हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय?

Submitted by दक्षिणा on 31 May, 2017 - 04:57

सगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.
हे प्रकरण नक्की आहे काय? त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.
आता दुसर्‍यांदा हा शब्द "सायबर हल्ला..' ह्या धाग्यावर ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली. बिटकॉईन म्हणजे व्हर्च्युअल मनी ना?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा आणि माझ्या अल्पमतीत भर घालावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण जेव्हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा करन्सी शिवाय दुसरा वापर करायचा प्रयत्न होतो तेव्हा हे ट्रस्टलेस कंसेन्सस साध्य करण्यासाठी लागणार्‍या मेहनतीचा मोबदला कसा देउ करावा हा मोठा कळीचा मुद्दा उपस्थित होतो.<<

या उदाहरणात (बिट्कॉइन्स्+ब्लॉकचेन) मोबदला देणे/घेणे हा त्या सगळ्या व्यवहाराचाच भाग आहे कारण यांत बिट्कॉइन्स (क्रिप्टोकरंसी) चीच देवाण्घेवाण होत आहे. एक लक्षात घ्या कि ब्लॉकचेन हे केवळ एक ट्रँझॅक्शन मेंटेन (डिस्ट्रिब्युटेड लेजर) करण्याची प्रणाली आहे. या प्रणालीचा वापर तुम्ही कुठल्याहि ट्रॅंझॅक्शनचा (फिनांशियल काँट्रॅक्टस, इंशुरंस क्लेम्स इ.) रेकॉर्ड ठेवण्यासाठे करु शकता. आणि ट्रस्ट्च्या बाबतीत म्हणाल तर बेसीक वॅलिडेशन्/वेरिफिकेशन, ट्रँझॅक्शन ऑथेंटिकेशनची प्रक्रिया ब्लॉकचेन मध्येच अंगभुत असल्याने ट्रस्टचा मुद्दाहि निकालात निघतो...

{बेसीक वॅलिडेशन्/वेरिफिकेशन, ट्रँझॅक्शन ऑथेंटिकेशनची प्रक्रिया ब्लॉकचेन मध्येच अंगभुत असल्याने ट्रस्टचा मुद्दाहि निकालात निघतो...}

अहो दादा ही अंगभूत प्रक्रिया कशी चालते हेच सांगायचा प्रयत्न केलाय मी. पण जेव्हा करन्सी शिवाय कुठलाही वेगळा उपयोग करायचा झाला (फिनांशियल काँट्रॅक्टस, इंशुरंस क्लेम्स इ.) तर मायनर्स ना त्यांचा मोबदला कसा मिळणार? मायनर्सनी रेकॉर्ड्स वेरीफाय का करावेत?

सगळ्या तांत्रिक बाजू बघितल्या तरी एक प्रश्न उरतोच
माझ्या कडे असणार्या बिटकॉइनचा मोबदला द्यायची जवाबदारी कुणाची? १ बिटकॉईनच्या बदल्यात १ लाख मिळतात उद्या संबंधित साईटने पैसे दिलेच नाही तर गळा कुणाचा पकडायचा? ५०० ची नोट तर बदलण्यासाठी कोणी घेतली नाही तर मी भारत सरकारकडे जाऊ शकतो कायद्याने सरकारला ते पैसे बदलून द्यावे लागणार. पण तसे बीटकॉईन संबंधी आहे का? जवळपास नाहीच. बड्या धेंड्यांनी उद्या निश्चित केले की आम्ही यात व्यवहार नाही करणार तर विषयच संपतो ना राव. सर्वसामान्य लोकांकडे असलेल्या बिटकॉईन मातीमोल क्षणात होतील.

देशाच्या अधिकृत चलनाची व्हॅल्यू पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळायची उदाहरणं आहेतच की (झिम्बाब्वे). नोटेवरील छापील किंमत आणि त्याची "व्हॅल्यू" किंवा पत या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बिटकॉईन याला अपवाद नाही.

देशाच्या अधिकृत चलनाची व्हॅल्यू पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळायची उदाहरणं आहेतच की (झिम्बाब्वे).

बरोबर तरीपण तिकडेही त्यांच्या पैशाच्या विनीमयाची जवाबदारी सरकारची आहे.

बिटकॉईन व सरकारी चलन यात तफावत आहे.
भारतात २०००ची value २०००च आहे. पण बिटकॉईनची किंमत प्रत्येक दिवशी बदलत असते त्यामुळे आज भारतात अमुक ठिकाणी हाती असलेला १ बिटकॉईन =१ लाख रुपये हे उद्या त्याच ठिकाणी १ लाख ऐवजी २ लाख पण असू शकतो अथवा १ रुपयाही.
सरकारी चलनचे तसे नाही. २०००ची किंमत आजही अमुक ठिकाणी तिच असणार उद्याही तिच असणार.

>>तर मायनर्स ना त्यांचा मोबदला कसा मिळणार? मायनर्सनी रेकॉर्ड्स वेरीफाय का करावेत?<<

बिटकॉइन्स+ब्लॉकचेन या काँबिनेशनमध्ये बिटकॉइन (माइनर्स, वॉलेट प्रोवायडर्स) सेट बिझनेस रुल्स; ब्लॉकचेन नेटवर्कचं काम फक्त ते रुल्स व्हायोलेट होत नाहि ना ते तपासायचं.

इतर अ‍ॅप्लिकेशन्स (फायनांस, इंशुरंस) मध्ये, माइनर्स हा प्रकारच ऑटोमेटेड, वर्कफ्लो ड्रिवन (आरपिए) असु शकतो, ज्यात कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट (सिमिलर टु प्रुफ ऑफ वर्क इन बिटकॉइन) द्वारे अचिव होतो. सिलेक्टिव एंडॉर्समेंट साठी लागणारे बिझनेस रुल्स, अ‍ॅप्रुवर्स या वर्कफ्लो मध्येच बिल्टइन असतात. तेंव्हा माइनर्सना मोबदला, त्यांचं मोटिवेशन याबाबतचा पॉइंट मूट होतो...

या दोन्हि उदाहरणात ब्लॉकचेनचं काम केवळ बिझनेस रुल्स तपासुन त्याची अंमलबजावणी करणे हेच असल्याने ते आयसोलेट करणं कठीण नाहि. थोडक्यात बिझनेस रुल्स बिटकॉइन्स (किंवा फायनांस, इंशुरंस सिस्टम्स) सेट करतं आणि त्याची अंमलबजावणी (कंप्लायंस) ब्लॉकचेन करतं...

एक मिनिटासाठी, ब्लॉकचेन हि एक प्रणाली (प्लॅट्फॉर्म) आहे आणि बिटकॉइन्स हे त्या प्रणालीवर डेवल्प केलेलं अ‍ॅप आहे असं माना. हे पटलं तर त्याच प्रणालीवर इतर अ‍ॅप्स डेवलप होउ शकतात हे सुद्धा पटेल...

फक्त १० वर्षांपुर्वी (२००८ जानेवारी मधे) १ अमेरिकन डॉलर ३९ रुपयात मिळायचा. आता रुपयाचे अवमुल्यन झाल्यामुळे तोच अमेरिकन डॉलर ६४ रुपयांना मिळतो. सांगायचा मुद्दा असा की सरकारी चलनाचे भाव देखिल बदलत रहातात.
झिम्बाब्वेच्या उदाहरणात १ लाखाची "किंमत" एका दिवसात अक्षरशः हजारो पटींनी कमी झालेली.

{त्यांच्या पैशाच्या विनीमयाची जवाबदारी सरकारची आहे} हा मुद्दा कळला नाही. जरा स्पष्ट कराल का?

{एक मिनिटासाठी, ब्लॉकचेन हि एक प्रणाली (प्लॅट्फॉर्म) आहे आणि बिटकॉइन्स हे त्या प्रणालीवर डेवल्प केलेलं अ‍ॅप आहे असं माना. हे पटलं तर त्याच प्रणालीवर इतर अ‍ॅप्स डेवलप होउ शकतात हे सुद्धा पटेल..}
हे पुर्णपणे पटलेलं आहे. काहीच वाद नाही.

{ज्यात कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट (सिमिलर टु प्रुफ ऑफ वर्क इन बिटकॉइन) द्वारे अचिव होतो.}
सिलेक्टिव एंडॉर्समेंट प्रकारामधे ट्रांझॅक्शन्स कोण बघणार, कोण व्हॅलिडेट करणार, "ऑफिशिअल" लिस्ट कुठाली यावर बंधनं असतात. कोणी मध्यस्थ ही बंधनं घालतो. त्यामुळे मी आधी म्हटल्यानुसार विकेन्द्रिकरणाच्या (decentralization) मुळ तत्वालाच धक्का पोचतो.

पण decentralization हा उद्देशच नसेल तर तुम्ही म्हणता तशी अ‍ॅप्स डेवलप होउ शकतात. पण ती अ‍ॅप्स ब्लॉकचेनऐवजी डेटाबेस वापरुन पण अधिक चांगल्या प्रकारे बनवता येतील की. ब्लॉकचेनचा फायदा काय?

व्यत्यय
नोटबंदीमध्ये ऱद्द नोटांची पु्र्ण किंमत द्यायची जवाबदारी सरकारची होती.

बीट कोईन मध्येही १ बीट कोईन तुमच्या कडे असेल तर ते कायम (हरवलं नाही तर) एकच राहील.
जसे १ रुपया किंवा १ डॉलर हा अनादी अनंत काळापर्यंत तेवढाच राहील. त्या १ रुपयाची विनिमय किंमत बदलेल, पण सरकार ते नाणं चलनातून बाद करत नाही तो पर्यंत त्याची किंमत तीच राहील तसेच बीट कोईनचे.
तुम्ही १ बीट कोईन म्हणजे १००रुपये हे जे गणित करीत आहात ते चुकत आहे कारण एकदा का त्याचा विनिमय केला की विनिमय दर लागेल जो मागणी पुरवठा आणि इतर अनेक बाजारपेठीय निकषांद्वारे बदलत असेल.

१ ची किंमत १ ही देणार कोण ? बाकीच्या ठिकाणी ती किंमत द्यायला जवाबदार संस्था आहेत. हाच फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय.

बिटकॉईन ची किंमत वाढणे कमी होणे या मागे देशांदेशांमधला होणारा व्यापार (ज्यात देवाणघेवाण वस्तू/ सर्विसेस) कारणीभूत नाही.
डिजिटल पासवर्ड, मायनिंग इ. प्रकारे बिटकॉईन तयार होतात. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे म्हणून दिवसेंदिवस किंमत वाढली आहे . अव्वल दर्जाच्या hackersने त्यांची संख्या वाढवली तर ?

तुम्ही वस्तू विनिमय व चलन विनिमय यांच्यात गोंधळ करत आहे का?
१ डॉलरला मला १ किलो साखर मिळाली. उद्या साखर परत द्यायला गेलो तर २ डॉलर किलो असेल.
पण मी दिलेल्या डॉलरची किंमत मात्र १ ची १च राहील.
बिटकॉईन मधे नेमके हेच होत नाही. कारण त्याला भौगोलिक सीमा नाही आहे. न्युयॉर्क मध्ये विकत घेतलेला बिटकॉईन दुसर्या दिवशी वॉशिंटन वाल्याला देऊ पर्यंत किंमत बदललेली असते. तसे डॉलरच्या बाबतीत होते का ? नाही होत.
बिटकॉईन चे विनिमय करण्यासाठी तुम्ही बिटकॉईनवर नाहीतर तिच्या सिस्टीम वर अवलंबून राहतात.

संख्या वाढवणे मॅथेंमॅटीकली अशक्य आहे.

>>>> अशक्य? तो एक डिजिटल प्रोग्राम जो ०,१ ने बनलेला आहे . नियंत्रण कुणाचे आहे? संख्या वाढू लागल्या तर आटोक्यात आणण्यासाठी कोणती संस्था आहे? उद्या डिजिटल पेमेंट बिटकॉईनेच करण्याचे खुळ अमेरिकेत स्वीडनमधे वाढीस लागले तर तितक्या संख्येत बिटकॉईन उपलब्ध होतील का? व झाली तर त्यांचा विनिमय दर खाली येणार नाही का?
शेवटी काय तर ते अनिर्बंध डिजिटल चलन आहे ज्याचा कंट्रोल कुठे आहे याचा निव्वळ तर्क लावू शकतो.

१ डॉलरला मला १ किलो साखर मिळाली. उद्या साखर परत द्यायला गेलो तर २ डॉलर किलो असेल. >> हेच बिट कॉईन मध्येही होईल की! आज १ किलो साखर १ बिट कॉईनला मिळेल. उद्या महाग झाली तर कदचित २ बिट कॉईनला मिळेल. तुमच्या उदाहरणात मला काही फरक दिसला नाही.
न्युयॉर्क मध्ये विकत घेतलेला बिटकॉईन दुसर्या दिवशी वॉशिंटन वाल्याला देऊ पर्यंत किंमत बदललेली असते. >> किंमत कशी बदललेली असते ? ती जर तुम्ही डॉलर मध्ये कनवर्ट केलीत तर बदलल्यासारखी वाटेल. पण एक बिट कॉईन इज जस्ट सेम.
आज १ ग्रॅम सोने मुंबईत विकत घेतलेत आणि लगेच नॉर्थ कोरिआवर हल्ला झाला तर तेच सोने काही तासात त्याच मुंबईत कदचित डबल भावाला पडेलच ना? तसेच ग्वामवर हल्ला झाला तर कदाचित डॉलरही रुपयाच्या तुलनेत स्वस्त होईल.
वस्तू विनिमय आणि चलन विनिमय गोंधळ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला समजत नाहीये.

माझ्या माहिती प्रमाणे सध्याच्या प्रोग्रॅम नुसार जवळपास २१ मिलियन हा अप्पर बाउंड आहे, पण जरी अ‍ॅक्चुअल बिट कॉईन त्यापुढे गेले नाहीत तरी फ्रॅक्शनल रिझर्व बॅंकिंग नुसार (बँका लोन जसं देतात तसं) सप्लाय आणखी वाढू शकतोच.

प्राण यांचे उदाहरण चुकत असले तरी प्रश्न फार सरळ आहे. देशाच्या करन्सीवर देशाच्या सरकारचे नियंत्रण असते. तसे नियंत्रण बिटकॉइनमध्ये कोणाचे आहे?

सध्यातरी बिटकॉइन हे मला करन्सी वाटत नसून कमोडिटी वाटत आहेत.

कोणी एक व्यक्ती/ संस्था बिट कॉईन कंट्रोल करत नाही, तर कम्युनिटी करते. तुम्ही (किंवा सी. आय.ए ) सोर्स डाउनलोड करून त्यात फेरफार करून नवीन वर्जन अपग्रेड करण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकता. (फोर्क करू शकता). तो बदल सामावून घायचा का नाही हे कम्युनिटी ठरवेल आणि त्याद्वारे जुनी (जे नवा कोड घेणार नाहीत त्याच्यासाठी) आणि नवी (नव्या वर्जनशी कम्प्याटिबल) अशी दोन्ही नाणी चलनात येऊ शकतात.

https://bitcoin.org/en/faq#who-controls-the-bitcoin-network
http://nakamotoinstitute.org/mempool/who-controls-bitcoin/
https://www.quora.com/Who-controls-Bitcoin

इथून बरीच माहिती मिळाली मला.

>>पण ती अ‍ॅप्स ब्लॉकचेनऐवजी डेटाबेस वापरुन पण अधिक चांगल्या प्रकारे बनवता येतील की. ब्लॉकचेनचा फायदा काय?<<

सगळीच अ‍ॅप्स, जी डिस्ट्रिब्युटेड डेटाबेस वर उभी आहेत त्यांना ब्लॉकचेन वर मायग्रेट करावं हा उद्देश मुळीच नाहि. परंतु ढोबळ्मानाने हा क्रायटेरिया लावला जाउ शकतो :
१. ज्यांत एकापेक्षा अधिक एंटिटिज इन्वॉल्व होणार आहेत (बी२बी, बी२सी इ.)
२. इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट शेअर करण्याजोगी आहे
३. हाय डेटा इंटिग्रिटि, अ‍ॅवेलबिलिटी, अ‍ॅक्सेसेबिलिटि ची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं,
४. ट्रस्ट्/कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट द्वारे एस्टॅब्लिश होण्याजोगा आहे

अशा प्रकारची अ‍ॅप्लिकेशन्स (लोन ओरिजिनेशन, कॅपिटल मार्केट्स, इंशुरंस क्लेम इ.) एखाद्या टिपिकल २ किंवा एन टियर डेटाबेसपेक्षा ब्लॉकचेनवर एफिशियंटली इंप्लिमेंट्/रन केली जाउ शकतात...

सध्यातरी बिटकॉइन हे मला करन्सी वाटत नसून कमोडिटी वाटत आहेत.

>>> याअबद्दल काही मत कुणाचे?

माझे उदाहरण बरोबर आहे पण बहूदा मी समजवण्यात तोडका पडत आहे. मी चलनच्या भौगोलिक सीमेमध्ये असणारे कायम मुल्य वर बोलत होतो तर तुम्ही लोक चलनाला भौगोलिक सिमेबाहेर घेऊन तिथल्या मुल्याबद्दल बोलत आहात.
सरकारी चलनांना भौगोलिक मर्यादा आहे. बिटकॉइनला नाही म्हणून त्याचे विनिमय मुल्य स्थिर राहू शकत नाही.

{२. इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट शेअर करण्याजोगी आहे}
ब्लॉकचेनमधे प्रत्येक एन्टीटी स्वतःची प्रत सांभाळत असते ना, मग इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट शेअर का करावी लागणार?

{४. ट्रस्ट्/कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट द्वारे एस्टॅब्लिश होण्याजोगा आहे}
ट्रस्ट्/कंसेंसस सिलेक्टिव एंडॉर्समेंट द्वारे एस्टॅब्लिश होण्याजोगा आहे की नाही हे ठरवायची काही गाईडलाईन किंवा चेकलिस्ट आहे का? मला बघायला आवडेल.

{अशा प्रकारची अ‍ॅप्लिकेशन्स (लोन ओरिजिनेशन, कॅपिटल मार्केट्स, इंशुरंस क्लेम इ.) एखाद्या टिपिकल २ किंवा एन टियर डेटाबेसपेक्षा ब्लॉकचेनवर एफिशियंटली इंप्लिमेंट्/रन केली जाउ शकतात...}
कॅपिटल मार्केट्स म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट ट्रांझॅक्शन्स म्हणायचं आहे का? त्याच्यासाठी स्प्लिट सेकंद प्रोसेसिंग टाईम लागतो. तो ब्लॉकचेनमधे शक्य नाही कारण जर चेनच्या सुरुवातीचा ब्लॉक रेफर करायचा झाला तर तिथे पोचण्यासाठी मधले सगळे ब्लॉक्स सिक्वेंशिअली अक्सेस करत जावे लागेल. आणि शेअर मार्केट ट्रांझॅक्शन्स जेव्हढा डेटा तयार करतील तो हाताळण्यासाठी ब्लॉकचेन अजिबात एफिशियंट नाही.

>> सध्यातरी बिटकॉइन हे मला करन्सी वाटत नसून कमोडिटी वाटत आहेत.

हो, सध्याच्या भारतातील कायदेशीर व्याख्यांमुळे बिटकॉइन ला करन्सी ऐवजी "गुड्स" म्हणणे जास्त योग्य आहे. खालील लिंकवर खुप सुंदर विवेचन केलं आहे.
https://cis-india.org/internet-governance/bitcoin-legal-regulation-india

भारतातील कायदेशीर व्याख्यांमुळे बिटकॉइन ला करन्सी ऐवजी "गुड्स" म्हणणे जास्त योग्य आहे>>>

येस लोक त्याला चलन मानत आहे.खरतर त्याला स्वतःची कुठलीच स्थिर किंमत नसल्याने त्याच्या किंमती मध्ये बदल होत राहतोय. चलन विनिमयाचे नियम ऐवजी वस्तुविनिमयचे नियम लावणे सोपे पडेल

प्राण, RBI च्या एका नोटिफिकेशनमुळे बिटकॉइनला करन्सीचा दर्जा मिळु शकतो. आणि असं नोटिफिकेशन काढणं फारसं कठीण नाही.
चलन विनिमयाचे नियम आणि वस्तुविनिमयचे नियम यात काय फरक आहे हे स्पष्ट कराल का?

RBI च्या एका नोटिफिकेशनमुळे बिटकॉइनला करन्सीचा दर्जा मिळु शकतो. आणि असं नोटिफिकेशन काढणं फारसं कठीण नाही.>
त्यासाठी बिटकॉईनला एका ठिकाणी तरी फिक्स मुल्य द्यावे लागणार. आणि मला ऊर्जित पटेल कडून तीच भिती आहे. असो त्या बाबतीत लिहील्यावर वेगळे वळण लागेल.

चलन विनिमयाचे नियम आणि वस्तुविनिमयचे नियम यात काय फरक आहे हे स्पष्ट कराल का? >>
१ चलनाची जितकी छापिल किंमत आहे ती देण्याची जवाबदारी ते चलन चालू करणार्याची असते. हे एक वर्तुळ आहे. सरकार ने १ कागद दिला सांगितले १०० किंमत. त्याच्यावर विश्वास ठेवून मी ते दुसर्याला दिले व त्या किंमतीची वस्तु घेतली. घेणार्याने सुध्दा तसाच प्रकार केला. असे करत करत शेवटी ती नोट सरकार कडे आली. आता सरकार त्या कागदाच्या बदल्यात देणार्या व्यक्तीला १०० मुल्य असलेले क्रेडीट देऊ केले. यात त्या कागदामुळे आदानप्रदान झालेल्या वस्तुंचे मुल्य काळानुसार बदलले. पण त्या कागदाचे मुल्य हे शेवट पर्यंत १००च राहीले ते राहण्याची जवाबदारी सरकार नामक संस्थेने घेतली आहे.
हे झाले चलन विनिमय..
आता वस्तु विनिमयात समजा ५ लिटर पेट्रोल च्या बदल्यात मला १ ठिकाणी ५ किलो तांदूळ मिळाले. त्यातले मी २ किलो वापरून ३ किलो तांदूळ पुन्हा २र्या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी वापरले तर मला पुन्हा ३ लिटर मिळेलच याची शाश्वती नाही आणि मला तशी कुठल्याही सरकारने गरंटी दिली नाही. तोच प्रकार माझ्याकडून घेणार्या बरोबर होईल . आपापली रिस्क.
उद्या एका जागी गहू विकायला ठेवले आहे पण विकणार्याला तांदूळ नकोय तर त्या जागी माझ्याकडे असलेल्या तांदळांची किंमत क्षणात शुन्य होणार. जो पर्यंत कुणाला तांदळाची गरज लागेल आणि तशी व्यक्ती मला सापडेल तेव्हा कुठे माझ्या तांदळाला मुल्य मिळेल.
हे वस्तु विनिमय. गरजेनुसार दोन्हीबाजूंचे मुल्य बदलत राहते.
इथे विनिमय वर्तुळ एक व्यवहार झाल्याबरोबर पुर्ण होते.

Pages