मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. वांग्याचा काय *भाव*
2. तिला *भाव* देऊ नको
3. मनी नाही *भाव* देव मला पाव

१) निसर्गाने मुक्त ह्स्ताने उधळलेले सृष्टी सौंदर्य काय वर्णावे.
२) वर्णाने तसा सावळाच आहे.

१. अर्थ माझा वेगळा.
२. अर्थविषयक चर्चा होईल.

जडबुद्धीच्या अ ने जड खोका उचलायला मदत केल्यापासून ब चे त्याच्यावर प्रेम जडले. तिने त्याला एका दिव्य झाडाची जड भेट म्हणून दिली.

स्वतः न वाचता नुसते वाचाल तर वाचाल म्हणणे म्हणजे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही म्हण सिद्ध करणे

तिने मोगरा माळला. गळ्यात टपोरी बोरमाळ घातली. दिवस माळवला तसे तिने सख्याच्या ओढीने माळरानाची वाट जवळ केली.

दिवस मावळला (मालवला - दिवा मालवला तसे सूर्य मालवला - माळवला )

गोडाचा शिरा
अंथरूणात शिरा
हाताच्या शिरा ( का शीरा ?)

किंवा
हाताची शीर
शीर सलामत तो पगडी पचास

बळी तो कान पिळी.

उंदीर मांजर खेळात,
उंदीर बळी जातो.

Pages