बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 03:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
उशीरा का होईना या देशात न्याय मिळतो याचे कौतुक करावे कि न्याय मिळायला ईतका उशीर लागतो यावर टिका करावी?
खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..
न्यायावरून आठवले, माणसांना चिरडण्याची शिक्षा झाली नाही, पण जनावरांना मारून मात्र फसला. हे अजब आहे..
अर्थात माणसांना मारायचा गुन्हा सिद्ध झाला नाही, हा झाला. हा फरक आहेच ..
त्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याला कुठलीही सहानुभुती नव्हती, पण इथे मात्र त्याच्याबद्दल वाईट वाटतेय.
आजवर मी स्वत: किंवा आपण सर्वांनीच जिभेचे चोचले पुरवायला ईतकी जनावरे मारून खाल्ली असतील. याला मात्र एक बेकायदेशीर असलेले जनावर मारायची अवदसा सुचली आणि लटकला.
यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताशा नेम धरणारेच जास्त चेकाळलेत त्याच्यापेक्षा
Submitted by सस्मित on 6 April, 2018 - 16:17
>>>>
नेम चुकल्याचे Frustration दुसरे काय?
तो मात्र एन्जॉय करतो.
Proud

काल एका डिबेट मधे शिल्पा शिंदे नावा ची अभिनेत्रि (?) का मॉडेल मस्त अकलेचे तारे तो डत होती . 'माझा दिवस भराचा थकवा दूर झाला. तिचा पुढिल डायलॉग ऐकुन तर हसावे कि रडावे तेच कळेना "आप ऐसे कैसे किसी जिते जागते इंसान को जेल भेज सकते हो" Lol Lol Lol
शेहजाद पुनावाला ने तर तिला कोपरा पासुन हात जोडले ____/\__

ऋन्मेष चा मोदी झालाय, काही काळापूर्वी डोक्यावर घेतलेले लोकांनी, आता साथ सोडून चाललेत,
निवडक भक्त दोन्ही कडे आहेतच Happy
>>
अगदी अगदी!!

सस्मित, तुम्हांला फारच लागलेलं दिसतंय, म्हणून विचारतोय
{फर्स्ट न्यूज देण्यात आनंद मिळवणे ही हुमायून मेंटेलिटी आहे}

हे प्रत्येक वेळी असं लिहिण्यामागे काय कारण, मानसिकता असू शकेल?

टीप : मानसिकता = मेंटेलिटी

सलमान खान ला शिक्षा झाली, ती योग्यच होती. पण त्यावरून जे रान उठलय, त्या अनुशंगाने २ प्रश्नः

कायद्यासमोर सगळे समान असं पुस्तकी विधान असूनही, some men are more equal than others चा अनुभव ठायी ठायी येत असल्यामुळे, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला शिक्षा झाल्यामुळे जरा जास्तच (आसुरी?) आनंद होतो का?

रोडरेज मधे सुटल्यामुळे सलमान खान विरुद्ध जो क्षोभ उसळला होता, त्याचं कुठेतरी ह्या निकालामुळे परिमार्जन झाल्याची (दुधाची तहान ताकावर) भावना आहे का?

फेफ, तुमच्या दोन्हीही शंका रास्त आहेत. ते तसं असूही शकतं. बाकी आसुरी आनंद की काय माहीत नाही, पण आपल्याकडे राजकारण्यांना व सेलीब्रीटींना शिक्षा मिळायचे प्रमाण नगण्य आहे असेच चित्र आहे. त्यामुळे अशांपैकी कोणाला शासन झाल्यास न्यायव्यवस्था अजून तरी बर्यापैकी जिवंत आहे असे नक्कीच वाटते.

आप ऐसे कैसे किसी जिते जागते इंसान को जेल भेज सकते हो

Lol Lol

शिल्पा शिंदे म्हणजे मराठी माणूस. मुंबईबाहेरच्या लोकांचे बरेचदा हिंदी कच्चे असते. तिला काहीतरी हसताखेलता परीवार उजड गया टाईप्स बोलायचे असेल. शब्द गंडले...

{फर्स्ट न्यूज देण्यात आनंद मिळवणे ही हुमायून मेंटेलिटी आहे}
हे प्रत्येक वेळी असं लिहिण्यामागे काय कारण, मानसिकता असू शकेल?
>>>>

हे प्रत्येकवेळी कुठे लिहिले आहे मी... कदाचित आणखी एखाद्या धाग्यात लिहिले असेलही. पण प्रत्येकवेळी?

विशेष् ढिगभर थिएट्र् काबिज केल्यावर आणि तिकिटाचे दर वाढवुन लावल्यावर असे होणारच.
>>>>>>

तुम्ही तोच चित्रपट सलमानच्या जागी आफताब शिवदासानीला घेऊन बनवा आणि हिच ट्रिक वापरा...
किंवा मलाच घ्या.. मी सलमानच्या दहा टक्केच मानधन घेईन. वाचलेल्या पैश्यात आणखी काही थिएटर काबीज करा.. आणि तिकीटदर सुद्धा दुप्पट करून टाका.. आणखी नफा होईल...

कमॉन.. तिकीटदर वाढवूनही जर ईतके थिएटर हाऊसफुल्ल होत असतील तर त्याचा करिष्मा मान्य करा..

किंवा मलाच घ्या.. मी सलमानच्या दहा टक्केच मानधन घेईन. वाचलेल्या पैश्यात आणखी काही थिएटर काबीज करा.. आणि तिकीटदर सुद्धा दुप्पट करून टाका.. आणखी नफा होईल...
कमॉन.. तिकीटदर वाढवूनही जर ईतके थिएटर हाऊसफुल्ल होत असतील तर त्याचा करिष्मा मान्य करा..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 7 April, 2018 - 02:56
>>>>>
भाऊ इथे आम्ही सहन करतो तुम्हाला
का त्या बाॅलीवुडच्या जीवावर उठताय?

Rofl

बॉलिवूड चा एकच भाई आहे.. सलमान..
उद्या अक्षय किंवा रणबीर च्या चित्रपटाचे टिकेट्स दुप्पट केले तर कोणी जाईल का बघायला? सल्लू भाई साठी मी तिप्पट पैसे देऊन फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला तयार आहे.

तुम्ही तोच चित्रपट सलमानच्या जागी आफताब शिवदासानीला घेऊन बनवा आणि हिच ट्रिक वापरा...
किंवा मलाच घ्या.. मी सलमानच्या दहा टक्केच मानधन घेईन. वाचलेल्या पैश्यात आणखी काही थिएटर काबीज करा.. आणि तिकीटदर सुद्धा दुप्पट करून टाका.. आणखी नफा होईल...

कमॉन.. तिकीटदर वाढवूनही जर ईतके थिएटर हाऊसफुल्ल होत असतील तर त्याचा करिष्मा मान्य करा..---+111111

तिकीटदर वाढवूनही जर ईतके थिएटर हाऊसफुल्ल होत असतील तर त्याचा करिष्मा मान्य करा.. >>> करिष्मा वैगेरे काही नाही सतत प्रसिद्धी मिळवत चर्चेत राहायचे. मग ती कोणत्याही पद्धतीने का असेना. जेव्हा शाखा आणि सखा चे कैटच्या पार्टीत वाद झाले. त्यावेळी त्यांच्या वादाला प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी हा वाद असाच तेवत ठेवत सतत चर्चेत राहीले. मग अश्याच प्रकारचे नवीन वाद निर्माण करत निगेटिव्ह पब्लिसिटी मिळवली. उदा. ऐश्वर्या ला मारहाण करुनही तिचे लग्न झाल्यानंतरही तिच्या व्हॅनिटी व्हॅन भोवती सायकल घेऊन रोमिओ टाईप चकरा मारणे. त्याचाच हा फायदा
आपल्या स्टारडम चा उपयोग करुन इतर चित्रपटांना थिएटर मिळु द्यायचे नाहीत. दिलेल्या मुदतीत ते सोडायचे नाहित. हि कसली दुसऱ्याच्या पोटावर पाय आणायची मानसिकता. सलमानचे जर एखाद्याबरोबर भांडण झाले तर तो निर्मात्यांवर दबाव आणुन त्यांना काम मिळु नये यासाठी प्रयत्न करतो. अशा मानसिकतेच्या लोकांना शिक्षा होते हे चांगलेच. थोडीतरी गुर्मी कमी होईल.

<हे प्रत्येकवेळी कुठे लिहिले आहे मी... कदाचित आणखी एखाद्या धाग्यात लिहिले असेलही. पण प्रत्येकवेळी?>
प्रश्न सस्मित यांना विचारला होता. हरकत नाही. उत्तर दुसर्‍या आयडीने आले.
मायबोली सर्च वापरू का?
ह्युमन नेचर असं किती वेळा लिहिलंत.

आता विषयाकडे
राजस्थानमध्ये ८७ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्यात. त्यात अर्थातच सलमानच्या जामिनाची सुनावणी करणारे न्यायाधीशही आहेत.
त्यामुळे आज जामीन अर्जाची सुनावणी होणार की नाही, हे नक्की नाही. ब्बिच्चार्‍या सलमानला आणखी दोन रात्री तुरुंगात राहावे लागणार? किती हा अन्याय!

सस्मित, तुम्हांला फारच लागलेलं दिसतंय, म्हणून विचारतोय>>>>>>>>>>> Lol
प्रश्न सस्मित यांना विचारला होता. हरकत नाही. उत्तर दुसर्‍या आयडीने आले.>>>>>>>>>>> Lol

सलमानला जामीन मिळण्यासाठी तर न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या नाहीत?
इतक्या तडकाफडकी आणि विवादास्पद केस व पुर्वीचा ईतिहास बघुन हाच संशय येतो.

उत्तर दुसर्‍या आयडीने आले.
>>>>>
सर आपण माझी पोस्ट कोट करून माझी मानसिकता कशी आहे असा प्रश्न एखाद्याला माझ्याच समोर विचारता आणि त्यावर मी उत्तर दिले तर म्हणता अर्जुनाची सीता कोण? Happy

जोक्स द अपार्ट,
आपल्यावर काही खोटेनटे आरोप होत असतील तर त्यावर तुरन्त प्रत्युत्तर देणे हे हुमायुन नेचर आहे. मी त्याला अपवाद कसा असेल Happy

मिस्टर पंडित, आपण जे कारणमीमांसा दिली आहे ती आजकाल टुक्कार चित्रपट कसे चालतात याची आहे. ती बरोबरच आहे. पण जशी ती कारणे आहेत तसेच किंवा सर्वात महत्वाचे कारण सलमानची स्टार वॅल्यू आहे जे चित्रपट चालवतात.
म्हणूनच म्हणालो की बाकीचे सारे फॅक्टर कायम ठेवून फक्त सलमानला रिप्लेस करा आणि मग त्याच चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बघा.

आणि हो, वादग्रस्त व्यक्तीमत्वे तर कमाल खान, राखी सावंत, मिका वगैरे सुद्धा आहेत. पण मी तरी त्यांना स्टार मानत नाही ना त्या कोणाचा फॅन आहे Happy

ह्याच धाग्यावर वर मुळं धाग्यात लिहिलेल्या मजकुरा मधे.. लोकाना उचकवणारी बरीच वक्ये.. स्टँड आहेत..
बॉलिवुडला धक्का अँड ऑल..
>>>>
_आनंदी_
बॉलीवूडला धक्का हे उचकवणारे वाक्य आहे Happy
आजच सेम हिच न्यूज वाचली. बॉलीवूडला धक्का. तब्बल 1000 कोटी अडकले आहेत बॉलीवूडचे सलमानवर...

Pages