बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 03:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
उशीरा का होईना या देशात न्याय मिळतो याचे कौतुक करावे कि न्याय मिळायला ईतका उशीर लागतो यावर टिका करावी?
खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..
न्यायावरून आठवले, माणसांना चिरडण्याची शिक्षा झाली नाही, पण जनावरांना मारून मात्र फसला. हे अजब आहे..
अर्थात माणसांना मारायचा गुन्हा सिद्ध झाला नाही, हा झाला. हा फरक आहेच ..
त्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याला कुठलीही सहानुभुती नव्हती, पण इथे मात्र त्याच्याबद्दल वाईट वाटतेय.
आजवर मी स्वत: किंवा आपण सर्वांनीच जिभेचे चोचले पुरवायला ईतकी जनावरे मारून खाल्ली असतील. याला मात्र एक बेकायदेशीर असलेले जनावर मारायची अवदसा सुचली आणि लटकला.
यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !>>>>>Headshot suicide

हे ईश्वर, या खुदा , ओ जीझस, वाहे गुरु क्या ये सब पढने के लिए मेरा जनम हुआ है? क्या इतने बुरे दिन आ गए मेरे? Sad crying smiley face

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दिलासा मिळालेला नाही. त्याला न्यायालयानं पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सलमानला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी त्याचे वकिल प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण सकाळी दोषी ठरवल्यानंतर कोर्टाने सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीची असल्याने सलमानला जामीनही मिळणार नाही.

लेटेस्ट बातमीनुसार धाग्यातील दोन वर्षे शिक्षा बदलून पाच वर्षे करण्यात आली आहे..
बॉलीवूडला मोठा धक्का !!!!

हे ईश्वर, या खुदा , ओ जीझस, वाहे गुरु क्या ये सब पढने के लिए मेरा जनम हुआ है? क्या इतने बुरे दिन आ गए मेरे?
>>>>

काही समजले नाही. साधीसुधी वाक्ये आहेत. जनमाणसात उमटलेल्या प्रतिक्रिया म्हणा..

अरे ऋन्मेष, तुला खरच सामान्य लोकांच्या प्रतीक्रिया जाणुन घ्यायच्या असतील तर बाहेर खुद्द मुंबईतच आजूबाजूला विचार. मायबोलीवर विचारुन उपयोग नाही. लोक असेच म्हणणार की करावे तसे भरावे.
तू मात्र बॉलीवुडला धक्का वगैरे कल्पनेत रमला आहेस. बसु दे की त्या फुटकळ लोकांना धक्के. कोणाच्या मागे जावे आणी काय करावे एवढी जर लोकांना अक्कल नसेल तर काय करणार?

मायबोली, फेसबूक, व्हॉटस्सप हेच आहेत ना सामान्य लोकं?
बाकी प्रश्न बॉलीवूड वा कोण्या एका सलमानचा नाही, तर अश्या प्रकरणातून आपले सिस्टीम काय कसे आहे हे समजते..

सलमानला शिक्षा होते आहे हे वाचून या धागाकर्त्याला दुःख होतय हे समजतय, पण धाग्यात जे लिहिलय ते वाचून लेखकाची कीव येतेय.

अय्या बरं झालं शिक्षा झाली नैतर ह्या हप्त्यात नवा बाफ नै? कै केलं अस्तं जनतेने अ ओ.

व्हेरी हॅपी फॉर द ब्लॅक बक्स अँड बिश्नोईज. ( चिकन खाउ मानभावी प्रतिसाद.क )

न्यायाधीशाला नक्कीच सलमान आवडत नसणार... (जोक राहूदेत बाजूला )

पण

तुमचं मत वाचल्यावर वाटतंय... माणसांना मारल्याची शिक्षा या ना त्या कारणाने मिळाली...आता संपलंच ना सगळं...

नंतर वाटतंय वीस वर्षांपूर्वीच निकाल लागला असता तर जास्त बरं झालं असत... आताच त्याचा काळ जास्त उमेदीचा ठरतोय म्हणून...

किंवा मग आता त्याने निवृत्तीची भावना मनी ठेवावी म्हणून... इत्यादी इत्यादी

फालतू निकाल... कशावरून तो लघुशंकेला गेलेला खरं बोलतोय?
कित्येक लोक शिकार करत असतील, त्यांना पैसे खाऊन सोडून देत असतील.

खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..>>> अरे कोणा सर्वांना मनस्ताप सहन करावा लगलाय? Uhoh

छी न्युज

ब्रेकींग न्युज " सलमान खान ने रात के खाने को मना किया"
"सलमान खान डिप्रेशन के शिकार हुए है"
"हथियार मिला नही फिर सजा कैसे"

देखते रहे छी न्युज

अरे कोणा सर्वांना मनस्ताप सहन करावा लगलाय? Uhoh
>>>

जे सोबत 4 जण निर्दोष सुटले त्यांना मनस्ताप सोसावा लागला ना एवढी वर्षे निर्दोष असून..

च्रप्स सहमत
गावच्या ठिकाणी बेकायदेशीर शिकार बेकायदेशीर दारू विकण्यासारखे सर्रास होते..

समजा हा वेगळा खान असता तर?>>>> प्रतिसादकर्त्याला कोणता बरे खान म्हणायचे असेल? Uhoh
धाविघाअ मुळे गुदमर्लेली बाहुली.

@अजब
नाम तो सुना ही होगा आपने?
नही सुन्या? जाने दो. मैने भी नही सुन्या. Biggrin

जेव्हा नुसते खान म्हटले जाते तेव्हा बायडिफॉल्ट तो शाहरूख खान समजला जातो.
येनीवेज तो एक युथ आयकॉन आहे.

बाकी आसाराम आणि सलमान एकाच कोठडीत आहेत का? आज व्हॉटसपवर सर्व या दोघांवरच जोक्स फिरत आहेत..

अहो मी KRK म्हणत होतो. त्याला म्हणे पोटाचा कॅन्सर झालाय. २ वर्षे लाईफ आहे बाकी

कसला धक्का आणि काय .. उद्या तो बाहेर असेल जामिनावर आणि मग खटला पुढील २० वर्ष सुरु राहील ... कशा उगीच शिळ्या काढिला ऊत आणतो आहेत तू ...

Pages