बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 03:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
उशीरा का होईना या देशात न्याय मिळतो याचे कौतुक करावे कि न्याय मिळायला ईतका उशीर लागतो यावर टिका करावी?
खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..
न्यायावरून आठवले, माणसांना चिरडण्याची शिक्षा झाली नाही, पण जनावरांना मारून मात्र फसला. हे अजब आहे..
अर्थात माणसांना मारायचा गुन्हा सिद्ध झाला नाही, हा झाला. हा फरक आहेच ..
त्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याला कुठलीही सहानुभुती नव्हती, पण इथे मात्र त्याच्याबद्दल वाईट वाटतेय.
आजवर मी स्वत: किंवा आपण सर्वांनीच जिभेचे चोचले पुरवायला ईतकी जनावरे मारून खाल्ली असतील. याला मात्र एक बेकायदेशीर असलेले जनावर मारायची अवदसा सुचली आणि लटकला.
यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या तो बाहेर असेल जामिनावर आणि मग खटला पुढील २० वर्ष सुरु राहील ...
>>>>>>

नाही, यावेळी असे नाही होणार...
जो पिछले सत्तर सालो मे नही हुआ वो अब होगा. कल एक बॉलीवूड सुप्पर्रस्टार सेलिब्रेटी जेल जायेगा..
विश्वासावर जग आहे आणि बदल हा लोकशाहीचा नियम आहे.

बॉलीवुड ला काही फटका बिटका बसणार नाही उलट नवीन टॅलेन्ट ला चान्स मिळेल.
कल एक बॉलीवूड सुप्पर्रस्टार सेलिब्रेटी जेल जायेगा.. << संजय दत्त गेलेला ना?

तेंव्हा लोकांनी सत्यनारायण केला होता तो सुटावा म्हणून. आता पण करा - यज्ञच करा.

तो मुसलमान आहे नि सध्या भा़जप चे सरकार आहे म्हणून त्याला शिक्षा झाली का?
पूर्वी काँग्रेसच्या राज्यात दारू पिऊन गाडी चालवली नि लोकांना मारले तरी काहीतरी करून त्याची सुटका झाली - तो गाडी चालवतच नव्हता, दारू प्यायलाच नव्हता वगैरे "सिद्ध" केल्या गेले.
अपील नाही का करता येणार? या जजने पैसे खाल्ले नसतील तर वरच्या कोर्टातला नक्कीच खाईल ना? कुण्या मिनिस्टरला पैसे नाही का चारता येणार? उद्या मुसलमान दंगल करतील नि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल म्हणून त्याला माफी नाही का देता येणार?
निदान मायबोलीवर तरी ऋन्मेSSष ने धागे काढू नयेत म्हणून त्याला सोडा हो.
अहो भारतीय लोकांना आवडते ५० वर्षाचे खान नि २० वर्षाच्या हिरवणींचे रोमांस बघायला!!

खरे तर बरे झाले तो सध्या तुरुंगात गेला. नाहीतर एव्हढा म्हातारा झालाय, सिनेमे चालले नसते त्याचे.
आता सुटून आल्यावर पुनः हिरोहिरवणींचा बाप म्हणून प्रसिद्ध होईल,

उद्या तो बाहेर असेल जामिनावर आणि मग खटला पुढील २० वर्ष सुरु राहील ...
>>>>>>
नाही, यावेळी असे नाही होणार...
जो पिछले सत्तर सालो मे नही हुआ वो अब होगा. कल एक बॉलीवूड सुप्पर्रस्टार सेलिब्रेटी जेल जायेगा..
विश्वासावर जग आहे आणि बदल हा लोकशाहीचा नियम आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 April, 2018 - 02:02
>>>>>>>>>>>
जर इथे SRK असता तरी हेच मत असते का?
की
"ये न्याय नही अन्याय है?" असा टाहो फोडला असतास ?
Rofl

नाहीतर एव्हढा म्हातारा झालाय, सिनेमे चालले नसते त्याचे.
>>>>
त्याचा फ्लॉप सिनेमासुद्धा अक्षयकुमारच्या हिट चित्रपटापेक्षा जास्त कमावतो..

अजुन तीन महिन्यांनी पॅरोल वर सुटुन (किंवा पैसे चारुन) बाहेर येईल. राहिलेल्या चित्रपटाचे शुटिंग कसही (नाचुन) पुर्ण करेल. रडण्याचे सीन असतील तर ते यावेळी चांगले जमतील. आणि असे टुक्कार चित्रपट पाहण्यासाठी कदाचित लोकही गर्दी करतील.
एकतर २० वर्षाने निकाल लागतोय. आणि आताही पॅरोल वर नियमापेक्षा जास्त वेळा सुटुन येईल हे निश्चित.
पैसेवाल्यांनी न्यायदेवतेची खेळण्यातली बाहुली करुन ठेवली आहे. Sad

Meanwhile...
अ‍ॅश बाजूला शांत झोपलेल्या अभी च्या केसांवर हात फिरवत मनातल्या मनात म्हणत होती....
कितीका फ्लॉप असेना... हा कधी जेल मधे नाही जाणार Lol Lol Lol

नन्द्या४३, तुम्हांला भारतात येऊन खूप वर्षं झालीत का? पुन्हा एकदा तरी इथे येऊन बघा बरं, सध्या काय चाललंय ते.
मग कळेल की भाजप काँग्रेसच्या आणि हिंदू लोक मुस्लिमांच्या खूप पुढे गेलेत (तुम्ही म्हणताय त्याच रस्त्याने).
जज लोकांच्या तडकाफडकी बदल्या होतात नाहीतर मरण पावतात.

प्रसन्न, यावर एक जोक वाचला.
जया बच्चन म्हणाल्यात (म्हणे) की सलमान जेलमध्ये गेल्याने इंडस्ट्रीचं खूप नुकसान होईल .
त्यांना कोणीतरी उत्तर दिलंय, की सलमान ऐवजी अभिषेकला पाठवा जेलात. नुकसान वाचेल.
पुढेही एक वाक्य आहे. पण ते जरा जास्तच हे आहे, म्हणून लिहीत नाही.

अ‍ॅश बाजूला शांत झोपलेल्या अभी च्या केसांवर हात फिरवत मनातल्या मनात म्हणत होती....
कितीका फ्लॉप असेना... हा कधी जेल मधे नाही जाणार>>> Lol

त्याचा फ्लॉप सिनेमासुद्धा अक्षयकुमारच्या हिट चित्रपटापेक्षा जास्त कमावतो.. >>> यात काय विशेष् ढिगभर थिएट्र् काबिज केल्यावर आणि तिकिटाचे दर वाढवुन लावल्यावर असे होणारच. यांच निम्म बजेट त्यासाठीच जात असेल.

शिक्षा झाली हे योग्य आहे म्हणा.
कितीही आवडता हिरो असला तरी गुन्हा होताच.
बाकी ऋन्मेषने कितीही सेन्सिबल लिहिलं तरी काही प्रतिसाद अतिशय नॉन्सेन्स असतात.
जया बच्चन आणि अ‍ॅशचे जोक तर अत्यंत खालच्या पातळीचे आहेत.
देव्कृपेने माझा माणसांचा सन्ग्रह खुप मर्यादित आहे त्यांमुळे मला असले फाल्तु मेसेज / जोक्स येत नाहीत.

ऐश्वर्या लग्न होऊन आता तिला मुलगीपण आहे, ती मुव on झालीय तर कशाला सलमानची प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडायची. अति करतात लोक्स पण.

बाय द वे जामिनावर सुनावणी उद्या.

बाकी ऋन्मेषने कितीही सेन्सिबल लिहिलं तरी काही प्रतिसाद अतिशय नॉन्सेन्स असतात. >> मलातर त्याच्या सगळ्याच धाग्यांवर तेच दिसतय.. मिळालय धोपाटणं धोपटा...

पाकडे रडतायत " सल्लु मुस्लिम आहे म्हणून त्याला शिक्षा झाली म्हणे " .
>>>>

हे द्वेषाचे राजकारणही असू शकते. याला बळी पडू नका. तो घरात गणपती आणनारा माणूस आहे..

@ सलमान ऐश्वर्या गॉसिप आणि कंबरेखालचे विनोद... तर सेलिब्रेटी असण्याची किंमत चुकवावी लागते. आणि सध्या व्हॉटसपच्या जमान्यात काही घडले की त्याच दिवशी प्रत्येक ग्रूपमध्ये हे तेच तेच लेटेस्ट मेसेज फिरत असतात.. अगदी वाह्यात मेसेज का असेना, आपण ग्रूपमध्ये लेटेस्ट विषयावरचा जोक सर्वात पहिले टाकला याचेच लोकांना कौतुक असते.

आपण ग्रूपमध्ये लेटेस्ट विषयावरचा जोक सर्वात पहिले टाकला याचेच लोकांना कौतुक असते.>> ही मेंटेंलिटी कैच्याकै आहे.असंच करंट विषयावर भारंभार धागे काढताना पण लागु होईल. Happy

असंच करंट विषयावर भारंभार धागे काढताना पण लागु होईल. Happy
>>>

हो नक्कीच...
फर्स्ट न्यूज देण्यात आनंद मिळवणे ही हुमायून मेंटेलिटी आहे.
फक्त तुम्ही एखादी बातमी वा माहिती शेअर करत आहात की एखादा वाह्यात विनोद याचे भान हवे, हा फरक आहे Happy

त्याने केलेल्या राजकारणाचे अनेक बळी आहेत. उदा विवेक,अरजित सिंग, हिट ऍंड रन मधील कॊन्स्टेबल ( ह्याची सर्वात वाईट परिस्थिती ) त्यामुळे जे झाले ते चांगलेच झाले.

मला फक्त एकच वाईट वाटते की आता बिग बॉस बघणे जमणार नाही म्हणजे मजा नाही येणार

मला तिथे सलमान सोडुन दुसरा किंवा दुसरी कुणी विचारच करवत नाही

मलातर त्याच्या सगळ्याच धाग्यांवर तेच दिसतय.. मिळालय धोपाटणं धोपटा...>>>>
ऋन्मेष चा मोदी झालाय, काही काळापूर्वी डोक्यावर घेतलेले लोकांनी, आता साथ सोडून चाललेत,
निवडक भक्त दोन्ही कडे आहेतच Happy

बाकी ऋन्मेषने कितीही सेन्सिबल लिहिलं तरी काही प्रतिसाद अतिशय नॉन्सेन्स असतात. >>
>>.
बाकी काही असो हे मात्र पट्लं नाही..
ह्याच धाग्यावर वर मुळं धाग्यात लिहिलेल्या मजकुरा मधे.. लोकाना उचकवणारी बरीच वक्ये.. स्टँड आहेत..
बॉलिवुडला धक्का अँड ऑल..
आणि जर लोक टारगेट करत असतिल तर तोही काही कमी नाहिये..
ह्यावर ही तो काहितरी लिहेलच तेव्हा.. :सैरावैरा पळणारी बाहुली :

लोक टारगेट करत असतिल तर तोही काही कमी नाहिये..>>>>
तो शर्टवर बुल्स आइ रंगवून समोर उभा राहतो, माझ्यावर नेम धरा म्हणून,
मग कोणीतरी नेम धरते, हा वेडावाकडा धावतो,
मग नेम चुकवल्या बद्दल आरशात पाहून स्वतः ची पाठ थोपटतो.
परत समोर येऊन उभा राहतो... नवा गडी नवं राज्य Happy

Pages