अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे?

Submitted by बन्या on 26 March, 2018 - 23:55

अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे? म्हटला तर बाळबोध पण तेवढाच महत्वाचा प्रश्न
सध्या माझ्यासमोर हाच प्रश्न पडलाय राव. आम्ही दोघेही पुण्यातले वय ३५ च्या आसपास, नकार द्यायला काही कारण नाही, पण अँटेचमेंट होत नाहीये.

इकडचे तिकडचे विषय झाले
एकमेकांच्या आवडीनिवडी झाल्या, बरेसचे विषय झाले पण तो एक्स फॅक्टर मिसिंग आहे
लग्न आता महिन्याभरात आलय, दोघांनाही तेच टेंशन आलय, भेटणे , watsapp, सुरु आहेच पण काही समजत नाहीये, २१ व्या वर्षी असतो तसा अवखळ पणा नस्लयाने की कशाने काही कळत नाहिये,मान्य आहे दोन महिन्यांच्या भेटित लगेच प्रेम कसे होईल पण खुप ताण आलाय याचा, घेतलेला निर्णय बरोबर असेल ना

Group content visibility: 
Use group defaults

प्रेमबीम काही नसतं ओ, life is all about adjustment n compromises
फक्त दोघांनी एकमेकांना समजून घेणे, दुसर्याला जपणे , फक्त शारीरिक जवळीक नाहीतर मनाने जवळ यायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कालांतराने सगळे आपोआप आवडू लागायची शक्यता जास्त आहे.
फक्त या सर्वात स्वतःचे अन आपल्या पार्टनर चे स्वत्व सुद्धा सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मानिनी, पोस्ट आवडली.खरेच आहे.९०% संसार तडजोडींवर चालू रहातात.

बन्या, तुम्ही आता इथे लक्ष घालू नका.मस्त हिंडा फिरा.साधनाताईंने म्हटल्याप्रमाणे गुलाब वगैरे द्या.नाटक सिनेमा पहा.जरुर नाही सिनेमाची स्टोरी काय आहे ते.केवळ सहवास हवा.माबोवर लग्न होईपर्यंत फिरकू नका. Wink

मानिनी, इस्से अच्छा तो "तुम्हे हो ना हो..." ही गा लेती. Happy. >.. असू द्या हो सीमंतिनी, तुम्ही गा जर तुम्हाला वाटते तर

मी , मला जे वाटले ते लिहिले

माबोवर लग्न होईपर्यंत फिरकू नका. >>> अगदी बरोबर

अन आलात तरी ह्या धाग्याचे प्रतिसाद वाचू नका, नाहीतर एक शंका मिटवायच्या नादात इतर हजार प्रश्न तयार होतील

इंडोनेशियन भाषेत प्रेमाला एक छान शब्द आहे. "चिंता. ". प्रेम करणे म्हणजे चिंता करणे.
फक्त एकच सतत करा. तिची काळजी करा व घ्या. बास. यात तुम्ही अजून एक काळजी घ्या. अती करू नका. Happy

>>यात तुम्ही अजून एक काळजी घ्या. अती करू नका. Lol
चूप भी रहीये, ये क्या कयामत हैं |
आपकी भी अजीब आदत हैं |
इतना हंगामा किसलिये आखिर |
प्यार हैं या कोई मुसिबत हैं | Happy

माबोवर लग्न होईपर्यंत फिरकू नका.
>>>>>

मला तर हा उलटा सल्ला वाटत आहे.
माबोवर जे काही बागडायचे आहे ते लग्नाआधीच बागडून घ्या. पण लग्नानंतर माबोवर फिरकू नका. जोपर्यंत संसार सुखाचा आणि सुरळीत चालू आहे तोपर्यंत तर नकोच नको.
म्हणजे निदान मी तरी असेच वागायचे ठरवले आहे.

ऋन्मेऽऽष, तू आता थोडे नॉन-शाहरुख पिक्चर बघायला सुरूवात कर.
>>>

अहो सशल, जर विषय रोमान्सचा आहे तर शाहरूखला पर्याय नाही. ईथे उघड कोणी कबूल करो वा न करो. त्याने प्रत्येक सिच्युएशनला साजेसा रोमान्स केला आहे. एकदा त्याच्या सर्व चित्रपटांची पारायणे केली की आयुष्यातील सर्व प्रेमविषयक चिंता आणि शंका मिटल्याच म्हणून समजा.

तुम्ही उदाहरणे दिली आहेत ते जुने चित्रपट आहेत. याबाबतीत काळासोबत राहिलेले चांगले Happy

अरे हो, शाहरूखवरून स्वप्निल आठवला. दोघांनी एकत्र मिळून मुंबई पुणे मुंबई दोन्ही भाग बघून घ्या. पाहिले असल्यास पुन्हा एकत्र बघा..

{{{ जर विषय रोमान्सचा आहे तर शाहरूखला पर्याय नाही. }}}

म्हणजे? याचा अर्थ काय? स्त्री असो किंवा पुरुष ज्या कोणा व्यक्तिस रोमांस करावयाचा आहे त्यांना शाहरुखसोबतच तो करावा लागेल? नोव्हेंबेर १९६५ च्या आधी जगात रोमांस नव्हता?

नोव्हेंबेर १९६५ च्या आधी जगात रोमांस नव्हता?
>>>>

1965 काय आहे?
भारत पाक युद्ध?
त्याचा ईथे काय संबंध?
एवरीथिण्ग फेअर ईज लव्ह एण्ड वॉर??

येनीवेज,
वर मी लिहिलेय की रोमान्स जगाच्या सुरुवातीपासून होता. पण काळानुसार तो कसा करावा हे बदलत जाते. म्हणून जुन्या काळातील चित्रपटांऐवजी आताचे बघा एवढेच म्हणायचे आहे.
देव आनंद आणि राजेश खन्ना यांनीही त्यांच्या काळात छान रोमान्स केला आहे. पण धागाकर्त्याचे वय 35 असेल तर शाहरूखचे सिनेमे जास्त चांगले रिलेट होतील असे मला वाटते. बाकी ज्याची त्याची आवड आहेच.

असो, वरच्या एक्स फॅक्टर संबंधी चर्चेत मला रब ने बना दी जोडी चित्रपट आठवला आणि तो सुचवावासा वाटला. आता तो निव्वळ शाहरूखचा आहे म्हणून आशय समजून न घेता विरोधाला विरोध होणार असेल तर काही अर्थ नाही. ईतर कलाकारांबद्दलही आदर आहेच, आणि ईतर चित्रपट कोणी सुचवेल तर त्याचेही स्वागत आहेच Happy

{{{ 1965 काय आहे? }}}

शाहरुख जन्मला.

{{{ वरच्या एक्स फॅक्टर संबंधी चर्चेत मला रब ने बना दी जोडी चित्रपट आठवला आणि तो सुचवावासा वाटला. आता तो निव्वळ शाहरूखचा आहे म्हणून आशय समजून न घेता विरोधाला विरोध होणार असेल तर काही अर्थ नाही. }}}

तो चित्रपट या धाग्याच्या विषयाशी जुळत नाही. त्यात अपघाताने लग्न झालेच आहे आणि आता या लग्नाला बायकोने विरोध केला नसला तरी ती आपल्या प्रेमातही नाही, कोरडेपणाने वागते हे जाणवल्यावर नायक ती आपल्या प्रेमात पडावी म्हणून जे काही माकडचाळे करतो ते तुम्ही इथे धागाकर्त्याला करायला सुचवताय का? दुसर्‍या व्यक्तिच्या गेटअप मध्ये शिरून तो चक्क बायकोच्या पातिव्रत्याची परीक्षा पाहत असतो. कुणीही सुज्ञ माणूस तसे करणार नाही.

धाग्याचा विषय काय? आपण ओढून ताणून इथे शाहरुख स्वप्नील आणतोय काय? याचा जरा शांतपणे विचार करा. धागा याबाबत आहे की - लग्न ठरले आहे पण ओढ वाटत नाही तर ते करावे की कसे? या विषयावर देखील काही कथा, कादंबर्‍या, नाटक, चित्रपट आहेत. पण अर्थातच त्यांचा शेवट (काही अपवाद वगळता) नायक - नायिकेचे मीलन घडवून आणायचेच या उद्देशाने केला असल्याने त्यात प्रॅक्टिकल सोल्यूशन शोधण्यात अर्थ नाही.

ते तुम्ही इथे धागाकर्त्याला करायला सुचवताय का?
>>>

त्या चित्रपटात दाखवलेले करायला कसे सुचवेन हो..
मागच्या पानावर जा..
माझी रब ने बना दी पोस्ट पुन्हा वाचा..
चला
मीच कॉपीपेस्ट करतो..

>>>>>
सिमंतीनी, आपली पोस्ट वाचून रब ने बना दि जोडी आठवला..
नवर्‍यात एक्स फॅक्टर हवा अशी बायकोची ईच्छा.. आणि म्हणून बायकोला खुश करत तिचे प्रेम मिळवायला नवर्‍याला डबल रोलचा सहारा घ्यावा लागतो .. शेवटी नवर्‍यातील खरा एक्स फॅक्टर त्याचे आपल्यावरील प्रेम आणि समजूतदारपणाच असते हे बायकोला समजते.. छान चित्रपट Happy
>>>>

हॅपी Happy

अवांतर - शाहरूखचा जन्म नोव्हेंबर 1965 हे नव्हते माहीत मला. माहितीबद्दल धन्यवाद Happy

रब ने बना दी जोडी मध्ये आपला ओरिजिनल नवरा लग्ना आधी मेल्यावर लग्न करण्या साठी पुढे होणार्‍या, त्याच्याशी स्वतःच्या आणि कूटुंबाच्या कंसेंट ने लग्न झालेल्या आणि तरी रुडली वागणार्‍या आणि मग तो फ्लॅशी बनून आल्यावर त्याच्यासाठी आपल्या खर्‍या नवर्‍याला चीट करायला निघालेल्या अनुष्काच्या २ कानाखाली मारुन तिचे दात पाडायला हवेत. Happy
बाकी पुढे चालूद्या चर्चा.

जर विषय रोमान्सचा आहे तर शाहरूखला पर्याय नाही. ईथे उघड कोणी कबूल करो वा न करो.>>>> ई, शाहरुख! महा मग्रूर आणि तेच तेच करत रहाणारा.

आग से ठंडक बर्फी से गर्मी माँगके हम पछताए...ध्यान अब आये हम ने गवांये दिन कितने अनमोल...>>
पण आता चुक नाही, कचरा वाचण्यात वेळ वाया घालवत नाही..

देव आनंद आणि राजेश खन्ना यांनीही त्यांच्या काळात छान रोमान्स केला आहे. पण धागाकर्त्याचे वय 35 असेल तर शाहरूखचे सिनेमे जास्त चांगले रिलेट होतील असे मला वाटते. बाकी ज्याची त्याची आवड आहेच.
>>
लोकहो, काही कळले का? Wink

अनुष्काच्या २ कानाखाली मारुन तिचे दात पाडायला हवेत.
>>>>>

अनु आपण नैतिकतेचा विचार करत आहात, मानसिकतेचा नाही. प्रेमाला नैतिकतेचे नियम जसेच्या तसे लावणे चूकच. त्यातील शाहरूख पात्राबद्दल वाईट वाटत असले तरी अनुष्काबद्दल चीड येत नव्हती.

पहिली गोष्ट म्हणजे शाहरूखने जे आयत्यावेळी लग्न करायची तयारी दाखवली ती मेहेरबानी अनुष्कावर नसून खरे तर तिच्या घरच्यांवर होती. कारण अशी मुलगी लग्नाच्या बोहल्यावरून परत फिरणे म्हणजे ईज्जतीचा कचरा. जळले मेले पुरुषप्रधान समाजाचे उसूल.
येनीवेज, शाहरूख मात्र चांगलेच वागला, जे तिच्याशी ऐनवेळी लग्न केले. पण त्या उपकाराचे ओझे जे तिला व्यक्तीश: नको होते ते तिने बाळगण्याची अपेक्षा म्हणजे स्त्री वर आणखी एक अन्याय नाही का..
बरं तिला त्या उपकाराची जाण असेलही, पण त्याबदल्यात त्याने जे पदरात पडलेय त्यावर प्रेम करावे ही कसली अपेक्षा? मुळात प्रेम होते का असे सहज..
चला प्रेमाची अपेक्षा नसेल, किमान रूड वागू नये अशी अपेक्षा असेल, पण यासाठी तिची त्यावेळची मानसिकता समजायला हवी. मनाने स्विकार केलेला मेला आणि आता लगेचच मनाने स्विकार न केलेल्या पुरुषासोबत त्याची पत्नी म्हणून राहणे यात किती अवघडलेपण आहे हे मी एक पुरुष म्हणूनही समजू शकतो. त्यामुळे तिच्या रूड वागण्याचे एक प्रेक्षक म्हणून काही वाटले नाही.
राहिला प्रश्न मॅचो शाहरूखच्या प्रेमात पडायचा. तर पहिल्या लग्नाला तोपर्यण्त काहीच अर्थ नसल्याने आणि फिलिंग्स कमिटमेंट एकाच बाजूने असल्याने मला तो व्यभिचारही वाटला नाही.

जर विषय रोमान्सचा आहे तर शाहरूखला पर्याय नाही. ईथे उघड कोणी कबूल करो वा न करो.>
इम्रान हाश्मी विसरला का भावा ☺️

इम्रान आणि शाहरूख या दोघांचा रोमान्स एकमेकांशी व्यस्त गुणोत्तरात आहे. ज्याची त्याची स्टाईल, ज्याची त्याची आवड. मला माझी आवड आठवली, ती सुचवली Happy

बापरे, किती त्या पोस्टी "रब ने बना दी" वरून... शाहरूख हल्लीचा कुठे?! हल्लीचाच सिनेमा एक्स फॅक्टर साठी पहायचा असेल तर "दम लगा के" पहा. दोघे अगदी दोन वेगळ्या सूर्यमालिकेतून आल्याइतके वेगळे. दोघांचे पटत ही नाही सुरूवातीला पण शेवटी "टीम बिल्डिंग" टास्क दिल्यावर "एक्स फॅक्टर" उपटसुंभासारखा मध्येच येतो पण अगदी आवडून जातो.

मुळात फक्त हेअर स्टाईल आणि मिश्या नॉन मिश्या फरक केल्यावर आपलाच नवरा इतके दिवस ओळखू न शकलेल्या अनुष्का च्या डोक्यात अजून 4 टपल्या मारून झाल्यावर मग तिचे दात पाडायला हवेत ☺️☺️☺️☺️
अनुष्का आवडते हो, पिक्चर मधल्या पात्राच्या.

Pages