भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2016 - 05:14

मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.

सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?

अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.

युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.

खालील लिंका उपयुक्त आहेत.

http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm

http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com

http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...

https://m.facebook.com/Vegan-72085494764/

https://m.facebook.com/therealgreencafe/

http://www.forksoverknives.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही .मला नाही वाटत...आयडीया ब्लास्ट झाली असं......आयडीया मान्य करणारे व न करणारे दोन्ही प्रकारचे लोक इथे होते. त्यांची त्यांची मतं.....
पण तुम्ही कंटिन्यू केलं की नाही...?

वेगन व्हायचे हे तुम्ही ठरवलेत. इथे ब्लास्ट केले लोकांनी म्हणून तुम्ही तुमचा निर्णय का बदलावा? तुम्ही तर सुरवात केलीय हेही लिहिलेले. मग तुम्हाला आवडले नाही म्हणून सोडले की एकूणच ह्या प्रकारच्या गोष्टीत काही राम नाही हे पटले म्हणून सोडलेत?

हा हा हा. अत्यंत विनोदी धागा व लेखिकेचा मानभावीपणा. स्वत:ला वेगन जमलं नाही तर लोकांवर ढकलून मोकळ्या. स्कूटर पोलिसाना घेऊन जाऊ देत म्हणणार्‍या, सायकल चालवणार होत्या...सिल्क्ची साडी नाही नेसणार...यातलं तरी काही केलं का? उगिच दुसर्‍यावर खापर का फोडायच? जमत नाहीये असं कबूल तरी करावं. तसही हा धागा चालवत ठेऊन, त्या दुसर्या धाग्यावर रोजच्या मांसाहाराच्या पोस्टस होत्याच की त्यांच्या... मानभावीपणा नुसता.

अमा तुमच्या नविन धाग्यात घी दोसाबद्दल वाचून इथे विचारायला आलो, वर उत्तर मिळाले.
आम्ही व्हेगन जीवन पद्धती (त्यातही नुसती व्हेगन नव्हे तर WFPB शैली) अवलंबली आहे. न जमण्यासारखे / कठीण असे काही वाटत नाही, उत्साहवर्धक , एनर्जी वाढलेली वाटते.

सर्व प्रतिसादकांचे आभार. इथे लिहिल्या दरम्यान फुल हेल्थ चेक अप करून घेतला होता फुल व्हेगन होण्या आधी. त्यात बोन डेन्सिटोमेट्री टेस्ट करून घेतली. त्यात डी व्हिटामिन डेफिशिअन्सी व ऑस्टिओपोरॉसिस चा धोका आहे असे निदान झाले. मग त्याच चेक अप चा भाग म्हणून डाएटिशिअन शी बोलले. तिने काहीही कन्क्लुझीव माहिती दिली नाही. कॅल्शिअम व डी वी टामिन साठी दुग्ध जन्य पदार्थ अंडी खा, असा सल्ला दिला व गोळी पण दिली डी विटामीन साठी. हा झाला हेल्थ डेटा चा भाग.
इमोशनली मला दही सोडून देणे फार फार अवघड गेले . श्रिखंड नव्हे साधे दही व ताक. दही कंफर्ट फूड आहे माझ्यासाठी.
राहणी बघितली तर हॉस्टेल मधली मुले वीकांताला येत तेव्हा चिकन बनवणे व ती गेल्यावर उरलेले संपवणे असे होत गेले. दरवेळी टाकून देणे होत नाही. व स्वतः साठी इतकुसे वेगळे बनवायचा पेशन्स नसतो माझ्यात. मग ते सुटले.
एकूण सध्या नॉर्मल जेवण खाण चालू आहे काहीच एक्सेस नाही. या वर्शाचा चेक अप झाला नो मेजर टेन्शनस.

विचार केलयवर लक्षात आले कि सिल्क कपडे घालायचे सोडणे, स्कूटर कार ओन करायचे सोडणे हा वैचारिक बदल होता त्याच्या साठी व्हेगनिझमची आवश्यकता नाही. स्कूट र एका मुलाला देउन टाकली.

सर्व शोध प्रक्रियेत लोकांचे प्रतिसाद न चिड ता हँडल करता आले हे ही एक लर्निंग. अजून काही माहिती हवी असेल तर विपू करा नक्की उत्तर देइन.

ओके.
जर कधी विचार बदलला तर सांगा मी काही टिप्स देउ शकेन.

अमा, पुण्यामध्ये एक छान वेगन इटिंग प्लेस आहे, रुबी हॉल क्लीनिक जवळ, पुन्हा याल पुण्याला तेव्हा सांगेन, एक्दम छोटीशी , मालकीण आवक्या समोर जेवण तयार करते टाईप.

वेगन नसाल तरी आवडेल चेंज म्हणून,

मी गेलेलो तेव्हा तिने विचारले, की मला त्या जागे बद्दल कसे कळले,? मी कपाळाला हात लावला म्हंटले खाली काठी कबाब खायला आलेलो, ते बंद होते Mहणून तुझे दार ठोठावले बाई,

ही लिंक दिली होती का इथे कोणी? कालच वाचनात आली नी हा धागा आठवला.

How Our World Could Change If Everyone Became Vegan
https://brightside.me/wonder-curiosities/how-our-world-could-change-if-e...

There will be an enormous amount of stray farm animals.
Severe economical problems will arise.
The planet’s ecology will change.
The population’s general health will be affected.
People will try to make their pets vegan.

Pages