वैद्यकीय 'मेवा'!

Submitted by अँड. हरिदास on 8 December, 2017 - 07:08

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!doctor-new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारीकरण वैद्यकीय क्षेत्रात येणारच .सेवाभाव वगैरे पुस्तकी गप्पा आहेत.ते पुर्वीचे स्वतः गरीबी पाहीलेले डॉक्टर होते म्हणून सेवाभाव असेल त्यांच्याकडे.आज एमाराय मशीन तीन कोटींना मिळते ,एमडी एमएस व्हायचे असेल तर किमान एक कोट तयार ठेवायला लागतात.डॉक्टर होताना नाडले गेल्याने आजकालचे डॉक्टर पेशंटला नाडतात, यात कुणाला दोष द्यायचा??

हे दुष्टचक्र आहे. समाजातली ढोंगी प्रतिष्ठा वाढते आहे. डॅाक्टरांस का धरता?
मुली नको हे कोणी ठरवले?
महागडी ट्रीटमेंट घेतो हे सांगण्याची फुशारकी कोणी शिकवली?

रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे >>>> खरच की काय? मला माहिती आहे बोरिवली तील असे सेंटर. मी तक्रार पण केलेली. पण काहिच उपयोग नाही झाला.

डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. <<हा प्रघात बदलायला हवा. डॉक्टर हा माणूसच आहे. ते प्रशिक्षित व्यावसायिक (skilled professionals) आहेत. वैद्यकिय व्यवसाय हा ग्राहक संरक्षण कायद्यांर्तगत येतोच.
आज वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश घेण्याकरिता जी चढाओढ आहे ती काही सर्वोत्तम समाजसुधारक होण्याकरीता नाही हे आपण सर्व जाणतो. वैद्यकिय व्यवसाय हा मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असल्याने वैद्यकिय व्यावसायिक आणि रुग्णांचे नातेवाईक या दोन्ही बाजूंनी जबाबदारीने अपप्रवृत्तींशी सामना केला पाहीजे. उगीच सब घोडे बारा टक्का म्हणण्यात अर्थ नाही.

आज एमाराय मशीन तीन कोटींना मिळते ,एमडी एमएस व्हायचे असेल तर किमान एक कोट तयार ठेवायला लागतात.डॉक्टर होताना नाडले गेल्याने

>> जबरदस्ती आहे का? कोणी डोक्यावर बंदूक लावतं का? लावा मग पहिल्याच टेस्ट ला तीन कोटीचे बील...? किंवा ज्या महिन्याचे जे काय इएमआय अमाउंट असेल तितकी प्रत्येक केसला बीलं लावायची. काय हरकत आहे?

मागेही एका डॉक्टरच्या लेखात हेच वाचलं की अमूक मशिन तमुक खर्च असतात वगैरे. ते काढायला अर्थातच कटप्रॅक्टिस, अनावश्यक चाचण्या वगैरे करणे क्रमप्राप्त आहेच. म्हणजे महिन्याचा खर्च दोन लाख असेल तर किमान दोन लाख निघतील इतके तरी उपद्व्याप करायला लागतात, मग त्यात योग्य-अयोग्य, नैतिक अनैतिक काही धरलं जात नाही. पैशाचं सोंग आणता येत नाही. हे सगळं स्पष्ट आहे ना? कुणी करायला सांगितले हे धंदे? लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन तुमच्या एमआराय मशीनचे हप्ते भरायला हकनाक चाचण्या करायला लावून पैसे उकळणे म्हणजे व्हाईट कॉलर रॉबरी आहे. वरुन सगळेच करतात म्हणून आम्हीही करतो त्यात काय चुकीचे असे मुजोरपणे बोलुन दाखवायचे. माझ्यामते हे जास्त डेंजरस आहे.

धंदाही करायचा, मुजोरीही करायची, वरुन सेवाभावाचे नाटकही करायचे, इतके करुन लोकांनी आम्हाला मान द्यावा, सम्जून घ्यावे जाब विचारु नये हेही अपेक्षित... ये जरा ज्यादा होरेला है....

सरतेशेवटी सगळेच असे नसतत, फार थोडे असतात चे पालुपद आहे. जितक्या तक्रारी येत आहेत ते बघता फार थोडेच चांगले असतात असे म्हणायला हवे.

मूळ लेखही नीट वाचलेला नाही, वरवर पाहिला. नीट वाचून नंतर लिहितोच.

सध्या एक विनंती.

आपण अ‍ॅडव्होकेट उर्फ वकील आहात असे दिसते. प्रॅक्टीस करता किंवा कसे ते ठाऊक नाही. पण, माबोवर युजरनेम (वापरायचे नांव) एडीट (संपादित) करायची सोय आहे.

ते अँड. बदलून अ‍ॅड कराल का, प्लीज?

वकिलसाहेब, एका चांगल्या (दुखर्‍या) विषयाला वाचा फोडलीत याबद्दल अभिनंदन. तुम्ही माबोवर आता फेमस होणार... Happy

अरेच्च्या!
हे राज नावाचं अजून आहे का माबोवर?
मला वाटलं होतं की अक्कल काढलावर हेडमास्तर कावत्यात.
असोच.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो.

<<

बरं.

कोणत्या कुप्रवृत्तींबद्दल बोलूया आपण?

१. "पाडलेली" पोटं साफ करून ते पडलेलं कुत्र्यांना खाऊ घालणारा एक मुंढे नामक डॉक्टर लय फेमस होता मध्यंतरी.

समाज, कोर्ट, पोलिस, पत्रकार, अन तुम्ही वकील, या सगळ्यांनी मिळून त्याचं काय अन कसं उपटलं, याची काही कथा ठाऊक आहे का? कुठे काही बातमी वगैरे? कित्ती कठोर शिक्षा झाली या नराधमाला?

२. एक कुणीतरी अनक्वालिफाईड वैदू स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत अनेक स्त्रियांचे खून करीत सुटला होता मागे. जेसीबी आणून खड्ड्यात प्रेतं गाडत होता.

त्या धाग्यावर चिडून एक प्रतिसाद लिहिल्याने माझी माबो आयडी उडाली होती. या कुत्र्याचे काय झाले, ते तुमच्या समाज, कोर्ट, पोलिस, पत्रकार, अन तुम्ही वकील, या सगळ्यांनी मिळून त्याचं काय केलं, याचा काही हिशोब? काही कथा, व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्स वगैरे?

३. इतर धंद्यांतल्या विकृतींबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. म्हणायच्या पलिकडे पोहोचलो आहे मी.

पण,

ज्या सो कॉल्ड समाजाने मी "धंदा" करतो असे डिक्लेअर करून "कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट" लावला. मला शॉप अ‍ॅक्ट लायसन्स घ्यायला लावलं. अन वरतून येता जाता मला "देवमाणूस" म्हणायचा प्रघात सांगत माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला, त्या समाजाला मी फाट्यावर मारून धंदाच करणार. माझ्यासारख्या म्हातार्‍यात तरी थोडी लाजलज्जा शिल्लक आहे. नवे तरुण येताहेत, ते तुम्हाला जशास तसे देणारच.

"कट प्रॅक्टिस!"

च्या** प्यायला याऽ तुमच्या! सालं कोणतं तरी टिनपॉट अ‍ॅप डाउनलोड करता, अन ते सांगतं, ५० लोकांना आमची जाहिरात करा, तुम्हाला १० रुपये "व्हर्चुअल कॅश" देतो, तर तुम्ही सो कॉल्ड "समाज" बांधव गपागप कट घेण्यासाठी फॉर्वर्ड करत सुटता.

तुमची कंपनी गिर्‍हाइकं गंडवली की तुम्हाला फॉरेन ट्रिपवर पाठवते. तिथे उड्या मारू मारू फिरता.

ते एमार नावाचे लोक स्वतः अन मेडिक स्टोअरवाल्यांना भक्कम ३०-५०% कट देतात.

अन कुण्या डॉक्टरने कॉन्फरन्सला जाण्याचं तिकिट स्पॉन्सर करून घेतलं, तर तुमच्या बुडाला चटके बसतात?

पण तो वेगळा विषय आहे.

४. मुद्दा हा आहे, की ते "पोट" पाडण्यासाठी आधी जो पराक्रम करावा लागतो, तो काय सोनोग्राफीवाला डॉक्टर करतो, की स्त्रीभ्रूणहत्या करणारा वैद्य? हो. वैद्यांना हे करायची परवानगी मिळालिये आयुषमधे Lol

आजच्या अमेरिकेत 'असुरक्षित' गर्भपातांमुळे होणार्‍या जीवीतहानीची आकडेवारी, गर्भपात प्रतिबंधक कायद्यांच्या संदर्भात काय दाखवते?

तेव्हा, आम्ही इतके सोनॉलॉजिस्ट पकडून दिले अन तितकी बक्षिसं लावली असल्या मूर्ख वल्गना करणार्‍या समाजाला मी काही गमती सांगू इच्छितो.

तुमचा हार्ट स्पेशालिस्ट असतो ना? तुमची अँजिओप्लास्टि वगैरे झाल्यावर तो तुमची २डी एको करतो. तोच. ही हृदयाची सोनोग्राफी असते. या डीएम कार्डिओ माणसांना तुमच्याच समाजातले मुन्शीपाल्टि कारकून, "स्त्रीभ्रूणहत्याप्रतिबंधक" समितीतले गावातले रिकामटेकडे "समाजसेवक" लोक जाऊन ब्लॅकमेल करून पैसे मागतात, अन दिले नाहीत तर हॉस्पिटल सील करून जेलची धमकी देतात. का? तर ते "सोनोग्राफी" मशिन आहे. Rofl

किडनी स्टोनसाठी जे विनाऑपरेशन साउंड वेव्हज वापरून दगड फोडतात ना? ते ही सोनोग्राफी मशीन असते.

डोळ्याचे ऑपरेशन करून लेन्स बसवतात ना? त्या लेन्सचे माप घेण्याचेही सोनोग्राफी मशीन असते, त्या "ए स्कॅन" प्रकारच्या सोनोग्राफीने लिंग सोडा, गर्भ देखिल दिसत नाही.

पण या अन अशा प्रत्येक डॉक्टरला जाऊन छळून त्याच्या कडून तुम्ही सो कॉल्ड समाज पैसे उकळता.
त्याने तुम्ही गर्भवती केलेल्या निरपराध मुलीं, तुमच्या घरच्या लेकी सुनांना असलेले मुलींचे गर्भ, यांचे खून करण्यासाठी, साम दाम दंड भेदाने भरीस पाडता, तुमचे राजकीय वजन, तुमची पोलिसातली पहेचान, तुमच्या पैशाचे आमिष.. दाखवत असता,

तेव्हा राधासुता,

कोठे असतो तुमचा समाज अन तुमची जबाबदारी अन धाक??

"चांगल्या" दुखर्‍या वगैरे शब्द वापरणार्‍या विकृत प्रवृत्ती समाजात प्रचण्ड संख्येने असल्याने, व त्यांच्यावर कोणताही चाप नसल्याने, इमानदारीत खरी समाजसेवा करून, समाज प्रबोधन करण्याऐवजी, सॉफ्ट टार्गेटला हाणले की झाले, हा रोगापेक्षा भयंकर आजार, आजकाल फार फोफावलेला दिसतोय!

वकीलांची सेवा असा एक सोप्पा लेख पाडणार आहे मी.

कसाबची बिर्याणी ही मनगढंत होती, असं सांगणार्‍या अतिप्रसिद्ध वकिलांपासून ते नोटिसा पाठवायचा धंदा करणार्‍या गावगन्ना बलिष्टर महोदयांपर्यंत, एक अत्यंत सेवाभावी प्रोफेशन आपल्या समाजात कार्यरत आहे.

त्यांनी केलेली सेवा, त्यातली तळमळ इ. कुणीतरी निस्पृहपणे समाजासमोर मांडावी असा विचार आहे..

यावर काय म्हणाल?: “Whenever medical doctors go on strike, a most interesting phenomenon occurs - death rates go down! “
<<
यावर इतकंच म्हणेन,,

"अध्यक्ष महोदय, इनफ इज इनफ"

अन हे म्हणणार्‍यावर हे म्हणण्याचं नाटक करायची वेळ का आली, तेही सांगितलेलं बरं. कारण त्याच वेळी याच महोदयांचा "संप केला हे चांगले झाले" असे म्हणणाराही व्हिडिओ फिरत होता.

बाकी माझ्यामते खरंच एकदा वर्ल्डवाईड अ‍ॅटलास श्रग झाला तर मज्जाच येईल. Lol

आरारा, मनात १-१० मोजा. भ्रष्टाचार सगळीकडे आहे, वैद्यकिय व्यवसायहि यातुन सुटलेला नाहि. मग घरचं कार्य असल्यासारखं जस्टीफाय का करताय? यंत्रणा, समाज यांनी मिळुन मला भाग पाडले म्हणुन मी भ्रष्टाचार करायला नाईलाजाने प्रवृत्त होतो; नाहितर मी अगदी सज्जन आहे - असं म्हणायचंय काय तुम्हाला?..

वकिलांवर लेख पाडण्याच्या बेतावरुन (वाटबौटरी) बाणेरेबाईंची आठवण झाली... Lol

राज,
१. तुमचं कुठे पोळतं ते मला ठाऊक नाही.
२. "मला" कुणीही काहीही करायला भाग पाडू शकत नाही अशा ठिकाणी मी आहे, अस मला वाटते.

पण,
उठसूट डॉकबॅशिंग केल्याने, या देशात जे काय होते आहे, ते तुम्हाला तिथे बसून अजिबात समजणार नाही, समजवून सांगायची मला गरज अथवा इच्छाही नाही.

तेव्हा, सध्या तुम्ही अमेरिकेतल्या कोणकोणत्या स्टेटमधे अ‍ॅबॉर्शन बंदी आहे, त्यामुळे तिथल्या किती कुमारी मातांवर इल्लिगल अ‍ॅबॉर्शन करवून घेण्याची वेळ येते आहे, त्यामुळे त्या मुलिंवर कोणते आभाळ कोसळते आहे, याचा विदा मिळवून तो सज्जनपणे, इमानदारीत इथे मांडण्याचा प्रयत्न करणार का?

मग अ‍ॅबॉर्शन, स्त्रीभ्रूणहत्या, त्याविरोधी आयएमए चा प्रयत्न, डोक्टर लोकांनी केलेली खरी समाजसेवा, स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध झटणारे डॉ., अन अशाच विषयां बद्दल हार्ड डेटासह अधिक बोलू.

>>"मला" कुणीही काहीही करायला भाग पाडू शकत नाही अशा ठिकाणी मी आहे, अस मला वाटते.<<
आश्चर्य वाटलं, माबोवर एन्थ वा आय्डी घेउनहि हा (गैर्)समज अजुन आहे.

असो, मला काय म्हणायचं होतं ते माझ्या आणि इतर प्रतिसादांवरुन इथे आलेलं आहे...

माइक ड्रॉप!

एल ओ एल
इतरांची अक्कल काढण्याचा तुमचा माज माबो प्रशासनाने अद्यापही सहन केल्यानंतर,
मी वर म्हटलो, तसा सभ्य व लॉजिकल संवाद करायची हिम्मत तुमच्यात नसल्याने, माझी एन थ आयडी काढायची वैयक्तिक वेळ तुमच्यावर आल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

ओक

चला आता आपले मुद्दे घेवू..
१ "पाडलेली" पोटं साफ करून ते पडलेलं कुत्र्यांना खाऊ घालणारा एक मुंढे नामक डॉक्टर लय फेमस होता मध्यंतरी.
समाज, कोर्ट, पोलिस, पत्रकार, अन तुम्ही वकील, या सगळ्यांनी मिळून त्याचं काय अन कसं उपटलं, याची काही कथा ठाऊक आहे का? कुठे काही बातमी वगैरे?

हा जेलात गेला होता माहित नाही का आपल्याला.. आवश्यक त्या सगळ्या कायद्या खाली कारवाई झाली त्याच्यावर.. या घटने नतर तर खरी जनजागराणाला सुरवात झाली. कायदे कड़क केल्या गेले.. अनेक लोकांवर कारवाई झाली.. सरकारने लेक वाचवा मोहीम सुरु केली. राज्यात मुलींचा जन्मदर वाढला.. अनेक समाजसेवी डॉक्टर मंडळीनी स्वतः पुढाकर घेत स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमा सुरु केल्या.. आमच्या जिल्ह्यात लेक माझी अभियान हे त्यातूनच जन्माला आल.. मुंडे डॉक्टर वर झालेली कारवाई पुरेशी होती का? असा आपला रोख असेल तर सन्माननीय मोहदय.. कायदा कायद्याचीच परिसीमा ओलांडु शकत नाही.. हे आपल्या देशातील न्याय व्यवस्थेचे तत्व आहे.. कायद्याने कायद्याचे काम केल.. समाजा ने समाजाच काम केल.. अर्थात याकडे सकारात्मक दृष्टि ने बघावे लागेल..

२ एक कुणीतरी अनक्वालिफाईड वैदू स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत अनेक स्त्रियांचे खून करीत सुटला होता मागे.

तो सुद्धा जेरबंद झाला आहे..
३ ज्या सो कॉल्ड समाजाने मी "धंदा" करतो असे डिक्लेअर करून "कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट" लावला. मला शॉप अ‍ॅक्ट लायसन्स घ्यायला लावलं. अन वरतून येता जाता मला "देवमाणूस" म्हणायचा प्रघात सांगत माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला, त्या समाजाला मी फाट्यावर मारून धंदाच करणार...

-अन्य व्यवसाय आणि रुग्ण सेवेचा व्यवसाय यात मोठे अंतर आहे, हे लक्षात न घेणारी मंडळीच आपल्या भ्रष्ट वर्तवणुकीचे आशा प्रकारे समर्थन करीत असतात. आपण मान्य करा किंव्हा नका करू, पण आजही व्रतस्थपणे आणि आपल्याला किती पैसे मिळतील, याची पर्वा न करता रुग्णसेवा करणारी अनेक डॉक्टर मंडळी आहेत. म्हणुनच समाज या क्षेत्राकड़े आदाराने पाहतो.. जी मंडळी याचा धंदा करू पाहते आहे.. त्यांचे परिणाम आणि हाल आपल्या समोर आहेत.. कुणी एकाने ठरविल्याने वैद्यकीय व्यवसायाचा धंदा होणार नाही..समाज त्याला मान्यता देणार नाही.. आणि समाज मान्यता सोडून जो कुणी असा प्रकार करेल त्याला कायदा सोडणार नाही..

४ मुद्दा हा आहे, की ते "पोट" पाडण्यासाठी आधी जो पराक्रम करावा लागतो, तो काय सोनोग्राफीवाला डॉक्टर करतो...

मग या डॉक्टर ला काय मानस मारायचे लायसन मिळते का?? तो समोरच्या रुग्नाला नाही म्हणू शकत नाही का??

५ स्त्रीभ्रूणहत्याप्रतिबंधक" समितीतले गावातले रिकामटेकडे "समाजसेवक" लोक जाऊन ब्लॅकमेल करून पैसे मागतात..

- हे मात्र सत्य आहे.. काही ठिकाणी खरच असे प्रकार घडलेत आणि घडत आहे.. यांना पोलिसांच्या ताब्यात देवून त्यांच्यावर खंडणी चा गुन्हा दाखल केला पाहिजे.. पण डॉक्टर मंडळी ब्लॅक मेल का होतात? हे मला समजत नाही.. आपण स्वच्छ आणि पारदर्शक दवाखाना चालवतोय तर मग लावा की अशांचा ट्रैप..

सरतेशेवटी
डॉक्टर, पत्रकार, साधू, शिक्षक यांच्यांकडे समाज आदराने बघत असतो पण हेच लोक माणुसकी सोडून वागायला लागले की सामान्य माणसाचा माणुसकीवरचा विश्‍वास उडतो. सामान्य माणूस आपला जीव आणि आरोग्य डॉक्टरच्या हातात सोपवत असतो. ते डॉक्टर धंदा करण्याच्या नादात भलतेच काही करायला लागले तर पेशंटवर जीव गमवायचंी पाळी येते. म्हणुन या व्यवसायाची अन्य व्यवसायसोबत तुलना करता येणार नाही.. आपण वकिली वर लिहनार असल्याचे वाचले.. नक्की लिहा.. यात ही अनेक अपप्रवृत्ति आहेत.. यानिमित्ताने त्यावर चर्चा होईल.. आमच्याही चेहरयासमोर आरसा येईल आणि आम्हाला आमचे खरे रूप दिसेल.. विनंती एवढीच् की, पूर्वग्रह दूषित भावना ठेवू नका.. आज काय चांगले, हे निवडायची संधी आपल्या जवळ राहिली नाही. कारण सर्वच ठिकाणी अपप्रवृत्तिनी शिरकाव केला आहे.. त्यामुळे कोण कमी वाईट, हे निवडायची वेळ आपल्यावर आली आहे.. आपल्या लिखानासाठी शुभेछ्या..

सर्व मान्यवारांच्या प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद..

आ. रा. रा...
ठीक आहे घेतो यूजर नेम बदलून.. मोबाइल वरुण टाइप करताना झालेली प्रिंटिंग मिस्टेक आहे ती..शेवटी सेक्सपियर म्हणतोच की, What's There's in NAME??

>>नवीन Submitted by अँड. हरिदास on 9 December, 2017 - 07:57<<

प्रतिसाद आवडला.

दुसरा करतो मग मी का मागे राहु, या प्रवृत्तीमुळेच हि कीड फोफावलेली आहे. आणि त्यात चूक काय आहे हे जाहिर प्लॅट्फॉर्म्वर विचारायची हिंम्मतहि बळावलेली आहे यावरुन समस्येच्या तीव्रतेची कल्पना यावी...

>>नवीन Submitted by अँड. हरिदास on 9 December, 2017 - 07:57<< प्रतिसाद आवडला.

आज काय चांगले, हे निवडायची संधी आपल्या जवळ राहिली नाही. कारण सर्वच ठिकाणी अपप्रवृत्तिनी शिरकाव केला आहे.. त्यामुळे कोण कमी वाईट, हे निवडायची वेळ आपल्यावर आली आहे.. >>> एकदम बरोबर

ण आजही व्रतस्थपणे आणि आपल्याला किती पैसे मिळतील, याची पर्वा न करता रुग्णसेवा करणारी अनेक डॉक्टर मंडळी आहेत.
<<
व्रतस्थपणे किती पैसे मिळतील याची पर्वा न करता सेवा करणार्‍या वकीलांची थोडी नांवं सांगा, असे सुचवतो.
बाकी सविस्तर लवकरच Happy

मुंडे अन तो दुसरा कोण त्याचं नावही आठवत नाही,

त्यांच्या "जेरबंद" नव्हे, तर न्यायालयीन निर्णयांची लिंक हवी आहे. जेरबंद झाले तेव्हाच तर बातमी आलेली. पुढे काय झालं? वकील आहात, ऑनलाईन निर्णयांच्या लिंका द्या. माझ्या धंद्यातले विकृत मेले याचा आनंद होईल.

*
>>
अन्य व्यवसाय आणि रुग्ण सेवेचा व्यवसाय यात मोठे अंतर आहे, हे लक्षात न घेणारी मंडळीच आपल्या भ्रष्ट वर्तवणुकीचे आशा प्रकारे समर्थन करीत असतात. आपण मान्य करा किंव्हा नका करू, पण आजही व्रतस्थपणे आणि आपल्याला किती पैसे मिळतील, याची पर्वा न करता रुग्णसेवा करणारी अनेक डॉक्टर मंडळी आहेत. म्हणुनच समाज या क्षेत्राकड़े आदाराने पाहतो.. जी मंडळी याचा धंदा करू पाहते आहे.. त्यांचे परिणाम आणि हाल आपल्या समोर आहेत.. कुणी एकाने ठरविल्याने वैद्यकीय व्यवसायाचा धंदा होणार नाही..समाज त्याला मान्यता देणार नाही.. आणि समाज मान्यता सोडून जो कुणी असा प्रकार करेल त्याला कायदा सोडणार नाही..
>>

नक्की काय अंतर आहे, "सेवेचा व्यवसाय" यात?

मला टॅक्स कमी लागतो, जमीन स्वस्तात मिळते, तुमच्यासारखे संभावित लोक मेडिया बॅशिंग न करता मदतीस येतात, लाच मागत नाहीत, प्रोफेशन टॅक्स, शॉप अ‍ॅक्ट, बाँबे नर्सिंग होम अ‍ॅक्ट, रुग्णालयांची तोडफोड, इत्यादितून सूट मिळते???

बाँड वसूल फेडण्यासाठी नोकरी मागणार्‍या डॉक्टरांना सरकार "कंत्राटा"वर बोलावते, अन बाँडची रक्कम १ कोटी रुपये करू असे सांगते?

काय देतो मला समाज?

मला सरकारी कॉलेजात शिक्षण दिले =माझ्यावर उपकार केले असे सांगतो?का?

तुमची वकीली खासगी कॉलेजात शिकलात का?

काय केलं समाजॠण फेडण्यासाठी?

म्हणुनच समाज या क्षेत्राकड़े आदाराने पाहतो..

मला घंटा तुमच्या फडतूस आदराची पडलेली नाही.

पैसे फेकले, अन रोब जमवला, की या देशात आदर अमित शहालाही मिळतो, अन गल्लीतल्या गुंडाला फक्त ६ इंची सुर्‍याच्या नंगचोटपणावर. तुमच्यासारखे भरपूर वकील त्याची बाजू मांडायला उभे राहतात, त्याने चार चव्वल फेकून मारले की.

जी मंडळी याचा धंदा करू पाहते आहे..

मराठी शिका.

तुम्ही मला धंद्याला लावलं आहे.

शॉप अ‍ॅक्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट कुणी डॉक्टरांनी आंदोलन करून स्वतःला लागू करून घेतलेत का? प्रोफेशनचा धंदा कुणी केला? मी??

अन वरतून मलाच शुचितेचे डोस पाजू पहात आहात. काहीच वाटत नाही?

कसली घंट्याची समाजमान्यता?

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट आणण्यासाठी तुमच्यासारखे जे झटत आहेत, ते फक्त डॉक्टरला तुमचा पर्सनल गुलाम बनवायच्या पाठी आहेत. फकट ट्रीटमेंट हवीये तुम्हाला. अन तीही का? तर "लोक" मला मान देतात. म्हणून मी "तुम्हाला" फुकट तपासायचं. का? तर मी मिळवलेल्या ज्ञानाला, कर्ज काढून विकत घेतलेल्या इन्स्ट्रूमेंट्सना, काहीच किम्मत नाही. "सेवाभावी" मॅसोचिझम म्हणून मी डॉक्टर झालोय. नैका?

हो. देतात लोक मान, कारण माझी मान त्यांच्या हातात देतो मी, अन जबाबदारी निभावतो. तुमच्यासारख्या अ‍ॅम्ब्युलन्स चेसर्सनी विनाकारण पाठी लावलेल्या कन्झ्युमर कोर्ट केसेस लढायला तुमच्याच व्यवसायबंधूंना माझ्या घामाच्या कमाईचे पैसे देतो. बिलाचे पैसे चुकवायला हल्ले करून येणार्‍या कंत्राटी गुंडाना हाकलून लावायला दुसर्‍या माफियाला प्रोटेक्शन मनी देतो.

कुठे आहे समाज, जो माझं रक्षण करील? मला माझं दुकान इमानदारीत चालवू देईल?

वखवखलेले तुमच्यासारखे फुकटे, मला नकोतच!

आणि सोशल मिडियावरचं बिनडोक डॉक बॅशिंग बंद करा. गपगुमान ऐकून घेण्याचे आमचे दिवस सरलेत. उलट उत्तर नक्कीच मिळेल.

सुनेला मुलीचा गर्भ आहे का हे तपासायला, अन पोटं पाडायला जाऊ नका डॉक्टरकडे. विषय संपला. समाज बेजबाबदार असेल, तर त्याला बेजबाबदार सरकार अन तसेच डॉक्टरही भेटणारच. (edit: अन डॉक्टर नाही भेटला, तर आयुषवाला वैदू, अन नाहीच, तर गर्भपात करण्यासाठी गेलाबाजार योनिमार्गात खराट्याच्या काड्या सारणारी चेटकीण किंवा नवर्‍याला ओटीपोटावर लाथ मारायला सांगणारा भगत तरी नक्कीच भेटेल. ते जे वरती येऊन झील तोडून गेलेत ना? ते राज अमेरिकेत आहेत. त्यांना असल्याच चेटकिण अन भगतांची अमेरिकन आकडेवारी मागितलेली आहे मी. ती देण्याची त्यांची हिम्मत नाही ते अलाहिदा.)

मला फक्त मुलीचा म्हणून एमटीपी करणार्‍यांचा तुमच्यापेक्षा जास्त राग आहे, अन त्यांच्याबद्दल जे काय करायचं , ते योग्य मार्गाने मी करतोच आहे. पण, तुमच्यासारख्यांनी संभावितपणे फक्त डॉ. ना जबाबदार धरून असले लेख पाडले की मी येऊन तिथे थयथयाट करणारच.

जाओ, अपने समाज को खुद सुधारो Lol मी डॉक्टरांना सुधरवायचं पाहून घेईन Happy

**
ता.क.
>>हे लक्षात न घेणारी मंडळीच आपल्या भ्रष्ट वर्तवणुकीचे आशा प्रकारे समर्थन करीत असतात<<
"ब्लॅक मनीवालेच फक्त नोटबंदीला विरोध करीत असतात" अशी चाल लावली आहे तुम्ही Lol

च्या मारी!

त्या "रुग्ण सेवा" या शब्दाचं मला कायमच आश्चर्य वाटत आलंय. मी "रुग्णसेवेच्या व्यवसायात आहे" ही साली काय भानगड आहे नक्की?

अ‍ॅक्चुली इथे शुश्रुषा हा शब्द ओके आहे. अमुक बिचारा आजारी पडलाय. त्याची काळजी घ्या. तुमचा लाडका बाळ आहे. तुमच्या घरातला ब्रेड विनर आहे, तुम्हाला या जगात आणणारा/री बापमाय आहेत.. नक्कीच. त्यांची सेवा करा.

"डॉक्टर" वा नर्स, नावाचा प्राणी त्यांची सेवा करायला नव्हे, तर शुश्रुषा करायला आहे.

कंपॅशनेटली. "दया आल्या"मुळे, व योग्य मोबदला घेऊन तो /ती "सेवा" "देणार" आहे. हॉटेलात "सेवा" उर्फ सर्विस मिळते, तशी.

डॉक्टरने तुम्हाला आजारी पाडलेले नाही. उदा. तुमचा हार्ट अ‍ॅटॅक डॉक्टरमुळे नव्हे तर तुमच्या दारू-सिगारेट-स्ट्रेस इ. मुळे आलेला आहे.

डॉक्टरने तुम्हाला ट्रीटमेंट देणे, हा तुमचा अधिकार नाही. ही तुम्ही विकत घेतलेली 'सेवा' आहे. जीएसटी मधील "एस"

ओके?

वेक अप.

तुमची "सेवा" करायला मी तुमचा गुलाम अथवा नोकर नाही. ICICIने ही बँकींग सेवा उपलब्ध करून दिली आहे. रिलायन्सचा अंबानी पैसे घेऊन इंटरनेट "सर्विस" देतो. मोदी देशाचा प्रधान "सेवक" आहे. Capish?

सो मायबाप रुग्णहो,

मी सेवा "देतो". तुमचे चिरंजीव, कन्या, सूनबाई, सौ. इत्यादी, सेवा "करतात"

***
इति मराठी भाषा लेक्चर समाप्त.

गाय दूध "देते" असे म्हणुन गायीचे दूध हिसकावून घेण्याचे ट्रेनिंग आपल्याला लहानपणापासूनच मिळालेले असल्याने, ही मानसिकता आहेच, त्यावर हा छोटा इलाज करायचा प्रयत्न.

आपण कितीही 'थयथयाट' केला तरी सत्य बदलेल अस मला वाटत नाही.. माझी मराठी कशीही असो, किमान ती 'सभ्य' आहे. त्यामुळे वेडी वाकड़ी अक्षरे समजून येतिलच.. शेवटी 'माय' बोली आहे..
कोण किती समाजाचे ऋण फेडतो हा माझा मुद्दा कधी नव्हता.. डॉक्टर लोकांना अनैतिक काम करण्याचा अधिकार नाही. हे मी मांडल आहे.. कोणत्या व्यवसायात किती अपप्रवृत्ति आहेत याच प्रत्येक वेगळा विषय घेवून लिहावा लागेल.. प्रासंगिक घटनेवर केलल् विश्लेषण आणि त्यातून व्यक्त झालेल्या अपेक्षा मला संयुक्तिकच वाटतात..

तुम्ही वकिली वर लिहा.. जे योग्य राहील त्याच आम्ही समर्थन करू.. चुकत असेल तर सुधारणा करण्याचा प्रयत्न करू..नुसता 'थयथयाट' करणार नाही. आणि हो वैद्यकीय क्षेत्र च नाही तर माझ्या सदसदविवेकाला ज्या ठिकाणी काही गंभीर चुकीचे दिसेल त्यावर तर प्रहार करणारच.. मग कुणी थयथयाट करो की तांडव..!
कारण , 'सत्य आम्हा मनी. नव्हो गबाळाचे धनी. देतो तीक्ष्ण उत्तरे... पुढे व्हावयासी बरे..."

गाय दूध देते.

लिंक मिळाल्या.

सत्य सांगण्याचा तुमचा आटापिटा समाजाला.

शुभ्रात्री

एक राहील की,
सेवा म्हणजे पैसे घेवू नका अस कुणी संगितल आपल्याला.. घ्या पैसे.. माणूस पाहुन थोड़े जास्त जरी लावले तरी काही हरकत नाही. पण पैसे कमविन्यासाठी लोकांचे जिव घेवू नका, इतकेच आमच् म्हणंन आहे.
चला थोड़ विस्तृत करुण सांगतो.. आमच्या जिल्ह्यात पहिली घटना लोणार इथे घडली.. यात एक अल्पवयीन मुलगी जी ५ महिन्यांची गर्भवती होती तिला गर्भपातासाठी आणण्यात आले होते. सर्व तपासन्या झाल्यावर मुलीची शाररिक क्षमता गर्भपात करन्यासारखि मुळीच नव्हती. अस जिल्हा शल्य चिकत्सक यांनी सांगितले आहे.. तेही प्रेस मधे. तरीसुद्धा त्या मुलींचा गर्भपात करण्यात आला. दुर्दैवाने अति रक्तस्त्राव होऊन मुलींचा मृत्यु झाला. प्रकरण इथच संपल नाही. घटनेची विल्हेवाट लावण्यासाठी डॉक्टर ने प्रयत्न केले. पोलिसात या घटनेची आकस्मिक मृत्य म्हणून नोंद झाली. एका वृत्तपत्र प्रतिनिधिला याची कुन कुन लागली आणि बिंग फुटले. आज डॉक्टर नातेवाईक सर्व जेल मधे आहेत.

दूसरी घटना
मोताळा तालुक्यात अगदी आठ दिवसाच एक अवैध गर्भापात केंद्र उघडकीस आले. एक बीएएमएस डॉक्टर गर्भपात करत असल्याचे निदर्शनास आले.. त्याच्यावरही कारवाई झाली आहे.
या दोन्ही घटनांच्या विश्लेषनासाठी लेख लिहला.. तो एका स्थानीक आणि एका राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रकाशित सुद्धा झाला.

मला सांगा मोहदय, समाजाने आपल्याला काहीच दिल नाही.. पण एका बीएएमएस डॉक्टर ला गर्भापात करण्याची परवानगी कोणी दिली.. ज्याने आयुर्वेद च शिक्षण घेतल तो जर शत्रक्रिया करत असेल तर याला नैतिक म्हणाव की अनैतिक???
पाच महीने गर्भवती असलेल्या एका १५ वर्षाच्या मुलीवर केवळ जास्त पैसे मिळतात म्हणुन एक डॉक्टर (हा सुद्धा एमडी सर्जन वैगरे कुणी नाही ) गर्भपात करत असेल तर याचे समर्थन आपण करणार आहात का???

डॉक्टर लोकांनी सेवा नाही धंदा करवा.. आम्हाला काही नाही त्याचे. पण जी तुमची पदवी नाही, ज्यात तुमच कौशल्य नाही, जे करण्याची तुम्हाला परवानगी नाही. ते कृत्य करुण एकादा पैसा जमा करत असेल तर याला 'व्यवसाय' या गोंड्स नावाखाली समर्थन देता येईल का???

माझा रोख आशा लोकांवर आहे..आपण सेवा धंदा कुठेच्या कुठे नेवुन स्वताला मनस्ताप करुण घेत आहात..

आ.रा.रा., प्रतीक्षा आहे आपल्या लेखाची..

Pages