नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या

Submitted by गणेशप्रसाद on 14 May, 2017 - 06:07

'मायबोली'वर कै. नारायण धारप यांच्या गूढ कथांचे अनेक दर्दी, चिकित्सक आणि विचक्षण वाचक आहेत. मी धारपांच्या शक्य तितक्या सर्व कथा-कादंबऱ्या गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कुणी काही मदत करू शकेल काय? विशेषतः मला त्यांच्या 'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. कुणी मदत करू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

पडछाया मध्ये बळी नावाची कथा असेल ज्यात एका पुरातन बळदातून पिशाचाला गुंतवून सोन्याची नाणी घेण्याचा रेफरन्स आहे.(तुंबाड ची कथा यावरून सुचली आणि त्यात बरेच बदल करून घडवली आहे.)
आणि अनोळखी दिशा मध्ये आजी नावाची कथा असेल ज्यात एक अमानवी आजी हस्तर च्या नावाने कंट्रोल होते.
तसेच ऋषिकेश गुप्ते यांच्या अंधारवारी मध्ये गानू आजीची अंगाई कथा आहे ज्यावरून तुंबाड मधल्या सीन मधला अगदी थोडा अंगाई चा सिक्वेन्स आणि संदर्भ घेतला आहे.
(कदाचित कथा आणि पुस्तकांचा क्रम माझा चुकला असेल.)
चित्रपट कथा आणि पुस्तकातली कथा या बऱ्याच वेगळ्या लिहाव्या लागतात.पुस्तकात वाचक आपल्या कल्पनेने रंग भरून चित्र पूर्ण करतो, आणि चित्रपटात सर्व रंग ठरवून भरून चित्र दर्शकाला स्पून फीड करावं लागतं.)

अमेझॉनच्या "किंडल अनलिमिटेड" वर धारपांची बरीच (५०?) पुस्तके आहेत आणि अगदी स्वस्तात ट्रायल मेंबरशिप मिळते, वाचून झाल्यावर काढून टाकता येते.

पडछाया आलंय किंडलवर. इच्छुकांनी लाभ घ्यावा Happy अजूनही बरीच पुस्तकं आली आहेत धारपांची तिथे.

हो पडछाया आणि अघोरी हिरवट घेतलं.केशवगढी पुस्तकामधल्या केशवगढी सोडून बाकी सर्व कथा मोहिनी पुस्तकातल्याच आहेत(हे वेगवेगळ्या पुस्तकात आधीच्या त्याच कथा शफलिंग नव्या वाचकांसाठी ठिके पण जे कलेक्टर असतात त्यांना वेगवेगळी पुस्तकं घेऊन सेम कथा मिळतात.किंडल वर अनुक्रमणिका फोटो हवा.
पडछाया आधीपासूनच पैसे वसूल आहे.

युगपुरुष म्हणजे लेव्हिटेटॉर्स आणि evolved human beings ची कथा असल्याचं आठवतंय. कथा नायक हरीश ओंकार. हा LEVITATORS ना एकत्र करतो आणि अज्ञान अंधकारात बुडालेली पृथ्वी हे सारे जण सोडतात आणि नवीन ग्रहावर जातात. हि एक अप्रतिम SCIENCE FICTION होती. नारायण धारप यांच्या बहुतेक सर्व कथा वाचून पारायणे केली आहेत. त्यांची जिद्द आणि कंताचा मनोरा हि पुस्तके कुणालाच फारशी माहित नाहीत. कंताचा मनोरा हे पुस्तक मी ऑडिओ बुक स्वरूपात YOUTUBE वर अपलोड केलं आहे. त्याच बरोबर त्यांची उंबरठा हि भयकथाही इथे मिळेल. (हे फक्त आणि फक्त या अफाट कल्पनाशक्ती असलेल्या लेखकाबद्दलच्या अतीव आदर आणि प्रेमापोटी केले आहे.)
https://www.youtube.com/watch?v=cXIBLiHUqtI - कंताचा मनोरा INTRO

(सॉरी ऐकण्यापूर्वीच विचारते,कथा नक्की ऐकेन.)
धारपांचे वारस पुत्र श्रीष धारप यांची या ऑडीओ वाचनासाठी परवानगी घेतली आहे का?

भरि

https://bookvishwa.com/product/narayan-dharap-9-books/
नारायण धारप यांच्या दुर्मिळ झालेल्या आणि गाजलेल्या ९ कादंबऱ्या / कथासंग्रह आता पुन:प्रकाशित..
घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध..
१. अंगारिका - रु. १५०/-
२. चंद्राची सावली - रु. १२५/-
३. स्वप्नमोहिनी - रु. १००/-
४. ग्रोग्रॅमचा चितार - रु. १७५/-
५. बहुमनी - रु. १२५/-
६. साठे फायकस - ३२५/-
७. तळघर - १७५/-
८. मैफल - २५०/-
९. विषारी साप - १७५/-
नारायण धारप यांची वरील ९ पुस्तके सोडुन इतर आणखी ३५ पुस्तके देखील उपलब्ध आहेत.

फेसबुकवर जाहिरात दिसली.

या यादीतलं गोग्रॅमचा चितार आमच्याकडे होतं आणि त्याची पारायणं केली होती.
याशिवाय मालिका वाईट आहे की मूळ पुस्तक हे बघायला म्हणून ग्रहण वाचली. आणखी एक कोणताततरी कथासंग्रह. धारपांची मी एवढी तीनच पुस्तके वाचलीत. Happy नॉट माय कप ऑफ टी.

मला नाही आवडली.
https://www.maayboli.com/node/65523
इथे शेवटून दुसऱ्या पानावर सविस्तर लिहिलं आहे. पुस्तक वाचलं नसेल आणि मालिकाही ््पाहिली नसेल, तर स्पॉयलर्स असू शकतात.

मी गेल्या काही दिवसांत नारायण धारपांची पडछाया आणि वेडा विश्वनाथ ही पुस्तकं वाचली. दोन्ही किंडलवर. मस्त आहेत. पडछाया कथासंग्रह आहे आणि वेडा विश्वनाथ कादंबरी आहे.
मायबोलीवर वाचल्यामुळेच मी त्यांची चेटकीण, स्वाहा, ४४० चंदनवाडी आणि लुचाई किंडलवर वाचली होती दोनतीन वर्षांपूर्वी. तीपण आवडली होती (बहुतेक लुचाई तितकं आवडलं नव्हतं)
याआधी मी नारायण धारपांची पुस्तकं का वाचली नव्हती याचं मला आश्चर्य वाटतं. कदाचित भुताखेतांची पुस्तकं म्हणून पूर्वग्रह असेल मनात. भुतांवर किंवा जादूटोणा वगैरेवर अजिबात विश्वास नसतानाही केवळ त्यांच्या लेखनकौशल्यामुळे ही पुस्तकं मला आवडली.
'तुंबाड'ची मध्यवर्ती कल्पना ज्यात आहे ती 'बळी' ही कथा 'पडछाया' मध्ये मिळाली. हस्तर कशात आहे?

ओह.. पण धारपांच्या कुठल्या पुस्तकात आहे?
आणि समर्थ हे डिटेक्टिव्ह पात्र आहे का होम्ससारखं? त्याचं कुठलं पहिलं पुस्तक आहे का? की कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी चालतं?

धारपांचे एक धमाल विनोदी पुस्तक वाचले होते.
ते गाजले असते तर भयकथावाले धारप आपल्याला मिळाले नसते.

आणि समर्थ हे डिटेक्टिव्ह पात्र आहे का होम्ससारखं? त्याचं कुठलं पहिलं पुस्तक आहे का? की कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी चालतं? >> डिटेक्टिव्ह पात्र नाही. धारपांच्या कथांमधे समर्थ, भगत , पंत, कृष्णचंद्र, जयदेव हे पाच साधक वरचेवर येतात. साधक हा शब्द ह्यासाठी कि हे सगळे विघातक शक्तीच्या विरोधात - मानवाविरोधात असलेल्या शक्तींच्या विरोधात उभे राहतात. त्यांची दैवते वेगळी आहेत - ट्रेडिशनल नाहित. वर उल्लेख केलेल्या लव्हक्राफ्ट च्या कथांमधे कॉस्मिक हॉरर हा प्रकार हाताळला आहे. धारपांच्या कथांमधे बहुतेक वेळा तो अंडरकरंट असतो. हस्तर शिवाय महंत, कथुल नि अझाथोथ हि पण नावे सापडतील. समर्थ नि होम्स ह्यांमधे दोन साम्ये आहेत - एक दोघांना असलेला जोडिदार नि दुसरे म्हणजे लॉजिकल डीडक्शन करणे - पण होम्स मधे अद्भुत - पारलौलिक प्रकार कमी येतो हा फरक. महावीर आर्य कथा अधिक होम्स सारख्या असतात.

अनोळखी दिशा मूळे धारप हे भयकथा लेखक म्हणून नावारुपाला आले. मला वाटते शंकर सारडांनी लिहिलेल्या परीक्षणामूळे लोकांछे लक्ष ह्या पुस्तकाकडे गेले होते. ह्या पुस्तकामधे पहिली समर्थकथा होती. मला माहित असलेली समर्थांचि पुस्तके - समर्थांचिया सेवका, समर्थांही साहसे, समर्थांची स्मरणे, समर्थांचे प्रयाण, समर्थांचे पुनरागमन, विषारी वारसा, समर्थांचा प्रहार, समर्थांना हाक. ह्याशिवाय धनंजय मधे समर्थ कथा येत (दिवाळी अंकामधे). समर्थ हा धरापांचा सर्वात पॉप्युलर नायक म्हणता येईल. मला वैयक्तिक रित्या भगत कथा अधिक आवडतात - विशेषतः ज्या तर्‍हेने भगत हि परंपरा समोर येते त्यामूळे.

वेडा विश्वनाथ हा काँसेप्ट इतर पुस्तकांपेक्षा वेगळा नि साधा सरळधोपट आहे हे आवडते. मी वाचलेले धरपांचे ते पहिले पुस्तक होते म्हणून थोडा अधिक जिव्हाळा. Happy

असामी+१

धारप नवल मधून पहिल्यादा भेटले. घरात धारपांची पुस्तके यायची. पाचवी कि सहावीत एक भयाण कथा वाचली. कित्येक रात्री तो तुटलेला हात स्वप्नात यायचा. धारपांच्या कथेतल्या अमानवी शक्तीला रूपडे नसायचे. ते अस्तित्त्वच वेगळे असायचे. कित्येकदा "खोलीत काहीतरी आले होते" असे उल्लेख येतात. त्यांची स्पष्टीकरणं पहिल्या पहिल्यांदा कंटाळवाणी वाटायची. पण थोडा मोठा झाल्यावर त्या भिण्यातली गंमत लक्षात आली तेव्हां त्या कंटाळवाण्या निवेदनात्मक उतार्‍यांना सहन करायची सवय झाली. भय पाहीजे तर हे झेललंच पाहीजे असा अलिखित करार झाला.

काही विज्ञानकथा पण वाचनात आल्या. त्या नंतर काही बेस्टसेलर्स वरून घेतल्यात असे वाटले.
त्यांची सुरूवातीची एक डिटेक्टिव्ह कथा अलिकडेच वाचनात आली. डिटेक्टिव्ह चेतन असं काहीसं नाव होतं.
धारपांनी बाबूराव अर्नाळकरांची नक्कल केली आहे. त्यातल्या मारामार्‍या आणि सदाशिव पेठी दमदाटी वाचून हहगलो झालं होतं.

पुढे चेतन शास्त्री हे पात्रं समर्थांनंतर त्यांच्या कथेत आलं. पण समर्थांची मजा नाही आली.
समर्थ हे सर्वात गाजलेलं पात्रं. त्यानंतर स्वतः धारपांनीच आचार्य, चेतन वगैरेंवर जास्त मेहनत घेतलेली नाही.

त्यांची सुरूवातीची एक डिटेक्टिव्ह कथा अलिकडेच वाचनात आली. डिटेक्टिव्ह चेतन असं काहीसं नाव होतं. >> चक्रवर्ती चेतन का ? चेतन कथांचे एक विशेष म्हणजे त्यात लांबलचक पाने भरून हाणामारी असायची. मी हा प्रकार इथे प्रसिद्ध असलेल्या ग्रे मॅन च्या नॉव्हेल्स मधे वाचलाय.

एकंडर मराठी साहित्यातल्या भयकथांबद्दल - म्हणजे स्पेसिफिक कथा नाहि - धारपांनी ललित मधे लिहिलेले ८७-८९ मधे . मी घरी आलेला ललित मी थोडाफार चाळलेला. पण तेंव्हा (नि आत्ताही) मराठी साहित्य प्रकारामधील एका स्पेक्ट्रमचा एकंदर आढावा वगैरे समजून घ्यायची क्षमता नव्हती. आज परत तो लेख वाचून समजून घ्यायला आवडेल. कोणाकडे आहे का ? असेल तर लेखाबद्दल लिहिता येईल का ?

चक्रवर्ती चेतन का ? चेतन कथांचे एक विशेष म्हणजे त्यात लांबलचक पाने भरून हाणामारी असायची. >>> हेच असावं नाव. हाणामारी चे वर्णन न तंतोतंत.

वावे, धारपांच्या गोष्टीतील सुष्ट - दुष्ट संघर्ष, जसजसे आपण अधिकाधिक धारप वाचतो, तसतसा साधारण माहीत होत जातो. पण तरीही वाचावासा वाटतोच..
आता रिक्षा - https://youtu.be/p8KjxYBXamU - दस्त
(कदाचित तुम्ही पाहिलाही असेल)

त्या दुर्मिळ पुस्तक धाग्यावरची सर्व अमेझॉन वर पण आहेत बहुतेक.
आणि हल्ली कधीकधी पुन्हा प्रकाशित पुस्तकांना इंडेक्स नसते.पूर्वी एका पुस्तकात 8 कथा असतील तर नव्या आवृत्तीत 5असतात, उरलेल्या 3 आणि इतर पुस्तकातल्या अश्याच काढलेल्या घेऊन अजून 1 पुस्तक बनते.(धारप कथांच्या बाबत असे खूप झाले आहे.)
त्यामुळे कोणीही जिथून घेईल तिथे विक्रेत्याला पुस्तकातल्या कथा नावांची यादी पाठवायला सांगा.पैश्यांचा प्रश्न नाही.पण नवं पुस्तक म्हणून पण परत परत रिपीटेड कथाच घरी येतात म्हणून.(मी पुस्तक शब्द लिहिल्यावर त्याचे भिंग बनतेय का?)

मी_अनु : खरंय. माझ्याकडे अश्या काही काही गोष्टी ३-४ वेळा आलेल्या आहेत. कित्येकदा तर एखाद्या वेगळ्या गोष्टीसाठी पण घेतलं जातं पुस्तक.

त्या पुनःप्रकाशित लिस्ट मधल्या चंद्राची सावली, स्वप्नमोहिनी आणि साठे फायकस माझ्या आवडत्या आहेत. याच क्रमाने.

Pages