Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खोड उगाळताना , कुणाची तरी खोड
खोड उगाळताना , कुणाची तरी खोड काढण्याची, त्या जून्या खोडाला सवयच होती.
ओढ्यापाशीच त्याने तिला
ओढ्यापाशीच त्याने तिला बाहुपाशात ओढले.
पत्यांचा डाव मांडता मांडता
पत्यांचा डाव मांडता मांडता तिने एकिकडे डावाने आमटी ढवळली.
गोपाळरावांची सही पाहून
गोपाळरावांची सही पाहून त्यांच्या चिरंजीवांनी त्याची सही सही नक्क्ल आपल्या प्रगतीपुस्तकावर केली.
पुर्वी जमिनदार आपल्या
पुर्वी जमिनदार आपल्या कर्जदारांच्या जमिनी लाटत, आणि त्यांच्या बायका स्वयंपाकघरात पुर्या लाटत.
काकांच्या साठीच्या
काकांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक कार्यालयच घेतले होते भाड्याने.
पुर्वी देवीचा रोग झाला की
पुर्वी देवीचा रोग झाला की रूग्णाच्या आरोग्यासाठी लोक देवीला साकडे घालत.
दक्षाबाई जोरात!
दक्षाबाई जोरात!
देव काकांनी देवाला प्रार्थना
देव काकांनी देवाला प्रार्थना केली.
आजी पिढीने आजी आजोबांचा चा
आजी पिढीने आजी आजोबांचा चा मान राखावा.
तारेवरची चिमणी बघत असताना तार
तारेवरची चिमणी बघत असताना तार आली आणि पाकही अगदी एकतारी झाला.
नानांना शेतात जोत धरल्यावर
नानांना शेतात जोत धरल्यावर घराचे जोत नीट करण्याची आठवण झाली.
सार करतानाच ती घडलेल्या
सार करतानाच ती घडलेल्या घटनेचा सारासार विचार करून सार काढण्याच्या प्रयत्नात होती.
सरांनी सांगितले की पावसाची सर
सरांनी सांगितले की पावसाची सर पडू लागली ना झाडांवर वेली सरसर चढतात.
संगिता, हाराभर फ़ुले, हारा
संगिता, हाराभर फ़ुले, हारा साठी घेऊन आली , व हारा करून निघून गेली.
अंगणात सडा घालताना ,
अंगणात सडा घालताना , प्राजक्ताचा सडा पाहून ती आनंदीत झाली, व
सड्यावर जाण्याची तिला आठवण झाली.
काळे काकूंनी काळे वाटाणे
काळे काकूंनी काळे वाटाणे आणले.
दक्षिणा, पुजेसाठी आलेल्या
दक्षिणा, पुजेसाठी आलेल्या गुरुजींना दक्षिणा देऊन कामाला लागली .
आजोबांनी नातवाची भेट घेऊन ,
आजोबांनी नातवाची भेट घेऊन , त्याला आणलेली भेट दिली.
प्रज्ञाने माठातल्या पाण्यात
प्रज्ञाने माठातल्या पाण्यात वाळा घालून, रोहीतच्या पायातही वाळा घातला.
उरलेल्या आमटीला कढ काढून तिने
उरलेल्या आमटीला कढ काढून तिने पाने वाढायला घेतली
आठवणींचे कढ डोळ्यावाटे वाहू लागताच तिने तोंडावर पाणी मारले
********
पेन्सिलीने सुधारणांच्या नोंदी करून त्याने कच्चा खर्डा बाजूला ठेवला
आजीच्या हातचा खर्डा म्हणजे जिभेला मेजवानीच
********
जग, नातीगोती म्हणजे भुलवणारी माया -- कीर्तनातील निरूपण तिला आठवू लागले.
बारीक झाल्याशिवाय हा घालता येणार नाही, शिंप्याने अजिबात माया ठेवली नाही उसवायला
********
अंधारात काहीतरी वळवळले
जमवलेल्या पैशातून एक सोन्याचे वळं घेऊ दसर्याला, ती मनाशी म्हणाली
माराचे वळ दिसतात, शब्दांच्या जखमा नाहीत
वळत गेलेल्या पायवाटेनेच त्याला दृष्टीआड केल्यावर ती नाईलाजाने घरात वळली
परिसा ही परिसाची कथा
परिसा ही परिसाची कथा
दही जमलं असेल तरच मला दहीवडे
दही जमलं असेल तरच मला दहीवडे करायला जमेल
कर्णाने वर्तुळ काढून त्याचा
कर्णाने वर्तुळ काढून त्याचा व्यास काढला व त्याला कर्ण म्हंटले, म्हणून व्यासमुनींनी "तो त्रिकोणाचा असतो" म्हणत त्याचा कर्ण पकडला
कर्ण भारी आहे
कर्ण व्यास भारी आहे, सहीच
भिंती वरची पाल पाहून ती
भिंती वरची पाल पाहून ती घाबरली.
सड्यावर उतारुंनी पाल उभारलं .
अंगावर अलंकार चढवताना ती
अंगावर अलंकार चढवताना ती अलंकार आठवत होती.
सरिताने डाव भरून आमटी वाढली व
सरिताने डाव भरून आमटी वाढली व सागरगोट्यांचा डाव खेळायला गेली.
रंजनाने केलेली पुरण पोळी खाऊन
रंजनाने केलेली पुरण पोळी खाऊन आत्माराम पोळी काढायला गेला.
जन पळभर म्हणतील हाय हाय!
जन पळभर म्हणतील हाय हाय!
अग, कुत्रा आला पळ.
Pages