नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या

Submitted by गणेशप्रसाद on 14 May, 2017 - 06:07

'मायबोली'वर कै. नारायण धारप यांच्या गूढ कथांचे अनेक दर्दी, चिकित्सक आणि विचक्षण वाचक आहेत. मी धारपांच्या शक्य तितक्या सर्व कथा-कादंबऱ्या गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कुणी काही मदत करू शकेल काय? विशेषतः मला त्यांच्या 'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. कुणी मदत करू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

मी खुप वर्षापूर्वी साठे फायकस वाचली होती आणि भावाला त्याची स्टोरी सांगितली तर तो झाडाखाली जायला घाबरायचा. Happy

धारपांसोबत >> जुन्या नवलच्या अंकांमधे उत्कृष्ट गूढ, कूटकथा, संदेहकथा असायच्या. अनिल रघुनाथ कुलकर्णी हे एक चांगले लेखक होते. त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत का हे माहीत नाही. बाकीचे आता आठवत नाहीत.
रत्नाकर मतकरींचे भयकथांचे, गूढकथांचे संग्रह उपलब्ध आहेत. सुशिंच्या कथा आहेत.

द पां खांबेटे यांचं चंद्रावरचा खून पुस्तक मला हवंय.
कुठे आहे का ऑनलाईन?
त्यांचं हसत खेळत मनाची ओळख पण सॉलिड आहे.

रसिक वर 5 डॉलर ला दिसतंय पण मला रसिक वरून भारतीय पैश्यात पुस्तकं मागवता येत नाही
धारप सैतान च्या वेळी काही डॉलर माझ्या भारतीय क्रेडिट कार्ड वरून पे केले होते(असे उद्योग माझ्याकडून भरपूर होतात) ते पुस्तक अचानक संपलं म्हणून परत आले होते.

काल चेट कीण परत वाचलं ह्याचा चित्रपट करणेबल नक्की आहे. तितके बजेट असते तर मीच बनवला असता. माझे खूप फेवरिट पुस्तक आहे.
फक्त एकच वाट्टे पूर्वी चांगली व्यक्ती व वाइट शक्ती ह्यांचा संघर्ष जरा विस्तारून लिहीत. आताच्या पुस्तकांत तो गुंडाळल्या वाणी वा टतो. जो थरार अपेक्षित आहे तो भेटत नाही. चेटकीण मधले घरांचे लोकेशन काय भारी आहे. मला ते तसले बियांचे झाड बघायचेच आहे.

हो चेटकीण मस्त आहे पुस्तक.
त्यातील वाक्य मला खूप आवडतं.

दृष्टी लाभली की जे समोर येईल ते बघावंच लागतं.

चेटकिण, शपथ, अत्रारचा फास, फरिस्ता, अन्धारयत्रा, प्रा. वाईकर ची कथा, स्वाहा, टोळधाड, काळि जोगिण, ईक्माइ, क्रुष्णचन्द्र, काळ्या कपारी, चन्द्रची सावली, नवी माणसं, सीमेपलीकडून, पाठलाग, व्दैत, दस्त, ४४० चंदनवाडी, माटी कहे कुम्हारको, दरवाजे, नवे दैवत, किमयागार, एक पापणी लवली आणी ग्रास ही सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत Happy
आणी चेटकिण व शपथ ही माझी सगळ्यात आवडती पुस्तकं आहेत

ह्याचा चित्रपट करणेबल नक्की आहे>>>>>>>>>>>>>>>> +१११११
दृष्टी लाभली की जे समोर येईल ते बघावंच लागतं.>>>>>>>>>>>>> ++++++१११११११११११ माझंही

धारप माझे सर्वात जास्त आवडते लेखक.... आमच्या इथल्या वाचनालयात त्यांची खूप पुस्तके आहेत. मी परत परत वाचली आहेत

धारपांचे सगळ्यात पाहिलांदा वाचलेलं पुस्तक म्हणजे शपथ.. माझी एक सवय आहे एक लेखक निवडायचा व त्यांची सर्व पुस्तके वाचून काढायची.. त्यामुळे आणि
शपथ वाचून धारप चाहता झाल्याने मी इतर काही पुस्तकेही वाचली.. सर्वात जास्त चंद्राची सावली आवडले.. पण सुरवातीला त्यांची उत्कृष्ट पुस्तके वाचल्याने नंतर ची काही पुस्तके नाही आवडली जसे कि टोळधाड,फ्रॅंकेन्स्टाइन.. सद्या काळी जोगीण वाचत आहे.. मस्त आहे..
तुम्ही वाचल्यापैकी सर्वात आवडलेली धारपांची पुस्तके सुचवाल का ?

तुम्ही वाचल्यापैकी सर्वात आवडलेली धारपांची पुस्तके सुचवाल का ?

Submitted by रमेश रावल on 20 September, 2018 - 08:08>>>>>>>>>
स्वाहा, परिसस्पर्श, आनंदमहल, लुचाई Happy

स्वाहा
अनोळखी दिशा खंड१-३
सैतान(आता कुठेही मिळत नाही)
चेटकीण
आनंदमहल (आधी द शाइनिंग वाचू नका नंतर वाचा)
लुचाई(आधी सालेम्स लॉट वाचू नका नंतर वाचा)
पडछाया
समर्थांचा विजय
माटी कहे कुम्हार को
केशवगढी (संग्रहाचे नाव हे किंवा वेगळे असेल)
अंधारातली उर्वशी

मी सर्वप्रथम वाचलेलं धारप यांच पुस्तक होत - समर्थांची स्मरणी.. त्यात असलेल्या काही कथा इतर पुस्तकात ही होत्या. मला खूप आवडलं होतं त्यांचं लिखाण.

कुणाकडे ग्रहण असल्यास मिळेल का? किंवा कुठे अवेलेबल असल्यास सांगा. मी मागवुन घेईल>>> मोबाईल मध्ये ऍमेझॉन किंडल डाउनलोड करा, त्यावर फ्री आहे.

नमस्कार, मी पूर्वी नारायण धारपांची एक समर्थ कथा वाचली होती. त्यामधे आप्पा जोशी यांचे लग्न / प्रेम जमते. माझ्या स्मृती नुसार त्या गोष्टीत Egyptian mummy वैगेरे प्रमुख villain आहेत. मी नुकतेच Amazon वरून 3 समर्थ कथासंग्रह विकत घेतले : समर्थांची ओळख, समर्थाना आव्हान व समर्थांचा विजय. परंतु मला वरील कथा या तीनही संग्रहात सापडली नाही. कोणाला या कथेचे व कथासंग्रहाचे नाव आठवत आहे का? मला असे वाटते की या गोष्टीचे नाव होते "समर्थ आणि '-'"
परंतु ही कोणत्या संग्रहात आहे याची कल्पना कोणाला आहे का?
धन्यवाद!

i have this book and azazoth pretty scary story. kirti such a cute girl.

हो.सर्व कथा वर्थ आहेत.
माझ्याकडे बुकगंगा वर इबुक आहे.
7 कथा आहेत.पळती झाडे आणि बागुलबुवा या कथा विशेष वाचण्या सारख्या आहेत.

हो.सर्व कथा वर्थ आहेत.
माझ्याकडे बुकगंगा वर इबुक आहे.
7 कथा आहेत.पळती झाडे आणि बागुलबुवा या कथा विशेष वाचण्या सारख्या आहेत.

Submitted by mi_anu on 12 November, 2018 - 18:24>>>>>>
धन्यवाद अनु Happy
मला पण मिळाले ते पुस्तक बुकगंगा वर.. तुम्हाला धारपांची एक कथा आठवतेय का ज्यात 2 लहान मुलांना एक टोळी पळवून नेते शेवटी ती मुलं पिशाच्च असतात असे दाखवले आहे... मी खूप पूर्वी वाचलेली ती गोष्ट आता संदर्भ आठवतही नाहीयेत... कोणत्या कथासंग्रहात होती ही कथा कोणाला माहीत आहे का??

कथेचे नाव बहुतेक अनाहूत आहे.दामू आणि शकि. मला वाचवत नाही ती कथा.हल्ली लहान मुलांबाबत मन भुसभुशीत झालंय खूप(बी व्हिटामिन खायला हवीत)
कथा संग्रह पडछाया असावा.

ओह नाही..मी सांगतेय ती वेगळी.
ही ड्रॅकुला भिकारी मुलं वाली कथा आठवतेय पण नाव लक्षात नाही.

नवीन Submitted by mi_anu on 28 November, 2018 - 15:07>>>>>>>
हो हीच कथा होती ती पण मलाही आठवत नाहीये कोणत्या पुस्तकात होती...

अनोळखी दिशा अमेझॉन वर मिळते
पडछाया आऊट ऑफ स्टोक असते.ते कोणत्या तरी प्रकाशनाने परत छापायला घेतले की मिळेल

आजी, बळी आणि राही बर्वे यांची स्वतःची कल्पनाशक्ती यांचा उत्तम मेळ, त्यात एडिटिंग टीम चे किंवा इतरांचे असतील ते बदल म्हणजे तुंबाड ची कथा.
बळी पडछाया मध्ये आणि आजी अनोळखी दिशा मध्ये बहुधा मिळेल.
शक्यतो 'धारपांच्या कथा घेऊन बनवलेला सिनेमा' म्हणून तुंबाड बघणे, आणि 'तुंबाड ची कथा वाले पुस्तक' म्हणून धारप वाचणे दोन्हीही टाळावे.चित्रपट कथा आणि पुस्तक माध्यम यात य फरक असतो.

mi 1 katha vachali hoti 15-16 varsha purvi, bahutek ti narayan dharap yanchi hoti.
kathecha plot hota 1ka talgharatun "balad" tyala sona milayche. story same as Tumbaad
kathecha naav aathavat nahi.
tumbaad pahila ani ti katha aathavali, mala ti katha parat vachaychi aahe

इथलं वाचू वाचू मी "माणकाचे डोळे " एका पुस्तक प्रदर्शनात मिळालं म्हणून घेतलंय. वाचायची हिम्मत होत नाहीये पण. Uhoh

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने 'लुचाई / अनोळखी दिशा खंड १ / २ / ३ ' प्रकाशित केले आहेत. मर्यादित प्रती!!
लवकर आपली मागणी नोंदवा.

संपर्क - साकेत प्रकाशन - ९८८१७ ४५६०५

नक्की घ्या अनु Happy
आवृत्ती संपलेली पुस्तके ते प्रकाशित करणार आहेत.

लुचाई चांगले आहे का?
मी ऑर्डर केले आहे।
पडछाया मराठी ग्रंथ संग्रहालयात मिळाले , वाचत आहे।
त्यात एक चेटकीण, आणि कर्पेकर कथा आहे।
चेटकीण मोठया पुस्तकाचे हे संक्षिप्त रूप आहे का?
माणकाचे डोळे, अनोळखी दिशा २ मध्ये आहे, ७ ते ८ पानी
.....
कोणी सांगेल का?

लुचाई चांगले आहे.खिळवून ठेवणाऱ्या धारप पुस्तकांपैकी.
स्टीफन किंग च्या सालेम लॉट वरून कथा आधारित असली तरी व्यवस्थित रुपांतरा मुळे चांगली वाटते.
चेटकीण कथा हे चेटकीण पुस्तकाचे मिनी व्हर्जन नाही.चेटकीण पुस्तक बऱ्याच नंतर आले आहे आणि कथा वेगळी आहे.

चेटकीण संग्रही ठेवण्यासारखे आहे? किंवा इतर चांगली कुठली आहेत?
माझ्याकडे ऐतिहासिक, पौराणिक, थ्रिलर(बहुतांश अनुवादित), विनोदी (पुल ,शिरीष कणेकर) अशा जवळपास ६०एक पुस्तकांचा संग्रह आहे।
धारपांची प्रथमच विकत घेतो आहे।

लुचाई
अनोळखी दिशा
समर्थांचा विजय
ही संग्रही ठेवण्या सारखी आहेत.
सैतान आणि पडछाया विकत अजून मिळत नाही पण मिळायला लागेल.

Pages