हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय?

Submitted by दक्षिणा on 31 May, 2017 - 04:57

सगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.
हे प्रकरण नक्की आहे काय? त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.
आता दुसर्‍यांदा हा शब्द "सायबर हल्ला..' ह्या धाग्यावर ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली. बिटकॉईन म्हणजे व्हर्च्युअल मनी ना?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा आणि माझ्या अल्पमतीत भर घालावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. चाळला वरचा पेपर.
अनधिक्रुत नाही असं वाटलं त्यावरुन. पण कायद्याच्या कसोटीवर अजुन टेस्ट न झाल्याने नरो वा कुंजरोवा पण खूपच वाटलं. इंडियाने लवकारात लवकर याला कायद्याच्या कक्षेत आणावं असं वाटलं. टेररिस्ट फंडिग, फ्रॉड होण्याची शक्यता आणि काहीच केवायसी नाही ही काही चांगली अवस्था नाही.

इंटरेस्टिंग आहे.
वायफाय मि़ळालं तर लोक कुणाकडून ते मिळतंय, ते खुलं आहे की सुरक्षीत याची काही पर्वा न करता सर्रास सगळ्या व्यवहारासाठी त्याचा वापर करतात. फुकट वायफाय देणार्‍याला End to End सुरक्षितता नसेल तर मधले सगळे अकाउंट पासवर्ड मिळवता येऊ शकतात याची कल्पना बर्‍याच जणांना नसते.> याबद्दल काय काळ्जी घ्यावी हे सांगणारा एखादा धागा आहे का? फार गरज आहे त्याची.

बिटकॉईलना "चलन" म्हणुन अधिकॄत मान्यता नाही. (भारतात तरी).
म्हणुन बिटकॉइन "एक वस्तु" म्हणुन बेकायदेशीर होत नाही. म्हणून बिटकॉइनची खरेदी विक्री बेकायदेशीर / गुन्हेगारी होत नाही असे मला वाटते.
ते बेकायदेशीर चलन आहे.
बेकायदेशीर वस्तु / गोष्ट नाही.
यात काही चुकत असेल तर, कायद्याच्या जाणकारांकडुन आणखी जाणुन घ्यायला आवडेल.

हायवेवर पेट्रोल संपले म्हणुन तुम्ही अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. त्याबदल्यात त्याला तुमच्याकडचा खाऊ दिला आभारप्रदर्शन म्हणुन.
इथे तुम्ही खाऊ बदल्यात पेट्रोल घेतले म्हणु लगेच खाऊ ही गोष्ट व ही कृती बेकायदेशीर / गुन्हेगारी होत नाही, जो पर्यंत तुम्ही हा खाऊ "चलन" म्हणुन "उघडपणे" दिलेला नाही! Happy

काही वर्षांपुर्वी नाण्यांचा तुटवडा जाणवत असताना मुंबईतल्या एका भागातल्या व्यापा-यांनी "पर्यायी" नाण्यांचा चलन म्हणून वापर सुरु केला होता अशी बातमी वाचली होती. तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली होती, कारण ते "पर्यायी चलन" वापरत होते जे भारतात बेकायदेशीर आहे.

पेपाल वि. आरबीआय हा वाद एकदा गुगुलन समजुन घ्यावा.
भारतात सर्व "अधिकृत" पैशाचे व्यवहार व त्यासंबंधी अधिकार हे फक्त आरबीआयमार्फत व आरबीआयलाच असतात / असतील. अजुनतरी.

टेररिस्ट फंडिग, फ्रॉड होण्याची शक्यता आणि काहीच केवायसी नाही ही काही चांगली अवस्था नाही.
>>
ओळख लपवता येत असल्यामुळे हॅकींगवगैरे ई. गुन्हेगारी व बेकायदेशीर जगात याला जास्त मागणी आहे.
केवायसी ही याच्या पायाचा भाग असल्यामुळे ती काढली तर ते बिटकॉइन कसे राहील?

काही वर्षांपुर्वी नाण्यांचा तुटवडा जाणवत असताना मुंबईतल्या एका भागातल्या व्यापा-यांनी "पर्यायी" नाण्यांचा चलन म्हणून वापर सुरु केला होता अशी बातमी वाचली होती. >>>

बातमी संपुर्ण माहीती . मुंबई मधे लोकांनी अंधश्रध्देच्या आहारी जाऊन नदींमधे सुट्टे पैसे फेकण्याचे सुरु केले होते. त्यामुळे तेव्हा सुट्टे पैशांचा तुटवडा निर्माण झालेला . बेस्ट बस ने सुध्दा त्यावेळी पैशांच्या ऐवजी कुपन्स वाटले होते. ही गोष्ट १९७७-८० च्या दरम्यानची आहे. (ही गोष्ट इथेच मायबोलीवर एका जुन्या जाणकारांनी लिहिली होती)

बिटकॉईन लाईटकॉईन यांची सुरुवात कॅसिनो मधल्या व्यवहारांकरीता झाली होती. पैशांचे ट्रांस्पोर्टेशन वाचवण्याकरीता हे मार्ग काढलेला होता. बीटकॉईन बनवण्यावर जगातील कुठल्याही देशाचे कंट्रोल नाही. बिटकॉईन बनने हे सगळे एका हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ने कंट्रोल केले आहे. त्यासाठी बरीच मोठी प्रोसिजर आहे. खोदकाम , हँडकॅश, वर्क इ. बर्‍याच प्रकारे तुम्ही बीटकॉईन बनवू शकतात. बरेच मोठे आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्ही व्हिडिओ गेम खेळताना बर्‍याच लेव्हल पार केल्यानंतर एक ठराविक रक्कम मिळते. अशाच वर्चुअल रक्कमेला बिटकॉईन म्हणतात.
How does a Bitcoin miner work?
Every ten minutes or so mining computers collect a few hundred pending bitcoin transactions (a “block”) and turn them into a mathematical puzzle. ... The miner who found the solution gets 25 bitcoins as a reward, but only after another 99 blocks have been added to the ledger.>>>>>>

अशा बिटकॉईन मधे रोजचा व्यवहार करणे धोकादायक आहे. काल परवाच एका बातमीनुसार "भीम अ‍ॅप्लिकेशन" मधून ४ लाख रुपये हॅकरने उडवले होते. त्यामुळे भारतात असा ऑनलाईन पैसे, ऑनलाईन तिजोरीत ठेवणार्‍या बिटकॉईन वरच्या सुरक्षेबद्दल न बोललेलेच बरे.
२०१३ साली रिझर्व बँकेने याबाबत ग्राहकांना सावधानीचा इशारा दिलेला होता. भारतातील कुठल्याही बँकेच्या शाखेतून बिटकॉईन खरेदी करता येणार नाही आणि तसे करु देखील नये. त्यात फसवणूक झाल्यास बँक आनि सरकार कोणीही जवाबदार नसेल. इ. नोटीफिकेशन काढल्या आहे.
परंतू २०१७ साली रिझर्व बँकेने आपल्या अधिसुचनेत बाकीच्या सुचनेबरोबर DEALING WITH VIRTUAL CURRENCIES WILL BE DOING SO AT THEIR OWN RISK अशी एक ओळ अ‍ॅड केली आहे. आता याचा अर्थ काय घ्यायचा तो संबंधितांनी हवा तसा घ्यावा.
आताचे सरकार डिजिटल मनीला प्रोत्साहन देणारे असल्याने बहुदा बिटकॉईन मधे व्यवहार केल्यास हरकत नसेल. पण सध्या रिझर्व बँके ही युधिष्ठिर प्रमाणे उत्तर देणारी असल्याने (उर्जित पटेलची कृपा) काहीच स्पष्ट सांगता येत नाही.

ही गोष्ट १९७७-८० च्या दरम्यानची आहे. >>
असेल.
माझी बातमी ही नाही.
"काही वर्षांपुर्वी" म्हणजे ७७-८० असण्याएवढ काही माझे वय झाले नाही अजुन.

आताचे सरकार डिजिटल मनीला प्रोत्साहन देणारे असल्याने
>>
भारत सरकारने Online Money Transfer, Digital Transactions / Processing याला प्रोत्साहन दिले आहे.
डिजिटल "मनी / करन्सी" ला नव्हे.

There is a disclaimer at the bottom of the news.

Except for the headline, this story has not been edited by NDTV staff and is published from a syndicated feed.

The heading is clearly misleading. The news nowhere mentions that bitcoins are illegal.

The government today said use of virtual currencies like Bitcoins is not authorised by RBI and could result in breach of anti-money laundering provisions.

Lack of authorization does not mean it is illegal

नाशिकमध्ये गेल्या महिन्यात बिटकॉइन्सच्या खरेदी विक्री व्यवहाराबाबत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अनेकांना पोलिसांनी आत टाकले होते. लाखो रुपयांचा हा खरेदी विक्रीचा प्रकार होता.

लहान शहरे व खेड्यात सध्या जोरात चाललाय ह्या अशा प्रकारच्या चलनाचा धंदा. बरेच फुगे फुटतील पुढील काही दिवसात.

बरोबर मार्मिक,

इन्व्हेस्टमेंट च्या नावाखाली गंडा घालणारे तयार झालेत,

सर्वांनी सावधान! नंतर म्हणू नका माहित नव्हतं.

बीट कॉइनने घातला हजारो कोटींचा गंडा

नागपूर - मलेशियाच्या दोघांनी भारतात येऊन बीट कॉईनच्या नावाने हजारो कोटींने गंडा घातला. एकट्या महाराष्ट्र राज्यात तब्बल ४०५ कोटींची फसवणूक या दोघांनी केली. त्यांच्यावर नागपूर आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूरमधून १०० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची चार ते पाच कोटींनी फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मलेशियात राहणारे माईक लुसी ऊर्फ बहारुद्‌दीन युनूस सिद्दिकी आणि रोमजी बीन अहमद यांनी मलेशियातून इंटरनेटद्वारे ऑनलाईन फ्युचर बीट कंपनी उघडली. या कंपनीच्या माध्यातून ‘आभासी किंवा काल्पनिक सिक्‍के’ तयार केले. या कंपनीने ५ मार्च २०१७ मध्ये नागपुरातील वर्धा रोडवरील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये सेमीनार घेतला.

यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, गोंदिया, अमरावतीसह संपूर्ण राज्यातून जवळपास ७० ते ८० गुंतवणूकदार उपस्थित होते. या सेमीनारमध्ये बीट कॉइनची किंमत आणि ते कसे वापरावे याबाबत समजावून सांगण्यात आले. भारतात केवळ गुजरातमधील अमदाबाद येथे ‘झेबपे प्रा. लि. कंपनी’ ही बीट कॉइन खरेदी-विक्री करणारी एकमेव शासकीय मान्यता असलेली कंपनी आहे. बीट कॉइन क्रिप्टो करंसी असून, तिचा भाव दिवसेंदिवस लाखोंमध्ये वाढत आहे. ज्यांना बीट कॉइन खरेदी करायचे आहे. ते पाव, अर्धा पाव, अर्धा आणि एक अशा स्वरूपात खरेदी करू शकतात, अशी बतावणी लुसी आणि रोमजी यांनी केली. त्यांच्या भूलथापांना कार्यशाळेला उपस्थित सर्वच जण बळी पडले.

नागपुरात गुन्हा दाखल
नागपुरातील मयूरेश किशोर गणोरकर हे मुंबईतील एका कंपनीत इंजिनिअर होते. सध्या ते प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांनी मलेशियातून आलेल्या दोन्ही आरोपींच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमधील कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांनी २६ लाख रुपयांचे २५ बीट कॉइन विकत घेतले. त्या बीट कॉइनची किंमत सध्या ७८ लाख रुपये आहे. आभासी चलन असल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वेबसाइटवर दिसत असलेल्या खात्यात ते पैसे जमा असल्याचे दिसत होते. मे २०१७ मध्ये अचानक ही बेवसाइट बंद पडली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी आर्थिक शाखेचे गणेश ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला.

महिन्यात दीड टक्‍के लाभ
एका बीट कॉइनची किंमत जानेवारी २०१७ मध्ये एक लाख रुपये होती. कॉइनची किंमत हजारोंच्या घरात दरदिवशी झपाट्याने वाढते. गुंतवलेल्या कॉइनच्या किमतीवर दर महिन्याला दीड टक्‍के लाभ फ्युचर बीट कॉइन कंपनीच्या वतीने दिला जातो. ती रक्‍कम आभासी चलनाच्या रूपात वेबसाइट पोर्टलवर असलेल्या अकाउंटमध्ये दिसून येते. त्यामुळे अकाउंटमध्ये दररोज हजारो रुपये वाढत असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात तो पैसा मिळत नाही.

विक्रीसाठी एजंट
दोन्ही आरोपी मलेशियातून बीट कॉइनचा व्यवसाय करीत होते. त्यांनी भारतातील जवळपास सर्वच राज्यांत फेसबुकवरून एजंट नेमले. त्यांना गुंतवणूकदारांना कसे आणायचे, किती कमिशन मिळेल, पैसे कसे उकळायचे, याचे प्रशिक्षण दिले. भारतातील एजंटने लुईस आणि रोमजी यांना घरबसल्या हजारो कोटी भारतातील उच्चशिक्षितांच्या खिशावर डल्ला मारून कमवून दिले. झटपट कमाईच्या आमिषाला बळी पडून उच्चशिक्षितांनी लाखो रुपये गमावल्याचे उघडकीस आले.

असा झाला भंडाफोड
लुईस आणि रोमजी यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांची निवड कार्यशाळा घेण्यासाठी केली. नाशिकमध्ये कार्यशाळा घेत असताना रोमजीवर एका डॉक्‍टरला संशय आला. त्यांनी कसून चौकशी करीत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता रोमजी हा फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. तपासात दोघांनी मिळून महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा आकडा हा ५०४ कोटींपर्यंत पोहोचला असून आणखी तक्रारी वाढत आहेत.

एक आरोपी मुंबईत
लुईस हा मलेशियाला पळून गेला तर दुसरा आरोपी रोमजी बीन याला नाशिकमधून पोलिसांनी अटक केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हा असल्यामुळे शासकीय परवानगी घेऊन त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यास सांगितले. सध्या रोमजी हा जामिनावर बाहेर आल्यानंतर पसार झाला आहे.

(ईसकाळ: http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-crime-69346)

आर्थिक व्यवहारात मिडल्मॅन नसावा हे बिटकॉइनचं मूळ तत्व (फाउंडिंग प्रिंसिपल) आहे. हे तत्वंच बिटकॉइन पॉप्युलर व्हायला कारणीभुत झालं आणि आता तेच मारक ठरत आहे कारण त्यावर कोणाचा अंकुश (रेग्युलेटर) नाहि. कुठल्याहि प्रकारच्या गवर्नमेंटचं त्यावर नियंत्रण नसल्याने बिट्कॉइन्सचा बहुतांश वापर सुरुवातीला ड्रग्ज डिलिंग (सिल्क रोड्), मनी लाँडरींग (बिटइंस्टंट, माउंट गाक्स) इत्यादि बेकायदेशी कामाकरता केला गेल्यामुळे फेडची नजर साहजिक या कंपन्यांवर पडली; रितसर चौकश्या झाल्यानंतर या कंपन्यांचे फाउंडर्स आता जेल मध्ये आहेत. लाँगटर्म उपाय म्हणुन फेडने या व्यवहारात बरीचशी रेग्युलेशन्स (बिटलायसंस) आणलेली आहेत. ती इतकि किचकट आहे कि त्यांच्यामुळे उरल्यासुरल्या बिटकॉइन्स कंपन्याचं हि कंबरडं मोडलेलं आहे. थोडक्यात अमेरिकेत बिटकॉइन्स बेकायदेशीर नाहि पण त्याचा व्यवहार करण्याकरता कंपनीला बिटलाय्संस घेणं बंधनकारक आहे. अजुनहि बरेच जण बिटकॉइनच्या भविष्याबाबत बुलीश आहेत पण सध्यातरी सामान्य जनतेने लांब रहाणं पसंद केलेलं आहे.

बिटकॉइनचा, एक ग्लोबल करंसी म्हणुन आतापर्यंतचा प्रवास अजुनहि चाचपडत असला तरी ती ज्या अंडर्लाइंग टेक्नॉलॉजीवर (ब्लॉकचेन) आधारीत आहे ती टेक्नॉलॉजी मात्र सध्या जोर धरत आहे. बर्‍याचशा बँका आणि फाय्नांशियल इस्टिट्युशन्स यांनी स्वतःची प्रायवेट प्रणाली ब्लॉकचेनवर आधारीत करण्याचं ठरवलेलं आहे. हाच ट्रेंड पुढे इतर सेक्टर (इंशुरंस, हेल्थ केर इ.) मध्ये अडाप्ट केला जाण्याची शक्यता भरपुर आहे...

गंमतीचा भाग म्हणजे बिटकॉइन्सचा शोध लावणारा "सटोशी नाकमाटो" हि खरोखर एखादि व्यक्ती आहे का डु आय्डी (माबो सारखी Wink ) याचा खुलासा अजुन झालेला नाहि. या प्रोजेक्टवर काम करतानाच त्याला पुढच्या संभावित धोक्यांची कल्पना असल्या मुळेच त्याने निनावी/भुमिगत रहायचं ठरवलं असावं का?.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे...

मध्यस्थरहीत व्यवस्थेमधे, एकमेकांवर अविश्वास असणार्‍या लोकांचे एकमत (ट्रस्टलेस कंसेन्सस) कसे जुळवुन आणावे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बीटकॉईन्स हे एकमत "प्रुफ ऑफ वर्क" या पद्धतीने साध्य करतात. सोप्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक ब्लॉक (ग्रुप ऑफ ट्रान्झॅक्शन्स) चा एक पासवर्ड (nonce) शोधायचा असतो. माहीत नसलेला पासवर्ड शोधायला खुप कंप्युटेशन पॉवर लागते. अब्जावधी शक्यता पडताळुन पहाव्या लागतात. पण एकदा कोणी पासवर्ड शोधला की तो बरोबर आहे की नाही हे तपासणं बाकीच्यांना एकदम सोपं जातं. या पासवर्ड शोधणार्‍या लोकांना त्यांच्या मेहनतीबद्दल मोबदला मिळणं गरजेचं आहे. नाहीतर ते मेहनत करणारच नाहीत. बीटकॉईन्स मधे जो पहिल्यांदा बरोबर पासवर्ड शोधेल त्याला काही बीटकॉईन्स मिळतात. याशिवाय ट्रांझॅक्शन्स करणारे पण आपली ट्रांझॅक्शन लवकर ब्लॉकमधे घेतली जावी म्हणुन बिटकॉईन्स मधेच मोबदला देउ करतात.
पण जेव्हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा करन्सी शिवाय दुसरा वापर करायचा प्रयत्न होतो तेव्हा हे ट्रस्टलेस कंसेन्सस साध्य करण्यासाठी लागणार्‍या मेहनतीचा मोबदला कसा देउ करावा हा मोठा कळीचा मुद्दा उपस्थित होतो. आणि जर कोणी विश्वसनीय मध्यस्थ हे काम करु लागला तर विकेन्द्रिकरणाच्या (decentralization) मुळ तत्वालाच धक्का पोचतो. माझ्यामते यामुळेच ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरलेल्या करन्सी व्यतिरीक्त इतर प्रणाली अजुन फक्त "प्रुफ ऑफ कन्सेप्ट" पुरत्याच मर्यादीत आहेत .

Pages