अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे?

Submitted by बन्या on 26 March, 2018 - 23:55

अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे? म्हटला तर बाळबोध पण तेवढाच महत्वाचा प्रश्न
सध्या माझ्यासमोर हाच प्रश्न पडलाय राव. आम्ही दोघेही पुण्यातले वय ३५ च्या आसपास, नकार द्यायला काही कारण नाही, पण अँटेचमेंट होत नाहीये.

इकडचे तिकडचे विषय झाले
एकमेकांच्या आवडीनिवडी झाल्या, बरेसचे विषय झाले पण तो एक्स फॅक्टर मिसिंग आहे
लग्न आता महिन्याभरात आलय, दोघांनाही तेच टेंशन आलय, भेटणे , watsapp, सुरु आहेच पण काही समजत नाहीये, २१ व्या वर्षी असतो तसा अवखळ पणा नस्लयाने की कशाने काही कळत नाहिये,मान्य आहे दोन महिन्यांच्या भेटित लगेच प्रेम कसे होईल पण खुप ताण आलाय याचा, घेतलेला निर्णय बरोबर असेल ना

Group content visibility: 
Use group defaults

अरेंज मॅरेजमध्ये कदाचित शारीरीर जवळीक साधल्यानंतर तो खुलेपणा तो कम्फर्ट येत असावा... हा फक्त एक अंदाज. बाकी अनुभवी जाणकार सांगतील Happy

निर्णय योग्य ठरेल.
आणि नो मॅरेज इज जस्ट रोझेस अँड वाईन्स. एकमेकांशी भरपूर गप्पा मारा(नुसतं 'लग्न झाल्यावर खोल्यांना हा रंग देऊ, त्या ट्रॉल्या करु' नाही.सर्व प्रकारचे विषय.सिरीयस पण.) एकमेकांची मते कळूदे.काय 'अजिबात चालणार नै', काय 'चालवून घेऊ' आणि काय 'हे मात्र आमच्यात कॉमन हवेच' हे मुद्दे शोधून काढा. थोडी भांडणे कुरबुर झाली तर अपसेट होऊ नका.
सर्वात महत्वाचे : मूल कधी पाहिजे, पाहिजे की नको, न झाल्यास ट्रीटमेंट, अडॉप्शन ची तयारी/इच्छा दोघांची आहे का,किंवा प्रयत्न सोडून देऊन मूल नसताना एकमताने आयुष्य एन्जॉय करण्याची तयारी आहे का यावर एकमेकांची मते तपासून घ्या.अलाईन करुन घ्या

@ mi_anu >>>> उत्तम प्रतिसाद

यात अजुन एक म्हणजे, तुम्हाला किंवा त्यांना कोणी दुसरी व्यक्ती आवडत नाहिये न ते पहा, म्हणजे जरी अरेंज मॅरेज असेल पण दोघांतील एकाचेही कोणा दुसर्यावर प्रेम असेल अन हे लग्न फक्त एक तडजोड असेल तर ...

मला वाटते लग्न ठरवुन केलेले असो वा प्रेम विवाह, आपले पुर्ण आयुष्य ज्या व्यक्ती सोबत घालवायचे आहे, तिच्याशी भावनिक अटेचमेंट खुप गरजेची आहे, प्रेम अन जिव्हाळा हवाच

@@यात अजुन एक म्हणजे, तुम्हाला किंवा त्यांना कोणी दुसरी व्यक्ती आवडत नाहिये न ते पहा, म्हणजे जरी अरेंज मॅरेज असेल पण दोघांतील एकाचेही कोणा दुसर्यावर प्रेम असेल अन हे लग्न फक्त एक तडजोड असेल तर ...

Fortunately असे काही नाहीये Happy

बन्या, सगळं छान होईल. काळजी करु नका.
एकमेकांना वेळ द्या. एकमेकाम्च्या आवडीनिवडी जपा. तसेच नावडीही जपा.

प्रेम म्हणजे वेगळे काही नसते हो, इतके धास्तावू नका. एकमेकांच्या आवडी एकमेकांनकळत जाणून घ्यायचा प्रयत्न करा व त्या प्रमाणे छोट्या गिफ्ट्स द्या. जसे तिला पिवळा रंग आवडत असेल तर एक पिवळा झरबेरा नाहीतर गुलाब घेऊन जा... बघा काय होते ते.

बेस्ट म्हनजे दोघे एखाद्या ट्रेकवर जा, भले दोन दिवसांचा असो. दिवसाचा बराच वेळ एकत्र घालवला की अंदाज येईल एकमेकांचा.

तुमचे वय 35 असले तरी वागणे 21 चे असू शकते ना.. तेव्हा वय डोक्यातून काढून टाका, उगीच गम्मत म्हणून आईस्क्रिम पार्लरला भेट द्या, चाट खा, एकत्र फिरायला जा... जिथे राहता तिथल्या बागांना भेटी द्या...

तुम्ही लग्नाचे ठरवलेत व आता लग्न महिन्यावर आले.तेव्हा तसेच काही संदेश समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीतून मिळत नसतील तर निर्णय योग्य की अयोग्य हा विचार डोक्यातून काढून टाका. संदेश मिळत असतील तर गोष्ट वेगळी.

प्रथमदर्शनी प्रेम वगैरे जितके खरे तितकेच सहवासातून प्रेम खरे आहे. प्रथमदर्शनी प्रेम नंतर ओसरू शकते पण सहवासातून निर्माण झालेले दीर्घकाळ टिकते.

म्हणून डोक्यातून सगळे किंतु परंतु काढून टाका व मनात मी 21विशीचा आहे समजून धाडकन उडी मारा प्रेमात Happy Happy

Dont worry

आता नसेल काही वाटत पण लग्नानंतर नक्कीच जवळीक वाटायला लागेल...

देवकी ह्यांनी बरोबर सांगितलय...सहवासातून प्रेम वाढत ..

एकच लक्षात ठेवा सकाळी उठल्या उठल्या आरश्या समोर उभे राहुन "नेहमी माझीच चुक असते, पुन्हा ही चुक करणार नाही आणि अर्ग्यु करणार नाही" असं दहा वेळा म्हणा.
सुखि व्हाल!!
बाकी ते प्रेम बिम होत राहील हळु हळु आयुष्य पडलय सगळं,

धन्यवाद मंडळी, बराच धीर आलाय, अनुभवी लोकांचेऎकणे नेहमीच चांगले, कारण हल्ली लव मॅरेज च्या जगात आमच्यासारखी साधी मंडळी मागे पडतात

बेस्ट म्हनजे दोघे एखाद्या ट्रेकवर जा, भले दोन दिवसांचा असो.
>>>>

+786
हा सल्ला मी सुद्धा देणार होतो. पण उगाच काही वेगळा अर्थ निघायचा म्हणून बोल्लो नाही.
आमच्यायेथील एक अरेंज मॅरेज ठरलेले जोडपे साखरपुडा करून मस्त गोवा ट्रिप करून आले. ग्रूपसोबत गेले. मग कम्फर्ट लेव्हल आल्यावर तिथे त्या ग्रूपपासून वेगळे झाले. ग्रूप परत आला आणि हे जास्तीचे दोन दिवस राहिले Happy

पुर्ण दिनचर्या, छोट्या मोठ्या प्रसंगातील वागणे, बारीक सारीक सवयी वगैरे दोनचार दिवस एकत्र राहिल्यावरच समजते.. आणि ते एकमेकांच्या सहवासात राहणे आवडूही लागते ..शेवटी एखादा माणूस आवडणे म्हणजे तरी काय दुसरे Happy

प्रेम कोणालाच नसते हो.
एकमेकांची सवय असते फक्त.
तुम्हालादेखील होईल... काळजी करू नका ☺️ शुभेच्छा !

मी अनु चा प्रतिसाद खूप आवडला.
अवखळ वय सोडून थोडं प्रौढ वयात लग्नं झालं कींवा ठरलं की इतर बर्‍याच गोष्टींचा विचार डो़क्यात घोळत असतो (जबाबदार्‍या, भविष्य इ) त्यामुळे अवखळपणे करायला मन धजावत नाही, शिवाय लोक काय म्हणतील याची भिती असतेच.
सगळ्या लग्नात प्रेम असतेच असे नाही, आणि सगळी प्रेमं लग्नात रुपांतरित होतात असं नाही.
सहजीवनात प्रेम हा एकच फॅक्टर नाही. एकत्र भाजी आणणे, एकाने चिरून धुणे, दुसर्‍याने ती फोडणीस टाकणे. घर हे एक डोमेन मानून सर्व कामे पडतील तशी करणे (हे तुझे, हे माझे न करता) एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना आवडेल असे ड्रेस घालणे, सरप्राईजेस देणे, कठिण प्रसंगात पाठिशी उभे राहणे. विश्वास निर्माण करत मित्रमैत्रिणीसारखे जगणे.. इ. करून पहा, प्रेम कधी झाले कळणारच नाही.

मान्य आहे दोन महिन्यांच्या भेटित लगेच प्रेम कसे होईल पण खुप ताण आलाय याचा, घेतलेला निर्णय बरोबर असेल ना>>> बघा तुम्हालाही मान्य आहे की २ महिन्याच्या भेटीत प्रेम होणे अवघड आहे. कारण तुमचे दोघांचे वय तुम्ही म्हणता त्या प्रमाणे अल्लड राहिलेले नाही. अरेंज मॅरेजमध्ये नाते बिल्ड व्हायला वेळ तसाही लागतोच. मुळात तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याप्रमाणे प्रेमात पडायचा प्रयत्न तर करुच नका, कारण तो तसा करताही येत नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुमचे प्रेमाबद्दल काही पूर्वग्रह असतील तर ते मनातून काढून टाका व थोडा वेळ द्या नाते फुलायला. प्रेम आपोआपच होइल. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा!

{{{ आम्ही दोघेही पुण्यातले वय ३५ च्या आसपास, नकार द्यायला काही कारण नाही, पण अँटेचमेंट होत नाहीये. }}}

आमच्या काळी तर सर्रास अ‍ॅरेंज मॅरेजेसच होत. आजच्या काळातही प्रेमविवाह वाढले असले तरीदेखील मेजॉरिटी ठरवूनच केलेले असतात. तरीपण स्थळ पाहतानाच एक आंतरिक ओढ जाणवते. रुप / देखणेपण हा तर आकर्षणाचा भाग आहे पण त्याशिवाय आवाज, वाक्चातूर्य, पाककला किंवा इतर कुठलाही एखादा गुण एकमेकांना भुरळ पाडतो. दोघांना एकमेकांची अतीव ओढ वाटली तर सोन्याहून पिवळं.. पण निदान एकाला तरी दुसर्‍याविषयी विशेष आकर्षण वाटायला हवे तरच तो दुसर्‍यालाही कालांतराने स्वतःच्या प्रेमात पाडून घेतो. पण जर दोघांनाही एकमेकांविषयी काहीच ओढ वाटत नसेल तर जरा थांबा, वाट पाहा पुन्हा विचार करा आणि काही सकारात्मक जाणवत असेल तरच निर्णय घ्या नाहीतर मैत्रीपूर्ण निरोप घेतलेला उत्तम. लग्न करुन नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीच वेगळे व्हाल तर बरे.

सर्वात सोपी युक्ति म्हणजे पंधरा दिवस फोन, वॉट्सप, ईमेल किंवा प्रत्यक्ष भेटणे या कुठल्याही प्रकारे संपर्क करु नका. या संपर्क उपवासाने हूरहूर वाढली, भेटीची कडकडून भूक लागली, एकमेकांना न भेटल्याने अस्वस्थ / बेचैन वाटलं आणि मनाला आवर घालूनदेखील एकमेकांशी संपर्क करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाहीत तर आपोआपच प्रेमाची प्रचीती येईल.

योग्य निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा!

अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात का पडावे, या प्रश्नाचं उत्तर शोधा, ते सापड्ल्यावर प्रेमात कसे पडावे हा प्रश्न पडणार नाहि... Proud

एक इंस्पेक्टर मैत्रिणीच्या मदतीने वरच्या पोस्टीत तुमचा व तुमच्या वाग्दत्त वधूचा हरवलेला एक्स फॅक्टर शोधून पोस्ट केला आहे. पुन्हा वेंधळेपणाने त्याला मिसींग करू नका. महिनाभर जपा व लग्नाच्या बोहल्यावर त्याला दोघांमध्ये ठेवून मगच लग्न करा. Happy खूप खूप शुभेच्छा.

सीमंतिनी, आपली पोस्ट वाचून रब ने बना दि जोडी आठवला..
नवर्‍यात एक्स फॅक्टर हवा अशी बायकोची ईच्छा.. आणि म्हणून बायकोला खुश करत तिचे प्रेम मिळवायला नवर्‍याला डबल रोलचा सहारा घ्यावा लागतो .. शेवटी नवर्‍यातील खरा एक्स फॅक्टर त्याचे आपल्यावरील प्रेम आणि समजूतदारपणाच असते हे बायकोला समजते.. छान चित्रपट Happy

ऋन्मेऽऽष, तू आता थोडे नॉन-शाहरुख पिक्चर बघायला सुरूवात कर. ह्यापुर्वी अनुभव, रजनीगंधा, थोड्या वेगळ्या प्रकारे पण अशाच स्टाईलचा, मै मेरी पत्नी और वो असे अनेक सिनेमे येऊन गेले. एकेक करून ते बघायला सुरूवात कर आता.

ऋन्मेऽऽष, तू आता थोडे नॉन-शाहरुख पिक्चर बघायला सुरूवात कर. >> Biggrin सशल, आग से ठंडक बर्फी से गर्मी माँगके हम पछताए... Wink

ट्रेकची आयडिया चांगली आहे. तुमच्या किंवा त्यांच्या ग्रुपबरोबर जा. ( अनोळखी ग्रुपऐवजी) म्हणजे आपोआप चिडवाचिडवी होईल Wink
आणि काय तो एक्स फॅक्टर सापडेलही कदाचित Happy

Pages