नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या

Submitted by गणेशप्रसाद on 14 May, 2017 - 06:07

'मायबोली'वर कै. नारायण धारप यांच्या गूढ कथांचे अनेक दर्दी, चिकित्सक आणि विचक्षण वाचक आहेत. मी धारपांच्या शक्य तितक्या सर्व कथा-कादंबऱ्या गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कुणी काही मदत करू शकेल काय? विशेषतः मला त्यांच्या 'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. कुणी मदत करू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

" स्वप्नांचा राजा कथुलु " या नावाचीही एक कथा वाचलेली आठवतेय. त्यात एक सावली डोळ्यांच्या कोपर्‍यात दिसते आणि मग ती पाठलाग करत राहते असं काहीतरी भारीच घाबरवून टाकणारं होतं.

१५ मार्चच्या गुगल डुडलच्या कृपेनं H. P. Lovecraft आणि त्या अनुषंगानं कथुलुची ही माहिती मिळाली. म्हणजे धारपांनी ही कथुलीची कन्सेप्ट मराठीत आणली होती तर.

आर एम डी तुमचा नॉलेज बेस खूप चांगला आहे आणी मेमरीही.
माटी कहे कुम्हार को मध्ये बहुधा शेवटची गोश्ट धोकेबाज प्रियकराचा सूड म्हणून काळी जादू करुन त्याला प्रेग्नन्ट बनवणे अशी आहे ना?

एक लुकुंडू ची गोष्ट पण आहे.आफ्रिकन चेटूक.
नारायण धारप प्रसंगी पुनरावृत्त्/बालिश्/इंग्लिश ची कॉपी करणारे वाटले तरी ही हॅज नो मॅच इन मराठी हॉरर.
द ओन्ली वन.

अमेय फडके,
पुणे हिंजवडीत बुक रेंटल चालू करणार का? Happy

आम्ही स्वत: पुस्तकं कलेक्ट करु.एखाद्या कंपनीच्या गेट वरुन.किंवा दुकानात ठेवल्यास दुकानातून.
रेंटल पे टि एम किंवा ऑनलाईन पे घेता येईल.
नारायण धारपांची भरपूर पुस्तकं आउट ऑफ प्रिंट आहेत.
तुम्ही समाजाला एक मोठी देणगी द्याल Happy

धन्यवाद, mi_anu Happy

माटी कहे कुम्हार को मध्ये बहुधा शेवटची गोश्ट धोकेबाज प्रियकराचा सूड म्हणून काळी जादू करुन त्याला प्रेग्नन्ट बनवणे अशी आहे ना? >>> हो. त्याच गोष्टीचं नाव 'माटी कहे कुम्हारको' आहे.

@ mi_anu
माटी कहे कुम्हार को मध्ये बहुधा शेवटची गोश्ट धोकेबाज प्रियकराचा सूड म्हणून काळी जादू करुन त्याला प्रेग्नन्ट बनवणे अशी आहे ना? >>> त्याला नहि बनवत प्रेग्नन्ट. ति त्याच्या पासुन प्रेग्नन्ट होते अनि तो गर्भ पाडून त्या गर्भाचा उपयोग करुन त्याचा सुड घेते अस आहे.

त्याला नहि बनवत प्रेग्नन्ट. ति त्याच्या पासुन प्रेग्नन्ट होते अनि तो गर्भ पाडून त्या गर्भाचा उपयोग करुन त्याचा सुड घेते अस आहे. >> नाही. ती त्याला प्रेग्नंट करते.

ति तो मृत गर्भ काळ्या जादूने त्याच्यात इम्प्लाण्ट करते.
पुरुषाना बर्थ कॅनॉल नसल्याने अश्या गर्भारपणातून सुटका म्हणजे दिवस भरल्यावर मृत्यू.

त्याच पुस्तकात दुसरी कथा पण साधी फिक्षन आहे. मला वाट्ते भयकथांच्या आधीची त्यांची फेज असावी. नो थरार नो फीअर. जस्ट ओ डीअर कम नीअर.

कदाचित त्यात फेल(लेखनातील कॅरॅक्टर) झाल्यामुळे थरार सुरु करावासा वाटला असेल लिखाणात, Wink

धारपांची खूप पुस्तकं कोल्हापूरच्या अजब प्रकाशनाने रिप्रिंट केली आहेत. १०० रु एक पुस्तक, ४-५ महिन्यापूर्वी एका प्रदर्शनात मी अशी १२-१३ धारपांची पुस्तकं पाहिली होती, कदाचित जास्त पण रिप्रिंट केली असतील.

धारपांच्या कथा, कादंबर्या आधी वाचल्या होत्या की नाही ते आठवत नाही.
पण ईथे त्यांच्या बद्द्ल ईतके वाचुन खुप ईच्छा होत होती, ती माझ्या एका मैत्रीणीने पुर्ण केली.

तीच्याकडे बरीच पुस्तके आहेत धारपांची.
मी त्यातले छोटेसे म्हणुन कृष्णचंद्र निवडले, वाचले सुद्धा पण ईतकेसे नाही आवडले.

आता शपथ वाचायला घेतीय, होप सो हे तरी आवडावे.

धन्यवाद
दस्त, शपथ वगैरे सध्या बर्‍याच ठिकाणी आउट ऑफ प्रिन्ट असलेली पुस्तकेही आहेत.

लायब्ररीत पुस्तक बदलायला गेल्यावर धारपांचि 'कात' ही कादंबरी मिळाली. मस्त आहे. कोणत्याही प्रसंगाचे खोलवर विश्लेषण केले नाही. कादंबरी वेगात पुढे सरकते. तरीही खिळवुन ठेवते.

माटी कहे कुम्हार को हा पण ऑल टाईम जबरदस्त कथा संग्रह आहे.
दस्त आणि शपथ(शपथ हे स्तिफन किंग च्या इट चे भारतीयीकरण) याही खिळवून ठेवतात.

उत्तररंग म्हणून पण एक आहे पुस्तक
भयकथा नाहीये .जेष्ठ नागरिकांचा विवाह अशी एक संकल्पना आहे.आता निटशी आठवत नाहीये
त्यांचं अजून एक पुस्तक होतं.. ते भुताचं नव्हतं..
एक बाई आईस्र्कीम आणायला बाहेर पडते आणि परत येते तर तिचं घर नसतं..>>>>हो सायली समांतर विश्व अशी काहीतरी कल्पना असावी पण नाव नाही आठवत

धन्यवाद
दस्त, शपथ वगैरे सध्या बर्‍याच ठिकाणी आउट ऑफ प्रिन्ट असलेली पुस्तकेही आहेत.

Submitted by mi_anu on 11 January, 2018 - 13:59
>>>>>>>>>>>> हो आधी नव्हती available आज पाहिलं तर बरीचशी पुस्तकं दिसली आणि घेऊन टाकली लगेच विकत. Happy धारपांच्या ऑलमोस्ट सर्व पुस्तकांचा संग्रह आहे माझ्याकडे.

युगपुरूष - कथानायक हरीश ओंकार - लेविटेटर्स - मानवातल्या वेगळ्या, मानसशक्ती प्रगल्भ असलेल्यांना चेटके म्हणून वाळीत टाकलं जाणं - व त्यांनी वेगळा ग्रह शोधणं - अदभूत

नारायण धारपांचं "जिद्द" जर कुणी वाचलंअसेल तर अगदी अपघाताने मला लागलेला शोध - टाॅम गाॅडविन या लेखकाची कादंबरी स्पेस प्रिझन वाचली - अगदी शब्द न् शब्द तसाच्या तसा - पण धारपांच्या लिखाणात ग्रिप प्रचंड

@संजीव >>>> अगदी शब्द न् शब्द तसाच्या तसा >>> म्हणजे कोणाकोणाची कॉपी केलीये?

चालतं.
धारपांच्या बऱ्याच कादम्बरया स्टीफन किंग ची रुपांतरे आहेत. काही बदलही केले आहेत.
रूपांतराला बहुधा श्रेय उल्लेखाचे बंधन नसावे.

स्वाहा आणि अनोळखी दिशा चे ३ भाग नक्की वाचा.

सैतान खुप भयंकर आहे पण आऊट ऑफ प्रिंट आहे.कोणाकडे असल्यास जपून ठेवा.

माझ्याकडे नारायण धारपांची १७ पुस्तके आहेत आणि मी धारपांची काही पुस्तके लायब्ररीमधून घेऊन वाचली देखील आहेत. त्यात साकेत प्रकाशन आणि अजब डिस्ट्रिब्युशनने त्यांची खूप चांगली पुस्तके बाजारात आणली आहेत, अजब ची कोणत्याही किमतीची पुस्तके फक्त ६० रुपयात मिळतात, बघा तुमच्या आसपास एखादा अजबचा सेल चालू असेल तर. 'युगपुरुष' माझ्याकडे नाहीये पण मला वाटते साकेतने बहुधा बाजारात आणली होती.
माझ्याकडे असलेली पुस्तके:
दरवाजे
चेटकीण
440 चंदनवाडी
माणकाचे डोळे
शपथ
भुकेली रात्र
सावधान
प्रा. वाईकरांची कथा
आनंदमहल
टोळधाड
फरीस्ता
चेतन
माटी कहे कुमहारको
आभास
दस्त
नवे दैवत
काळी जोगिण
खालची माझ्याकडे नाहीयेत पण मी लायब्ररीतून घेऊन वाचलेली होती:
ग्रहण
अत्रारचा फास
सीमेपलिकडून
कृष्णचंद्र
इकमाई
नवी माणसं

mi_anu >>>> चालतं.
धारपांच्या बऱ्याच कादम्बरया स्टीफन किंग ची रुपांतरे आहेत. काही बदलही केले आहेत.
रूपांतराला बहुधा श्रेय उल्लेखाचे बंधन नसावे. >>>

त्यांची 'शपथ' कथा मला स्टीफन किंगच्या IT ची समांतर वाटली आणि शपथ वाचताना मजाही आली.

रूपांतर चांगलं असेल तर चालतं.जितका इम्पॅक्ट सालेम्स लॉट मध्ये फादर कॉलाहान अपवित्र होऊन दिशाहीन भरकटत गेल्यावर होतो तितकाच लुचाई मध्ये गोडे गुरुजी अपवित्र होऊन गोमुखाच्या पाण्याखाली जळून मेल्यावर होतो.

mi_anu >>>> रूपांतर चांगलं असेल तर चालतं.जितका इम्पॅक्ट सालेम्स लॉट मध्ये फादर कॉलाहान अपवित्र होऊन दिशाहीन भरकटत गेल्यावर होतो तितकाच लुचाई मध्ये गोडे गुरुजी अपवित्र होऊन गोमुखाच्या पाण्याखाली जळून मेल्यावर होतो.>>>
अगदी बरोबर!

ग्रहण कादंबरीतली गोष्ट शेवट पर्यंत कोणाला माहित आहे का असल्यास सांगाल का ?सिरीयल बघायचा फारच कंटाळा आलाय ☺

सायली<<< त्यांचं अजून एक पुस्तक होतं.. ते भुताचं नव्हतं..
एक बाई आईस्र्कीम आणायला बाहेर पडते आणि परत येते तर तिचं घर नसतं..
आणि हळुहळु आपल्या लक्षात येतं की ती वेगळ्याच प्रतलामध्ये गेलीये.. म्हणजे तिचा नवरा ,मूल आहे तिथच असतं.. पण ते वेगळच प्रतल असतं..
असं बरंच काही..
त्यावेळी तरी जाम आवडलेलं पुस्तक..>>>
Vidya Kurhe<<< सायली तुमही सांगत असलेया गोष्ट ची ग्रहण मालिका चालू आहे>>>

अहो पण सायली जी कथा म्हणताहेत ती तर 'सीमेपलिकडून' आहे ना? त्यात ती बाई आईस्क्रीम घेऊन येत असताना चुकून एका मितीची सीमा ओलांडून दुसऱ्या मितीत जाते म्हणून तर त्या कथेला 'सीमेपलिकडून' असं नाव आहे. ती कथा भूत पिशाचावर नव्हती आणि मला वाटतं 'ग्रहण' कथा भूत प्रेतावर आधारित आहे. Correct me if I'm wrong...

सीमेपलिकडून हा कथासंग्रह आहे.माझ्याकडे डेलीहंट इ बुक आहे.
ग्रहण चा बुकगंगा प्रिव्ह्यू इथे कोणीतरी दिलाय त्यावरून ग्रहण मध्येच आईस्क्रीम आणायला जाऊन पास्ट आणि फ्युचर चा बँड वाजवलेली बाई आहे असं वाटतं.

लुचाई रसिक.कॉम वर 9 डॉलर 20 सेंट ला उपलब्ध आहे.
बुकगंगा आणि डेलीहंट वर आउट ऑफ स्टोक आहे.
मागे मी अमेझॉन वरून एका प्रकाशन वाल्याना सैतान आणि रत्नपंचक बद्दल मेल करून बराच फॉलो अप केला होता.पण ती पुस्तके मिळणे कठीण आहे, आम्ही प्रयन करतो असा त्यांचा रिप्लाय आला.
धारप कलेक्शन क्रॉसवर्ड मध्ये वगैरे असते ते पॉप्युलर नव्या नॉन फिक्शन कथा असतात.
अर्थात अमेझॉन वरून मला 3 समर्थ मिळाले.मला 3 अनोळखी दिशा हवे आहेत.इबुक किंवा हार्ड कॉपी कसेही चालतील.
आणि रोह्याचे टॅलेंटेड लेखक ऋषिकेश गुप्ते यांची 2 जेम पुस्तके अंधारवारी आणि दैत्यालय माझी हरवलीत घरात.ट्राजिक लॉस.दंशकाल मला एका माबो मैत्रीणीने गिफ्ट दिलेले आहे.

इथे धारप किंवा गुप्ते यांचे कोणी नातलग आहेत का?जे त्यांची आउट ऑफ प्रिंट पुस्तके परत प्रिंट करवून मार्केट ला आणू शकतील?

लुचाई रसिक.कॉम वर 9 डॉलर 20 सेंट ला उपलब्ध आहे.
बुकगंगा आणि डेलीहंट वर आउट ऑफ स्टोक आहे.
मागे मी अमेझॉन वरून एका प्रकाशन वाल्याना सैतान आणि रत्नपंचक बद्दल मेल करून बराच फॉलो अप केला होता.पण ती पुस्तके मिळणे कठीण आहे, आम्ही प्रयन करतो असा त्यांचा रिप्लाय आला.
धारप कलेक्शन क्रॉसवर्ड मध्ये वगैरे असते ते पॉप्युलर नव्या नॉन फिक्शन कथा असतात.
अर्थात अमेझॉन वरून मला 3 समर्थ मिळाले.मला 3 अनोळखी दिशा हवे आहेत.इबुक किंवा हार्ड कॉपी कसेही चालतील.
आणि रोह्याचे टॅलेंटेड लेखक ऋषिकेश गुप्ते यांची 2 जेम पुस्तके अंधारवारी आणि दैत्यालय माझी हरवलीत घरात.ट्राजिक लॉस.दंशकाल मला एका माबो मैत्रीणीने गिफ्ट दिलेले आहे.

इथे धारप किंवा गुप्ते यांचे कोणी नातलग आहेत का?जे त्यांची आउट ऑफ प्रिंट पुस्तके परत प्रिंट करवून मार्केट ला आणू शकतील?

Submitted by mi_anu on 25 March, 2018 - 09:59>>>>> मला देखील हवी आहेत धारपांची पुस्तके... समर्थकथा मी घेतल्या amazon वर अंधारवरी देखील आहे पण लुचाई, परिसस्पर्श, देवाज्ञा, अनोळखी दिशा 3 सेट हे नाही मिळत आहेत Sad
तुमच्याकडे ईबुक वा pdf असतील तर देवाण घेवाण कराल का प्लिज??

mi_anu<<<सीमेपलिकडून हा कथासंग्रह आहे.माझ्याकडे डेलीहंट इ बुक आहे.
ग्रहण चा बुकगंगा प्रिव्ह्यू इथे कोणीतरी दिलाय त्यावरून ग्रहण मध्येच आईस्क्रीम आणायला जाऊन पास्ट आणि फ्युचर चा बँड वाजवलेली बाई आहे असं वाटतं.>>>
अच्छा, मी ग्रहण आणि सीमेपलीकडून दोन्ही वाचलेले आहेत पण खूप आधी आणि तेही लायब्ररीतून घेऊन त्यामुळे आता कुठली गोष्ट कोणती यात खूप confusion आहे.
BTW मलाही धारपांची अनोळखी दिशा 1-3 आणि अजून बरीच पुस्तके हवी आहेत पण online आणि बाजारातही काही मिळत नाहीयेत.

रसिक वर बरीच पुस्तके आहेत.
पण ते फक्त डॉलर मध्ये विकतात असे वाटते.पेमेंट करायला गेले तर डॉलर चे रुपये होतात आणि किंमत येते.इंडियन साईट ला जाण्याचा ऑप्शन दिसला नाही.
(पुस्तकं पुण्यात बनून अमेरिकेत जाऊन तिथून जगभर शिप होतात की काय? आपल्या चाकण फोक्सवॅगन प्लँट वगैरे सारखं?)
की रसिक आउटलेट ला मिळतील अबचौक मध्ये? रसिक ला गेल्याला अनेक वर्षं झाली.११ जुलै चा मुंबई सिरीयल बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी गेलो होतो.

Abc मधल्या रसिकमध्ये नेहमीची चार पाच आहेत धारपांची. त्यापेक्षा डायरेक्ट प्रकाशन वाल्यांना विचारून पहा, शिल्लक कॉपीज मिळू शकतील.

ओके.
मोस्ट चांगली पुस्तकं मेहता आणि दिलीपराज ची आहेत.

बुकगंगा आणि डेलिहंट वरील इबुक शेअर करता येत नाहीत.
डेलीहंट वर एक एक वेगळा चॅपटर विकत घेऊनही वाचता येतो.
पी डी एफ मराठी बुक्स च्या नाहीयेत.

धारपांची सगळी (जुनी, चांगली)पुस्तकं आउट ऑफ स्टॉक आहेत.थोडी नवी म्हणजे चेटकीण स्वाहा विधाता आणी महावीर आर्य, चंद्राची सावली वगैरे सगळीकडॅ आहेत.

एखादा धारप फॅन क्लब असला तर जुन्या संग्रहकांना स्कॅन करुन फक्त ग्रुप मध्ये शेअर् करा असे सांगता येईल.
(मला राजरोस विकत घ्यायची इच्छा आहे पण कोणीही विकतही देईना.आउट प्रिंट आहेत.एक दोन मोठ्या प्रकाशकांना संपर्क करुन झाला.)
सैतान आणि आनंदमहल कोणाकडेच नाहीत.आणि आता तर अनोळखी दिशा वगैरे तुलनेने नवी पण आउट ऑफ स्टॉक आहेत.

एखादा धारप फॅन क्लब असला तर जुन्या संग्रहकांना स्कॅन करुन फक्त ग्रुप मध्ये शेअर् करा असे सांगता येईल.
(मला राजरोस विकत घ्यायची इच्छा आहे पण कोणीही विकतही देईना.आउट प्रिंट आहेत.एक दोन मोठ्या प्रकाशकांना संपर्क करुन झाला.)>>>> +111
आनंदमहल आहे माझ्याकडे फक्त परिसस्पर्श, लुचाई, अनोळखी दिशा चे सेट आणि संक्रमण हवे आहेत Sad

कुणाकडे ग्रहण असल्यास मिळेल का? किंवा कुठे अवेलेबल असल्यास सांगा. मी मागवुन घेईल.

Submitted by सस्मित on 29 March, 2018 - 11:49>>>> ग्रहण पण सगळीकडे आऊट ऑफ स्टॉक आहे... जुन्या लायब्ररी मध्ये शोधलंत तर मिळेल कदाचित...

Pages