हे 'बिट्कॉईन' नक्की आहे तरी काय?

Submitted by दक्षिणा on 31 May, 2017 - 04:57

सगळ्यात पहिल्यांदा मी 'बिट्कॉईन' हा शब्द माझ्या शेजार्‍यांकडून ऐकला. तो त्याच्या मूळच्या व्यवसाया व्यतिरिक्त पण काही गुंतवणूक करतो आणि मार्गदर्शन करतो. ती गुंतवणूक बिट़्कॉईन्स मध्ये.. थोडक्यात श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग असावा असा माझा कयास. त्याने मला सांगितलं ते आठवतंय की त्याने जेव्हा ते खरेदी केले तेव्हा एका बिटकॉईनची किंमत २८००० होती आणि थोड्याच दिवसात त्याची किंमत ६५००० झाली होती.
हे प्रकरण नक्की आहे काय? त्याने मला एक दोनदा गाठून 'तुला नविन प्लान सांगायचा आहे' असे म्हटल्यावर मला उगिचच ते मल्टी लेव्हल मार्केटिंग टाईप काही असल्याचा फिल आला.
आता दुसर्‍यांदा हा शब्द "सायबर हल्ला..' ह्या धाग्यावर ऐकल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली. बिटकॉईन म्हणजे व्हर्च्युअल मनी ना?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा आणि माझ्या अल्पमतीत भर घालावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाजगीरीत्या चालु केलेली, मुक्त स्त्रोत डिस्ट्रीब्युटेड व्हर्चुअल करन्सी आहे.
काही देशांनी याला अधिकृत चलन म्हणुन मान्यता दिलेली आहे.
जगात एकुण बिट"कॉईन्स" मर्यादीत आहेत.
भारतात याला अजुन आरबीआयची मान्यता नाही.

हा वकीली किंवा आर्थीक सल्ला नाही.
-------------------------------------------------------------------------------------
बिटकॉइन्स किंवा व्हर्चुअल / डिजिटल करन्सी हा काही स्कॅम नाही. पण भारतात त्याला चलन म्हणुन अधिकृत मान्यता नाही.
तरीही भारतात काही स्टार्टप्स आहेत ज्या बिटकॉइन्स बदलुन खरे पैसे देण्याचा व्यवसाय करतात, फी घेऊन.

पण बिटकॉइन्सच्या नावाचा वापर करुन इतर कोणी स्कॅम करु शकतो.
बिटकॉइन्स वापरुन पैसे कमावणे अशक्य नाही, पण त्याची एक पद्द्त असते.
अगदी सुरुवातीला अनेकांनी स्वतःचे कंपुटर वापरुन त्यावरच ते तयार केले होते (मायनींग). ब्लॉकचेन मधे असे मायनिंग करता येत.
पण यात अनेक नियम / अडथळे ई. आहेत. क्लिक केले व कॉइन्स मायनींग झाले असे होत नाही.
तर, त्याने एकतर सुरुवातीला असे मायनींग केले असतील ते आता विकुन पैसे केले असतील, किंवा मध्यंतरी कधीतरी विकत घेउन ते आता भाव वाढल्यावर विकले असतील.
तुमच्या वाक्यातील "कमावतो आहे" यावर मला शंका आहे. "कमावले असतील". आहे म्हणायला त्यात्याकडे कॉइन्सची अशी कोणती अमर्याद विहीर आहे? ते सगळे नीट प्रश्न विचारुन आधी माहित करुन घ्या.
पुर्ण जगातील बिटकॉइन्स मर्यादीत आहेत. ख-या पैशाप्रमाणे ते अगणीत छापता येत नाहीत.
तो बिटकॉइन्स विकुन कमावतो "आहे" की त्याबद्दल सल्ल देऊन / इतर तांत्रीक सुविधा देउन कमावतो "आहे" ते विचारा. दोन्हीत फरक आहे.

खालील वाक्ये बिटकॉइन्स बद्दल नसुन, अनोळखी गोष्टीबद्दल माहिती जाणून घेताना लक्षात ठेवायचे मुद्दे आहेतः
१. जगात फुकट काही नसते
२. एखादी गोष्त जर एवढी प्रचंड सोपी असती करायला तर प्रत्येकजण ती करत असता

पण मग त्यातून माझा शेजारी खूप कमवतो आहे. (निदान तो तरी असं सांगतो आहे)
>>
ज्याप्रमाणे बी.एस.ई. / एन.एस.ई. ई. स्टॉक एक्सचेंज मधे अमेरीकन डॉलर किंवा भारतीय रुपये असे सर्व देशांचे चलन विकत घेऊन ते आपण भाव वाढल्यावर विकुन नफा कमावु शकतो अगदी तसेच.
फक्त इथे बी.एस.ई. / एन.एस.ई. नसते.

रीतसर बिटकॉईन विकत घेऊन भाव वाढल्यावर ते विकणे यात नक्कीच पैसे कमावता येतात. पण, परत तेच की ते "खुप" सोपे नाही.
पण शक्य नक्कीच आहे.
तसेच अनेक देशात जिथे याला मान्यता आहे तिथे बिटकॉइन्स वापरुन सर्व वस्तु / सेवा विकत घेऊन शकता किंवा बिटकॉइन्सही विकु शकता.

टाईम या जगप्रसिद्ध प्रकाशनातला लेख.
http://time.com/money/4623650/bitcoin-invest/

इतर लेख
http://money.cnn.com/2016/08/07/technology/bitcoin-bitfinex-account-loss/

http://thebitcoinspot.com/how_people_get_scammed,_ripped_off,_or_otherwi...

वेळ झाल्यास या विषयावर लिहीन. पण सध्या इतके लक्षात ठेवा.

बीटकॉईन हे चलन नाही, अजून बहुसंख्य देशांनी त्याला चलन म्हणून मान्यता दिलेली नाही.
बीटकॉईन एक कमोडीटी आहे. चलना ऐवजी देवाण घेवाण म्हणून वस्तू/सेवा विकत घेण्यासाठी वापरता येईल. साठवून ठेवली तर जसा सोन्याचा भाव वर खाली होतो तसा बीटकॉईन चा भाव ही वर खाली होतो. पण हा भाव पूर्णपणे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून आहे. हे बरेचसे सोन्यासारखे आहे. जगात सगळ्याना सोने हवे आहे म्हणून त्याला भाव आहे.
भारतात पद्धतशीरपणे याचे मार्केटींग चालू आहे. काही जणाना त्यातून फायदा झालाही असेल. पण भारतात सगळ्यात मुख्य धोका मागणी आणि पुरवठा यांच्यातल्या व्यस्त प्रमाणापेक्षाही , तुमचा बीटकॉईन अकाउंट हॅक होण्याची शक्यता हा आहे. तुमचे बीटकॉईन मधले पैसे चोरीला गेले तर ते कुठल्याही मार्गाने शोधण्याची शक्यता नाही. किंबहूना असे शोधता येणे अवघड होण्यासाठीच बीटकॉईन तंत्रज्ञानात मूलभूत सुविधा आहे.
समजा तुम्ही ५०,००० हजाराच्या बीटकॉईन्स विकत घेतल्या तर त्या बीटकॉईन चा सगळा इतिहास जगात कुणालाही उपलब्ध असतो. म्हणजे त्या कुठुन आल्या, कुणि विकल्या, विकत घेतल्या, कुणि चोरल्या हे सगळे (म्हणजे फक्त त्यांचा आयडी) उघड माहिती असते. हो तुम्ही घेतलेल्या बीटकॉइन कुणाकडून तरी चोरलेल्या असू शकतात. पण त्या आयडी मागची व्यक्ति कोण आहे हे जगातल्या कुठल्याच सरकारी /निमसरकारी/खाजगी संस्थाना माहिती नसते. त्या त्या व्यक्तिने स्वतःहून आपण तोच हे उघड केले तरच इतराना माहिती होऊ शकते.
समजा तुमचा अकाऊंट हॅक होऊन बीटकॉईन्स चोरीला गेल्या तर त्या कुठल्या आयडीने घेतल्या हे तुम्हाला अगदी व्यवस्थीत समजेल. पण त्यामागची व्यक्ती आणि पैसे परत मिळण्याची शक्यता शून्य. त्यातून मागोवा अजून अवघड करण्यासाठी ५०,००० च्या बीटकॉइन्स , पाच लाख वेगवेगळ्या आयडीमधे काही मिली सेकंदात वाटल्या जाऊ शकतात. आणि त्या पुढे अजून दहा लाख नवीन आयडीमधे वाटल्या जाऊ शकतात. आता या दहा लाख आयडीमागे खरोखर दहा लाख व्यक्ती आहेत का १०-१२ चोरांचेच ते सगळे आयडी आहेत हे माहीत करणे अशक्य असते.

बीटकॉईन मधून पैसे मि़ळवता येतात का? हो. नक्की. पण तुमचे सगळे पैसे जातील ही शक्यता ग्रुहीत धरूनच हा व्यवहार करा.
शेअरबाजारातही पैसे जाण्याची शक्यता असते म्हणून त्यात गुंतवणूक थांबत नाही पण शेअर बाजारापेक्षा इथे काही मूलभूत फरक आहेत.
१. शेअरच्या मागे त्या त्या कंपनीचे काही अ‍ॅसेटस असू शकतात. उदा. जमीन, कारखाने , ग्राहक पण इथे तसे काहीच नसते. अमूक लाख लोकांचा बीटकॉईनवर विश्वास आहे म्हणून त्यांना किंमत आहे. तो विश्वास संपला तर किंमत शून्य.
२. शेअर चोरीला गेलेले तर त्याचा माग काढण्यासाठी कायदेशीर मार्ग असतात. इथे ते अतिशय अवघड आहे.

नवीन बीट्कॉईनचा पुरवठा वाढल्याने बीटकॉईनची किंमत कमी होईल का?
जगात एकूण बीटकॉईन २ कोटि १० लाखाच्या (२१ मिलियन) वर कधीच जाणार नाही अशी मर्यादा बीटकॉईनच्या खोदकाम प्रकियेमधे घातली आहे. पूर्णपणे नवीन बीटकॉईन मिळवणे किती अवघड आहे याचे प्रमाण दर १४ दिवसांनी अधिक अवघड होत असते. इस. २१४० मधे २१ मिलियन ही संख्या पार होईल आणि नवीन बीटकॉईन मिळवणे पूर्णपणे थांबेल असा सध्याचा अंदाज आहे.
त्यामुळे बाजारात एकदम नवीन बीटकॉईन आल्यामुळे बीटकॉईनची किंमत कमी होणार नाही. पण बीटकॉइनवरचा विश्वास उडाल्यावर , सध्याच्या गुंतवणूकदारांकडून जुन्याच बीटकॉईन बाजारात एकदम खूप विक्रिला आल्यावर किंमत एकदम कमी होऊ शकते आणि असे पूर्वी झाले आहे.

अजय इज टोटली राईट. बिटकॉइनच्या भुलभुल्लैया पासून दूर राहा. खूप ल्युक्रेटीव आहे पण भासमान.

माझा शेजारी मला गळ घालू पहात होता गुंतवणुकीसाठी. अलिकडे अजुन कुणाला तरी महिना १५ लाख कमवतोय असं ही त्याने सांगितल्याचं ऐकलं.
शिवाय याच कामाकरिता तो १-२ वेळेला दुबईला जाऊन आला आहे (हे मात्रं खरं आहे)

अजय, बीट कॉईन हॅक होऊ शकतं हे अगदी खरं. पण तुमच्या ठळक केलेल्या वाक्यातले 'भारतात धोका' चा अर्थ कळला नाही. ते कुठेही हॅक होऊ शकतेच ना?

अमितव,
बीट कॉईन अकाउंट कुठेही हॅक होऊ शकतं हे अगदी खरं आहे. पण त्या त्या देशातल्या ईंटरनेट वापराच्या कालावधीनुसार वापरकर्त्यांच्या सुरक्षीततेबद्दलच्या कल्पना आणि मर्यादा भिन्न असू शकतात. उदा. गेल्या काही दिवसात भारतात मला असं दिसलं की फुकट वायफाय मि़ळालं तर लोक कुणाकडून ते मिळतंय, ते खुलं आहे की सुरक्षीत याची काही पर्वा न करता सर्रास सगळ्या व्यवहारासाठी त्याचा वापर करतात. फुकट वायफाय देणार्‍याला End to End सुरक्षितता नसेल तर मधले सगळे अकाउंट पासवर्ड मिळवता येऊ शकतात याची कल्पना बर्‍याच जणांना नसते.
हे फक्त एक उदा. झालं पण अशी संगणक सुरक्षीततेबद्दल बरीच उदासीनता दिसली. त्यामु़ळे अशा चोरांसाठी १ बिलियन इतकं नवीन मार्केट खुलं होतं आहे. कायदेशीर यंत्रणांना अफरातफरीच्या अनेक मार्गांची अजून कल्पना नाही.

बिटकॉइन इन्व्हेस्टमेंट चा स्टॉक गेल्या २ महिन्यात ४००% वाढला आहे. जपान मध्ये बिटकॉइन रिटेल मध्ये वापरायला परवानगी दिली आहे त्यानंतर प्रचंड वाढला आहे हा स्टॉक. जर मार्च एंड ला ११३ $ किंमत असताना ५०,००० चे स्टॉक्स घेतले असते तर आज त्याची किंमत ४८८$ प्रमाणे २ मिलियन पेक्षा अधिक झाली असती. माझ्या ओळखीतल्या एकाने ५०,०००$ चे घेतले होते पण त्याचे १००,००० $ झाल्यावर रिस्क नको म्हणून विकले !
तुमच्या शेजार्‍याने अशीच इन्व्हेस्टमेंट केली असेल !

रच्याकने: वेमांनी पोस्ट एडीट केली तरी त्यांचा टाईम स्टॅम्प बदलत नाही? का हे नव्या मायबोलीतलं फीचर आहे? का हा बीट कॉईनचा बीबी आहे म्हणून टाईम स्टॅम्प चं महत्त्व अधोरेखित करायला असं होतंय कोण जाणे Happy

पूर्वीची बार्टर सिस्टिम जशी होती तशीच पद्धत आहे थोडीफार. चलन आहे बिट्कॉईन.
फक्त आधी सांगितल्या प्रमाणे व्यवहार सगळ्यांच्या समोर असतो त्यामुळे व्यवहारात घोटाळा व्हायची शक्यता कमी आहे.

जागतिक बँकांची मान्यता न मिळाल्यामुळे कॅल्क्ञुलेटेड रिस्क घेऊन गुंतवणुक करा. जगातल्या अनेक कंपन्या मात्र खूप सिरिअस्ली विचार करीत आहेत बिट्कॉईन्स स्विकारायचा!

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक म्हणजे high risk high return. बिटकॉइन शी संलग्न कोणताही व्यवसाय/मार्केटिंग करण्यापेक्षा (धोका वाटत असल्यास) केवळ गुंतवणूक म्हणूनही आपण जसे कंपनीचे शेयर घेतो तसे घेऊन ठेवावे (अर्थातच थोडीफार रिस्क घेण्याची तयारी असेल तर. निर्णय मात्र विचार करूनच घ्यावा) अजय यांनी म्हणल्याप्रमाणे गुंतवणूक करायची असल्यास गुंतवलेली रक्कम जवळपास बुडली तरी काहीच फरक पडणार नाही असे समजून आणि तेवढीच करावी. अगदी वाटल्यास थोडा कमी नफा घेऊन देखील बाहेर पडता येईल. गेल्या वर्षभरात मात्र बिकॉइन ने खूप मोठा परतावा दिला आहे. तसेच हळूहळू का होईना याला बऱ्याच देशांमध्ये मान्यता मिळत आहे. युस मध्ये अनेक दुकाने, जिम यांमध्ये तुम्ही बिटकॉइन मध्ये pay करू शकता. तसे करणे स्वस्त देखील पडते.
बिटकॉइन सेक्युरिटी बद्दल अजय यांनी छान लिहिले आहे. हल्ली ऑनलाइन एक्सचेंजेस (जिथून बिटकॉइन विकत घेऊ शकतो) हे सेक्युरिटी चा भाग म्हणून 2 factor authentication (e.g. OTP) स्वीकारत आहेत ज्यामुळे हॅकिंग शी शक्यता थोडी कमी होत आहे.

बिट्कॉईन्स ही ब्लॉक्चेन वर आधारित एक cryptocurrency आहे. यात फ्रॉड असा काही नाही.
Calculated रिस्क घेउन ह्यात गुणतव्णूक करण्यास काहि हरकत नाही. (कॄपया, हा सल्ला नसुन मत आहे असे वाचावे )

बिट्कॉइन्सची किंमत खुप वाढल्यामुळे सध्या ती आवक्या बाहेर जात आहे.
बिट्कॉइन्स्ला पर्याय म्हनून इतर बरेच options उप्लब्ध आहेत. जसे कि इथेरिय्म, लाइट कॉइन, डॅश ई.
ब्लॉकचेनवर आधारित applications साठी खुप प्रचंड प्रमाणात फंडींग होत आहे.
जसे एखादी कंपनी आयपिओ (IPO) ने पैसा उभा करतात, तसेच आजकाल ह्या कंपन्या आयसीओ (initial coin offering) ने पैसा उभा करत आहेत. मार्केट रिसर्च करुन ICO गुंतव्नूक हा पण एक पर्याय आहे.

बाकी सेफ्टी आणि मार्केट रिस्क बद्द्ल माहीती अजय व इतरांनी दिलीच आहे.

अधिकृत मान्यता नाही तरीही गुंतवणूक करा असा सल्ला इथे देणार्‍या माननीय सदस्यांना विनंती. कॄपया असलं काही करु नका लोकहो. तुम्ही ऑथोरिटी नाही आहात. आणि हा पैशाचा प्रश्न आहे.

बाकी पैसा ज्याचा त्याचा. आपण आपलं सावध करायचं काम करतो.

खरंच कोणाला हाय रिस्क हाय गेन मध्ये इन्टरेस्ट असेल तर मला सांगा, पूर्णपणे अधिकॄत व कायदेशीर असे शंभर तरी पर्याय सुचवेन.

अमेरिकेत आणि अनेक देशांत हे अनधिक्रुत नक्कीच नाही. व्यवस्थीत कायदेशीर आहे.
आयआरएस बिट्कॉईन्स मधून आलेले उत्पन्नावर कॅपिटल गेन्स टॅक्स लावतं. जसं इतर गुंतवणुकीवर लावला जातो.

मग मला असे वाटते की ज्या देशात हे अधिकृत आहे त्या देशाच्या खासगी गृपात हा धागा वर्ग करावा. काय आहे की आधीच भारतात अनेक एजन्ट लोक असंबंद्ध दावे करत लोकांना यात गुंतवणूकीला उद्युक्त करत आहेत. आता परिस्थितीही अशी आहे की लोक मजबूत रिटर्न्स देणार्‍या इन्स्ट्र्मेन्ट च्या शोधात आहेतच. तेव्हा कोणाला ह्या धाग्यातील माहितीमुळे चुकीचे प्रोत्साहन मिळू नये असे वाटते.

गुंतवणूकीच्या बाबतीत जानो, परखो, सतर्क रहो ही त्रिसूत्री फॉलो करावी या मताचा मी प्रसार करतो. काही चुकीचे वाटल्यास क्षमा असावी.

नानाकळा, ह्या धाग्यात एकही प्रतिसाद चुकीची/ वाढवून माहिती सांगितलेला मला वाटला नाही, की असंबद्ध दावे केलेला दिसला नाही.
बरं इंडिया मध्येही बिट्कॉईन्स लीगल आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Legality_of_bitcoin_by_country_or_territor...

कुणी चुकीची माहिती सांगणार असेल तर त्यावर इलाज योग्य माहिती असणे आणि त्यातून सारासार विचार करुन निर्णय घेणे हा (माझ्या मते) असतो. कोंबडं झाकून तांबडं फुटणार नाही यावर माझा विश्वास नाही. बाकी जानो, परखो, सतर्क रहो ही त्रिसूत्री तुम्ही फॉलो करताय तशी इतरांना करता यावी म्हणून हा धागा आहे ना? माहिती बेडशिटखाली घालून काय साध्य करणार?

बाकी जानो, परखो, सतर्क रहो ही त्रिसूत्री तुम्ही फॉलो करताय तशी इतरांना करता यावी म्हणून हा धागा आहे ना? माहिती बेडशिटखाली घालून काय साध्य करणार? >> +१

आरबीआयने सावधगिरी बाळगण्याबद्दल प्रेस रिलिज दिले आहे.

The Reserve Bank of India had cautioned the users, holders and traders of Virtual Currencies (VCs), including Bitcoins, about the potential financial, operational, legal, customer protection and security related risks that they are exposing themselves to, vide its press release dated December 24, 2013.

The Reserve Bank of India advises that it has not given any licence / authorisation to any entity / company to operate such schemes or deal with Bitcoin or any virtual currency. As such, any user, holder, investor, trader, etc. dealing with Virtual Currencies will be doing so at their own risk.

Jose J. Kattoor
Chief General Manager

Press Release: 2016-17/2054

ओके. पण म्हणजे अनधिक्रुत नाही ना? विचारतोय.
वरचं वाचून, आरबीआय ने कोणाला परवाना दिला नाहिये हे समजलं. पण म्हणजे ते क्रिमिनल आहे असं वाटलं नाही. तुमच्या जवाबदारीवर करा इतकाच बोध झाला.
त्यातून काही गोंधळ झाला, फसवणूक झाली तर आम्ही हात वर करू अशा टाईपचं सेफ विधान वाटलं मला.

अमितव सहमत. कोणताही प्रतिसाद सरधोपटपणे 'तुम्ही बिटकॉइन मध्ये गुंतवणूक कराच' असा सल्ला देत नाहीये. इथे दिलेल्या माहितीचा उपयोग एखाद्याला बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करावी कि नाही याबाबत विचार करायला किंवा त्याविषयी आणखी माहिती मिळवायला नक्कीच उदयुक्त करेल एवढेच आणि त्यात काहीच गैर नाही.
बिटकॉइन मधील गुंतवणूक ही गेली काही वर्षे वादाचा विषय झालेला आहे. या वादाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी काही वर्षांपूर्वी थोडी का होईना गुंतवणूक केली त्यांना यातून बराच नफा देखील झाला आहे. जे विरोध करत बसले त्यांच्यासाठी महात्मा गांधींचे एक वाक्य आठवले : First they ignore you then they laugh at you then they fight you then you win
टीप : मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. याचा अर्थ बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करावीच असे मुळीच नाही. प्रत्येकाने समंजसपणे, गुंतवणुकीच्या प्रकारची संपूर्ण माहिती काढून आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही विनंती.

मी कुठे म्हटलं की ते क्रिमिनल आहे म्हणून? अनधिकृत आणि क्रिमिनल एकच असते काय? आजवर मला वाटत होते की इल्लीगल आणि क्रिमिनल असे दोन वेगळे प्रकार असतात गुन्ह्यांचे, माझेच काही चुकले असेल. ठिक आहे.

आरबीआय ने नरो वा कुंजरोवा भूमिका घेतलेली स्पष्ट दिसत आहे.

माझे काही प्रश्नः
पैशाचे, मालमत्तेचे, गुंतवणूकीचे व्यवहार नियंत्रित करायला भारतात कोणती ना कोणती अधिकृत संस्था आहे. बिटकॉइन हे कोणत्या संस्थेअंतर्गत अधिकृत ग्राह्य धरले आहे?

अधिकृत म्हणजे काय? बिटकॉइन ने सरकारी कार्यालयांत पेमेंट केले तर चालते का? बिटकॉइनमध्ये फसवणूक झाली तर कोणत्या ऑथोरिटीकडे तक्रार नोंदवता येईल? त्याबद्दल काय गाईडलाइन्स आहेत?
-----------------------------------------------------
ह्या लिन्क वर दिल्याप्रमाणे प्रत्येक देशाने, ज्याने हे अधिकृत केले आहे त्यांनी संपूर्ण अधिकृततेचे स्पष्टीकरण दिलेले आहे व त्यास नियंत्रण करणारी संस्था कोनती हे नमूद केले आहे.
https://www.zebpay.com/legal

एवढ्या भांडवलावर कोणाला रिस्क घ्यायची असेल तर घेऊ देत की. चांगलेच आहे. उद्या भारतात अधिकृत झाले तर फायदाच होईल. (हे स्वप्नरंजन आहे, सल्ला नव्हे)
------------------------------------------

Pages