अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे?

Submitted by बन्या on 26 March, 2018 - 23:55

अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेमात कसे पडावे? म्हटला तर बाळबोध पण तेवढाच महत्वाचा प्रश्न
सध्या माझ्यासमोर हाच प्रश्न पडलाय राव. आम्ही दोघेही पुण्यातले वय ३५ च्या आसपास, नकार द्यायला काही कारण नाही, पण अँटेचमेंट होत नाहीये.

इकडचे तिकडचे विषय झाले
एकमेकांच्या आवडीनिवडी झाल्या, बरेसचे विषय झाले पण तो एक्स फॅक्टर मिसिंग आहे
लग्न आता महिन्याभरात आलय, दोघांनाही तेच टेंशन आलय, भेटणे , watsapp, सुरु आहेच पण काही समजत नाहीये, २१ व्या वर्षी असतो तसा अवखळ पणा नस्लयाने की कशाने काही कळत नाहिये,मान्य आहे दोन महिन्यांच्या भेटित लगेच प्रेम कसे होईल पण खुप ताण आलाय याचा, घेतलेला निर्णय बरोबर असेल ना

Group content visibility: 
Use group defaults

शाहरूख हल्लीचा कुठे?!
>>>
येस्स हल्लीचा नाहीएच. पण जे आजच्या तारखेला पस्तिशी ते चाळीशीत आहेत ते मोठ्या पडद्यावर शाहरूख आमीर आणि छोट्या पडद्यावर सचिनला बघत मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे दोघे जवळचे वाटतात ईतकेच.

तुम्हाला काहीच आवडले नाही का बोलून वा भेटून? मग हो कशाच्या जोरावर सांगितले ते आठवून पहा. तुम्हाला वय्य झाले असे वाटल्याने आणि त्याचे सामाजिक प्रेशर ( उगीच) घेतलेय का दिलेय? कारण भारतात ३५ वय झाले की लोकं आहेतच टोमणे मारायला.
अजून दोन महिने आहेत तर , एक प्रयोग करून पहा, आठ दिवस काहीच बोलू वा भेटू नका.
तुम्ही काय केले तर तुम्हाला एअटॅचमेंट वाटते ते तपासून पहा. तुमच्या “कनेक्ट” होण्याची लिस्ट काय?
मूवी? नाटक? जीमला एकत्र? खाण्या पिण्याचे मॅचिंग? चांगली मैत्री झालीय इतपत तरी पोहोचलात का? कम्फर्ट वाट्ततो का आता फोन केलाच तर मारतो हवामानाच्या गप्पा असे आहे का?
काह्रेच आकर्षण नाही वाटले भेटून? कुछ्कुछ होता है असे नसेलच वाटत तर थांबएले बरे.

मनाने स्विकार कुठल्याच लेवलवर नसेल तर लग्नानंतर सामावून घ्यायची पातळी कमी असते.
बाकी, लग्नानंतर आधार किंवा सोय(अगदीच क्रुड भाषेत आणि भावनाहिन वाटेल हा शब्द. किंवा कम्फर्ट योग्या वाटेल) असे होते नात्यात बर्‍यापैकी.

तुम्हाला वय्य झाले असे वाटल्याने आणि त्याचे सामाजिक प्रेशर ( उगीच) घेतलेय का दिलेय? कारण भारतात ३५ वय झाले की लोकं आहेतच टोमणे मारायला.>>>> अगदी बरोबर.

कुछ्कुछ होता है असे नसेलच वाटत तर थांबएले बरे.>>>>> अहो असं नका बोलू.त्याना तेच तर टेंशन असावे.

व्हॉ.अ‍ॅच्या सौजन्याने: झाडाला पाणी आणि नात्यांमधे संवाद नसेल तर दोन्ही सुकतात.
नुसते एकमेकांजवल असणे हा पण मूक संवाद आहे.

कुछकुछ होता हे असे लगेच वाटत नाही हाच इश्यू आहे, पण मैत्री म्हणाल तर बोलणे व्यवस्थित सुरु आहे तो काही प्रोब्लेम नाहीये, बर्यासचशा आवडी निवडी मॅच होतायेत, मेजर डिफरंसेस नसतात संभाषणात

५-६ दिवस अजिबात भेटू नका,फोन करू न्का,व्हॉ.अ‍ॅ,फे.बु.वर अजिबात भेटू नका.मग कळेल.

आयुष्यातील तेवढे दिवस फुकट घालवले म्हणून वाईट वाटेल.

प्रेमाची व्याख्या ही व्यक्तीगणिक बदलते. कुणाला फक्त शारिरिक जवळिक प्रेम वाटत असेल तर (शनाया सारख्या) लोकांना पैसा म्हणजे प्रेम वाटत असेल.
प्रत्येकाने आपापली प्रेमाची व्याख्या बनवावी. दोघांना कशात एकत्र आनंद मिळतो? काय आवडतं, काय नाही याची खुलेपणाने चर्चा करा. एकमेकांच्या मतांचा आदर करा.
तसे ही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाची व्याख्या तशीही बदलत जाते. पंचविशी-तिशी पर्यंत शारिरिक जवळिक, रोमान्स, मुले झाल्यावर जबाबदार्‍या, मग पोरांची शिक्षणं, लग्न, , उतारवय इ. नुसार साथीदाराची गरज, जिव्हाळा या नुसार प्रेमाची शेड ही बदलते.
या सर्व शेड्स तुम्हाला लाभोत. तुमचे वैवाहिक जीवन अतिशय सुरेख जाईल काळजी नका करू Happy

बोलणं होतय आणि ते रटाळ जॉब म्हणून होत नसेल तर मग तेच कुछ कुछ ची सुरवात असु शकते हो. डे ट्रिप करून पहा.
निसर्गाच्या सानिध्यात जावून बघा.
माझ्या मैत्रीणीने आता ४० च्या आसपास लग्न केले. अँरेजच होते, फार काहीवेळ काही घेतला नाही पण तिच्या भाषेत आणि तिच्या अनुभ्वाचे सांगायचे तर, वी कुड टॉक अबॉउट अवर फार्टींग अँड वी कुड लाफ , वाज दी मोमेंट दॅट आय फेल्ट, आय कॅन मॅरी धिस गाय. Happy
आता अगदी असेच होइल कोणाच्या बाबतीत असे नाही. पण मुद्दा हा की, तो कुठलाही क्षण असतो आणि गोष्ट की तुम्ही क्लिक होता. वेळ नक्कीच द्यावा त्यासाठी.

देवकी, अहो, मी फक्त एक सुचना दिली की तपासून पहा. इतके टेंशघेण्यापेचाक्षा चाचपलेले बरे.

५-६ दिवस अजिबात भेटू नका,फोन करू न्का,व्हॉ.अ‍ॅ,फे.बु.वर अजिबात भेटू नका.मग कळेल. >> असं काहिहि होतं असं मला नाही वाटत. प्रेम आहे ते, कधी कसं होईल ते आपण नाही सांगू शकत.

वी कुड टॉक अबॉउट अवर फार्टींग अँड वी कुड लाफ , वाज दी मोमेंट दॅट आय फेल्ट, आय कॅन मॅरी धिस गाय. Happy >> हे अत्यंत खरे आहे झंपी. कारण वय वाढते तसं आपल्याला लोक जज्ज करतील ही भिती मनात प्रचंड घर करू लागते.
And not being judged is the basic need of every human being.
That’s why we feel comfortable with friends, where if we fart they laugh.
Or reply back by farting louder. Lol

>>>५-६ दिवस अजिबात भेटू नका,फोन करू न्का,व्हॉ.अ‍ॅ,फे.बु.वर अजिबात भेटू नका.मग कळेल.<<

५-६ दिवस प्रेम आहे की नाही ते तपासण्यासाठी नाही हो, तर त्यांची गोंधळलेली मनःस्थिती शाण्त करून विचार( वा अति विचार नाही ना करत ) ठरवायला.
५-६ काही नाही हो फुकट जात. उलट उत्तर मिळेल किंवा अति विचार थांबतील ...

आता लगनाला बोलवाच आणि अहेर नको असे स्पष्ट लिहा , आमरस वगैरे ठेवा. (हे स. पे. मधल्या व्यक्तीला सांगावे लागते. ).

ह. घ्या.

तर त्यांची गोंधळलेली मनःस्थिती शाण्त करून विचार( वा अति विचार नाही ना करत ) ठरवायला.>>>>>हेच म्हणायचे होते.धन्यवाद झंपी!

लग्नाला ४५ पेक्षा जास्त वर्षे झालेल्या माणसाचे विचार कुणाला वाचायचे आहेत का?
आवडणार नाहीत, असे काहींनी मला सांगितले. म्हणून आधी परवानगी विचारतो.
कारण कुठला धागा गंभीरपणे घेतला जातो तर कुठला केवळ मनोरंजनासाठी? विशेषतः प्रेम म्हंटले की तरुण लोकांना एकदम रोमँटिक मूड मधे जायला होते, तिथे सत्य सांगण्यात अर्थ नाही.

कुणाला वाचायचे असतील तर अर्ध्या तासाच्या आत टीपापा धाग्यावर जा. तिथे पाच मिनिटात २० नुसत्या इमोजी टाकून गटारात तुंबलेल्या पाण्यासारखा धागा वाहवून टाकतात.

(हवा हवाई या एक पुरातन आय डी ने लिहिलेली ही उपमा मी चोरली आहे. मराठीतील उत्तम लिखाण असे पुढे आणले तरच मराठी टिकेल, नाहीतर आहेतच इथे अनेक लोक - मराठीच्या प्रेमाच्या नावाखाली मराठीचे वाट्टोळे करायला).

लग्नाला ४५ पेक्षा जास्त वर्षे झालेल्या माणसाचे विचार कुणाला वाचायचे आहेत का? ">>> विचारताय काय टाकाकी

टिपापा, नाही दिसत, इथे टाका

टीपापा वरून (संक्षिप्त)
मला माझ्या लग्नाबद्दल काहीहि आठवत नाही, कधी झाले, कसे झाले. कुणि विचारले लग्न कधी झाले तर मी आपला प्रामाणिक पणे सांगतो काही लक्षात नाही - आठवते आहे तेंव्हापासून ही घरातच बघायची सवय आहे. प्रेम जुळले की नाही हेहि नक्की सांगता येत नाही. पण अजून एकमेकांना सोडले नाही नि आता तेहि शक्य दिसत नाही. शेवटी convenience महत्वाचा.
आणि प्रेम म्हणजे काय हो? ते म्हणे आपोआप होते, लग्न होण्याचा, arranged marriage असण्याचा काही संबंध नाही. उगीचच काही तरी - प्रेम होईल का नाही याची चिंता. असे सांगून का प्रेम होते? उग्गीच काहीतरी.
एक गोष्टः
लांबलचक गोष्ट - प्रेमाबद्दल काही कल्पना असणार्‍या बायकोने घटस्फोट घ्यायचा विचार केला नि नंतर तो का व कसा बदलला या बद्दल.
तेंव्हा हे असे असते - कुणास ठाउक प्रेम असते का नसते, पण काहीतरी फायदा असतोच बर्‍या माणसाबरोबर रहाण्याचा.
प्रेमाखेरीज इतर बरेच काही काही असते लग्न करून रहाण्यात.

इथले एकेक प्रतिसाद वाचून 'भारताचा Happiness quotient इतका कमी का आहे ते कळतं!' असं म्हणता येईल का?

स्वतःतर पाट्या टाकायच्याच पण दुसर्यांनाही पाट्या टाकणच कसं योग्य आहे सांगत फिरायचं Angry

<<< कुछकुछ होता हे असे लगेच वाटत नाही हाच इश्यू आहे, पण मैत्री म्हणाल तर बोलणे व्यवस्थित सुरु आहे तो काही प्रोब्लेम नाहीये >>>
अतिशय चांगली गोष्ट आहे. नवरा-बायको एकमेकांचे चांगले मित्र होणे, हे सुखी संसाराचे गुपित आहे. तुम्हाला दोघांना शुभेच्छा.

थोडे अवांतरः
आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस?
मी ही भाबड्यासारखं सगळं सांगितलं.. गॄहपाठ घेतो, किराणा भरतो, कार नीट चालू ठेवतो, इतर कामे करतो इत्यादी इत्यादी आणि नोकरी ही करतो.
हे ऐकून ती म्हणाली, चुकलंच माझं, तुलाच हो म्हणायला हवं होतं.... Light 1

आज ती भेटली. मी विचारायच्या आधीच विचारले तिने, तू सध्या काय करतोस? >>
धागा "सध्या मी काय करू" पासून "सध्या ती काय करते" कडे सरकतोय.

Pages