"राजकारणावर बोलू काही..!"

Submitted by अँड. हरिदास on 18 December, 2017 - 01:45

(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल. आकड्यांच्या राजकारणात भेलही आज काँग्रेस हरली असेल. पण या अपयशातही राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. पुढील राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना देशाला बघायला मिळणार आहे. काहीही असो, ज्या राहुल गांधींना त्यांच्या देहबोलीवरून त्यांचेच सहकारी स्वीकारायला मागेपुढे पाहत होते. त्याच राहुल गांधींना आज त्यांच्या विरोधकांनी 'सक्षम विरोधक' म्हणून स्वीकारले, ही खरी गुजरात निवडणुकीची काँग्रेस साठी उपलब्धी.. शिवाय काँग्रेसच्या गुजरातमध्ये वाढलेल्या जागाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरतील. त्यामुळे गुजरात निकालाने आगामी काँग्रेस नेतृतवाचाही निकाल दिला.. असं म्हणावे लागेल..!

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. वैयक्तिक निवडणूक जिंकली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा नेतृत्वाचा'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती असली तरी भाजपाला मिळालेला कौल हा कण्हत कुंथत मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही कमकुवत समजून चालणार नाही. कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!

टिप- प्रांसगिक विश्लेषण आहे.. परिस्थिति बदलू शकते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>प.बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राज्य ३३ वर्षे होतं.<<<<

धन्यवाद!

तुमच्याकडे सांगण्यासारखं काही राहावं म्हणूनच प्रतिसाद द्यावेसे वाटतात.

>>राहुल गांधी याचं अपयश ही चमकदार आहे..<<

म्हणजे गिरे तो भी टांगे उप्पर असं म्हणायचं आहे का तुम्हाला? Lol

अँटायइन्कंबसी चा मुद्दा, नोटाबंदि/जीएसटी चा तथाकथित निगेटिव इंपॅक्ट कॅपटलाय्ज करायचा प्रयत्न करुनहि काँग्रेस बहुमत गाठु शकली नाहि यातंच सगळं आलं. काँग्रेसमधल्या डिनेस्टी, अंतर्गत कारभाराला कंटाळुन बाहेर पडलेल्या वाघेला इ. मुळे काय फटका बसला यावर काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं काय म्हणणं आहे? काँग्रेस पक्ष आणि तिच्या समर्थकांची हुजरेगिरी जोवर संपत नाहि तोवर बीजेपीची विजयी घोडदौड चालु राहणार आहे...

गिरे तो भी टांगे उप्पर हे तर भाजपसमर्थकांचं चाल्लय की वो....! Happy

कॉंग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या अश्वमेधाच्या घोड्याला गुजरात काँग्रेसमुक्त करता आलेलं नाहीये तर आता अधिक काँग्रेसयुक्त झालंय. निवडणुक हरले नाहीयेत काँग्रेसवाले, फक्त भाजपपेक्षा जागा कमी आहेत. काँगेसची एकही सीट आली नसती तर इथल्या भाजपसमर्थकांच्या उड्या मारण्याला काहीतरी अर्थ राहिला असता.

आता असं बघा की हे राजकारण आहे, कॉलेजची एन्ट्रन्स नाहीये, कटऑफ वर बंद व्हायला...

निवडणुक हरले नाहीयेत काँग्रेसवाले, फक्त भाजपपेक्षा जागा कमी आहेत<<<<

अच्छा अच्छा

राज्यसभा निवडणुकांत फुटलेल्यांपैकी किती जण भाजपच्या तिकिटावर निवडून आले?

अच्छा अच्छा
>> अगदी अगदी. भाजपचीच चॉकलेटं भाजपला द्यावी म्हटलं... Wink

>>. निवडणुक हरले नाहीयेत काँग्रेसवाले, फक्त भाजपपेक्षा जागा कमी आहेत.<<
पण सत्तेच्या राजकारणात हार्/जीत हि बायनरी असते, नाहि का? आम्हि फक्त वीसेक जागांनी मागे पडलो म्हणुन आमचा सत्तेवर थोडाफार प्रमाणात हक्क आहे - असं नाहि ना म्हणु शकत....

म्हणजे गिरे तो भी टांगे उप्पर असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
अँटायइन्कंबसी चा मुद्दा, नोटाबंदि/जीएसटी चा तथाकथित निगेटिव इंपॅक्ट कॅपटलाय्ज करायचा प्रयत्न करुनहि काँग्रेस बहुमत गाठु शकली नाहि यातंच सगळं आलं. काँग्रेसमधल्या डिनेस्टी, अंतर्गत कारभाराला कंटाळुन बाहेर पडलेल्या वाघेला इ. मुळे काय फटका बसला यावर काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं काय म्हणणं आहे? काँग्रेस पक्ष आणि तिच्या समर्थकांची हुजरेगिरी जोवर संपत नाहि तोवर बीजेपीची विजयी घोडदौड चालु राहणार आहे...<<<

>> गिरे तो भी टांग ऊपर पेक्षा 'गिरे तो भी शान से' अस म्हणन संयुक्तिक राहील.. अमित शाह यांचा १५० चा आकड़ा आठवतो का? कांग्रेस मुक्त भारताची घोषणा..! या सर्व फोल ठरल्या की.. अर्थात भाजपचा विजय झाला आहे... भाजपाची विजयाची रेश मोठीच.. हे कुनीच नाकारत नाही. पण कांग्रेस ची रेश सुद्धा यावेळी वाढली आहे हे मान्य करावे लागेल. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणुन.

आम्हि फक्त वीसेक जागांनी मागे पडलो म्हणुन आमचा सत्तेवर थोडाफार प्रमाणात हक्क आहे - असं नाहि ना म्हणु शकत....<<
>> अस नाही म्हणू शकत.. पण विरोधी पक्ष म्हणुन सत्तेवर अंकुश निष्चित ठेवू शकतील!

ज्यांना लोकशाही राज्यव्यवस्थेची थोडीफारही माहीती असेल ते लोक असे बोलणार नाहीत.....

संत्रा सोलके...

सिचुएशन नंबर वनः
एका जागेसाठी दहा उमेदवार उभे राहिले. त्यातला एक निवडून येतो. त्याला अधिकृत प्रतिनिधी म्हटले जाते. बाकीच्या ९ लोकांना काही आयडेन्टीटी नसते. दे आर फिनिश्ड फॉर दॅट इलेक्शन. डब्बा गुल, घरी जायचं नीट. हरलेल्यांना कोणतीही लिगल ऑथोरिटी नाही.

सिचुएशन नंबर टु
असेम्ब्लीच्या १०० जागांसाठी ४ पक्षांनी आपआपले उमेदवार उभे केले. अनुक्रमे ४०, ३०, २०, १० असे चारही पक्षाचे निवडून आले. सत्तास्थापनेचा अधिकार ४० वाल्याला मिळाला. तरी इतर ६० जणांनाही कारभारात बोलायचा अधिकार आहे. असेम्बली १०० लोकांच्या मताने चालते. केवळ ४० च्या नाही. असेम्ब्लीतून वेगवेगळ्या समित्यांसाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्ष अशा दोन्ही बाजूंकडून प्रतिनिधी घेतलेले असतात. १० प्रतिनिधी असलेल्या पक्षालाही आपले म्हणणे मांडण्याचा आणि आपली कामे करवून घेण्याचा पूर्ण घटनादत्त अधिकार असतो. केवळ १० आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कधीच कमी होत नसते. हे गेल्या कैक वर्षांत बघितले असेलच.

---------------------------------------
और मसाला मारके....
तर 'दिल बहलाने के लिये खयाल अच्छा है' च्या मूडमध्ये भाजपसमर्थक सिचुएशन नंबर टू ला सिचुएशन नंबर वन समजत आहेत. तेव्हा हर्षातिरेकाच्या भरात कोणाची धाव कुठवर आहे हे पुरेसे स्पष्ट होत आहे.

,,,,,,,,,'१५० च्या बाता मारणार्‍यांना १००चा आकडाही गाठता आला नाहीये' ह्या सत्यापासून पळण्यासाठी परत एकदा काँग्रेसच्या परफॉर्मन्सचाच सहारा घ्यावा लागतोय हे मनोरंजक आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

आणखी एक सत्य..

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी ‘नोटा’ला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमध्ये ५ लाखांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून यापैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत नोंदवले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाजाला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा अधिक पसंती ‘नोटा’ला मिळाली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ लाख ८३ हजार ८३४ मते, बहुजन समाज पार्टीला २ लाख ५ हजार ४४७ मते मिळाली आहेत, तर ‘नोटा’ला ५ लाख ४६ हजार २०६ जणांनी पसंती दिली आहे. गुजरातच्या विकासासाठी आम्हालाच निवडा असे सांगणारा भाजपा आणि भाजपाला आम्हीच पर्याय ठरू शकतो असे सांगणा-या काँग्रेससाठी ‘नोटा’ने हे मोठे उत्तरच दिले आहे.(साभार-कॉपी पेस्ट)

>>ज्यांना लोकशाही राज्यव्यवस्थेची थोडीफारही समज असेल ते लोक असे बोलणार नाहीत.....<<

हाहा, हि सारवासारव आहे. निवडणुकांत बहुमत न मिळाल्याने वा घोडेबाजार करुनहि सत्ता काबीज करता न येण्यामुळे होणारं दु:ख काय असतं ते काँग्रेस, राकाँ, बीजेपी नेते चांगल्यारित्या पटवु शकतील...

मी फक्त सत्य मांडलं... सारवासारव तुम्हाला वाटू शकते.

नोटः मी कोणा पक्षाचा समर्थक नाही. इन्डिपेन्डन्ट सिटिझन आहे. माझं भाष्य केवळ सत्य दुर्लक्षीत करुन खिदळणार्‍या उतावीळ भाजपसमर्थकांबद्दल आहे. असाच माज कधीकाळी काँग्रेसलाही होता.

बाकी, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलायला काँग्रेसचे प्रवक्ते आणि समर्थक सक्षम असावेत.

बाकी बाकी, काँग्रेस असो वा भाजप, सगळे आपलेच पक्ष आणि आपलीच माणसे आहेत.

खर म्हणजे कमी झालेल्या जागा या भाजपासाठी इष्टापत्तीच म्हणावी लागेल..... भाजपा या निवडणूक निकालातून घ्यायचा तो धडा नक्कीच घेइल!
पण याचा अर्थ हा राहुल गांधींचा राजकीय उदय आहे वगैरे लावून त्यांचा राज्ज्याभिषेक करायला निघालेले खरच "म हा न" आहेत!

तस तर मग हिमाचल मधल्या पराभवाची जबाबदारी कुणाची?

गुजरातमध्ये असे झाले आता २०१९ मध्ये बघा कसे होतेय म्हणणारे तर केवळ हास्यास्पद आहेत.... निवडणूक वेगळी तसे मुद्दे वेगळे, रणनीती वेगळी हे पण जर कळत नसेल तर बसा पोस्टी पाडत.... आणि आपण इथे मराठी साइटवर मराठीतून जे लिहतो त्याचा गुजरातच्या जनमानसावर प्रभाव पडतो आणि जनमत बदलते अश्यापण भ्रमात असतात काही लोक.... असो!

>>मी कोणा पक्षाचा समर्थक नाही.<<

मी सुद्धा नाहि. पण चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणायचं धाडस बाळगतो; मग तो पक्ष कोणताहि असो. दुर्दैवाने, काँग्रेस तिच्याबाबतीत चांगलं बोलण्याची संधी देत नाहि...

राज .. अमेरिकेत बसून इथे काड्या घालणे बंद केले नाही.?

ट्रम्प कडे लक्ष द्या. एच1 व्हिसा वर नवऱ्याला नोकरी असेल तर बायकोला मिळणार नाही असा काहीसा कायदा केला आहे. तिकडे बघा आणि बोला

दुर्दैवाने, काँग्रेस तिच्याबाबतीत चांगलं बोलण्याची संधी देत नाहि...

>> ह्याला बायस म्हणतात. मी तर असे कधीच भाजपबद्दल किंवा शिवसेनेबद्दल किंवा माझ्या गल्लीतल्या नगरसेवकाबद्दलही म्हणणार नाही. Happy

>>ह्याला बायस म्हणतात.<<

वेल, तुमचं तसं पर्सेप्शन असेल त्या वाक्यावरुन, पण माझं ते निरिक्षण आहे...

८. मोदींसमोर उभा राहील असा एकही नेता सध्या देशात नाही हे वास्तव अधोरेखीत झाले.
नवीन Submitted by बेफ़िकीर on 18 December, 2017 - 18:40
>>
खरं आहे ,अगदी योग्य मुद्दा.कुठल्या सभेत कीती आनि कसे रडावे याचे टायमिंग असलेला एकही नेता विरोधी पक्षात नाही हे वास्तव पुन्हा अधोरेखीत झाले.

इतक्या खालच्या थराला जाणारा मोदी व्यतिरिक्त एकही नेता कुठल्याही पक्षात नाही . या गोष्टीत मोदी एकमेव आहे हे मी मोकळ्या मनाने मान्य करतो गलिच्छ राजकारण करण्यात , नीतिमत्ता न ठेवणे इत्यादी गोंष्टींमध्ये मोदी समोर कोणीही उभे राहू शकत नाही. अमित शाह हे जवळपास जाऊ शकतात
बेफिने अचूक लिहिले आहे

८. मोदींसमोर उभा राहील असा एकही नेता सध्या देशात नाही हे वास्तव अधोरेखीत झाले.>>> अगदी +१११. तरीही भाजपा ला आत्मपरीक्षणाची गरज आहेच... तसेच काँग्रेसींना घराणेशाहीतून बाहेर पडायची.
बाकी, युवराजांचा (सॉरी, आता महाराज नाही का?) विजय असो...

दुर्दैवाने, काँग्रेस तिच्याबाबतीत चांगलं बोलण्याची संधी देत नाहि...<<
>> बी पॉझिटिव..

काँग्रेस चे सिनियर लीडर्स अर्जुन मोधवादीया, शक्तीसिंह गोहिल,सिद्धार्थ पटेल,तुषार चौधरी हरले आणि मुळात काँग्रेस चे नसलेले अलपेश ठाकोर, जिग्नेश मेवानी सारखे तरुण नेतृत्व जिंकले ह्या वरून हा अर्थ काढावा का कि काँग्रेसचा येत्या 2019 निवडणुकांसाठीचा core nucleus सक्षम तरुण नेतृत्वाचा असायला हवा?
किंवा ह्यातून काय बोध घ्यावा?

मोदींसमोर उभा राहील असा एकही नेता सध्या देशात नाही हे वास्तव अधोरेखीत झाले >>> अगदि अगदी. इतक्या खालच्या पातळिला (जातीला नव्हे) जाणारा नेता दुसरा असुच शकत नाहि देशात्

निकाल अपेक्षित होते... प्रचाराच्या पातळीने नवा निच्चान्ग गाठला. कितीही नाही म्हटले तरी भाजपाला जोरदार धक्का बसला आहे असे मला वाटते. तो तसा बसणे नैसर्गिक न्यायाला अनुसरुन होते. तुम्ही सर्व लोकान्ना सर्व काळ मुर्ख नाही बनवू शकत. निव्वळ पोकळ आश्वासने द्यायचे, प्रचन्ड मोठी दिशाभुल करायची आणि मते मागायचे. असे मार्ग सर्वच पक्ष अनुसरतात पण त्याने केवळ सत्ता मिळवण्यास मदत होते. सत्ता मिळवणे, आणि सत्ता टिकवणे यातला फरक भाजपा थिन्क टॅन्कला कळत असेल. दिलेल्या अनेक आष्वासनान्पैकी काही तरी पुर्ण करा, किव्वा तसा प्रामाणिक प्रयत्न तर करा ? प्रामाणिक प्रयत्न होणार नसतील तर २०१९ मधे शायनिन्ग इन्डिआ भाग दोन ची तयारी ठेवा. २०१९ च्या निवडणुका अत्यन्त चुरशीच्या होतील यात शन्का नाही.

शिंजो अ‍ॅबेंच्या साथीने सुरू झालेला गुजरात निवडणुकीचा प्रचार देशातली पहिली (नसलेली) रो रो सर्व्हिस, अनेक प्रकल्पांची पायाभरणी , उद्घाटनं अशी वळणं घेत सेक्स सीडी नेहरू-सोमनाथ, इंदिरा-रुमाल, राहुल न हिंदू , नीच, पाकिस्तानी सुपारी, मंदिर हवं की मशीद , मला वाटेल तसं बोलतात, गुजरातचा अपमान या गंतव्यार्यंत पोचला. (मध्येच, आप्ला राजा बघा कसा तीन तीन हेलिकॉप्टरर घेऊन फिरत्तो, असं पाहिलेलं का कधी? ही तीन हेलिकॉटर त्याच्याकडे राहायला हवी असतील, तर त्यालाच मत द्या, असं माजी मुमंबाई बोलून गेल्या. मग सीप्लेनची स्टंटबाजी आली. पुढल्या निवडंणुकांतही तो हाच मार्ग अनुसरेल हे उघड आहे. पण कौल मात्र मिळाला, विकासाला.
लोकसभा निवडणुकांत गुजरात मॉडेलच्या विकासाचं चित्र दाखवून निवडून आल्यावर मोदींनी हिंदुत्वाचा अजेंडा राबवला. तेव्हा यांची विकासाची कल्पना नक्की काय आहे ते एक गूढच आहे. गुजरात मॉडेल नक्की काय आहे, याबद्दल कधीही शंका नव्हती. आणि ते देशभर राबवलं जाताना दिसतंच आहे. राबवायची पद्धत मात्र बदललीय. आधी मोठ्ठं ऑपरेशन होतं. आता लहान सहान कट्स देताहेत.

काँग्रेसची गुजरातमधली गेल्या २२ वर्षांतली ही सर्वोत्तम कामगिरी आहे (याची कॉरोलरी लिहायची गरज नाही.
गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसची मतं आणि जागा दोन्ही वाढल्यात. (आपला आवडता पक्ष विजयी होऊनही समर्थकांच्या चिडचिडीचं कारण हेच ना?) तेव्हा कॉंग्रेसमुक्त भारत करण्यासाठी पुढल्या राज्यसभा निवडणुकांत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांचं 'मत''परिवर्तन करायच्या कामगिरीवर मोटा सेट लागलेच असतील.

प्रचाराच्या पातळीने नवा निच्चान्ग गाठला. >> आता सूडाचे राजकारण किती नीचतम पातळीला जाते ते पाहुया

Pages