हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय?

Submitted by दक्षिणा on 31 May, 2017 - 04:57

सगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.
हे प्रकरण नक्की आहे काय? त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.
आता दुसर्‍यांदा हा शब्द "सायबर हल्ला..' ह्या धाग्यावर ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली. बिटकॉईन म्हणजे व्हर्च्युअल मनी ना?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा आणि माझ्या अल्पमतीत भर घालावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ मार्केट शेअरला सुध्दा फिक्स मुल्य असते. शेअर किंमत ० झाली तरी कंपनीला विशिष्ट मुल्यानुसार मोबदला शेअरच्या बदल्यात द्यावा लागतो

>> व्यत्यय, एकाच देशात दोन करन्सी इन्स्ट्रुमेन्ट्स असल्याचे काही उदाहरण आहे का?

नाना, बिटकॉईनला फॉरेन करन्सीचा दर्जा मिळेल.

>> यात त्या कागदामुळे आदानप्रदान झालेल्या वस्तुंचे मुल्य काळानुसार बदलले. पण त्या कागदाचे मुल्य हे शेवट पर्यंत १००च राहीले ते राहण्याची जवाबदारी सरकार नामक संस्थेने घेतली आहे.<<

प्राण, बिटकॉईनला फॉरेन करन्सी समजा. एका बिटकॉईनचे "१" हे मुल्य शेवटपर्यंत तेच राहील. त्या बिटकॉईनमुळे आदानप्रदान झालेल्या वस्तुंचे किंवा दुसर्‍या करन्सीचे (रुपये??) मुल्य काळानुसार बदलले.

एका बिटकॉईनचे "१" हे मुल्य शेवटपर्यंत तेच राहील.>>>

नाही . या सुरू झालेल्या व्यवहाराचे वर्तुळ पुर्ण झाले नाही. समजा जेव्हा पहीला बिटकॉईन बाजारात आला तेव्हा देणार्याने घेणार्याकडून ५रुपये मोबदला घेतला आहे. तो मोबदला त्याने बिटकॉईनच्या मोबदल्यात परत दिलेला नाही. त्यामुळे अजून वर्तुळाची फेरी भरोश्यावर चालू आहे. ज्यावेळेस तो बिटकॉन निर्मात्याला कोणी दिला त्यावेळेस निर्मात्याने ५ रुपये त्याबदल्यात दिले तर बिटकॉईनला मुल्य प्राप्त होईल. अन्यथा त्याचे मुल्य हे आभासी राहील.
निर्मात्याने मी ५ रुपये परत देईनच अशी कुठे जबाबदारी घेतली आहे का ? नाही.

सावधान!
बिटकॉइनबद्दल महत्त्वाची माहिती. बिटकॉइन नामक स्कॅम जोर पकडत आहेत. तरी आपण, आपल्या मित्र नातेवाईकांना यापासून सावध करावे. भारत सरकारने, आरबीआयने यावर अधिकृत असे कोणतेही मत दिलेले नसल्याने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे हे अतिशय मोठ्या जोखमीचे ठरणार आहे. बिटकॉइन विक्रेते आपल्याशी संपर्क साधू शकतात, ते आपल्याच मित्रवर्तुळातले असू शकतात. प्रचंड टेक्निकल माहिती सांगून आपल्याला गोंधळात घालू शकतात. अल्पावधीत लाखो रुपये झालेली बिटकॉइनची आभासी किंमत आपल्याला भुरळ घालू शकते. तेव्हा ह्या कोणत्याही प्रकारच्या प्रसाराला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नये.

बिटकॉइन हे आभासी चलन अस्तित्वात असले तरी ते मान्यताप्राप्त नाही आहे. बिटकॉइनची जबाबदारी भारत सरकारने घेतलेली नाही आहे. अल्पावधीत प्रचंड फायद्याचे आमिष दाखवून, एटीममधून पैसे काढता येत आहेत असे दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्यात वेगळेच लोक गुंतलेले आहेत.

भारत सरकारकडून अधिकृतरित्या मान्यता मिळाल्याशिवाय, म्हणजेच जोवर स्वतः सरकारची खाती, बॅंक्स चलन म्हणून बिटकॉइन स्विकारत नाहीत तोवर बिटकॉइन सारख्या आभासी चलनांपासून दूर राहावे अशी विनंती.

>>निर्मात्याने मी ५ रुपये परत देईनच अशी कुठे जबाबदारी घेतली आहे का ?

निर्माता अशी हमी का देईल?
मै धारक को १ बिटकॉइन अदा करनेका वचन देता हू.
बस्स फक्त एक बिटकॉइन. त्या बिटकॉइनची इतर करन्सी किंवा वस्तूंच्या तुलनेत पत/मूल्य कमी होतेय की जास्त होतेय यावर निर्मात्यांचा कंट्रोल नाही.

नाना, तुमची पोस्ट अगदी बरोबर आहे. बिटकॉइन मध्ये गुंतवणूक अत्यंत जोखमीची आहे. त्यापासून लांब राहीलेले चांगले.

निर्माता अशी हमी का देईल?>>>>
नाही दिली आहे मग लोक त्याचा वापर का करतील ? मग तर मी पण चलन बाजारात आणु शकतो. हमी घेण्याचा प्रश्नच नाही.

बिटकॉईनची हमी कोणीच घेतली नाही. बाजारात उतरले ते निव्वळ कॅसिनोचे व्यवहाराचा हवाला मध्ये वापरण्यासाठी. ऱक्कम घेऊन जाण्याऐवजी त्या किमतींचे ऑनलाईन बिटकॉईन ट्रांस्फर करायला सोपे पडते. नंतर सोईनुसार रक्कम देऊन बिटकॉईन परत घेतले जात होते.

>>ब्लॉकचेनमधे प्रत्येक एन्टीटी स्वतःची प्रत सांभाळत असते ना, मग इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट शेअर का करावी लागणार?<<
ओवरॉल कॉस्ट एकाच एंटिटिला बेअर करावी लागत नाहि, ती डिस्ट्रिब्युटेड आर्किटेक्चरमुळे स्प्रेड आउट होते...

>>ट्रस्ट्/कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट द्वारे एस्टॅब्लिश होण्याजोगा आहे की नाही हे ठरवायची काही गाईडलाईन किंवा चेकलिस्ट आहे का? मला बघायला आवडेल.<<
हा ज्या-त्या फंक्शनच्या बिझिनेस आर्किटेक्चरचा भाग आहे. चेकलिस्ट्/टेंप्लेट्स आहेत पण आयपी कारणास्तव शेर करु शकत नाहि...

>>आणि शेअर मार्केट ट्रांझॅक्शन्स जेव्हढा डेटा तयार करतील तो हाताळण्यासाठी ब्लॉकचेन अजिबात एफिशियंट नाही.<<
ट्रेडिंग हा फक्त एक लहान भाग आहे , कॅपिटल मार्केट्सचा. बाकि इतर फंक्शन्स (अ‍ॅसेट मॅनेजमेंट, सेटल्मेंट ऑप्टिमायझेशन, रेग्युलेटोरी ऑडिट्स इ.) वर सध्या काम चाललेलं आहे. एक लक्षात घ्या, ब्लॉकचेन मुळे बर्‍याचशा सिस्टम्स रिआर्किटेक्ट करुन एफिशियंट करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, कंप्युटिंग पॉवर हि दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या दृष्टिकोनातुन बघता नजदिकच्या काळात ट्रेडिंग फ्लोअर हि ब्लॉकचेनवर उभं केलं तर मला तरी नवल वाटणार नाहि...

>> मग तर मी पण चलन बाजारात आणु शकतो.
अर्थात तुम्ही ते करू शकता. बाजारात बिटकॉईन सारखीच शेकडो इतर व्हर्च्युअल करन्सीज आहेत. एकत्रितपणे त्यांना "अल्टकॉईन" (अल्टरनेट कॉईन) म्हणतात.

>>सध्यातरी बिटकॉइन हे मला करन्सी वाटत नसून कमोडिटी वाटत आहेत.<<

मुल्यात होण्यार्‍या चढाव-उतारामुळे करंसी कमाडिटीचं रुप घेते...

http://www.deccanchronicle.com/business/economy/160917/govt-may-launch-i...

Reserve Bank’s executive chairman Sudarshan Sen on Wednesday had said the central bank is not comfortable with non-fiat cryptocurrencies like the Bitcoin. He had also hinted that it may launch its own cryptocurrency. “Right now, we have a group of people who are looking at fiat cryptocurrencies. Something that is an alternative to the Indian rupee, so to speak. We are looking at that closely," Sen had said.

बिटकॉईनला चलन म्हणता येणार नाही. एक तर त्याला स्वतःची कोणतीही किंमत नाही किंवा किमतीची हमीही नाही. एखाद्या कमोडीटी प्रमाणे त्याचे व्यवहार चालतात . ऑनलाईन व्यवहार असल्याने १००% सुरक्षित नाही. अशा गुंतवणुकीला चलनाचा दर्जा देणे हे बिनडोकपणाचे लक्षण आहे.

त्याला करन्सी म्हणून दिशाभूल सुरु आहे. खेळण्यातल्या नोटांइतकीच त्यांची किंमत. किंवा खाणीतल्या हिर्‍यांतकी. आता हिरे बाळगता येतात तरी. या बिटकॉइनचे तसेही नाही.

बीट कॉईन साठी विडीओ बघा युटूब वर

नमस्कार कुटस्थ
बिटकोईन वर सरकार बंद करत आहे आता थांबवा प्रचार करणे

Pages