बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 03:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
उशीरा का होईना या देशात न्याय मिळतो याचे कौतुक करावे कि न्याय मिळायला ईतका उशीर लागतो यावर टिका करावी?
खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..
न्यायावरून आठवले, माणसांना चिरडण्याची शिक्षा झाली नाही, पण जनावरांना मारून मात्र फसला. हे अजब आहे..
अर्थात माणसांना मारायचा गुन्हा सिद्ध झाला नाही, हा झाला. हा फरक आहेच ..
त्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याला कुठलीही सहानुभुती नव्हती, पण इथे मात्र त्याच्याबद्दल वाईट वाटतेय.
आजवर मी स्वत: किंवा आपण सर्वांनीच जिभेचे चोचले पुरवायला ईतकी जनावरे मारून खाल्ली असतील. याला मात्र एक बेकायदेशीर असलेले जनावर मारायची अवदसा सुचली आणि लटकला.
यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मारल्यासारखं करतो तु रडल्यासारखं कर असं असावं सलमानचं प्रकरण.
मागच्या केस मधुन सुटला. आता लगेच ह्यातुन पण सुटला असं नको व्हायला म्हणुन आधी ५ वर्षाची सजा सांगायची.
मग जामीन मंजुर करायचा.

ऋ आता जामीन मिळाला, bollywood धक्यातून सावरलं असेल एव्हाना.>>>>> हो ना, नाहीतर काहींची रात्रीची झोप पण उडाली होती. Exhausted

हो ना, नाहीतर काहींची रात्रीची झोप पण उडाली होती.
>>>>

एक्चुअली उडाली असेल.. हजार करोड अडकलेले. कित्येकांचे पैसे असतील यात. कित्येकांसाठी तो आकडा फार मोठाही असेल. आणि फिल्म ईण्डस्ट्रीमध्ये हातावर पोट असणारेही कित्येक असतात. कित्येक स्ट्रगलर असतात. बायकापोरांना कसे पोसायचे या टेंशनने झोप उडाली असेलच कित्येकांची..

येनीवेज,
जामीन मिळाला कि सुटला, म्हणजे निर्दोष मुक्तता झाली?

अरे परवा शिक्षा झाली, दोषी म्हणून. जामीन मिळालाय.

पण बरेचसे fans त्याचे जणू निर्दोष सुटलाय असा जल्लोष करतायेत.

षऋन्मेषसर , मला क्षमा करा. माझ्या काही प्रतिसादामुळे तुमचा आणि तुमच्या चाहत्यांचा वेळ वाया गेला, रसभंग झाला.
यापुढे मी तुमच्या वाटेला जाणार नाही.
तुमचं चालू द्या.

https://www.maayboli.com/node/62978 या धाग्यावर ऋन्मेष सरांच्या शाखाची वकिली करीत स्वतःचा वेळ वाया घालवंण्यात धन्यता मानणारे आज ऋन्मेषसरांचा वेळ वाया घालविल्याबद्दल माफी मागताना पाहून टडोपा आलं.

खिक्,
जगात कोणी शाखा बद्दल चांगले बोलले ( खरे तर ते शाखा बद्दल चांगले बोलणे आहे, की दुसरे जे वाईट बोलले त्यातील तथ्य तपासणे आहे हे लोकांना समजायला पाहिजे आधी) की ती ऋन्मेष ची वकिली होते हे आजच कळले.

{{{ प्रश्न सस्मित यांना विचारला होता. हरकत नाही. उत्तर दुसर्‍या आयडीने आले.
मायबोली सर्च वापरू का?
ह्युमन नेचर असं किती वेळा लिहिलंत.

आता विषयाकडे
राजस्थानमध्ये ८७ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्यात. त्यात अर्थातच सलमानच्या जामिनाची सुनावणी करणारे न्यायाधीशही आहेत.
त्यामुळे आज जामीन अर्जाची सुनावणी होणार की नाही, हे नक्की नाही. ब्बिच्चार्‍या सलमानला आणखी दोन रात्री तुरुंगात राहावे लागणार? किती हा अन्याय!
Submitted by भरत. on 7 April, 2018 - 08:35 }}}

एका आयडीवर कॉमेंट केली की दुसर्‍या आयडीकडून उत्तर येण्याचा योग या धाग्यावर पुन्हा एकदा आणल्याबद्दल अभिनंदन.

शतकोत्तर वाटचाल अशीच चालू द्या.

{{{ ऋन्मेष चा मोदी झालाय, काही काळापूर्वी डोक्यावर घेतलेले लोकांनी, आता साथ सोडून चाललेत,
निवडक भक्त दोन्ही कडे आहेतच Happy
Submitted by सिम्बा on 6 April, 2018 - 15:39 }}}

_____________________________________________________________________________________________________________________________

खिक्,
जगात कोणी शाखा बद्दल चांगले बोलले ( खरे तर ते शाखा बद्दल चांगले बोलणे आहे, की दुसरे जे वाईट बोलले त्यातील तथ्य तपासणे आहे हे लोकांना समजायला पाहिजे आधी) की ती ऋन्मेष ची वकिली होते हे आजच कळले.
Submitted by सिम्बा on 7 April, 2018 - 21:26

______________________________________________________________________________________________________________________________

धाग्याच्या विषयाशी जराही संबंध नसताना त्यावर मोदींचा उल्लेख करणार्‍यांकरिता -

जगात कोणी मोदीं बद्दल चांगले बोलले ( खरे तर ते मोदींबद्दल चांगले बोलणे आहे, की दुसरे जे वाईट बोलले त्यातील तथ्य तपासणे आहे हे लोकांना समजायला पाहिजे आधी) की तो अंधभक्त असतो हे आम्हाला २००२ सालीच कळले होते.

मायबोली सर्च वापरू का?
ह्युमन नेचर असं किती वेळा लिहिलंत.
>>>>>

ह्युमन हा शब्द मी नेहमी हुमायुन म्हणून लिहितो, त्यामुळे मी ह्युमन नेचर लिहिलेले अभावानेच आढळेल Happy

सिंबा, चीनमध्ये बाहुबली हिट झालेला पाहून पोटदुखी झाली म्हणून अमीरने दंगल चीनमध्ये नेला आणि हिट करवला, असली तर्कटं लावणार्‍या, 'खान' आहे म्हणून त्याचा द्वेष करणार्‍या आणि तेच दुसरीकडे देओल नाव असलेल्या माणसाच्या हिंसाचाराचे समर्थन करणार्‍याशी संवाद साधताय तुम्ही?
वेळ जात नाहीए का? Wink

देओल नाव असलेल्या माणसाच्या हिंसाचाराचे समर्थन करणार्‍याशी संवाद साधताय तुम्ही?>>>>>>>

छे, मी खुद्द वकिलाला "तुला कायद्यातले काय कळते" असे विचारणाऱ्या ज्ञानी माणसाशी संवाद करून स्वतः चा उद्धार करून घ्यायचा प्रयत्न करतोय.

काल एका चॅनेलवर सलमानची ज्योतिषी कुंडली दाखवत होते. म्हणे त्याचे अमुक तमुक ग्रह शुभ होते म्हणुन तो सुटला. कुकातकुका.

तिथे राष्ट्रकुल स्पर्धेत विविध गटात भारतीय जिंकतायेत त्याचं कोणाला काही नाही, मीडियासकट सर्व सलमानच्या मागे.

तिथे राष्ट्रकुल स्पर्धेत विविध गटात भारतीय जिंकतायेत त्याचं कोणाला काही नाही, मीडियासकट सर्व सलमानच्या मागे.
>>>>>

आपण सारे तरी काय करतोय ईथे..
सलमानवर चर्चा करतोय, पण तुम्ही म्हणता त्या राष्ट्रकुलवर कोण कुठे काही लिहितेय Happy
मिडिया शेवटी तेच दाखवणार जे लोकांना बघायचे आहे. टीआरपी सलमानच खेचत असेल तर त्याच्याच बातम्या दिसणार. यात काही गैर नाही...

हो ना रे मी पण इथे वाचायला येते त्यामुळे माझी पण चुक आहेच, मी पण ह्या धाग्याला महत्व देतेय आणि स्वतः राष्ट्रकुल वर धागा काढला नाही.

>> काळवीटाने काय सांगितले?
>> असा एक धडा होता मराठीच्या पुस्तकात..

अगदी अगदी. मला सुद्धा याच धड्याची आठवण झाली होती यासंबंधीच्या बातम्या वाचताना Happy

kalwitane_kay_sangitle.jpg

आपल्या पत्नी व मुलींचे फोटो (अर्थातच ते सार्वजनिक रीत्या प्रसिद्ध करायच्या हेतूने) विनापरवानगी काढणार्‍या छायाचित्रकाराचा रोल व कॅमेरा बलपूर्वक ताब्यात घेणे म्हणजे हिंसाचारच (?) की हो! होप असे मानणारे त्यांच्या कुटुंबियांसोबत असे काही घडले तर केवळ मनातल्या मनात ० ते १०० अंक मोजत बसतील.

LOL,
हा असा "इकडून सांगणे झाले", " तिकडून विचारणे झाले" टाईप्स बोलायचा कोर्स असेल तर मला करायचाय .

रश्मी, तसे नाहीये, बरेचदा माझ्याकडे बघून ईतरांनाच शाहरूख आठवतो. मायबोली वा ईतर सोशलसाईटच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही असे होते Happy
आणि मी स्वतः त्याला कधी मुद्दामहून आणत नाही. बस्स एखादा मुद्दा उदाहरणासह समजावताना तो किंवा त्याचा चित्रपटाचे उदाहरण दिले जाते. अर्थात आपल्याला उदाहरणे त्याच विषयावरची चटचट आठवतात जो आपला आवडीचा विषय आहे..

सलमानला शिक्षा झाली त्याच दिवशी न्यायाधीशाची " बदली" झाली. आणि दुसरया दिवशी दुसरया न्यायाधीशाने जामीन मंजूर केला..

न्यूज जरा कन्फर्म कराल का?

Pages