Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ सचिन काळे, भारी अनुभव. मला
@ सचिन काळे, भारी अनुभव. मला माझ्या बालपणाचा एक चारसहा महिन्यांचा कालावधी आठवला जेव्हा बिल्डींगचे रिपेअरींग चालू होते. पुर्ण बिल्डींगभर मोठ्याल्या घुशीसारख्या ऊंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यात आमच्याकडे प्रत्येकाचा पोटमाळा जो स्टोअर रूम म्हणून वापरला जायचा. मग काय याच्या माळ्यावरून त्याच्या माळ्यावर त्यांचेच राज्य. आधी आधी रात्रीच बागडायचे, भिती चेपली तसे अगदी दिवसाही उंडारू लागले. असे पकडापकडी खेळता खेळता माळ्यावरून टप्पकन खाली पडायचे आणि क्षणभर थांबून क्षणार्धात पसार व्हायचे. पण तो क्षणभर आमचाही श्वास थांबला जायचा. एकदा परीक्षेच्या आदल्या दिवशी मी फिरत फिरत अभ्यास करत असताना माझ्या हातातल्या पुस्तकावर पडला. आणि ते त्यालाही नवीन असल्याने तो तिथेच माझ्याकडे बघत थांबला. एखादा घुशीसारखा उंदीर मी पुस्तकरुपी ओंजळीत धरलेला. भितीने बोबडीच वळलेली. पुस्तक मिटताही येत नव्हते आणि फेकायचेही सुचत नव्हते. किती तरी वेळ आम्ही तसेच एकमेकांच्या नजरेत नजर घालून बघत होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा समजले की माझा पेपर बुडाला होता
मॉड्युलर किचन मधल्या खालच्या
मॉड्युलर किचन मधल्या खालच्या एका ड्रॉवर मध्ये जाऊन तो मेला . तो तिथे कसा गेला/ जाऊ शकला हे मात्र गूढच आहे . वोचमॅन ला बोलावून त्याला काढून घेतला . त्यानंतर खालचे सगळे ड्रॉवर रिकामे करून आतली भांडी बाईंकडून घासून घेतली . जास्तीच काही सटर फटर सामान होत तर ते काढून टाकलं कांदे बटाटे वरच्या ड्रॉवर मध्ये एका कुकरच्या भांड्यात घालून ठेवले . आता ते खाली ठेवणार नाही . कारण उंदीर काही कारणाने घरात शिरले तर ते पहिल्यांदी किचन मधेच शिरतात आणि कांदे /बटाट्याची टोपली खाली असली तर पाहिलं टारगेट त्यांचं तेच असत दुसरं ठिकाण म्हणजे बाथरूम मध्ये ( पाणी पिण्याकरता )
रेटॉल केमिस्टच्या दुकानात मिळालं आदल्या दिवशी केक्स आणले होते ते आणखीन एक पॅकेट आणावं या विचाराने परत आणायला गेले होते पण केकची सगळी पॅकेट्स त्याच्याकडची संपल्याने त्याने "रेटॉल" सजेस्ट केलं पोळीच्या नाहीतर ब्रेडच्या तुकड्यावर लावून ठेवा असं सांगितलं . केक नाही खाल्ले . पिंजऱ्यात ठेवलेला कांदा खायला गेला नाही पण रेटॉल लावलेले पोळीचे दोन्ही तुकडे पळवले आणि मेला . रेटॉल मध्ये ऍसिडच असत त्यामुळे पोळीच्या तुकड्याला लावताना बाथरूम मध्ये जाऊन जपून लावलं. कारण पोळीच्या तुकड्याला लावता लावता वाफा आल्या . माणसांना विषारी असणारच ते . घरात लहान मूल असली तर पोळीचे तुकडे फक्त ओट्यावर ठेवावे. . तसे केक्स पण विषारीच असतात . लहान मूल घरात असेल तर काळजी घ्यावीच घ्यावी . जमिनीवर ठेऊ नये उंदरांकरता म्हणून त्याच्या वाटेवर रात्री किचन मध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी केर काढणाऱ्या बाईंना ( जर खाल्ले गेले नाही तर ) सांगून ठेवायचं . मग प्रॉब्लेम नाही
उंदीर औषधाने त्रास होऊन मरतात
उंदीर औषधाने त्रास होऊन मरतात हे खरं आहे.
पण ते घरात सापडल्यास त्यांना 'हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे, तिथुन बाहेर जा' हे सांगणे सगळ्यांनाच नीट जमत नाही
पिंजर्यात पकडून नंतर बाहेर नेऊन सोडणेही बर्याच लोकांना टेरीफाईंग ठरते. उंदीर अचानक ट्रॉलीतून समोर आला तर हार्ट अटॅक येऊ शकतो.
या सगळ्यापेक्षा उंदराचा जीव घ्यावा लागतो.
त्याचे रक्ताच्या उलट्या होऊन हाल न होता स्लीपिंग पिल ओव्हर डोस देऊन मारण्याची सोय कोणी शोधत असेल तर उत्तम.पण तोवर माझ्या घरात तो आल्यास त्याला मरणे भाग आहे.
ओके आणावं लागेल मग.. थँक्यु
ओके आणावं लागेल मग.. थँक्यु ऑल..
मी अनु , सहमत तुला..
खालच्या एका ड्रॉवर मध्ये जाऊन
खालच्या एका ड्रॉवर मध्ये जाऊन तो मेला . तो तिथे कसा गेला/ जाऊ शकला हे मात्र गूढच आहे . >> सुजा उंदिर हा अत्यंत फ्लेक्झिबल असतो. मी दहाव्या मजल्यावर राहते आणि एके रात्री मला खुडबुड ऐकू आली पण कळेना की आवाज कुठून येतोय.
लाईट लावून निरखून पाहिले पण कळले नाही. माझे निरखणे रात्री सव्वादोन ला सुरू झाले ते फायनली ५ ला बहुधा तो उंदिर कंटाळला आणि त्याने वॉर्डरोब च्या ड्रॉवर मधुन डोकावून पाहिले. आता गम्मत म्हणजे हे ड्रॉवर असे आहेत ज्याला हँडल नाही फक्त वरून एक कर्व्ह आहे ज्यात आपण आपली ४ बोटं घालून खेचायचा की तो बाहेर निघतो. अर्थात हे ड्रॉवर मोठे आहेत तो ज्यात शिरला होता त्यात माझी सर्व डॉक्युमेंट्स होती (आहेत) तो त्या कर्व्ह मधुन आत शिरला होता. जमिन आणि दरवाजा यांच्यात ही योग्य आकाराची फट असेल तर उंदराना शिरकाव करायला पुरते.
तर अखेर मी बेड वरून थिजून त्याच्याकडे पाहिलं पण कळेना काय करू.
मग तो टुणकन बाहेर आला उडी मारून आणि मी बेड बडवला साईड ने तर तो बेड आणि भिंतीच्या मध्ये असलेल्या फटित गेला. आणि अखेर बाल्कनीतून बाहेर. मी हुश्श केले आणि बाल्कनीचे दार लावून घेतले. उन्हाळा असल्याने बाल्कनी उघडी ठेवली होती. कानला धोंडा.
आता तो एक तर इतक्या वर कसा आला? (दहाव्या मजल्यावर)
यावरुन आठवले.
यावरुन आठवले.
आमच्या इथे एका फ्रेशर ला डेंग्यु झाला आणि तो ब्लु रिज ला ११ व्या मजल्यावर राहतो.
डेन्ग्यु चा डास उंच उडू शकत नाही ही थिओरी लक्षात घेतल्यास कसे शक्य आहे?
ती व्यक्ती तर खाली उतरु शकते
ती व्यक्ती तर खाली उतरु शकते ना?
आमच्या इथे एका फ्रेशर ला
आमच्या इथे एका फ्रेशर ला डेंग्यु झाला आणि तो ब्लु रिज ला ११ व्या मजल्यावर राहतो.
डेन्ग्यु चा डास उंच उडू शकत नाही ही थिओरी लक्षात घेतल्यास कसे शक्य आहे?>>>
त्याच्या पायावर बसून गेला असेल.
बादवे डासावर नवीन धागा सुरू करूया का?
बादवे डासावर नवीन धागा सुरू
बादवे डासावर नवीन धागा सुरू करूया का?

>>
जो डास ११व्या मजल्यावर जाऊ शकतो, तो दुस-या धाग्यावरही येईलच की!
मी तर वाचलंय परदेशात
मी तर वाचलंय परदेशात शंभराव्या मजल्यावरसुद्धा डास आढळतो.
मुंबईत नसतात डास. दक्षिण
मुंबईत नसतात डास. दक्षिण मुंबईत तर त्याहून नाही. पण उपनगरांमध्ये असतात. असे का? यामागे काही भौगोलिक कारण आहे की आर्थिक? डासांनाही मराठी माणसांसारखी मुंबई परवडत नाही का?
डेन्ग्यु चे डास एडिस इजिप्ती
डेन्ग्यु चे डास एडिस इजिप्ती स्वच्छ साठलेल्या पाण्यात वाढतात.त्यांच्या बुडा वर शेरलॉक होम्स च्या सूट प्रमाणे पिन स्ट्राईप डिझाईन असते. ते पहाटे ३ ते ६ मध्येच चावतात. (अलार्म लावून ठेवत असतील.)
आमच्या मित्राचा सल्ला : 'पाणी खराब करायचं मग!! म्हणजे नो डेंग्यु.'
(नवा धागा डास निर्मूलनावर काढा कोणी)
उंदीर पाईप वरुन चढुन जातात.
उंदीर पाईप वरुन चढुन जातात. आमच्या कोकणात नारळाच्या झाडांना बुंध्यावर पत्रा ठोकतात उंदीर वर चढु नयेत म्हणुन. नहीतर वर जाउन नारळांची नासधुस करतात.
मच्छर लिफ्ट मधुन वरच्या मजल्यावर जातात. मस्करी नाही खरंच.
@दक्षिणा " सुजा उंदिर हा
@दक्षिणा " सुजा उंदिर हा अत्यंत फ्लेक्झिबल असतो. >> अगदी . आताच समजलं एवढे ड्रॉवर बंद असूनही जाऊच कसा शकला ? तर फ्लेक्झिबल म्हणूनच . मुद्दामून किचन ची खिडकी बंद केली होती . किचन ला दार आहे ते पण बंद केलं होत . म्हणजे तो इतर खोल्यांमध्ये येणार नाही हे नक्की झालं त्यामुळे मेला तर किचन मधेच हे पण नक्की होत. आता मला वाटलं जमिनीवर दिसेल मेलेला तर आत ड्रॉवर मध्ये ? प्रत्येकाची उंदरांची एक एक स्टोरी असते. घर म्हंटल कि पाली /झुरळ/ उंदीर आलेच
आता एम आय चा डिफॉल्ट ब्राऊजर
आता एम आय चा डिफॉल्ट ब्राऊजर उघडला तर त्यावर न्यूज लिंक मध्ये ही रोचक माहिती मिळाली
अश्या आपल्याला पाहिजे तश्या पाली पाडणं मॅनेज करायला भरपूर रिसोर्सेस नोकरीला ठेवावे लागतील ☺️☺️☺️
"शरीर के अलग-अलग अंगों पर छिपकली के अचानक गिरने का प्रभाव भी देखने को मिलता है। पुरुषों के सिर या दाहिने हाथ पर तथा महिलाओं की बाईं बांह पर छिपकली का गिरना शुभ और सौभाग्य दायक माना गया है। दाहिने गाल पर छिपकली गिरे तो भोग सुख, बायें गाल या गुप्तांगों पर गिरे तो स्वास्थ्य विकार, नाभि पर गिरे तो संतान सुख, पेट पर गिरे तो समस्याएं, छाती पर गिरे तो भोजन सुख, घुटने पर गिरे तो सर्व सुख मिलने की संभावना होती है।"
अश्या आपल्याला पाहिजे तश्या
अश्या आपल्याला पाहिजे तश्या पाली पाडणं मॅनेज करायला भरपूर रिसोर्सेस नोकरीला ठेवावे लागतील >>
खतरनाक आहे हे.. पण करून कोण बघेल? 
अश्या आपल्याला पाहिजे तश्या
अश्या आपल्याला पाहिजे तश्या पाली पाडणं मॅनेज करायला भरपूर रिसोर्सेस नोकरीला ठेवावे लागतील >>
ईईईईई
उंदीर पाईप वरुन चढुन जातात.
उंदीर पाईप वरुन चढुन जातात. >>> म्हणून पाईपला उलट्या फनेलच्या आकाराचा पत्रा बसवतात.
बादवे डासावर नवीन धागा सुरू करूया का? >>> हो करूया! करूया! आजपर्यंत त्या डासांकरिता goodnight वर किती पैसा ओतलाय त्याचा काही हिशोबच नाही.
आणि झुरळावरसुद्धा काढुया! झुरळ तर मला बिलकुल आवडत नाही. आमच्या घरात नेहमी झुरळं व्हायची. गेल्या पंचवीस वर्षांत नाही नाही ते उपाय केले. पैशापरीस पैसा गेला पण उपयोग शून्य. मग दोन वर्षांपूर्वी टीव्हीवर ऍड पाहिली. तीच ती! एक कोक्रोच दुसरेको खा जाता है. 'HIT' चं इंजेक्शन वाली! प्रॉडक्ट् जरा महाग आहे. पण एकदम इफेक्टिव. फक्त एक एक थेंब किचनचा ओटा आणि जिथे जिथे झुरळांचा त्रास आहे तिथे तिथे टाकायचा. दुसऱ्याच दिवसापासून झुरळ मरायला चालू झाले. मरणाऱ्या झुरळांची संख्या एव्हढी असायची की झाडूने कचरा गोळा केल्यासारखी सुपड्यावर गोळा करावी लागायची. एक झुरळ दुसऱ्याला खाऊन मरत होता की नाही, ते माहीत नाही. मला तर काही तसं दिसलं नाही. पण मेलेली झुरळं अक्षरशः ड्राय झालेली दिसायची. एकदम कुरकुरीत! फुंक मारली तर उडतील अशी. बस्! त्या दिवसापासून गेली दोन वर्षे आमच्या घरात झुरळ नावालाही उरलं नाही. अगदी माळ्यावरची जुनी पेटी जरी काढली किंवा किचन ओटा, मांडणी, फर्निचरमध्येसुद्धा एकही झुरळ दिसणार नाही. सगळी गायब झालीत. त्यांना माहीत झालंय वाटतं, की आमच्या घरात काहीतरी डेंजर गोष्ट आहे. त्यामुळे ती आमच्याकडे फिरकतच नाहीत.
मुंबईत नसतात डास. दक्षिण
मुंबईत नसतात डास. दक्षिण मुंबईत तर त्याहून नाही. पण उपनगरांमध्ये असतात. असे का? यामागे काही भौगोलिक कारण आहे की आर्थिक? डासांनाही मराठी माणसांसारखी मुंबई परवडत नाही का?
डासाना अंडी घालण्यासाठी stagnant water लागते. बादलीतले किंवा toilet मधले पाणी चालत नाही. जर तसे पाणी मिळाले नाही तर आठ दिवसात त्या भागातले डास नाहिसे होतात. (डासाचे जीवन ८ दिवसाचे असते. ) मुंबईत खास करुन दक्षिण मुंबईत माणसाला पाय ठेवायला जागा नसल्यामुळे stagnant water कुठुन येणार. त्यामुळे डास नसतात.
डास आणि झुरळं उंदराच्या
डास आणि झुरळं उंदराच्या धाग्यावर आणून धागा भरकटवू नका.
ढेकणांसाठी वेगळा धागा आहे, तसा डास आणि झुरळांसाठी करा.
डास आणि झुरळं उंदराच्या
डास आणि झुरळं उंदराच्या धाग्यावर आणून धागा भरकटवू नका.>>

खरंच खिचडी करू नका . सगळ्यांवर शेप्रेट धागे काढा
गोष्टीतला बासरीवाला बोलवा. तो
गोष्टीतला बासरीवाला बोलवा. तो बासरी वाजवत वाजवत ऊंदीर घेऊन जाईल.
हाकानाका
पाफा
पाफा
आज सकाळीसकाळी कमोडच्या आतमधे
आज सकाळीसकाळी कमोडच्या आतमधे दोन छोटे उंदीर दिसले. बहुतेक नुकतेच जन्मलेले आहेत. ड्रेनेज पाईपमधून चौथ्या मजल्यावर येऊन बाळांतपण करायला माझंच घर सापडलं
सध्या झाकण बंद करून त्यावर वजन म्हणून हर्पेकची बाटली ठेवली आहे. दुसरे बाथरूम आहे त्यामुळे याचा वापर काही दिवस नाही केला तरी चालेल. तर
झाकण बंद असताना ते उंदीर बाहेर येऊ शकतील का?
काही काळाने स्वतःहून दुसरीकडे निघून जातील की मारावे लागेल?
कसे मारायचे?
उंदरी व्याली की ४-६ पिल्ले
उंदरी व्याली की ४-६ पिल्ले घालते. बाकीची कुठे गेली ते पण शोधा.
बाकीची कुठे गेली ते पण शोधा
बाकीची कुठे गेली ते पण शोधा.जिकरीची काम आहे. All the Best!
फ्लश करून बघितलेत का?
फ्लश करून बघितलेत का?
पाण्याच्या ठिकाणी फक्त डांस
पाण्याच्या ठिकाणी फक्त डांस पिल्ले घालतात बाकी प्राणी-पक्षी (जलचर उभयचर वगळून) शक्यतो सुकी सुरक्षित आड़ोश्याची जागा प्रेफर करतात. त्यामुळे नक्की पिल्लांचे मैटरनिटी होम कमोड होते की माळ्यावरील एखादा आडोसा ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि पिल्लांनी डोळे उघडून इकडे तिकडे रांगत रांगत आपल्या बाललीला दाखवण्यापूर्वी त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. दयाबुद्धीनुसार घराबाहेरचे बालसंगोपन केंद्र किंवा कंसमामा बनून नवजात अर्भकाचा खून हे २ पर्याय अमलात आणावे. शक्यतो उंदरिण उंदीरसाठी कडक उपाय योजना करत त्यांचा पुढील हनीमून स्वर्गवासी अवतारात होईल असे बघावे. अन्यथा अजुन एक दोन डिलिवरी नंतर घराचे उंदीर पाळणाघर बनण्याचे चांसेस जास्त आहेत.
> उंदरी व्याली की ४-६ पिल्ले
> उंदरी व्याली की ४-६ पिल्ले घालते. बाकीची कुठे गेली ते पण शोधा.
बाकीची कुठे गेली ते पण शोधा.जिकरीची काम आहे. All the Best! Proud
फ्लश करून बघितलेत का? >
मी पटकन फ्लश करून लीड बंद केलं तेवढ्या एकदोन क्षणमधे जेवढं दिसलं त्यावरून ती दोन & पिल्लं आहेत असं वाटलं.
> पाण्याच्या ठिकाणी फक्त डांस पिल्ले घालतात बाकी प्राणी-पक्षी (जलचर उभयचर वगळून) शक्यतो सुकी सुरक्षित आड़ोश्याची जागा प्रेफर करतात. त्यामुळे नक्की पिल्लांचे मैटरनिटी होम कमोड होते की माळ्यावरील एखादा आडोसा ह्याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि पिल्लांनी डोळे उघडून इकडे तिकडे रांगत रांगत आपल्या बाललीला दाखवण्यापूर्वी त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. दयाबुद्धीनुसार घराबाहेरचे बालसंगोपन केंद्र किंवा कंसमामा बनून नवजात अर्भकाचा खून हे २ पर्याय अमलात आणावे. शक्यतो उंदरिण उंदीरसाठी कडक उपाय योजना करत त्यांचा पुढील हनीमून स्वर्गवासी अवतारात होईल असे बघावे. अन्यथा अजुन एक दोन डिलिवरी नंतर घराचे उंदीर पाळणाघर बनण्याचे चांसेस जास्त आहेत. > माळा नाहीय, घरात अडगळ-पसारा जास्तीचे सामन वगैरे काही नाही.
याच बाथरूममधे मागच्या तिरक्या काचेतून, गेल्या दहा वर्षात दोनदा उंदीर आले आणि टुणकन उडी मारून परत तिथूनच निघून गेले आहेत.
===
https://citypests.com/how-to-stop-rats-coming-up-the-toilet/ इथे ब्लिच टाका म्हणजे १५ मिनिटात ते मरतील लिहलंय.
ब्लिच म्हणजे सौम्य ऍसिडच असते का? मगात हर्पेकची पूर्ण बाटली उपडी करून घेऊन, आधी फ्लश करून पटकन लीड उघडून मगभर हार्पेक टाकून परत पटकन लीड झाकू का? नंतर ग्लोव्हज घालून त्यांची मढी बाहेर काढता येतील (फ्लश करून गेली नाहीततर)
===
मदतीसाठी आभार.
आभार देवा! काही करावं लागलं
आभार देवा! काही करावं लागलं नाही, गायब झाला स्वतःहूनच!!
Pages