अमिताभ मुळे आपलं प्रोडक्ट भरपूर विकलं जाईल असं वाटणार्या व्यावसायिकांना तो मोबदल्यासाठी परवडतो म्हणून ते त्याला घेतात. आणि तो प्रोफेशनल आहे, आलेले काम इमाने इतबारे करतो.
उद्या माझ्याकडे करोडो रुपये देउन कुणी सिनेमा काढ म्हटलं तर मी स्वप्नील जोशी किंवा शाहरूख पेक्षा अमिताभ ला प्राधान्य देइन हे नक्की
बाकी राहिले शैली बद्दल... मला तर त्याची शैली अज्जिबातच सेम वाटत नाही.
बाकी अर्थार्जनासाठी त्याला जाहिरात करायची काय गरज? कल्याण ज्वेलर्स ची माहिती काढा.
इथे इतरांनी अमिताभच्या बाजूने
इथे इतरांनी अमिताभच्या बाजूने लिहीलेले पॉइण्ट्स १००% बरोबर असूनही "एका फॅनची तक्रार" या दृष्टीने लिहीलेला बेफिंचा टोन पटला. मी भारतात राहात असतो तर कदाचित मलाही तसेच वाटले असते. इथे अमिताभची एखादी जाहिरात (उदा: त्या रामलीला वाल्या एक दोन धमाल जाहिराती) कोणीतरी क्लिप फॉरवर्ड करते, किंवा कालनिर्णय मधे सायकल की अगरबत्ती (की सायकल छाप अगरबत्ती, माहीत नाही) ज्या जाहिरातीत तो दिसतो - इतपतच एक्स्पोजर असल्याने ते जास्त वाटत नाही. पण भारतात असंख्य वेगवेगळ्या रूपांत तो सतत समोर येत असतो - टीव्हीवर, पेपर्स मधे, रस्त्याच्या जवळच्या होर्डिंग्ज वर. ते पाहून मूळच्या फॅन्स ना अरे जरा कंट्रोल कर वाटणे साहजिक आहे.
बाय द वे अमांनी उल्लेख केलेला तो अमोल पालेकर चा अमिताभवरचा लेख अतिशय सुरेख आहे. एक कलाकार म्हणून आणि एक सेलेब्रिटी म्हणून त्याच्यावरची इतकी बॅलन्स्ड कॉमेण्टरी फार क्वचित वाचली आहे आणि अमोल पालेकरने सुरूवातीपासून त्याची कारकीर्द जवळून पाहिलेली असल्याने त्यात एक अचूकताही आहे.
>>बाय द वे अमांनी उल्लेख
>>बाय द वे अमांनी उल्लेख केलेला तो अमोल पालेकर चा अमिताभवरचा लेख अतिशय सुरेख आहे.
ऑनलाईन लिंक आहे का कुणाकडे?
With all due respect to
With all due respect to Farend and Amol Palekar too, मला तो लेख आवडला नाही. मी-मी करणारा जास्त वाटला. तसं होतंच म्हणा ते बर्याच वेळेला बर्याच जणांचं. त्यापेक्षा त्याच अंकातले अमोल उदगीरकर, विजय केंकरे यांचे लेख उत्कृष्ट आहेत. ( अमिताभ बच्चनवर नाहीत, त्यामुळे विषयांतराबद्दल सॉरी )
या पत्राबद्दल ऋन्मेष, प्राजक्ता इत्यादींनी व्यक्त केलेल्या मतांशी सहमत.
योग,https://www.loksatta.com
योग,
https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/amitabh-bacchan-on-screen-o...
मलाही तो लेख अमिताभपेक्षा
मलाही तो लेख अमिताभपेक्षा अमोल पालेकरविषयी (म्हणजे पालेकरांच्या कौतुकाविषयी) जास्त वाटला. शेवटच्या दोन तीन परीच्छेदात आलेल्या त्याच्याविषयीच्या तक्रारी ("Why did he always choose to be a conformist? ....") काही प्रमाणात मान्य आहेत. त्याच्या एवढ्या महानायकाचा प्रभाव कल्पनेपलिकडला असू शकतो, त्याचा उपयोग किती प्रमाणात केला जातो वगैरे. पण तरीही त्याबाबतीत जजमेंटल न होता त्याचीही काही कारणं असतील असा त्याला benefit of doubt द्यावा वाटतो.
मलाही तो लेख अमिताभपेक्षा
मलाही तो लेख अमिताभपेक्षा अमोल पालेकरविषयी (म्हणजे पालेकरांच्या कौतुकाविषयी) जास्त वाटला. >>> अनुमोदन.
>>मलाही तो लेख अमिताभपेक्षा
>>मलाही तो लेख अमिताभपेक्षा अमोल पालेकरविषयी (म्हणजे पालेकरांच्या कौतुकाविषयी) जास्त वाटला. >>> अनुमोदन.
अगदी..! वाचायला घेतला आणि पालेकर पुराण जास्त वाट्याला आले.. स्वताच्या कारकिर्दीला अधोरेखित करण्यासाठी अमिताभ चा संदर्भ दिल्यासारखे. असो.
प्रतिक्रिया वाचल्या नाहीत.
प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. सॉरी.
एका पत्रकाराने एकदा अमिताभला ह्याच सततच्या कोणत्याही जाहिराती स्विकारण्यावरुन विचारले तेव्हा तो खवळून त्याला म्हणाला होता,
" तो मेरे घर का चुल्हा जलाने आप आओगे....?"
अमिताभ आणि एबीसीएल बद्दल जरा इतिहास उगाळून बघा. तो जे काही करतोय ते त्याच्या स्वतःसाठी योग्यच करतोय.
अमिताभला नागराज मंजुळे
अमिताभला नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार आहे असे मधे वाचले. तेव्हा चांगले वाटले होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या, लोकप्रियतेच्या प्रभावाने दबून न जाता स्वतःला पाहिजे तसे काम त्याला करायला लावणारे दिग्दर्शक गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाले आहेत. जे आहेत त्यांच्याबरोबर त्याने काम केलेले नाही किंवा त्यांनी त्याला घेतलेले नाही. राम गोपाल वर्मा सारख्यांनी अमिताभ बरोबर काम करेपर्यंत एक दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिभा संपली होती.
अजूनही कधीकधी वाटते की एखाद्या दमदार कथा व संवादलेखका बरोबर अमिताभचा चित्रपट यावा, ज्यात स्वतःबद्दल आत्मविश्वास असलेल्या 'विजय' कॅरेक्टरसारखा पण वयाला सुटेबल रोल त्याला मिळावा. त्याची नेहमीची 'शुध हिंदी' जरा बाजूला ठेवून टीपिकल 'स्ट्रीट' भाषा जशी तो बोलत असे तसे, पण आताच्या काळात शोभणारे संवाद त्याला असावेत. अजूनही फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला जाईन असा चित्रपट आला तर.
बाकी चित्रपटाबाहेरच्या इमेज बद्दल अमिताभचे एक विशेष आहे. सामान्य माणसांशी सहज संवाद साधणार्या जाहिराती वगैरे तो करतो. त्यात अगदी गंगाकिनारेवाला गावरान रोल तो करतो. पण त्याच बरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या संस्थांच्या कार्यक्रमात तेथील लोकांबरोबर संवाद साधताना तो एकदम पॉलिश्ड उच्चभ्रू ग्रूप्स मधेही तितक्याच सहजतेने वावरतो आणि तेथे तो ऑड वाटत नाही. एक दोन दिवसांपूर्वी त्याने टाइम्स ऑफ इण्डिया मधे पोलिओ विरूद्धच्या मोहिमेतील प्रत्यक्ष काम करणार्या लोकांबद्दल लेख लिहीला आहे. पहिले एक दोन पॅरा सोडले तर बाकीचा लेख मला घोस्टरिटन वाटला - कारण एखाद्या त्यात काम करणार्या तज्ञाने लिहील्यासारखा तो लेख आहे. पण खरेच तो लेख पूर्ण त्याने स्वतः लिहीला असेल तर त्या विषयाबद्दल जेन्युइन कळकळ दिसते त्यात.
त्यामुळे एकूण त्या जाहिरातींव्यतिरिक्त असे बरेच उद्योग तो करत आहे असे दिसते.
ॠन्म्यासाठी
ॠन्म्यासाठी
कर्जबाजारी होऊन जेव्हा कोणी काम देत नव्हते तेव्हा "मोहोब्बते" चित्रपटात अमिताभ यांना रोल शाहरुखने मिळवून दिलेला. याआधी अमरिश पुरी यांना घेऊन काही सीन चित्रित केले होते. परंतू आदित्यला अमिताभ या रोल साठी योग्य आहे हे शाहरुखने पटवून दिले.
शाहरुखने मिळवून दिलेला. >>>
शाहरुखने मिळवून दिलेला. >>> हे चुकीचे आहे. अमिताभच्या मते तो स्वतः यश चोप्रांकडे काम मागायला गेला होता तेव्हा आदित्य मोहब्बतेवर काम करत होता आणि त्याला अमिताभसाठी तो रोल योग्य वाटला म्हणून त्याला तो मिळाला.
Pages