"राजकारणावर बोलू काही..!"

Submitted by अँड. हरिदास on 18 December, 2017 - 01:45

(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..)

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल. आकड्यांच्या राजकारणात भेलही आज काँग्रेस हरली असेल. पण या अपयशातही राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. पुढील राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना देशाला बघायला मिळणार आहे. काहीही असो, ज्या राहुल गांधींना त्यांच्या देहबोलीवरून त्यांचेच सहकारी स्वीकारायला मागेपुढे पाहत होते. त्याच राहुल गांधींना आज त्यांच्या विरोधकांनी 'सक्षम विरोधक' म्हणून स्वीकारले, ही खरी गुजरात निवडणुकीची काँग्रेस साठी उपलब्धी.. शिवाय काँग्रेसच्या गुजरातमध्ये वाढलेल्या जागाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरतील. त्यामुळे गुजरात निकालाने आगामी काँग्रेस नेतृतवाचाही निकाल दिला.. असं म्हणावे लागेल..!

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. वैयक्तिक निवडणूक जिंकली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा नेतृत्वाचा'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती असली तरी भाजपाला मिळालेला कौल हा कण्हत कुंथत मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही कमकुवत समजून चालणार नाही. कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!

टिप- प्रांसगिक विश्लेषण आहे.. परिस्थिति बदलू शकते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या कारणासाठी आरक्षण देणं काँग्रेसला मान्य आहे?<<

सिरियस्ली, काँग्रेसने त्यासाठीच हार्दिक पटेलला जवळ केलं असं वाटतं तुम्हाला? दुश्मन का दुश्मन दोस्त होता है हे तत्व वापरुन बीजेपीच्या मताधिक्यावर एक डेंट आणायची खेळी होती ती...

आणि अमित शहांच्या मते ती यशस्वी झालेली आहे. कॉंग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे आमचं मिशन १५० थोडक्यात हुकल़.
आमच्या भाजपनी किती पवित्र, निष्पाप , शुद्ध ,निर्मळ, निरागस प्रचार केला.
खऱ्याची दुनियाच नाही.

भ्यॉं

दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था कुठल्या कुठे घेऊन गेलेल्या, कित्येक करोड लोकांचे उत्पन्न वाढवलेल्या सरकारबद्दल संगनमताने असंतोष वाढवत नेऊन सत्ताबदल घडवला गेला. ज्याने सुखात आणलं त्यालाच कृतघ्नपणे लाथा मारल्या. आणि आता हेही ऐकून घ्यायचं की काँग्रेसचं सरकार आलं तर अंगावर काटे येतील. जस्ट वॉव!>>>रियली? Uhoh हे वाचून गरीब, बिचार्या, महान, प्रामाणिक व निष्कलंक काँग्रेस व मित्रपक्षांवर सर्व समाजाने व मिडीयाने केवढा मोठा षडयंत्र करुन अन्याय केलाय असंच वाटलं. त्यांच्या चुका भजपाच्या पथ्यावर पडल्या व त्या त्यांनी हायलाईट करुन त्याला आपल्या भूलथापांचा मसाला लावून फायदा करुन घेतला असं समजू शकतो पण बाकीचं पामराला नाय पटलं सॉरी. Happy

सिरियस्ली, काँग्रेसने त्यासाठीच हार्दिक पटेलला जवळ केलं असं वाटतं तुम्हाला? दुश्मन का दुश्मन दोस्त होता है हे तत्व वापरुन बीजेपीच्या मताधिक्यावर एक डेंट आणायची खेळी होती ती...

हहम्म तुम्ही म्हणता तसंही असू शकेल.
सोशल मीडियावर काँग्रेसचे उच्चशिक्षित , विचारवन्त समर्थक जे काही 'जातीवादाला विरोध, विज्ञानवाद, आंबेडकर विचार' वगैरे बोलायचे ते मी जरा सिरियसली घेतलं होतं. पण तेच लोक 'नॉट जस्ट हिंदू बट जनेउधारी' सारखी supremacist स्टेटमेंट मिरवतात, त्यांचा नेता अचानक देवळात जाऊन व्रतवैकल्य करू लागतो , 'either free the nation from reservation or make everyone its slave' म्हणणारा हार्दिक त्यांचा नेता होतो हे सर्व पाहून जरा धक्का बसलाय.
आणि हे असं करून आपण जिंकू असं यांना वाटत होतं?
कठीण आहे.
एनिवेज, बीजेपीचे दुष्मन बरेच आहेत. त्यामुळे आता काँग्रेसची पुढची घोषणा 'separate but equal' 'लाल सलाम' ते 'सौंगन्ध राम की खाएंगे' या रेंजमध्ये काहीही असू शकते.

मंदिर मस्जिद , खिलजी , सीडी वगैरे चे धार्मिक जातीय राजकारण करून गलिच्छ हीन व निचतम पातळीवर उतरणार्या भाजपच्या कथित भक्तांनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांची बरगळ कशी बंद होईल याकडे लक्ष दिले तर बरं होईल.

काँग्रेस ने हिंदू कार्ड काय खेळले भाजपची नुसती जळजळ बरनोल चळवळ सुरू झाली . तो घाव भाजप व भक्तांच्या वर्मी बसलेला दिसतोय. Wink जिथे जिथे मंदिरं मध्ये गेले तिथे काँग्रेस प्रचंड मतांनी जिंकली आहे. त्यामुळे भाजपाचा हा ट्रम्प कार्ड काँग्रेस ने हिरावून घेतल्याने त्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नाही.
तळटीप :- मोदींच्या घरात भाजप हारल्याने भाजप चे तोंड काळे झाले आहे. उत्तरप्रदेश मध्ये अमेठीच्या नगर निगमचे निकाल दाखवून रान उठवणारी विकलेली मीडिया मात्र यावर चूप बसली आहे..

थोडेसे अवांतर

मी काय म्हणतो ओपन केटेगरी साठी 5 टक्के रीजर्वेशन ठेवा ( तितकेही खुप होईल) बाकीचे इतराना वाटून घेऊ दया. देशाचे कल्याण डोम्बीवली काय ते होईल Wink

आज जे ईव्हीएम प्रणालीविशयि जो सम्शय दाखवत आहेत तोच ते उद्या बॅलेट पद्दतविशयी पन दाखवतील कारन आपन हरल्याचे खापर दुसर्याच्या दोक्यावर मारले की काम सम्पले मग आपन का हरलो याचा विचार करयला नको. याच विचाराने हर्दिक पतेल ने आज निवदणुक आयोगाविशयी बोलतना म्हतले आहे कि ते सान्गतात त्यावर आम्हि का विश्वास थेवावा. ही विचारप्रणाली जो पर्यन्त नेत्यामधे आहे तो पर्यन्त ते सारखे आपल्या अपयशाचे खापर दुसर्यान्च्या माठी मारत राहणार.

त्या ह्यांनी माझी पाकिस्तानला सुपारी दिली, तिथला लष्करी अधिकारी गुजरातचा मुख्यमंत्री ठरवणार, इंदिरा गांधींना गुजरात घाण वाटतो, राहुल गांधी खिल्जीचा वंशज , हिंदूच नाही, असली वक्तव्ये तीही निवडणूकीत करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत मला हार्दिक बरा वाटतो. सभ्य सुशिक्षित सुसंस्कृत , सार्वजनिक जीवनात वावरताना बाळगायच्या संकेतांची चाड आहे म्हणवणार्‍या लोकांना असले नेते चालतात याचं नवलही वाटतं. धर्माच्या, वंशाच्या नावावर द्वेष करणं चांगलं हा संदेश स्वीकार्य असल्याबद्दल अभिनंदन.

मंदिर व्हिजिट्स आणि जानव्याबद्दल आमचं जिथे लिहायचं तिथे लिहून झालंय. राहुल हिंदू नाहीच अशा लेव्हलला यावं लागलं यात बरंच काही आलं.

आणि असली निवडणूक लढवून वर हा कौल विकासालाच मिळालाय ही मल्लिनाथी.

बाकी जिंकलेल्या पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाच्या विजयाऐवजी, हरलेल्या नामशेष होऊ घातलेल्या पक्षाबद्दलच बोलत आहेत, यात बरंच काही आलं.
इथे पराभवासमोर विजय झाकोळलाय.

आज जे ईव्हीएम प्रणालीविशयि जो सम्शय दाखवत आहेत तोच ते उद्या बॅलेट पद्दतविशयी पन दाखवतील <<<

>>ईव्हीएम मशीन किती सुरक्षित हा प्रश्न किंव्हा संशय जेंव्हा व्यक्त केला जातोय तेंव्हा लोकांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी आणि त्यांचा या प्रक्रियेवर विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाने गरजेचे आहे.. विरोधी मानसिकता अशी हेटाळनी करुण संशय अजुन दृढ होऊ न देता ईव्हीएम कसे सुरक्षित आहेत याचा प्रचार केला जावा..

लोक पण कोणाच्या जातीपातीच्या गोष्टी करतायेत. गुजरात्यांच्या, ज्यांचा गरबा पण जातिविशिष्ट असतो. भानुशाल्यांचा एक, लोहानांचा वेगळा, कच्छी दुसरीकडे, आणखी बरेच.

बर, आपलं काही वेगळं, तर ते ही नाही. साला जन्मल्यापासून मरेपर्यंत जातीच्या घेट्टोमध्ये जगायचं आणि राजकीय पक्षांच्या जातीपातीच्या राजकारणावर तोंड फाडायचं.

राजकिय विरोधकांना दुष्मन म्हणायचे संस्कार पातळी दर्शवतात. मोदींपासून सामान्य समर्थकांर्यंत एकच दर्जा.

सनवसारख्यांचे प्रतिसाद म्हणजे नावडतीचे मीठ अळणी, नावडत्या सुनेने अगदी आपल्यासारखाच हुबेहूब स्वयंपाक केला तरी नाक मुरडणारच.

भरत, अगदी दबंग प्रतिसाद. लेखनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद.

सुनटून्या, अचूक विश्लेषण..

सरतेशेवटी आताशी मी या मतावर येतोय की राजकीय पक्षांना समाजसुधारक म्हणून बघणे सोडून दिले पाहिजे. ते फक्त सत्ता मिळवण्यास इच्छुक असलेले स्पर्धक आहेत. जनतेला स्वप्ने विकणे, भुलवणे, इत्यादी प्रकार करुन सत्ता मिळवायची हेच केवळ एक काम.

आंबेडकर, नेहरु, इत्यादी काळ कधीच संपलाय. आता दूध का दूध और पानी का पानी करायचा काळ आहे. यावर अधिक लिहायला लागणार आहे.

सरतेशेवटी आताशी मी या मतावर येतोय की राजकीय पक्षांना समाजसुधारक म्हणून बघणे सोडून दिले पाहिजे. ते फक्त सत्ता मिळवण्यास इच्छुक असलेले स्पर्धक आहेत. जनतेला स्वप्ने विकणे, भुलवणे, इत्यादी प्रकार करुन सत्ता मिळवायची हेच केवळ एक काम. >>>>

बरोबर. शिवाय त्यांचे समर्थक हि केवळ आपला पक्ष जिंकला ह्यातच समाधानी होतात. विशेषता बीजेपी समर्थक.

But the Congress’s problems go well beyond the Modi versus Rahul battle. Can the Congress offer a vision that makes it more attractive to the rising aspirations of urban India (remember, the BJP swept urban Gujarat by a substantial margin)? Can it re-define its stand on secularism beyond temple-hopping in an attempt to avoid being stereotyped as pro-minorities? Can it offer substantive solutions to the structural crisis that bears down on the farmer, on the unemployment epidemic or the plight of SMEs? Is there a ‘nationalistic’ spirit that the Congress offers to challenge the BJP’s monopoly over the ‘India First’ rhetoric? And does the Congress have enough committed foot-soldiers to combat the BJP’s panna pramukhs and party workers on the ground?

In Gujarat, the Congress could get away with asking all the questions because it was the BJP that had to deal with anti-incumbency after a long stint in power. But if it wants to position itself as a national alternative to the BJP, the Congress will have to convince enough Indians that the party under Rahul has little to do with a discredited ancient regime; and is actually seeking to build a more compassionate, inclusive India based on the politics of hope not fear, and that it has a better economic agenda for jobs and growth than the BJP.

https://www.google.co.in/amp/m.hindustantimes.com/columns/were-modi-shah...

राजदीप ह्यांनी अचूक लिहिले आहे...

ह्याच article मध्ये राजदीप ह्यांनी अजून एक नेमका प्रश्ण विचारला आहे...
Can it (congress) re-define its stand on secularism beyond temple-hopping in an attempt to avoid being stereotyped as pro-minorities?

काँग्रेस प्रो मायनॉरिटी आहे म्हणजे नक्की काय? मायनॉरिटीजना कोणते अतिरिक्त लाभ दिलेत?
गांधी मुस्लिम धार्जिणे होते म्हणजे नक्की काय?
दोघांनी मेजॉरिटी = हिंदूंवर कोणता अन्याय केलाय?

<<गांधी मुस्लिम धार्जिणे होते म्हणजे नक्की काय?>>
------- ९/११ ननतर धाकटे बुश म्हणाले होते 'एकतर तुम्ही आमच्यासोबत आहात किव्वा त्यान्च्यासोबत (दहशतवाद्यान्सोबत)', येथे दहशत्वादी कुणाले म्हणायचे ते पण आम्हीच ठरवणार. आता तर बुश पण खुपच मवाळ वाटतात...

गान्धी यान्नी हिन्दूत्ववाद्यान्च्या सुरात सुर मिसळला नाही, त्यान्नी त्यान्चा वेगळा पण परिणामकारक सुर लावला जो मोठ्या अडचणीचा वाटला म्हणुन ते परके म्हणजे मुस्लिम धार्जिणे. त्यान्ना मिस्लिम धार्जिणे म्हणणे, समजणे अज्ञानीपणा आहे.

भरत ,
हे परसेप्शन (perception) आहे. का? ते माहीत नाही. पण ते आहे हे नक्की.राजदीप ते पेरसेप्शन चुकीचे आहे की बरोबर ह्या बद्दल बोलत नसून ते कसे बदलता येईल त्या बद्दल बोलत आहेत.
राहुल देवळात गेला आणि त्याने पूजा केली ही त्याने ते परसेप्शन बद्दलण्याच्या दिशेने घेतलेली स्टेप होती.राजदीप ह्यांना अश्याच आणखीन स्टेप्स अपेक्षित आहेत.म्हणजे नेमके काय करायचे? ह्यावर विचार करावा लागेल...काँग्रेसलाच!

भाजपाचा राजदीप कधी पासून लाडका झाला?
त्याला तर शिव्याशाप भाजपाचे भक्तगण उठता बसता देत होते.

प्रदीपके,
कोण कुणी कडले ह्या भानगडीत पडू नका, जो मुद्दा मांडला आहे त्यावर बोला.तो कुणी मांडला ते महत्वाचे नाहीये.

सध्या मी कुणीकडलीच नाही. भाजप आवडेनासे झाले आहे आणि काँग्रेस बद्दल विश्वास वाटत नाही. पण होप्स किंवा अपेक्षा आहेत.

पॉलिसी ठरवणे यासाठी आपण आपल्यातल्याच काही लोकांना निवडून असेम्ब्लीत पाठवतो. त्या मुद्द्याकडे पाहिलं तर आजचे सगळे राजकीय पक्ष हे इर्रीलिवंट आहेत. कारण जनतेच्या कोणत्याच खर्‍या भावनांचे, गरजांचे प्रतिबिंब ना यांच्या भाषणात दिसत, ना वागण्यात दिसत.

<<पॉलिसी ठरवणे यासाठी आपण आपल्यातल्याच काही लोकांना निवडून असेम्ब्लीत पाठवतो. त्या मुद्द्याकडे पाहिलं तर आजचे सगळे राजकीय पक्ष हे इर्रीलिवंट आहेत. कारण जनतेच्या कोणत्याच खर्‍या भावनांचे, गरजांचे प्रतिबिंब ना यांच्या भाषणात दिसत, ना वागण्यात दिसत.>>

------- सहमत. कुणाला लोकसभेत, राज्यसभेत पाठवायचे हे आपणच ठरवतो. त्याहीपेक्षा त्यान्च्या पॉलिसीज काय असायला हव्यात हे पण आपणच ठरवतो. ज्या पॉलिसीज सहजपणे विकल्या जातिल, किव्वा "थोडे वातावरण तयार करुन" विकल्या जातिल अशाच पॉलिसी ते स्विकारतात. लोकान्नी रिस्पॉन्सच नाही दिला तर पॉलिसीज बासनात जातिल. जनमताची चाचपणीसाठी (पाण्यात दगड टाकुन काय होते ते बघायचे) अनेक मार्ग आहेत.

एन्डीटीव्हीवरच्या बिग फाइटमधले दोन इंटरेस्टिंग मुद्दे
१. गुजरात निवडणुकीत भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला नाही. टुजी. दामादजी इत्यादी काढलं नाही
कारण अ) भाजपवरही भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागलेत (शाह-जय)
ब) जर भ्रष्टाचार्‍यांनी शासन करण्यात ते अपयशी ठरले, तर पुढल्या निवडणुकांत हा मुद्दा अर्थहीन ठरेल. (बोफोर्स प्रकरणावरून मंत्रीमंडळातून आणि कॉग्रेसमधून बाहेर पडलेले विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्या मुद्द्यावर पंतप्रधान झाल्यावर तो कुठे पुरून किंवा गाडून टाकला?)
२. भाजपचे एक नवेच प्रवक्ते दिसले. ते म्हणाले की आम्ही witch hunt करतोय असं लोकांना वाटू नये.
याचा मला लागलेला अर्थ - आतापर्यंत मोदींचं भाजप जे बोलत आलंय त्याच्या उलट करत आलंय. म्हणजे यापुढे witch hunting वाढेल. पण ते भाजपला त्रासदायक ठरणार्‍यांचं. भ्रष्टाचार्‍यांना बहुतेक शुद्ध करून घेता येईल.
सुखराम सुस्थळी पडलेच आहेत.

गुजरात निवडणुकीत भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला नाही.

कर्नाटकातही उचलणार नाहीत. तिथे तर पक्षाचा चेहरा म्हणून दस्तुरखुद्द यडियुरप्पा आहेत. "टिपु भक्त विरुद्ध हनुमान भक्त" वगैरे सुरु झाले आहे.

Pages