"राजकारणावर बोलू काही..!"

Submitted by अँड. हरिदास on 18 December, 2017 - 01:45

(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल. आकड्यांच्या राजकारणात भेलही आज काँग्रेस हरली असेल. पण या अपयशातही राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. पुढील राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना देशाला बघायला मिळणार आहे. काहीही असो, ज्या राहुल गांधींना त्यांच्या देहबोलीवरून त्यांचेच सहकारी स्वीकारायला मागेपुढे पाहत होते. त्याच राहुल गांधींना आज त्यांच्या विरोधकांनी 'सक्षम विरोधक' म्हणून स्वीकारले, ही खरी गुजरात निवडणुकीची काँग्रेस साठी उपलब्धी.. शिवाय काँग्रेसच्या गुजरातमध्ये वाढलेल्या जागाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरतील. त्यामुळे गुजरात निकालाने आगामी काँग्रेस नेतृतवाचाही निकाल दिला.. असं म्हणावे लागेल..!

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. वैयक्तिक निवडणूक जिंकली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा नेतृत्वाचा'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती असली तरी भाजपाला मिळालेला कौल हा कण्हत कुंथत मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही कमकुवत समजून चालणार नाही. कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!

टिप- प्रांसगिक विश्लेषण आहे.. परिस्थिति बदलू शकते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!
<<

कैच्याकै.
मुळात गेल्यावेळे पेक्षा ज्या काय ८-१० जागा कॉंग्रेसला वाढीव मिळालेल्या दिसत आहेत त्या अल्पेश, जिग्नेश व हार्दीक यांच्या जातीयवादी राजकारणामुळे. राहुल गांधी आधी ही मठ्ठ होता व आताही मठ्ठच आहे.

मुळात कोणत्याही निवडणूकीत भाजपाला विकासाच्या नावावर रोखुच शकत नाही, भाजपाला फक्त व फक्त जातीयवादी राजकारण, आरक्षण असले मुद्दे घेऊनच रोखू शकतो हाच संदेश बिहार व गुजरात निवडणुकीने दिला आहे. आता विरोधकांकडे(?) जातीयवादी राजकारण करण्या व्यतिरिक्त दूसरा कोणताही पर्याय उरणार नाही.

अनिरुद्ध, शेवटच्या १० दिवसात प्रदान सेवकांच्या भाषणात काय मुद्दे होते ते जरा आठवणार का?
किती वेळा विकास आला? आणि किती वेळा पाकिस्तान , मुसलमान मुख्य्पंत्री होइल इत्यादी मुद्दे आले होते?

मुळात जेंव्हा अल्पेश, जिग्नेश व हार्दीक या जातीयवादी तिकडीची मदत कॉंग्रेसने घेतली त्या नंतर विकासाचा मुद्दा निवडणुक प्रचारात आणायची भाजपाला गरजच उरली नाही. एकिकडे कॉंग्रेस जातीयवादी प्रचार निवडणुकीत असताना, दूसरीकडे श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करायची अपेक्षा कश्याला ? शिवाय गेल्या २२ वर्षाचा विकास गुजराती मतदारांना दिसत असताना वेगळा प्रचार करायची गरजच काय !

शिवाय गेल्या २२ वर्षाचा विकास गुजराती मतदारांना दिसत असताना वेगळा प्रचार करायची गरजच काय !<<

>> वेगळा प्रचार करायची गरज नव्हती तर पाकिस्थान चा मुद्दा का बाहेर आला.. तथाकथित बैठकी वरुण पंतप्रधान यानी केलले वक्तव्य आणि त्यावर पाक ची आलेली प्रतिक्रया सर्वाना माहीत आहे.. भाजपा विजयी झाला आहे.. भाजपच्या रणनीतिचे कौतुक करावेच लागेल.. परंतु विपरीत परिस्थित कांग्रेस नेही अस्तित्व राखल हे त्या जोडिने मान्य केल पाहिजे..

परंतु विपरीत परिस्थित कांग्रेस नेही अस्तित्व राखल हे त्या जोडिने मान्य केल पाहिजे..

<<

अजिबात अस्तित्व राखले नाही कॉंग्रेसने. उलट अल्पेश, जिग्नेश व हार्दीक या जातीयवादी तिकडीची मदत घेऊन कॉंग्रेजने हे सिद्ध केलेय, की निवडणुकीत जाती-पातीचे राजकारण आणल्याशिवाय निवडणुक लढवलीच/जिंकलीच जाऊ शकत नाही.

अनिरुद्ध जी
७५ जागा.. किमान सक्षम विरोधी पक्ष म्हणुन तर स्विकारावेच लागेल कांग्रेस ला.. लोकसभा आणि यूपी पेक्षा हा निकाल वेगळा म्हणावा लागेल.. आणि निवडणुकीतील मुद्दे म्हणाल तर यात कुनीच धुतल्या तांदळाचे नाहीत.. प्रचाराची पातळी दोन्ही बाजूने खालवली गेली होती.

५८-52

वकील साहेब. लिडींग नंबर फॉलो करु नका. अ‍ॅक्चुअल विनिंग सीट्स बघा.<<
>> हो राव मी लीडिंग सीट्स फॉलो करत होतो..

अल्पेश ठाकूर + जिग्नेश मेवाणी + हार्दिक पटेल + राहुल गांधी =
काँग्रेस विजयी = 79
११ मुख्यमंत्री + १ प्रधान मंत्री + निवडणूक आयोग + ईव्हीएम मशीन = भाजप विजयी = 99
तरीबी अभिनंदन रे तुम्हाला !!!
लढाई तो अब शुरू हो गई हैं
फिरभि हारकर जितने वाले को बाज़ीगर कहते है
राहुल तू जिंकलायस..!☺☺

<मुळात कोणत्याही निवडणूकीत भाजपाला विकासाच्या नावावर रोखुच शकत नाही>
हे कैच्च्या कैच आहे राव.
भाजपला उलट विकासाच्याच मुद्द्यावर सर्वाधिक घेरण्याची संधी कोंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना आलेली आहे ,रोजगारनिर्मिती, शिक्षण(प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक) आणि आरोग्य या क्षेत्रात कोणत्या मोठ्या सुधारणा झाल्या आहेत? कसला विकास दिसतोय या क्षेत्रात?
काँग्रेसने हे तीन मुद्दे उचलले तरी जनमत १००% त्यांच्या बाजूने फिरेल अशी परिस्थिती आहे. भाजपला मत दिलेल्यांना आता प्रसेंच्या विकास सोदून गाय, राम मंदीर, पाकिस्तान असल्या जुमल्यांचा कंटाळा आलाय.

काँग्रेसने हे तीन मुद्दे उचलले तरी जनमत १००% त्यांच्या बाजूने फिरेल अशी परिस्थिती आहे. <<
>>अशीच परिस्थिती होती गुजरात मधे पण कांग्रेस ला बहुमत मिळाले नाही.. अर्थात शेवटच्या टप्प्यात प्रचार 'विकास' एवजी भलतिकडेच भरकटला.

मला वाटतं गुजराती वोटर्स भाजप गवर्मेंट वर खुश नाहीत पण त्यांना काँग्रेस बद्दल ही फार काही शाश्वती वाटत नाही...

सत्ताधारी पक्षाच्या कामावर टीका करणे हे जरी विरोधी पक्षाचे काम असले तरी या व्यतिरिक्त लोकांच्या मनात त्यांच्या नेतृत्वा बद्दल खात्री वाटेल आणि त्यांना निवडून दिले तर ते नक्की काय काय कामं करतील - हे लोकांपर्यत पोचणं गरजेचं आहे.

ही भाजप साठी वॉर्निंग बेल आहे आणि राहुलचं कौतुक...
2012 पर्यंत ज्याला मूर्ख म्हणत आलो त्या मुलाने इत पर्यंत किल्ला लढवला...काँग्रेस ने कास्ट चा पत्ता फेकला ह्यात काही शंका नाही...पण राजकारणात oppurtunistic कोण नाही? ह्या वेळेस काँग्रेस ने वेळेवर बरोबर कार्ड्स खेळलेत.
बेटर लेट देन नेव्हर.
मध्ये काही काळ काँग्रेस पॅरालाईज्ड झाल्या सारखे दिसत होते.इट इज गुड कम बॅक.

पण अजून ही मी वर जे पहिले वाक्य म्हंटले ते आहेच.खरं तर त्यांना सध्या खूप स्कोप आहे.त्यांनी फक्त 'criticism criticsm आणि criticism' ह्या पेक्षा जास्त विश्वास जिंकण्या जोगे काही तरी करावे हीच अपेक्षा. शशी थरूर आज इंडिया टुडे वर म्हणालेत कि 2019 च्या निवडणुकी पर्यंत ते negative criticism चा पलीकडील टप्पा गाठतील. बघूया.

ec.jpg

हे आहेत फायनल रिझल्ट्स.
९९ वर भाजपा व मित्रपक्षांना थांबवण्यात यश आलेले आहे.
गुजरातेत.
जिथे अख्ख्या भारताचा विकास करण्यात आला,
जिथे हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून भले मोठे ध्रुवीकरण घडवून आणण्यात आले.

९२ सीट्स लागतात सरकार बनवायला.

म्हणजे बीजेपीचे ८ फोडले, तर पुरे होते. १२-१५ करोडमधे एक आमदार आरामात विकत मिळतो.

पण राहूल हा सभ्य अन मवाळ विचारसरणीचा मुलगा आहे.

इतकी चिखलफेक, इतकं घालून पाडून बोलणं, त्याला अगदी पप्पू, वेडा, बावळट ठरवणं, त्याच्या अख्ख्या खानदानावर गरळ ओकणं.. सगळं सहन करूनही त्याने कधीच सभ्यता सोडलेली नाही. युवराज म्हणुन २००९लाच भारताचा पंप्र होऊ शकला असता तो. पण ते न करता, He really has grown up. तेव्हा तो गोव्यात भाजपाने केलं तसे करेल असे वाटत नाही.

पण त्याने असं करावं असं मनापासून वाटतंय. गुजरातेत १०-१२ आमदार विकत घ्यायला दीड दोनशे करोड फेकून मारण्यासाठी काँग्रेसला कीडुकमिडुक विकावे लागेल अशी परिस्थिती अजीब्बात नाही. Lol

एनीवे.

आता सुरू होईल सूडाचे राजकारण.

कारण १९ सालचे "नतिजे" दिसू लागले आहेत.

गुजराथमधील निकाल व प्रचार पाहून मनात आलेले विचारः

१. एका राज्यातील निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी 'किती वेळ घालवू नये'हे समजले. तसेच, त्यांनी तो वेळ घालवला नसता तर काय झाले असते हेही लक्षात आले.

२. नीच म्हणजे नीच जातीचा हा अर्थ काढून पराचा कावळा करणे किंवा कांगावा करणे जेमतेम उपयोगी ठरले.

३. पाकिस्तानला मधे आणणे निरुपयोगीच नाही तर फालतूही ठरले.

४. राहुल गांधींना स्थानिक नेत्यांचे महत्व समजून घ्यावे हे समजले.

५. राहुल गांधींचे वक्तृत्व सुधारले. प्रतिमाही सुधारली.

६. राहुल गांधी अध्यक्ष बनण्याच्या सुमारास झालेल्या निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी केलेल्या अथक परिश्रमांना बर्‍यापैकी लोकाश्रय लाभला. किंवा, गुजराथ निवडणुकांचे निकाल लागण्याआधीच राहुल गांधींना अध्यक्ष बनवले जाणे ही अगतिक खेळी थोडीफार यशस्वी ठरली.

७. २२ वर्षे एकाच पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात पुन्हा त्याच पक्षाची सत्ता येऊ शकते हे केवळ भाजपच्याच बाबतीत होऊ शकते हे देशाला समजले व स्वीकारण्यातही आले.

८. मोदींसमोर उभा राहील असा एकही नेता सध्या देशात नाही हे वास्तव अधोरेखीत झाले.

इतकी चिखलफेक, इतकं घालून पाडून बोलणं, त्याला अगदी पप्पू, वेडा, बावळट ठरवणं, त्याच्या अख्ख्या खानदानावर गरळ ओकणं.. सगळं सहन करूनही त्याने कधीच सभ्यता सोडलेली नाही. युवराज म्हणुन २००९लाच भारताचा पंप्र होऊ शकला असता तो. पण ते न करता, He really has grown up. तेव्हा तो गोव्यात भाजपाने केलं तसे करेल असे वाटत नाही.<<
>> राहुल गांधी याचं अपयश ही चमकदार आहे.. परंतु आपण म्हटल त्याप्रमाणे गोव्या सारखा प्रयोग गुजरात मधे शक्य होणार नाही.. पैसा कितीही असला तरी सत्ता ची पॉवर महत्वाची असते अशावेळी कांग्रेस ते करणार नाही किंबहुना त्यांना गुजरात मधे तरी हे करने शक्य होणार नाही.

>>>>युवराज म्हणुन २००९लाच भारताचा पंप्र होऊ शकला असता तो. पण ते न करता, He really has grown up. तेव्हा तो गोव्यात भाजपाने केलं तसे करेल असे वाटत नाही.<<<<

Rofl

ही भाजप साठी वॉर्निंग बेल आहे<<
>>सहमत, गुजरात निकालाचे आकडे हेच सुतोवाच करत आहेत.
१९९५ - १२१ जागा
१९९८ - ११७ जागा
२००२ - १२७ जागा
२००७ - ११७ जागा
२०१२ - ११५ जागा
२०१७ - ९९ जागा

ही भाजप साठी वॉर्निंग बेल आहे आणि राहुलचं कौतुक...>> खरंच युवराजांचं कौतूक..पण मला तरी काँग्रेसच्या जागा वाढण्यामधे रागां च्या कौशल्यापेक्षा त्याला पटेलांच्या आरक्षणामुळे तापवलेले वातावरण जास्त कारणीभूत वाटते.
इव्हीएम च्या बाबतीत स्वरूप यांच्या पोस्टीला अनुमेदन. Happy
बाकी हार्दिक चे सध्या तरी राज साहेबांसारखे चालू दिसतंय, सभांना होणारी गर्दी मतांच्या आकडेवारीत दिसत नाहीये. तसाही आरक्षणाचा मुद्दा फक्त गर्दी खेचण्यापुरताच कामी येवू शकतो.

हार्दिक चे सध्या तरी राज साहेबांसारखे चालू दिसतंय, सभांना होणारी गर्दी मतांच्या आकडेवारीत दिसत नाहीये. तसाही आरक्षणाचा मुद्दा फक्त गर्दी खेचण्यापुरताच कामी येवू शकतो.>>

हे मात्र खर आहे आंदोलन किंव्हा एकादा सामाजिक लढा यातील गर्दी मतात परिवर्तित होत नाही, याचा अनुभव पुन्हा एकदा आला.

Pages