Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाल माठ पालेभाजी छान ताजी
लाल माठ पालेभाजी छान ताजी मिळाली, नुकतीच काढून ओट्यावरच्या लाल माठाशेजारी ठेवली. आता कांदा परतून भाजी करेन. करणारीला माठ समजू नका हा
.
माबोवर काडी करणारा ऋन्मेष,
माबोवर काडी करणारा ऋन्मेष,
घरात मात्र ईकडची काडी तिकडे करत नाही
लहान मुलं पालक खायलाच तयार
लहान मुलं पालक खायलाच तयार नसतात, त्यासाठी त्यांच्या पालकांनी पालकाचे चविष्ट प्रकार करावेत पण ते फार तेलकट नसावेत.
सिम्बा - ते "पाणिग्रहण" हवे
सिम्बा - ते "पाणिग्रहण" हवे पहिल्या उल्लेखात
"हलवा" वाले वाक्य मस्त!
हे माझे नाही - बहुधा पुलंच्या कोणत्यातरी पुस्तकात आहे:
आमचा गुरू असा पाजी
आमचा गुरू असा पाजी
पाजि ज्ञानामृत सर्वांना
फारेंड, थँक्स
फारेंड, थँक्स
मला जरा संशय होता त्या बद्दल, पण आता एडिट नाही करता येणार.
अमित, चीर म्हणजे वस्त्र (चीर का चिर माहीत नाही हा)
चीर म्हणजे वस्त्र >> ओह हा
चीर म्हणजे वस्त्र >> ओह हा अर्थ माहीत नव्हती. चीर म्हणजे भेग किंवा चिरणे चे एक रूप, आणि चिर म्हणजे स्थायी/अनंतकाळ राहणारे ("चिरायु") हेच फक्त अर्थ माहीत होते.
कर जोडून कर-मुक्ती करवावी
कर जोडून कर-मुक्ती करवावी
ह्यात एक अर्थ म्हणजे पैसे आणि
ह्यात एक अर्थ म्हणजे पैसे आणि एक म्हणजे मीनींग असे आहे ना ?>>>>>>>>>>प्राजक्ता बरोबर.
रुषाली सुंदर कर्णफ़ुले घालून , कर्णाला दाखवू लागली.
गरीब मुलांना बघून नयनाचे नयन
गरीब मुलांना बघून नयनाचे नयन भरून आले.
तेलावर कांदा परता आणि परातीत
तेलावर कांदा परता आणि परातीत काढून घ्या.
परकीय आक्रमण परतवून लावण्यास सज्ज व्हा.
आयकर विभागाकडून आलेला परतावा परत एकदा तपासा.
व्वा ! स्निग्दधा!स्निग्ध
व्वा ! स्निग्धा!
स्निग्ध नजरेने स्निग्धा आर्याकडे पहात होती.
आर्याने सगळ्या आर्या, म्हणून
आर्याने सगळ्या आर्या, म्हणून दाखवल्या. आणि आर्य चकित झाले.
चहात घालायला हवे म्हणून
चहात घालायला हवे म्हणून घोकूनही बाजारातून येताना आले आणायचे राहून गेले, सुदैवाने सासरेबुवा न सांगताच आले घेऊन आले.
नाकावरचा राग जरी अत्यंत वाईट
नाकावरचा राग जरी अत्यंत वाईट असला तरी, राग यमन हा ऐकायला सुमधुर आहे.
रस्त्यावरच्या एका खूळ्याला
रस्त्यावरच्या एका खूळ्याला कचर्यात एक तुटलेला खुळखुळा सापडला.
शेंडी वाल्या भटजींनी, नारळ
शेंडी वाल्या भटजींनी, नारळ सोलून, नारळाच्या शेंडीस धरून फरशीवर आपटला तो इतक्या जोरात की त्याचे दोन तुकडे होऊन, एक तुकडा पार शेजारच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत गेला.
जोशी काकूंनी वाहतूकिचा नियम
जोशी काकूंनी वाहतूकिचा नियम तोडला आणि त्या पळून जाऊ लागल्या तश्या महिला हवालदाराने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दंडाला पकडून चौकित आणले आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला.
कृष्णा नदिच्या काठी आमच्या
कृष्णा नदिच्या काठी आमच्या काकांनी वांग्यांची लागवड केली होती. पण त्याची नासधूस करायला नेहमी गुरे येत
त्यांना काका काठीने मारत.
पाटाच्या काठावर पाट मांडून
पाटाच्या काठावर पाट मांडून पाट लावायला बस
* पाट लावणे म्हणजे लग्न करणे ना?
तुझ्या डोक्यावर हात ठेऊन वर
तुझ्या डोक्यावर हात ठेऊन वर देतो कि तुला तुझ्या मनासारखा वर मिळेल !
दक्षे, मस्त ग!
दक्षे, मस्त ग!
तुझ्या पगाराला दोन ने भाग. मग
तुझ्या पगाराला दोन ने भाग. मग त्यातला एक भाग मला दे आणि मग उरलेल्या भागात घराचा खर्च भागतो का बघ.
ओहह.. चिरगुट मधलं फक्त चिर
ओहह.. चिरगुट मधलं फक्त चिर म्हणजे वस्त्र माहीत न्हवतं. मग गुट म्हणजे फाटके किंवा तत्सम काही अर्थ आहे का?
चिर ( विथ र्हस्व चि) असावं.
सुरेखाने नविन पातळ
सुरेखाने नविन पातळ नेसण्याच्या नादात आमटीत जास्तीचे पाणी घातल्याने ती जरा जास्तच पातळ झाली.
ग्रहण काळात अन्न ग्रहण करू
ग्रहण काळात अन्न ग्रहण करू नये असे शास्त्र सांगते
नावेत बसून आम्ही जात असतना तो
नावेत बसून आम्ही जात असतना तो तिला म्हणाला,'तुझे नाव काय?'
वात वळताना, गार वात अनुभवताना
वात वळताना, गार वात अनुभवताना, आजींच्या पायात वात आला.
टेबल पुसतानाच तिने मला पुसले,
टेबल पुसतानाच तिने मला पुसले,"हे कुणाचे?
"
वहाण पायात सरकवून तो वहाणार्
वहाण पायात सरकवून तो वहाणार्या पाण्याला अडवायला गेला.
प्रितीची लेकीवर अति प्रिती
प्रितीची लेकीवर अति प्रिती होती
Pages