मैत्री भाग - 12

Submitted by ..सिद्धी.. on 21 April, 2018 - 13:28

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867
================
मागील भागात:-
दुसर्या दिवशी दुपारी आपली कारखन्यातली कामं आवरून ते दोघे मुंबईला जायला निघाले. रात्री आठच्या सुमारास ते मुंबईत त्या हाॅस्पीटलमध्ये पोहोचले. समीर अजूनही शुद्धीवर आला नव्हता. त्यांना भेटून ते लगेच तिथनं निघाले. रात्री राजेश ड्रायव्हींग करताना समिधाचा त्याला फोन आला. तीने सांगितलं की समीर च्या तब्येतीत अचानक चढउतार येत आहेत. आता तो अत्यवस्थ झाला आहे. राजेशला कळून चुकलं को तो त्या तावीजाचा परिणाम होता...  
आता इथून पुढे
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
रात्रभर समीरच्या तब्येतीत चढ उतार येत होते. डाॅक्टरपण चक्रावून गेले होते. शेवटी बरेच प्रयत्न केल्यावर जरा स्टेबलला आला. संजनाला यात काहीतरी शंका येत होती. पण ती कोणाला सांगू शकत नव्हती. आधीच सगळे टेन्शनमध्ये होते .शेवटी तीने स्वतःच शहानिशा करायचा निर्णय घेतला.

सकाळी संजना हाॅस्पिटलमधनं घरी आली.तीने समिधालाही  बरोबर घेतलं. ही अशी का वागतेय हे तीला कळत नव्हतं . शेवटी मुकाट्याने तयारी करून ती संजनासोबत निघाली.

गाडीत बसल्यावर समिधाने तीला विचारलं;" आपण कुठे निघालोय असे घाईघाईत? काही सांगशील का? मगासपासनं एकही शब्द बोलली नाहीयेस."

संजना म्हणाली" समिधा तुला येईल राग माझा.आत्ता नको.आपण तिथे पोहोचल्यावरच बोलू"
समिधाने बरेच प्रयत्न करून तिला सांगायला लावलं. तेव्हा संजना म्हणाली;" तुला एक जाणवतय का ? राजेश जेव्हापासनं इथे येऊन गेलाय तेव्हापासनं या विचीत्र प्रकारांना सुरूवात झालीये.बघ त्या दिवशी रात्री राहून ते गेले तेव्हा दुसर्याच दिवशी संध्याकाळी समीरचा अपघात झाला. आता पण बघ कालही तो येऊन गेला तेव्हाही समीर अत्यवस्थ झाला. यात काहीतरी वेगळाच योगायोग आहे.मला काहीतरी गडबड दिसतेय. तेच विचारायला आपण महंतांकडे चाललोय."

एवढं बोलून संजना थांबली आणि तीने गाडीचा वेग वाढवला. समिधानेही विचार केला आणि तीलाही ते पटलं..

ती पटकन संजनाला म्हणाली;" संजना तुझं निरीक्षण बरोबर आहे. मला अजिबात राग नाही आला. आता मलाही हे नक्की काय प्रकरण आहे हे शोधायचय. आता या वेळी राजेशचा यात जराही सहभाग असेल ना तर मात्र यावेळी मी राजेशला सोडणार नाही. पहिल्यांदा होते ती चूक असते आणि तीच चूक पुन्हा करणे हा अपराध आहे. त्यामुळे आता माफी नाही." समिधा चिडलेही हे तिच्या स्वरातनं स्पष्ट जाणवत होतं.

शेवटी एकदाची गाडी महंतांच्या बंगल्यासमोर थांबली. गाडी पार्क करून दोघी आत गेल्या. पहिल्यांदा समिधा तिथे आलेली तेव्हाचा तिचा गैरसमज आता महंतांवरच्या विश्वासात परिवर्तीत झालेला. महंत बाहेर येऊन बसले. संजनाने एका दमात सगळं सांगून टाकलं. महंतांनी पाच मिनीटं डोळे मिटले. त्यांच्या चेहेर्यावर गंभीर भाव दिसत होते. डोळे उघडल्यावर ते म्हणाले तुमची शंका खरीये असं आता मलाही वाटतय. आता आधी आपण तुमच्या बंगल्यावर जाऊन सगळी पडताळणी करूया. चला लवकर..

तिघही जण समीरच्या बंगल्यात आले. महंतांनी दोन मिनीटं ध्यान करून काही मंत्र आठवले. संपूर्ण घरात फिरताना त्यांना एक शक्ती सतत आपल्या आजूबाजूला वावरतेय हे जाणवलं. त्यांनी त्याक्षणी काही बोलणं शिताफीने टाळलं. समिधा आणि संजनाला मात्र काहीच जाणवत नव्हतं. बाहेर येऊन गाडीत बसल्यावर महंतांनी बोलायला सुरूवात केली. "आजच रात्री आपल्याला बंगल्यात एक पूजा करावी लागेल. मला वाटलं तितकं सोपं प्रकरण नाहीये हे. मी मागे सांगितलेल्या सगळ्या सूचना लागू असतील. रात्री दहा वाजता आपण सुरू करूया. आणि हो आता माझ्या घरी गेल्यावर मी  एक धागा आणि एक पुडी देईन. मी जो मंत्र सांगेन तो म्हणत समीरच्या हातात तो धागा बांध आणि उशीखाली ती पूडी ठेव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दरम्यान तब्येतीत चढ उतार आले तरी उपचार करताना तो धागा आणि ती पुडी त्याच्यापाशीच असणं अत्यावश्यक आहे. ते एक प्रकारचं सुरक्षाकवच असेल. बाकी तयारी मी करतोच. ही गोष्ट कमीत कमी लोकांना कळवा. "

रात्री साडे नऊला तिघंही बंगल्यात आले. महंतांनी सगळी तयारी झाल्यावर एक मंत्र दोघींना म्हणायला लावला आणि हाॅस्पिटलमध्ये पाठवलं. आधी ठरवल्याप्रमाणे सगळ्यात वरच्या मजल्यावरची एक छोटीशी खोली उघडली. तिथेच पूजेला सुरूवात केली. आवाहन केल्यावर बर्याच वेळाने एक आत्मा रिंगणात प्रकट झाला. नंतर जवळपास दोन तास अखंड मंत्र म्हणत महंत त्या खोलीबाहेर आले. त्यांनी काही विशिष्ट मंत्रांचा उच्चार करत खोलीचं दार लावून घेतलं .त्याला लाल दोरा घट्ट बांधला. उंबरठ्यावर त्यांनी काही चिन्हं काढली. आणि शेवटी पूजा संपन्न झाली.एक मजबूत कुलूप लावून त्यांनी ती खोली कायमची बंद केली. अघोरीने पाळत ठेवायला पाठवलेला आत्मा त्यानी त्या खोलीत कैद केला होतं.

त्या ओसाड जंगलातल्या अघोरीला याचे संकेत मिळाले होते. तो भयंकर चिडला होता.

क्रमशः

--आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे आहे ते सांगता का??? टाईप करताना आपोआप डिलीट होतय...म्हणून असतील...वाचते एकदा... साॅरी हं...
@ विजयजी केल्यात दुरूस्त
@ गुगु धन्यवाद...

आदिसिद्धी भारीच जमलाय हाही भाग. पूजा वगैरे वाचून ही तुझी पहिलीच दीर्घ भयकथा वाटत नाही. भारीच जमलंय हं...

Khup chan likhan aahe... Fakt khup lahan part takti yes.... Pan khilvun theval aahes katheshi ....
Pudhachya bhagachya pratikshet ...