नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या

Submitted by गणेशप्रसाद on 14 May, 2017 - 06:07

'मायबोली'वर कै. नारायण धारप यांच्या गूढ कथांचे अनेक दर्दी, चिकित्सक आणि विचक्षण वाचक आहेत. मी धारपांच्या शक्य तितक्या सर्व कथा-कादंबऱ्या गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कुणी काही मदत करू शकेल काय? विशेषतः मला त्यांच्या 'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. कुणी मदत करू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

ग्रहण पण सगळीकडे आऊट ऑफ स्टॉक आहे> >>>>>>>>> हो ना. मी ही सगळीकडॅ बघितलं. लायब्ररीत जाणं होत नाही. सगळी पुस्तकं विकतच घेते मी.
पण ग्रहण कुठेच मिळत नाहीये. Sad धारपांची ५-६ पुस्तकं आहेत माझ्याकडे. मतकरींचीही आहेत.
बूकगंगा वर हे पुस्तक अव्हेलेबल झाल्यास नोतिफिकेशन द्या म्हणुन सांगुन ठेवलंय.

जुन्या पुणे सिटी मधल्या लायब्ररी (सपे किंवा नवी पेठ किंवा कोथरुड बेस्ट) मध्ये ही पुस्तकं नक्की मिळतील.
मी बिबवेवाडीत एका लायब्ररीत जायचे तिथे बरीच जुनी होती.
इथे 'पिम्पेल सॉदगर' उर्फ एक्स्टेंडेड नॉयडा मध्ये मिळणे जरा कठीण आहे.

काल अबचौक ला गेले होते.तिथे एकच दुकान उघडे होते.रसिक अन्युअल पुस्तक मोजणी मुळे बंद होते.
अनमोल का काहीतरी मध्ये त्यांनी सर्व साकेत प्रकाशन ची दाखवली (चेटकीण माणकाचे डॉळे चंद्राची सावली नवे दैवत स्वाहा नवी माणसे भुकेली रात्र) ती इबुक स्वरुपात वाचून झालीत.
मेहता ची आउट ऑफ प्रिंट आहेत सगळीकडे.कोणी धरपांच्या मुलाचा/मुलीचा/बायकोचा संपर्क देईल का?

चंद्राची सावली छोटं आहे पण आवडण्यासारखं आहे.कंसेप्ट थोडी वेगळी आहे.
चेटकीण पण मला आवडलं.त्यात पास्ट प्रेझेंट लिंक मस्त केल्यात.

मनोरमा प्रकाशनाने 2 पुस्तके रिप्रिंट केलीत.आडवे धागे आणि पानघंटी.खरेदी संपर्क 9923989194 धनंजय देशमुख

ग्रहण अक्षरधारा ने सिरीयल ने मागणी वाढल्याने रिप्रिंट केले होते, आता सगळीकडे असेल.

सस्मित amazon वर ग्रहण उपलब्ध आहे..>>>>> लगेच बघितलं तर अ‍ॅड टू कार्ट ऑप्शनच येत नाहीये. Sad का बरं??
बूकगम्गावर बघते.

मागवलं. Happy धन्य्वाद जुइ के Happy

पुस्तक आताच आलं अमेझॉन वरुन. आजपासुन वाचायला सुरु.

नवीन Submitted by सस्मित on 18 June, 2018 - 12:45>>>>>> वाचून झालं की मला पण सांगा कथा थोडक्यात Happy Wink

खूषखबर!!
साकेत प्रकाशन ने शाडूचा शाप आणि अनोळखी दिशा प्रकाशित केले परत.
बुकगंगा वर आली आहेत.
अनोळखी दिशा साठी मी अमॅझॉन वर बर्‍याच सेलर्स ना मेल लिहीली होती.
(माझ्यापेक्षा जास्त फॅन असलेल्या फॅन्स ने अजून चांगला फॉलो अप केला त्यामुळे ही प्रकाशित होतायत.)

हो आताच केली तिथून.
मेले फार शिपिंग घेतात.अमॅझॉन प्राईम पण ९९९ झाल्यावर परत नाही घेतले.

हौ ना. मी पण ग्रहण बूकगंगावरुन न मागवता अ‍ॅमेझॉन वरुन मागवली कारण अजुन ३-४ वस्तु मागवाय्च्या होत्या.
पण शिपिंग जास्तच आहे.
बूकगंगा जास्तीत जास्त ४९ रुपये घेतात.

नारायण धारपांचा मी देखील फॅन आहे, ते सोशीअल मीडियावर हल्ली ते खूप गाजत आहेत. त्यांच्या नावाचे प्रचंड मोठे ग्रुप आहेत. त्यांनीच नवी पुस्तकं छापायला प्रयत्न केले आणि आता लुचाई, सैतान, चक्रावळ , वेडा विश्वनाथ सारखी पुस्तकं छापली जात आहे.

हा धागा वाचायला मजा आली. धारपांची इतकी पुस्तकं माहिती नव्हती. इतर पुस्तकं खूप वाचली पण धारपांचं एकही वाचलं नव्हतं.
वर कुणितरी उल्लेख केल्या प्रमाणे उत्तररंग ही कादंबरी काहीतरी गुढ असेल म्हणून वाचायला घेतली पण ती एक सुरेख प्रेमकथा निघाली (ज्येष्ठ नागरिकांची) त्यात ही धारपांची लेखणी उत्तम चालली आहे.

ग्रहण मला माझ्या लायब्ररितून मिळालं - एक जबरदस्त पुस्तक. समांतर जगात चुकून आलेल्या स्त्रीची कथा, अतिशय बळकटपणे उतरवली आहे.

मला काही गोष्टी कळलया नाहित इथे लिहिलेल्या - नंतरचे कॉफि आणि केक्स
समर्थाच्या गोष्टी..
ए.

समर्थ मोहिमा असतात तेव्हा ते आणि आप्पा जनरली फक्त कोफी किंवा बाजारातून केक आणून कॉफी आणि केक खातात त्याचा संदर्भ असावा.
मला चेटकीण मधला सुटसुटीत स्वयंपाक खूप आवडतो.कधीही गोष्टीतली पात्रं भयंकर काही भारी मेनू बनवायला स्वयंपाकघरात जुंपलेली नसतात.त्यांनी ज्या काळात कथा लिहिल्या त्या काळात असे खाद्य शॉर्टकट दुर्मिळ असतील.आता साग्रसंगीत स्वयंपाक दुर्मिळ आहे ☺️☺️☺️

भयकथांचा म्हणजे फक्त भूतच नाही तर मानवी विकृती मनाचे आजार हेही प्रकार इतके छान रंगवले आहेत एन डी नी कि बस्स। पहिल्या पुस्तकापासून आम्ही फॅन झालो त्यांचे। इतकी सुरेख वाक्यरचना। चित्रदर्शी शैली आणि चांगल्याची वाईटवर केलेली मात हे सगळं इतकं भारी आहे की त्यांच्या तोडीचा लेखक आजसुद्धा मिळणे अशक्य आहे। sad end असलेल्या पण कथा आहेत त्यांच्या ज्या चटका लावून जातात। निष्पाप माणसांचा गेलेला बळी बघून वाईट वाटतं। त्यांच्या सायन्स fictions पण जबरदस्त च, उदा, 'सावधान ' । आकाशातला डोळा वाचून 4 दिवस सुन्न झालेलो आम्ही।

मला खूप आवडलेली पुस्तकं म्हणजे शपथ, चेटकीण, 444चंदनवाडी, स्वाहा, सावधान, आणि काळी जोगिण।

धारपांच्या कथा कधी तरी नवल मधे प्रकाषित होत. त्यांची "आपण सारी धरणीमातेचीच लेकरं " ही भयकथा नवलमधे प्रकाशित झाली होती. त्यांच्या नेहमीच्या भयकथेपेक्षा किंचित वेगळी पण भयानक होती.
हाताच्या तुटलेल्या पंजाची कथा लहानपणी वाचली होती. त्यानंतर झेपोतून उठून दचकायचे प्रमाण वाढले होते.
समर्थांची स्मरणी मधली - असला प्रकाश नको...

धरणीमातेची लेकरं टेरीबल आहे.
पडछाया मध्ये एक कथा आहे.एका कुटुंबातल्या वारसाला अमावस्येला एका बळदातून सोन्याची नाणी मिळत असतात.(यात कॅच आहे.)हे ऐकून त्याला धोका आहे सांगितलेलं असताना पण एक मित्र तिथे अमावस्येला जातो नाणी मिळवायला. आणि त्याला तिथे काय असतं ते कळतं.कार्तिक परमार नाव असतं मित्राचं.
पडछाया मध्येच हस्तर म्हणून कथा आहे.हृषिकेष गुप्तेंची फेमस गानू आजींची अंगाई चा अर्धा पार्ट थोडा हस्तर वरुन इन्स्पायर्ड आहे.पण गुप्ते इज जेम.सॉलिड लिहीतात.दैत्यालय आणि अंधारवारी पुस्तकं वर्थ अ पेनी आहेत.
(तरीही दंशकाल आवडली नाही.)

मला ग्रहण कुठेच मिळत नाहीये वाचायला. बुकगंगा वर अफाट शिपिंग चार्जेस आहेत. फक्त हार्डकव्हर पुस्तक आहे. नो इ-बुक आणि रसिक वर आउट ऑफ प्रिंट आहे. Sad

ओहह अनु, ही जी बळदातून सोन्याच्या नाण्यांची गोष्ट आहे बहुधा त्याच थीमवर तो बहुचर्चित 'तुंबाड' नावाचा चित्रपट येतो आहे (तीन भाषांमधून). ट्रेलर तरी जबरदस्त आहे.

एका कुटुंबातल्या वारसाला अमावस्येला एका बळदातून सोन्याची नाणी मिळत असतात >> सुहास शिरवळकरांची वारस नावाची एक कथा आहे. विस्मयभयकथा या प्रकारातील आहे. मला ती वाचल्यानंतर ही पूर्वी धारपांच्या कथासंग्रहात वाचली आहे असे सारखे वाटत होते. पण नंतर स्वतःची समजूत घातली कि कदाचित मूळ कथा शिरवळकरांचीच वाचली असेल, लक्षात राहीले नसेल. पण शिरवळकरांची कथा ओघवती आणि चित्तथरारक होती. ती आता मिळत नाही कुठेच.

स्वाहा >> हो. धारपांची जुनी पुस्तके जितकी प्रभावी वाटली तेव्हढी नवीन नाही. तोच तोच पणा आला असे वाटले. त्यांनी बर्‍याच कथांचा गाभा स्टीव्हन किंग च्या पुस्तकांमधून घेतला असला तरी त्या गोष्टी अस्सल भारतीय वाटतात हे धारपांमधल्या लेखकाचे यश आहे.

खूप वर्षांपूर्वी धारपकथांचा एक संग्रह वाचला होता. एका कथेत मिती आकुंचन पावत असतात. त्या ठिकाणी नायक प्रवेश करतो तेव्हां तो ही आकुंचन पावतो. पुन्हा उलटा धावायला लागतो तेव्हां त्याच्या लक्षात येतं की मघाशी जे अंतर छोटं वाटत होतं ते आता लांबचं झालेल आहे. कारण पावलं आकुंचन पावल्याने वेळ लागत असतो. ही वेळ टळण्याच्या आत त्याला पुन्हा आपल्या जगात यायचे असते...

त्याच पुस्तकात दरवडेखोरांची एक टोळी एका वाड्यावर दरोडा घालण्यासाठी येते. इथपर्यंतची सुरूवात तशीच सोडून दिलेली आहे . काही वर्षांनी एक जोडपे रात्रीच्या वेळी आश्रयाला त्या वाड्यात येते. ही अत्यंत भयानक कथा आहे ती.

अजून एका कथासंग्रहात गावातला पुजारी कि भगत नरबळी देण्याच्या उद्देशाने आधी त्या व्यक्तीचा मनगटापासून हात तोडतो. हा तुटलेला पंजा नंतर अमानस्येला गावात प्रवेश करायचा. आपले भक्ष्य शोधायचा. या सर्वच कथा भयानक होत्या. खरे म्हणजे शाळेत असताना वाचल्याने अत्यंत भीती वाटली होती.

आन्जली ग्रहण कालच पहिले अक्ष र धारात

नवीन Submitted by नानबा on 8 September, 2018 - 13:39>>> मीदेखील हेच सांगायला आले होते. धारपांची खूप पुस्तके आहेत तिथे, माझ्या मैत्रिणीने तिथूनच मागवली.

धारपां सोबत मराठीतील उल्लेखनीय गुढकथा,भयकथा ,विस्मयकथा लिहणारे जून्या काळातले लेखक आणी त्यांच्या पुस्तकांविषयी काही माहिती मिळेल का ?पैकी काहींची पुस्तके उपलब्ध आहेत काय?

Pages