मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोपाळरावांची सही पाहून त्यांच्या चिरंजीवांनी त्याची सही सही नक्क्ल आपल्या प्रगतीपुस्तकावर केली.

पुर्वी जमिनदार आपल्या कर्जदारांच्या जमिनी लाटत, आणि त्यांच्या बायका स्वयंपाकघरात पुर्‍या लाटत.

काकांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक कार्यालयच घेतले होते भाड्याने.

सार करतानाच ती घडलेल्या घटनेचा सारासार विचार करून सार काढण्याच्या प्रयत्नात होती.

अंगणात सडा घालताना , प्राजक्ताचा सडा पाहून ती आनंदीत झाली, व
सड्यावर जाण्याची तिला आठवण झाली.

उरलेल्या आमटीला कढ काढून तिने पाने वाढायला घेतली
आठवणींचे कढ डोळ्यावाटे वाहू लागताच तिने तोंडावर पाणी मारले
********
पेन्सिलीने सुधारणांच्या नोंदी करून त्याने कच्चा खर्डा बाजूला ठेवला
आजीच्या हातचा खर्डा म्हणजे जिभेला मेजवानीच
********
जग, नातीगोती म्हणजे भुलवणारी माया -- कीर्तनातील निरूपण तिला आठवू लागले.
बारीक झाल्याशिवाय हा घालता येणार नाही, शिंप्याने अजिबात माया ठेवली नाही उसवायला
********
अंधारात काहीतरी वळवळले
जमवलेल्या पैशातून एक सोन्याचे वळं घेऊ दसर्‍याला, ती मनाशी म्हणाली
माराचे वळ दिसतात, शब्दांच्या जखमा नाहीत
वळत गेलेल्या पायवाटेनेच त्याला दृष्टीआड केल्यावर ती नाईलाजाने घरात वळली

कर्णाने वर्तुळ काढून त्याचा व्यास काढला व त्याला कर्ण म्हंटले, म्हणून व्यासमुनींनी "तो त्रिकोणाचा असतो" म्हणत त्याचा कर्ण पकडला Happy

Pages