भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी?

Submitted by अश्विनीमावशी on 28 September, 2016 - 05:14

मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.

सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?

अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.

युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.

खालील लिंका उपयुक्त आहेत.

http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm

http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com

http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...

https://m.facebook.com/Vegan-72085494764/

https://m.facebook.com/therealgreencafe/

http://www.forksoverknives.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, व्हिगनिझम स्वीकारणे व ते पूर्ण पणे पाळणे कठीण आहे. भारतात तर त्या बाबतीत पूर्ण अंधार आहे. बाहेरच्या खाद्य पदार्थांवर फार कमी वेळेस सगळे कंटेंट खरे लिहीलेले असतात. त्यामुळे, हॉटेलिंग, बाहेरील तयार पदार्थ, चॉकोलेट्स, आईसक्रीम्स, केक्स असे सगळे वगळावे लागेल.फक्त प्लांट बेस्ड अन्न सेवन करायचे. मध नाही, लेदरच्या वस्तू वापरायच्या नाहीत, प्युअर सिल्कचे कपडे नाहीत. पण जर तुम्ही निश्चय केला असेल तर त्याचे नैतीक, पर्यावरण दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच मोठे समाधान आहे. माझी बहिण अमेरिकेत पूर्णपणे व्हिगन आहे व या चळवळीची सक्रीय कार्यकर्ती आहे. तिला मी इथे पोस्ट करायला सांगेनच. शुभेच्छा ! Happy

व्हेगनिझम थोडा महाग आहे पाळायला भारतात.पण अशक्य नाही.सोय आणि बदाम प्रॉडक्टस ची आवड हवी.नट अ‍ॅलर्जी नको.थोडी काळजी घ्यावी लागते, दूग्धजन्य पदार्थ वर्ज्य करुन त्याची कमी पूर्णपणे दुसर्‍या प्रोटिन्स ने भरुन काढताना.आपल्या लक्षातही येत नाही इतक्या गरजा आपण आहारात दूध तूप ताक लोण्या वर अवलंबून ठेवत असतो.
(उदा. पराठ्यावर बटर किंवा थालिपीठावर ताज्या लोण्याचा गोळा, याची रिप्लेसमेंट म्हणून कॅश्यू बटर वापरावे लागेल.)
शिवाय व्हेगनिझम फक्त आपण पाळून गायींचे दर वर्षी मॅटर्निटी सायकल मध्ये जावे लागणे थांबेल का हा प्रश्न आहेच.कारण व्हेगनिझम आचारलेल्यांची संख्या प्रचंड कमी आहे.व्हेगनिझम ज्या गोष्टी टाळतो त्या उत्पादनांवर मोठी प्रॉडक्ट चेन आणी बर्‍याच जणांची पोटे आहेत.

फेसबुक वर एक भरवश्याची व्हेगनिझम कम्युनिटी आहे.नाव विचारुन सांगते.
(मला स्वतःला व्हेगनिझम वाल्यांची विचारसरणी पटते.पण मिल्क प्रॉडक्ट अणि लेदर वापर हे रक्तात हाडात भिनलेले असल्याने पूर्ण फेकणे कठीण आहे.)
लिंबूदा व्हेगन म्हणजे जी जीवन पद्धती कोणत्याही प्रकारे ज्यात प्राण्यांचा वापर्/शोषण झाले आहे अशी उत्पादने आणि आहार पूर्ण पणे वर्ज्य करते ती.

मध नाही, लेदरच्या वस्तू वापरायच्या नाहीत, प्युअर सिल्कचे कपडे नाहीत. पण जर तुम्ही निश्चय केला असेल तर त्याचे नैतीक, पर्यावरण दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच मोठे समाधान आहे. माझी बहिण अमेरिकेत पूर्णपणे व्हिगन आहे व या चळवळीची सक्रीय कार्यकर्ती आहे. तिला मी इथे पोस्ट करायला सांगेनच. शुभेच्छा !>> जरूर लिहायला सांगा चांगले मार्गदर्शन होईल. दुग्ध जन्य पदार्थ जवळ जवळ सोडलेच आहेत. पण चहात एक दीड चमचा का होईना मिल्क पाव्डर टाकायचा मोह सुटत नाही. त्या बदली काय वापरता येइल? हे मी फेसबुक वर वीगन आउटरीच ला पण मेसेज टाकला होता. त्यांनी चार प्रकारचे दूध सबस्टिट्यूट दिले आहेत.

घरी अर्धा डबा तूप आहे. अमूल चीज व बटर शेवटची पाकिटे संपवली. ह्या बरोबर ब्रेड खात होते. तर त्याला आता ऑलिव्ह ऑइल वापरता येइल. दोन अंडी आहेत. किंवा मग ब्रेडच पूर्ण कटाप. जसे साबुदाणा खिचडी बरोबर दही ताक आव ड ते तर ते पूर्णच सोडून द्यावे लागेल. तसाही साबूदाणा वाईट

१ डिसेंबर फुल व्हेगन सुरू करायची डेडलाइन किंवा लाइफ लाइन म्हणा ठेवली आहे. सिल्क च्या साड्या देउन टाकीन किंवा ओलेक्स पे बेच दे. नो प्रॉब्लेम अबाउट द्याट. ऑफिसची डायरी पण लेदर बाउंड आहे. त्यांना सांगेन की नवीन वर्शाची देताना मला साधी द्या. कारण मी लेदर वापरू शकत नाही.

व्हेगनिझम थोडा महाग आहे पाळायला भारतात>> हो. पण माझी टोटल डेली अन्न रिक्वायरमेंट १५०० -१७०० कॅलरी पेक्षा फार नाही. त्यामुळे जमवेन. ग्रोसरी हून जास्त खर्च इन अ‍ॅप परचेसेस मध्ये होतो आहे असे लक्षात आले आहे. त्यामुळे तिथे शिस्तीची गरज आहे.

सोया ग्रॅन्यूल कधीतरी बनवल्या आहेत. व बदाम दूध बनवायला शिकेन. नाहीतर आपले अश्वत्थामा फेमस
दूध आहेच.

प्रोत्साहना बद्दल धन्यवाद अनू. तुझे काही नुस्खे असतील तर लिही.

सुरुवात एक एक्सेल शीट बनवून करता येईल.
रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत च्या दिनक्रमात आपण काय काय प्राणीज उत्पादने वापरतो आणि त्यांना कसे रिप्लेस करता येईल.
खास करुन आहारात जे दुग्धजन्य वापरले जाते त्याच्या ऐवजी काय काय वापरुन शरीराला मिळणारी प्रोटिन व्हिटामिन आणि ते खाऊन मनाला मिळणारा कंफर्ट कमीत कमी विचलीत होईल.
नैतिक बाजूबरोबरच व्हेगनिझम हा वेट लॉस आणि डायबेटिस वा तत्सम साठी उपयोगी.फक्त कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यास त्यांची हे सर्व पाळून तुमची चांगली सरबराई करताना जाम गोची होते.(सगळं स्वतःचं घेऊन गेलं तर ओक्के.)
हौसेने आणि प्रेमाने मेनू मध्ये श्रीखंड्/आईसक्रिम्/मिल्कशेक्/ताक/बुंदी रायता ठेवणार्‍यांचे चेहरे धाडकन खाली पडतात.

(मी पाच वर्षापासून एका ठराविक कारणाने आइसक्रिम खात नाही त्यामुळे यातला एक पडणारा चेहरा प्रकार ओळखीचा आहे.पण शक्यतो याची पब्लिसीटी न करता सर्दी वगैरे चे कारण देऊन खपून जातं.मिल्कशेक/कोल्ड्रींक्/चहा कॉफी चालतं.)

मी नाही हो पाळत व्हेगनिझम Happy माझा दिवस सध्या एक चहा घरी ने चालू आणि दिवसभरात कमी साखरेच्या आणि दुधाच्या तीन एस्प्रेसो ने संपतो.
पण यावर आमच्या ग्रुप्स मध्ये दोन्ही बाजूंनी सारखी पेटती चर्चा चालू असते त्यामुळे माहिती आहे जरा.
कँपात व्हेगन कॅफे चालवणार्‍या एक दोन जणांशी थोडी ओळख आहे.
एका ग्रुप वर चौकशी चापवली आहे, अजून सांगते उद्या.

ते खाऊन मनाला मिळणारा कंफर्ट कमीत कमी विचलीत होईल.
>> खरे तर मोखाड्यातील उपाशी व कुपोषित मुले बघून घरी जेवायचीच लाज वाटू लागली आहे. त्यामुलांना चांगले चौरस जेवण पोचवावे असे फार वाट्ते आहे. एखादी चॅरीटी असेल तर ती शोधून हे करणार आहे. ( हे जरा अवांतर आहे इथे . ) पण आपल्याकडे साधने आहेत पण आपण ते अन्न खाणे बरोबर नाही आणी ज्यांना खरेतर हाय कॅलरी, प्रोटीन युक्त जेवणाची गरज आहे त्या मुलांना व त्यांच्या आयांना ते मिळत नाही आहे. हा विरोधा भास आहे. मी सोडेक्सो पासेस मधले १० २० ३५ रु चे पण आता दान करायला सुरुवात केली आहे.

>>> लिंबूदा व्हेगन म्हणजे जी जीवन पद्धती कोणत्याही प्रकारे ज्यात प्राण्यांचा वापर्/शोषण झाले आहे अशी उत्पादने आणि आहार पूर्ण पणे वर्ज्य करते ती. <<< ओके, धन्यवाद.
पण मग भारतात अजुन एक प्रश्न उभा रहातो.
तो म्हणजे भारतातील शेती उत्पादन हे बव्हंशी बैल /अन्य प्राण्यांची मेहनत वापरुनच केले जाते. तर मग बैलाच्या द्वारे शेती तुन आलेले धान्यही वर्ज्य करायचे का?
आपल्या कडे, बहुधा ऋषीपंचमीला (नेमके बघुन सांगावे लागेल) बैल/गोवंशाच्या कष्टापासुनचे अन्न ग्रहण करीत नाहीत, अर्थात वर्षातुन एक दिवस. त्याची आठवण झाली.
त्याचबरोबर व्रतवैकल्य म्हणून, वर्षातील काहि दिवस्/ उर्वरीत पूर्ण काळ प्राणीच काय, दुसर्‍या माणसाचे कष्ट लागलेलेही काही ग्रहण न करणारे आहेत(/असायचे?) . पूर्ण स्वावलंबन. मानव हा प्राणीच मानला, तर त्या दुसर्‍या मानवाच्या कष्टाचे देखिल त्यागणे आवश्यक नाही का?

वरील एकंदरीत प्रकार म्हणजे हिंदू शास्त्रातील "जीवो जीवस्य जीवनम" ही साखळीच मान्य न करण्यासारखे आहे. असो.
मी वाचनमात्र. Happy

डायरेक्ट वापर्/शोषण आधी टारगेट करता येईल.इन्डायरेक्ट हार्ड टु ट्रॅक.
डायरेक्ट उदा गायी म्हशींचे दूध/कातडे
सिव्हेट मांजराच्या स्त्रावापासून बनलेले महाग परफ्युम
अंबर्/कस्तुरी
गायीच्या आतड्याच्या पिशवीत कुटून बनवलेला वर्ख
मंकी ब्रँड कॉफी
इ.इ.

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm अमा, सोया मिल्क तुम्ही चाखुन पाहीले आहे का? मला तरी ते पसंत पडले नाही. तरीही पर्याय मिळत असतील तर बरे. पण एकदम कमी करु नका, हळू हळू सवय करा.

चांगला पॉइन्ट लिंबू,

मध्यंतरी रुषी पंचमीची भाजी डाएट करणा र्‍यांनी खावी असे टीव्हीवर ऐकले होते.

सुरुवात म्हणून संपूर्ण शाकाहारी होणे, मग डेअरी कट करणे, लेदर कट करणे इतके करणे शक्य आहे. आता मला स्वतः उगवून खायला पटेल पण शेतजमीन नाही. अशांनी काय करणे शक्य आहे?
बिल क्लिंटन पण व्हेगन आहेत असे वाचले होते. म्हणजे रेड मीट वगैरे ते खात असत. मग बायपास सर्जरी झाल्यावर हा बदल केला.

सिल्क कपडे वापरायचे थांबविणार!> हो त्यात काय अवघड आहे?
मग तुम्ही पेट्रोल पण वापरायचे थांबवणार का?
नाही म्हणजे खनिज तेलपण लाख्खो वर्षांपूर्वी वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरावर दाब पडून तयार झालेय ना?> सध्या पेट्रोल ६०० रु. महिन्याच्या वर लागत नाही. नोकरी संपली की कुठे वेळेवर जाण्याची गरज पडणार नाही. जिथे जायचे तिथे चालत जाता येइल. जवळ पास तरी. नाहीतर पब्लिक ट्रान्स्पो र्ट. पेट्रोल वर व्हेगन इज्म मध्ये काय विचार आहेत ते वाचून बघते.

पुस्तकांचा डिंकात सरस असे म्हणून मग सिल्कच्या साड्यांबरोबर जुनी पुस्तकेही देऊन टाकणार का?>> ९०% रीडिंग ऑनलाइन . जुनी पुस्तके खरेच लायब्ररीला देणार आहे. दोन खोकी पडून आहेत.

बरीचशी ब्युटी प्रॉडक्टस / स्कीन केअर प्रॉडक्ट प्राण्यांची चरबी, युरिन यांपासून तयार केलेली असतात.तूम
आणि हे त्यांवर मेंशन नसते. केवळ केमिकलचे नाव असते.>> वापरतच नाही. मी रेग्युलेट्री डाटा वर काम करते. व फॉर्म्युलेशन्स माहीत आहेत. अ‍ॅनिमल ओरिजिन काही असले तर नक्की माहीत पडेल. कोचिनीएल लाल रंग. जो किडे मारून बनवतात. उदाहरणार्थ. केक बिस्किटेच नाही तर लाल रंगाचे काही खावे लागनार नाही.

कित्येक औषधे/व्हीटॅ/कॅल्शिअम्/आयर्न सप्लिमेंटस अ‍ॅनिमल बेस्ड असतात.
आणि सगळेच हे मेंशन करत नाहीत.
म्हणजे औषधावर हिरवा /लाल ठिपका लावायची नियमानुसार गरज नाही.
ज्या गोळ्या / टॉनिकांना औषधाऐवजी फूड सप्लिमेंट /फूड म्हणून प्रमाणित केलंय त्यांच्यावरच हा ठिपका असणं सरकारने कंपल्सरी केलंय.>> बिलीव्ह मी आजपरेन्त एकही सप्लिमेंट विकत आणलेली नाही.

तसेच वर अनु म्हणाल्या तसं ज्यांच्याकडे तुम्ही जाल त्यांना हा एक वेगळाच ताप.>> तसे माझे सोशल सर्कलच नाही तितके पण गेले तर स्वतःचा डबा घेउन जाता येइल. किंवा फक्त पाणी द्या असे सांगेन.

किंवा ऑफिसातल्या पार्ट्याना वगैरे मुद्दाम तुम्हाला 'मी वेगान' ची जाहिरात करावी लागेल.>> तसे कल्चर नाही.

अन्यथा पावभाजीत वरून बटर न घेता थांबलात तरी मूळात पावभाजी बटरातच केलेली असते.
पुलावांमध्ये तूप असते.> हे दोन्ही पदार्थ तेलात बनवता येतील की. बाहेरचे फारसे खात नाही.

आणि मूळात ज्या गोष्टी नॅचरल सोर्समधून मिळतायत त्या टाळून मग त्यांची सप्लिमेंटस घ्यायची हा अट्टहास का करायचा आहे?
>> शक्यता पडताळून बघते आहे. अट्टाहास लेव्हल ला गेले नाही अहो अजून. Happy १ डिसें डेडलाइन आहे.

मूळात ज्या गोष्टी नॅचरल सोर्समधून मिळतायत त्या टाळून मग त्यांची सप्लिमेंटस घ्यायची हा अट्टहास का करायचा आहे?>>> supplements market chalave mhanun Wink

अमा तुम्ही धाडस करताय याचे कौतुक वाटते पण मला नाही जमु शकणार असे, मी व्हेज असले तरी. आणी वर सातीने सगळे लिहीले आहेच. यातले बरेच आपण टाळु शकत नाही, पण तब्येत सांभाळुन ही जीवन पद्धती स्वीकारा. कारण आता नाही पण नंतर पुढे तुम्हाला कॅल्शियम वगैरेची जरुर भासली तर त्यावर पर्यायी औषधे पण बघुन ठेवावी लागतील.

https://www.vegalyfe.com/

ह्ये सापडलं इथे सर्व उपलब्ध आहे. जे नाही ते नाही. घरी बनवलं नाहीतर त्याविना जगलं क्या फरक पडेगा.

फॉसिल फ्युएल बद्दल दोन मत प्रवाह सापडले एक म्हणतात ते नॅचरल ऑरगॅनिक प्लांट मटेरैल आहे. सो नो वरीज. काही म्हनतात मिनिमाइज करा. जे मला शक्य आहे. आय डोट ओन अ कार. आणि सायकल घेण्याच्या प्रक्रियेत आहे. नवरात्री सुरू झाली की घेइन.

@अमा, व्हेगन जीवन पद्धतीविषयी पूर्वी कधी माझ्या ऐकण्यात किंवा वाचनात आले नव्हते. तुमच्याकडून असे मी प्रथमच ऐकतोय आणि त्याविषयी वाचून प्रचंड आश्चर्यचकितहि झालोय, कि असेही काही असू शकते?
प्रथम मला असा प्रश्न पडलाय कि हि व्हेगन जीवन पद्धती आपणांस का अंगीकारावीशी वाटतेय? सद्या तुम्ही अनुसरत असलेल्या जीवनपद्धतीत आपणांस कोणत्या प्रकारची कमी जाणवतेय? व्हेगन जीवन पद्धतीचे फायदे तोटे काय असतात? त्याविषयी आपण केलेला अभ्यास, इतरांकडून आपणांस मिळू शकणाऱ्या आणि न शकणाऱ्या सहकार्याला तोंड द्यायची आपली तयारी, ह्या सर्वांविषयी आपणांकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

फॉसिल फ्युएल बद्दल दोन मत प्रवाह सापडले एक म्हणतात >>>
फॉसिल फ्युएअल वेगन पद्धतीला चालायला काय हरकत आहे ते कळले नाही.

जे प्राणी काही लाख वर्षापूर्वी मेले असतील ते काही माणसांसाठी पेट्रोल तयार व्हावे म्हणुन नाही. आत्ता तर प्राण्यांना मारुन किंवा वापरुन खनिज तेल तयार केले जात नाही ना.

फॉसिल फ्युएल बद्दल दोन मत प्रवाह सापडले एक म्हणतात >>>
फॉसिल फ्युएअल वेगन पद्धतीला चालायला काय हरकत आहे ते कळले नाही.

जे प्राणी काही लाख वर्षापूर्वी मेले असतील ते काही माणसांसाठी पेट्रोल तयार व्हावे म्हणुन नाही. आत्ता तर प्राण्यांना मारुन किंवा वापरुन खनिज तेल तयार केले जात नाही ना.

अहो टोच्या तसे तर आहेच पण जेव्हा विघटन होत राहते तेव्हा एका लेव्हल ला प्राणी व वनस्पती ह्यांच्या अवशेषांचे विघटन होउन मॉलिक्यूल एकत्र होतात. यू कांट रिअली सेपरेट. तसे तर श्वास पण घेता कामा नये. कारण फॉसिल फ्युएल मधला कार्बन मोनॉक्साइड व इतर घटक द्र्व्ये आपण आत घेतो.
बट लाइफ गोज ऑन...

व्हेगन जीवन पध्दतीबद्दल पाच सहा वर्षापुर्वी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यामुळे याबद्दल थोडीफार माहिती होती. आता या धाग्यावर विस्तृत चर्चा झाली तर वाचायला आवडेल.

सातीने आणि लिंबुकाकांनी उपस्थित केलेले मुद्दे आवडले. सचिन काळेंनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल उत्सुकता आहे.

ama, tumachya awantatavishayi addyawar lihit ahe.
awantar discussion we can continue there.

व्हेगनपेक्षा सहज जीवनशैली ही काळाची गरज आहे.
व्हेगन जीवनशैलीत रोजच्या आहारात घ्यावे लागणारे पदार्थ स्थानिक पातळीवर बनतात, ताजे मिळतात असे नाही. इथे 'स्थानिक' व 'ताजे' या शब्दांचा कीस काढता येऊ शकेल. परंतु जे पदार्थ चटकन भाजीवाला, किराणा सामान विक्रेता, दूध किंवा अन्य खाद्यपार्थ विक्रेता यांकडे मिळतात, मिळू शकतात, किंवा थेट मळा/ शेत / डेअरी / उत्पादन केंद्रातून आपल्यापर्यंत घरपोच येऊ शकतात असे, हे मला म्हणायचे आहे. मेट्रो शहरांमधे मिळूही शकेल असे, परंतु जरा उपनगरात गेलात किंवा लहान शहरांत, तर अडचण होऊ शकते.
खास करून नोकरी व्यवसायाचे निमित्ताने सतत प्रवास करणाऱ्यांना या जीवनशैलीला अंगीकारणे अवघड ठरू शकते किंवा मग काही प्रकारच्या जीवनसत्वांना, पोषणमूल्यांना आहाराद्वारे घेणे कठीण होते. सगळीकडे व्हेगन पर्याय उपलब्ध नसतात हे वास्तव आहे. आहारपूरकांद्वारे कमतरता भरून काढली जाऊ शकते परंतु ते तसे करावे का, हा पुन्हा वेगळा मुद्दा झाला.
आहाराखेरीज इतर जीवनशैलीही व्हेगन असलेले अनेक लोक माझ्या पाहाण्यात आहेत. परंतु स्पष्ट शब्दांत सांगायचे तर भारतात त्यांचा आर्थिक स्तर हा उच्चदर्जाचा समजला जाणारा आहे व बाकीची जीवनशैलीही तशीच आहे. त्यांना आपल्या घरच्या खास प्रजातीच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्युच्च दर्जाचे, खास आयात केलेले व अतिशय महाग खाद्यही सहज परवडते. ते स्वत:साठीही उत्तम ब्रँड्सचे अत्युत्तम व्हेगन समजले जाणारे खाद्यप्रकार, वस्त्रप्रावरणे, इतर अक्सेसरीज् बाहेरून मागवतात, आयात करतात किंवा देशातून महाग किमतीला विकत घेतात. अशी जीवनशैली सर्वांनाच शक्य नाही. संपन्न स्थितीतील काही परिवार व्हेगन असतीलही, परंतु सर्वच ठिकाणी ही जीवनशैली पाळणे त्यांना शक्य होत नाही.

Pages