"राजकारणावर बोलू काही..!"

Submitted by अँड. हरिदास on 18 December, 2017 - 01:45

(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल. आकड्यांच्या राजकारणात भेलही आज काँग्रेस हरली असेल. पण या अपयशातही राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. पुढील राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना देशाला बघायला मिळणार आहे. काहीही असो, ज्या राहुल गांधींना त्यांच्या देहबोलीवरून त्यांचेच सहकारी स्वीकारायला मागेपुढे पाहत होते. त्याच राहुल गांधींना आज त्यांच्या विरोधकांनी 'सक्षम विरोधक' म्हणून स्वीकारले, ही खरी गुजरात निवडणुकीची काँग्रेस साठी उपलब्धी.. शिवाय काँग्रेसच्या गुजरातमध्ये वाढलेल्या जागाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरतील. त्यामुळे गुजरात निकालाने आगामी काँग्रेस नेतृतवाचाही निकाल दिला.. असं म्हणावे लागेल..!

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. वैयक्तिक निवडणूक जिंकली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा नेतृत्वाचा'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती असली तरी भाजपाला मिळालेला कौल हा कण्हत कुंथत मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही कमकुवत समजून चालणार नाही. कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!

टिप- प्रांसगिक विश्लेषण आहे.. परिस्थिति बदलू शकते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिच्युएशन वन, सिच्युएशन टू अशा थिअरीज पराजित पक्ष नेहमीच मांडतात. त्यात नावीन्य नाही. मात्र भाजपला हादरा बसला आहे हे नक्कीच! एक मोठा घटक भाजपच्या विरुद्ध होता तो म्हणजे बावीस वर्षे सरकार त्यांचेच असल्यामुळे विरोधकांवर टीका करायला तर्काधारीत मुद्देच हातात नव्हते. हाच घटक विरोधकांसाठी मात्र पॉझिटिव्ह काम करणारा होता. बावीस वर्षांत काय विकास झाला असेल / नसेल त्याचे सगळे श्रेय / जबाबदारी भाजपचीच होती. ह्या सापळ्यात अडकल्यामुळे 'आम्ही केलेला विकास पुरेसा आहे'हेही म्हणता येत नव्हते आणि 'विकास झालाच नाही'असा दोषही कोणाला देता येत नव्हता. ह्या सापळ्यातून सुटण्यासाठी पत्करता येणारा सोपा मार्ग म्हणजे भावनिक पातळीवर येऊन मते मिळवणे! भाजपने तेच केले. ते करताना कशीबशी सत्ता मिळाली पण प्रतिमा खालावली. ह्या खालावणार्‍या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर आजवर हिणवल्या गेलेल्या राहुल गांधींची प्रतिमा वेगात उजळली. 'भाजप माझ्यावर करत असलेल्या टीकेतून मी निर्माण होत आहे 'अशासारखी विधाने ते करू लागले. मनापासून प्रचार केला. प्रयत्न अपुरे पडले, पण दाद मात्र मिळाली. बाकी त्यांच्या पक्षातील घराणेशाही कायम टिकून राहिली ह्यात नवल नाहीच. जे गुजरातमध्ये झाले ते हिमाचलमध्ये होऊ शकले नाही कारण असलेले सरकार उलथवणे भाजपला सोपे जाते. असलेले सरकार टिकवणे किंवा नसलेली सत्ता मिळवणे हे काँग्रेसला सोपे जात नाही कारण त्यांच्याकडे अजूनही तितके सक्षम नेतृत्व नाही.

"गुजरात मध्ये काँग्रेस निर्विवाद जिंकेल" असे कोणत्यातरी भाजप विरोधकाने इथे मायबोलीबर लिहिलं होतं का ते मी शोधतोय, कुणाला सापडलं तर द्या.

<<जे गुजरातमध्ये झाले ते हिमाचलमध्ये होऊ शकले नाही कारण असलेले सरकार उलथवणे भाजपला सोपे जाते. असलेले सरकार टिकवणे किंवा नसलेली सत्ता मिळवणे हे काँग्रेसला सोपे जात नाही >>
------ अटलबिहारीन्च्या सरकारने (१९९८ - २००३) समाधानकारक काम केले होते, पण पाच वर्षानन्तर ते सरकार भाजपाला टिकवता आले नाही. अगदी अनपेक्षित पराभव झाला, केला गेला.... मनमोहन सिन्ग पन्तप्रधान झाले. पुढे त्यान्च्या नेतृत्वात कॉन्ग्रेस सरकार २००९ च्या निवडणुकीला सामोरे गेली, सत्ता टिकवली...

<<कारण त्यांच्याकडे अजूनही तितके सक्षम नेतृत्व नाही.>>
------ अत्यन्त सक्षम नेतृत्वाकडुन वारन्वार मिळालेली पोकळ आष्वासने, आणि तुलनेने पोकळ नेतृत्वाकडुन मिळालेली सक्षम आष्वासने यात जनता पोकळ नेतृत्वाला निवडेल.

आता सूडाचे राजकारण किती नीचतम पातळीला जाते ते पाहुया >>> त्याची सुरवात झालीच आहे , बर्याच माजी लोकांनी क्ट केला असे भर सभेत बोलुन. त्याचे पुढचे अध्याय आता सुरु होतील. सत्ता टिकवणे आता सोपे राहिले नाहि हि समज मोदी -शाह ना नक्कि आली आहे. आता कोणत्या थराला ते जातील भविष्यात हेच पाहयचे.

बाकी त्यांच्या पक्षातील घराणेशाही कायम टिकून राहिली ह्यात नवल नाहीच >>> ती बीजेपीत नाहि असे वाटते हे नवलच आहे.

भारताच्या जनतेला काय हवे आहे याचा भाजपाच्या थिन्क टॅन्कला पत्ता नसतो. गाय, मन्दिर, धर्म, ताज, दुफळी, पाक, असल्या सामान्यान्ना काडीचा उपयोग नसलेले मुद्दे तयार करुन किती काळ सत्ता मिळवणार, टिकवणार?

भारतीय जनता भावनिक आहे - विशेषता धर्म, पाकिस्तान वगैरे मुद्द्यांवर. त्यामुळे हवे तेव्हा डायव्हर्ट करता येते हळुच पिलू सोडुन कोणत्याहि पक्षाला.

मला एक सांगा
निवडणुकीतल्या जय पराजयाने आपल्याला काही फरक पडणार आहे का?

आम्हा 'सुशिक्षितांच्या' डोंबोलीत आम्ही एक गँगस्टर, आमदार म्हणून एकहाती निवडून दिला आणि त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री केलं.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी डझनभर गुंड आयात केले आणि स्वतःच्याच अखत्यारीतील पोलीस सरंक्षणाखाली त्यांचा प्रचारही केला आणि सर्व सुशिक्षितांनी त्यांना निवडूनही आणले.

आमदारांच्या कृपाछत्राखाली त्यातीलच एक नगरसेवक सध्या डोंबोलीचे 'माननीय भाई' झाले. या माननीय भाईंच्या सुशिक्षित आणि संस्कारी कार्यकत्यांसाठी एक अख्खी इमारत वापरावयास देण्यात आलेली आहे. हि इमारत आणि त्यातील सुप्रसिद्ध संस्कारी कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या पोलीस खात्याला दिसत नाहीत. अगदीच अदृश्य झालेत.

आमच्या विख्यात आमदारांना कार्यकर्त्यांची वाणवा असल्याची जाण असल्याने त्यांनी उल्हासनगरचे संत श्री. पप्पूजी महाराजजी कलानीजी आणि कुटुंबियांनाही आश्रय दिला.

काँग्रेस काळात जे होत, तेच आता भाजप काळातही चालू आहे. काय फरक पडला निवडणुकीतल्या जय पराजयाने!

सूनटून्या, अगदी सुंदर प्रतिसाद,
जय पराजयाने काही फरक पडत नाही, सगळे एक हि थैली के चट्टे बत्ते आहेत.

बिहारचा विदूषक सुशील मोदि ने कालच मोठा जोक केला.
हज वर राम भारी पडला म्हणे.. असे फुटकळ जोक कुजकट आणि हीन वृत्ती असलेला नेता करू शकतो आणि असे नेते भाजपामध्ये मुबलक प्रमाणात आहे .

१९९५ - १२१ जागा (माहीत नाही)
१९९८ - ११७ जागा (माहीत नाही)
२००२ - १२७ जागा (माहीत नाही)
२००७ - ११७ जागा(माहीत नाही)
२०१२ - ११५ जागा (४६% मते मिळाली)
२०१७ - ९९ जागा (४९% मते मिळाली)

आता बोला?

"गुजरात मध्ये काँग्रेस निर्विवाद जिंकेल" असे कोणत्यातरी भाजप विरोधकाने इथे मायबोलीबर लिहिलं होतं का ते मी शोधतोय, कुणाला सापडलं तर द्या.<<

>>गुजरातच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा भाजपचा विजय गृहीतच धरला जात होता. मुद्दा तो किती मोठा असेल आणि काँग्रेस पक्ष कितपत आव्हान देणार हाच प्रश्न होता. त्यांचाही निकाल आता लागला आहे.

भारतीय जनता भावनिक आहे - विशेषता धर्म, पाकिस्तान वगैरे मुद्द्यांवर. त्यामुळे हवे तेव्हा डायव्हर्ट करता येते हळुच पिलू सोडुन कोणत्याहि पक्षाला.<<
>> पण याचा परिणाम काय होतो याचाही विचार झाला पाहिजे.. गुजरात निवडणुकीत पाकिस्तान चा उल्लेख करुण आपण पाक ला बोलन्याची संधी दिली, अस म्हटल्यास वावग ठरनार नाही..

वाचा ही बातमी..
पंतप्रधान मोदींवर अब्दुल्लांचे टीकास्त्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated Dec 19, 2017, 02:40 PM IST

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणूक प्रचारात केलेल्या आरोपानंतर सुरू झालेले वाद शमताना दिसत नाही. भाजपला हरवण्यासाठी पाकिस्तान षडयंत्र करत असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले, ' पंतप्रधान मोदी स्वत: पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात कोणी षडयंत्र रचले होते का? असे म्हणत फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान असे कट रचत नसल्याचे म्हटले. गुजरात निवडणुकी दरम्यान काही लोकांनी असभ्य शब्दांचा वापर केला नसता तर काँग्रेस निवडणूक जिंकली असती असेही फारुख अब्दुल्ला म्हटले.
गुजरात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेकदा पाकिस्तानचा उल्लेख केला होता. त्याशिवाय मणिशंकर अय्यर यांनी आपल्याविरोधात पाकिस्तानला सुपारी दिला असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला होता.

निवडणुकीतल्या जय पराजयाने आपल्याला काही फरक पडणार आहे का?
आम्हा 'सुशिक्षितांच्या' डोंबोलीत आम्ही एक गँगस्टर, आमदार म्हणून एकहाती निवडून दिला आणि त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री केलं.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी डझनभर गुंड आयात केले आणि स्वतःच्याच अखत्यारीतील पोलीस सरंक्षणाखाली त्यांचा प्रचारही केला आणि सर्व सुशिक्षितांनी त्यांना निवडूनही आणले.<<
>>मार्मिक प्रतिसाद आहे..राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा चिंतेचा मुद्दा आहे.पण हे रोखण्याची जबाबदारी आपली म्हणजेच मतदारांची ही आहे. एकादा गुन्हेगारी प्रवृत्तिचा माणूस निवडणुकीत उभा राहिला की त्याला नाकरन्या एवजी वाल्याचा वाल्मिकी’ झाल्याचे समजून त्या व्यक्तीचे पुढारी पण मान्य केल्या जाते.. लोक मतदान करतात.. संबदित व्यक्ति निवडून येतो..पुन्हा आपला धंदा सुरु करतो.. निवडणूक काळात लोक याला गांभीर्याने घेत नाहीत, हे खरे दुर्दैव आहे. राजकारणात आलेली गुन्हेगारी रोखण्याची शक्ति मतदार अर्थात आपल्यात आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुकीत समाजकंटकच नव्हे तर त्यांचे आप्तजन अथवा बगलबच्च्यांना नाकारण्याचा अधिकार आपल्याच हातात आहे. याचा सारासार विचार केल्यास जय आणि पराजयाने बराच फरक पडू शकेल!

ज्या पक्षाच्या अध्यक्षांवर तडीपार, धमकी, अपहरण दंगली चा आरोप आहे त्यांना कुठे नैतिकता ?<<
>> पक्षाच्या पधाधिकार्याना नसली तरी किमान लोकप्रतिनिधी तरी चांगले ठेवता येतील की नाही.

बेफी, मस्त पोस्ट,
२०१४ ला प्रस्थापित काँन्ग्रेसला धुडकावून लावून जनतेने बीजेपीला खूप अपेक्षेने निवडून दिले आहे व त्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते सफल न ठरल्यास पुन्हा एकदा ते काँग्रेस सरकार? Uhoh विचार करुनच काटा येतो...तरिही हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं| राजमाता व महाराजांचा विजय असो!

गेल्या 65 वर्षात असेच अंगावर काटे येऊन शिक्षण नोकरी रोजगार यांचा लाभ घेतला आहे. आता अंगावर बहुतेक पिस किंवा फुले येत असतील.

अत्यन्त सक्षम नेतृत्वाकडुन वारन्वार मिळालेली पोकळ आष्वासने, आणि तुलनेने पोकळ नेतृत्वाकडुन मिळालेली सक्षम आष्वासने यात जनता पोकळ नेतृत्वाला निवडेल.>>>

सक्षम आष्वासने पुरी होतील की नाही हे काँग्रेस 2019 ला निवडून आल्यावरच कळेल.आता मनमोहनसिंग नाहीत तर राहुल राहील.काँग्रेस तेच राहील. पण सक्षम आष्वासने असतील तरी काय किंवा आहेत तरी काय? ते तरी काँग्रेस ने नीट कळू द्यावे 2019 आधी.

माझ्या आधीच्या प्रतिसादात गुजरातेतल्या निवडणुका हिमाचल नंतर एक महिन्यानी जाहीर केल्या. तोवर जमतील तेवढी उद्घाटनं, पायाभरण्या केल्या , हे लिहायचं राहिलं. शिवाय काँग्रेसमध्ये फाटफूट केली (ती काँग्रेसच्या पथ्यावरच पडली हे लिहायचं राहिलं.

अजब, ज्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या त्यांच्या करताहेत पूर्ण.>>> खरंय भरतजी, पण यांना कळायला पाहिजे की हे जे सत्तेवर आहेत ते फक्त त्यांच्या काही भक्तांमुळे नाहीत तर आधीच्या घोटाळेबाज सरकारला कंटाळलेल्या बहुसंख्य लोकांना एक आशेचा किरण दिसत होता म्हणून. परंतू हे वेळीच सुधारले नाहीत तर यांचेही उच्चाटन दूर नाही. आणि तसे झाल्यास चांगला पर्याय मला तरी दिसत नाही. बाकी भक्तांची भक्ती त्यांच्यापाशी, पण केजरी, रागां, बारामतीकर, ठाकरे, समाजवादी, ममता, माया, लालू वगैरे लोकांमधून लोकांनी भाजपा पर्याय निवडलाय...पण हे सध्या तरी आपल्याला कोणी खुर्चीवरुन हलवू शकत नाहीत याच भ्रमात दिसतायेत. बाकी, एक थाली के चट्टे बट्टे हे मात्र खरंय. Happy

गेल्या 65 वर्षात असेच अंगावर काटे येऊन शिक्षण नोकरी रोजगार यांचा लाभ घेतला आहे. >> हा युक्तीवाद तर नेहमीच केला जातो. भक्तांच्या तोंडावर मारायला मस्त चपखल आहे हा. आधीच्या सरकारांनी आत्तापर्यंत काहीच केले नाही हे कोणीच (म्हणजे अभक्त Wink ) म्हणत नाहीत. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यापासून ते भारताला आर्थिक सक्षमतेकडे घेवून जाण्यात असलेल्या योगदानाला (योग्यायोग्य निर्णयांसकट) कोणच नाकारु शकत नाही. परंतू पूर्वजांच्या पुण्याईवर किती दिवस रहायचे? त्यांची काहीच चूक नसताना व सर्व आलबेल असतानाही फक्त दुर्दैवाने त्यांची सत्ता २०१४ मधे गेली असं मानायचं का?

२०१४ मध्ये सत्ता कशी गेली हे आता पुरेसे उघड झालंय. जी मिडिया २४बाय७ सतत खोट्यानाट्या गोष्टी बढाचढाके बोलत होती, ती आता २०१४ पासून कशी गप भिजल्या मांजरासारखी सरकारविरुद्ध एक शब्दही बोलत नाहीये त्यावरुन दिसत आहेच. इतकेच काय तर अधिकृत सुपारी घेतल्यासारखी भाजप आरती सुरु असते. अण्णामोर्चा, निर्भयाकांडाला दिलेली हवा... आणि तत्सम सगळे आंदोलन जरा खोलात जाऊन सगळ्या लिंका लावल्या तर काँग्रेसला बदनाम करुन सत्तेवरुन खाली खेचण्याचा मोठा प्लान होता जो २०११ पासून विधिवत सुरु झाला होता. दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था कुठल्या कुठे घेऊन गेलेल्या, कित्येक करोड लोकांचे उत्पन्न वाढवलेल्या सरकारबद्दल संगनमताने असंतोष वाढवत नेऊन सत्ताबदल घडवला गेला. ज्याने सुखात आणलं त्यालाच कृतघ्नपणे लाथा मारल्या. आणि आता हेही ऐकून घ्यायचं की काँग्रेसचं सरकार आलं तर अंगावर काटे येतील. जस्ट वॉव! अंबानी, अदाणी, बाबारामदेव सारख्यांच्याच संपत्ती दिन दुगनी रात चौगुनी वृद्धी करत आहेत आणि सामान्य माणसांचे धंदे बसलेत हे उघड्या डोळ्याने दिसतंय. हे पण जस्ट वॉव आहे.

हे मी भाजपविरोधक किंवा काँग्रेसमर्थक म्हणून बोलत नाहीये तर एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मोदींचा जयजयकार कर्ण्यात आणि काँग्रेसला शिव्या देण्यात मीही आघाडीवर होतो. नंतर वर्षभरात डोळे उघडले, अक्कल आली... बाकी कट्टर भाजप्यांचे जे अजेंडे आहेत त्याला अनुसरुन ते वागणारच. ते मनसुबे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरे केले जातायत याची भयंकर चीड आहे. आणखी चीड याची आहे की "तुम्हाला चु* बनवले" हे खुलेआम तोंडावर कबूल करुन वर "यात काय चुकीचे आहे?" असं मुजोरपणे म्हणायला कमी करत नाहीयेत हेही गेल्या तीन वर्षात दिसलेच.

<त्यांची काहीच चूक नसताना व सर्व आलबेल असतानाही फक्त दुर्दैवाने त्यांची सत्ता २०१४ मधे गेली असं मानायचं का?
>
असं कोणी म्हणत असेल असं वाटत नाही. पण जे देऊ असं तुम्हाला सांगितलेलं त्यापेक्षा वेगळंच काही तुमच्या गळ्यात घातलंय हे कळलं तरी बास.

यावेळी सुरुवातीला असं वाटलं की कोणीही जिंकलं तरी काय फरक पडतो! राजकारण बोअर वाटतं हल्ली.
भाजपने जे केलं ते त्यांचं नेहमीचं राजकारण म्हणून सोडून देता येईल. पण काँग्रेसने कमाल केली. NOt just any hindu but a janeudhari hindu हे सरळसरळ casteist statement आहे.
हार्दिक पटेल बद्दल गुगल केलं. या बाबाला का आरक्षण हवं आहे? तर आम्हाला ८०-९० टक्के मिळाले तरी इतरांना आरक्षण आहे म्हणून ओपनच्या लोकांना सीट मिळत नाहीत म्हणून एकतर ओपनवाल्याना आरक्षण द्या अन्यथा सर्वांचं आरक्षण रद्द करा असं तो म्हणतोय..
आमच्याबर अन्याय झाला म्हणून आरक्षण द्या असं तो म्हणत नाही तर आरक्षण हाच एक अन्याय आहे म्हणून ते उडवा अन्यथा आम्हालाही द्या असं तो म्हणतो.
या कारणासाठी आरक्षण देणं काँग्रेसला मान्य आहे? आणि कोर्टाने जर हे फेटाळलं तर मग काय दुसरी मागणी मान्य करून सर्वच आरक्षण रद्द करणार आहे काँग्रेस?

२०१४ मध्ये सत्ता कशी गेली हे आता पुरेसे उघड झालंय. जी मिडिया २४बाय७ सतत खोट्यानाट्या गोष्टी बढाचढाके बोलत होती, ती आता २०१४ पासून कशी गप भिजल्या मांजरासारखी सरकारविरुद्ध एक शब्दही बोलत नाहीये त्यावरुन दिसत आहेच. इतकेच काय तर अधिकृत सुपारी घेतल्यासारखी भाजप आरती सुरु असते. अण्णामोर्चा, निर्भयाकांडाला दिलेली हवा... आणि तत्सम सगळे आंदोलन जरा खोलात जाऊन सगळ्या लिंका लावल्या तर काँग्रेसला बदनाम करुन सत्तेवरुन खाली खेचण्याचा मोठा प्लान होता जो २०११ पासून विधिवत सुरु झाला होता. दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था कुठल्या कुठे घेऊन गेलेल्या, कित्येक करोड लोकांचे उत्पन्न वाढवलेल्या सरकारबद्दल संगनमताने असंतोष वाढवत नेऊन सत्ताबदल घडवला गेला. ज्याने सुखात आणलं त्यालाच कृतघ्नपणे लाथा मारल्या. आणि आता हेही ऐकून घ्यायचं की काँग्रेसचं सरकार आलं तर अंगावर काटे येतील. जस्ट वॉव! अंबानी, अदाणी, बाबारामदेव सारख्यांच्याच संपत्ती दिन दुगनी रात चौगुनी वृद्धी करत आहेत आणि सामान्य माणसांचे धंदे बसलेत हे उघड्या डोळ्याने दिसतंय. हे पण जस्ट वॉव आहे.
हे मी भाजपविरोधक किंवा काँग्रेसमर्थक म्हणून बोलत नाहीये तर एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मोदींचा जयजयकार कर्ण्यात आणि काँग्रेसला शिव्या देण्यात मीही आघाडीवर होतो. नंतर वर्षभरात डोळे उघडले, अक्कल आली... बाकी कट्टर भाजप्यांचे जे अजेंडे आहेत त्याला अनुसरुन ते वागणारच. ते मनसुबे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरे केले जातायत याची भयंकर चीड आहे. आणखी चीड याची आहे की "तुम्हाला चु* बनवले" हे खुलेआम तोंडावर कबूल करुन वर "यात काय चुकीचे आहे?" असं मुजोरपणे म्हणायला कमी करत नाहीयेत हेही गेल्या तीन वर्षात दिसलेच.<<

>> वस्तुनिष्ठ विश्लेषण.. हा एकच शब्द माझ्याकडे आहे..आपला प्रत्येक मुद्दा नुसता पटन्यासरखा नाही तर यावर स्वतंत्र धागा होऊ शकतो.. अण्णा हजारे यांचे लोकपाल मी सुरवातीलाच मांडले आहे.. रामदेव बाबा चे "अर्थकारण" सर्वश्रुत आहे..सत्ता बदल घडवनियासाठी हे षड्यंत्र होते अस समजन्यास आता तरी काही हरकत नाहो..कांग्रेस च्या अनागोंदी ला कंटाळलेल्या जनतेने... अर्थात अनागोंदी अगदी प्रखरपने मांडल्या गेली... भाजपा चा पर्याय स्वीकारला पण आता सगळे 'एकाच माळेचे मनी ' असल्याची भावना दृढ़ होऊ लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार यावे अस मनापासून वाटत होते.. कारण सगळ्यांप्रमाणे आम्हालाही बदल हवा होता.. अर्थात हा बदल किती पचनी पडला याच वेगळ विश्लेषण करावे लागेल..परंतु एक मात्र नक्की गेल्या साढे तिन वर्षात अन्ना हजारे यांना लोकपाल असावा असे वाटले नाही.. बाबा रामदेव यांना पाकिस्थान विषयी असूया वाटली नाही..त्यांना देशात काहीच वाईट दिसले नाही..कदाचित आता त्यांचे प्रोड्कट चांगले विकु लागले असतील.. अण्णा हजारे आता पुन्हा आंदोलन कराणर आहेत म्हणे.. यालाही काही राजकीय कांगोरे असतीलच.. त्याच प्रथम विश्लेषण झालाय.. पुढील धागा लवकरच काढ़नार आहे..पण एकंदर परिस्थिति वर एक कविता आठवली.. कुणाची आहे माहीत नाही..पण आहे समर्पक...

कुछ फर्क नही पडता
राज कौरवोका रहे या पांडवोका
जनता तो बेचारी द्रौपदी है।
राज पांडवोका रहा तो दांवपे लगा दी जाएगी,
कौरवोका रहा तो वस्त्ररहीत की जाएगी।।
कुछ फर्क नही पडता
राज रामका रहे या रावणका
जनता तो बेचारी सिता है।
राज रामका रहा तो त्याग दी जाएगी,
रावणका रहा तो भगा ली जाएगी।।
कुछ फर्क नही पडता
राज हिंदूओ का रहे या मुस्लीमोंका,
जनता तो बेचारी लाश है।
राज हिंदूओका रहा तो जला दी जाएगी,
मुस्लीमोंका रहा तो दफना दी जाएगी।।

Pages