वैद्यकीय 'मेवा'!

Submitted by अँड. हरिदास on 8 December, 2017 - 07:08

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!doctor-new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेशातील नियमांशी तुलना करुण संभ्रम निर्माण होतोय. >> नाही. परत सांगायचा प्रयत्न करते.

धाग्यात तुम्ही दोन वेगवेगळ्या केस सांगितल्या आहेत.

• पहिल्या केसमधे unplanned, unwanted गर्भधारणा आहे. काही कारणाने कायदेशीर गर्भपात करता आलेला नाहीय. मी आणि इतर जे सांगत आहेत तसा कायदा केला तर या अशा केस योग्य पद्धतीने, वैधरित्या हँडल करता येतील.

• दुसरी केस लिंगसापेक्ष गर्भपाताची आहे. मला वाटत कि यावर सरकारने जो उपाय शोधला आहे तो मुळातच चुकीचा आहे. या उपायावर लोक काय जुगाड करताहेत?
~ एकतर १७-१८ आठवदे गर्भ राहू देऊन लिंग पाहून गर्भपात करून देणारे डॉक्टर शोधताहेत. किंवा
~ मुलगा हवा मुलगी हवी करत ४-५ एकाच लिंगाची पोरं जन्माला घालत सुटलेत.
दोन्ही जुगाडमधे मातेवरच अन्याय होतोय. तिच्यावरच भरपूर बाळंतपण किंवा घाणेरड्या जागेतले रिस्की गर्भपात लादले जात आहेत.

आता यावर मी काय पर्याय सुचवतेय कि जोडप्याना अपत्याचे लिंग निवडू द्या. अगदी गर्भधारणा व्हायच्या आधीच!
फक्त एकूण किती मुलं जन्मला घालतो यावर बंधन आणा. २ पेक्षा जास्त नाही.
~ ज्यांना याचा वापर करायचा नाहीय ते करनार नाहीत
~ काहीजण एकदाच वापर करून एकच मुलगा किंवा मुलगी जन्माला घालतील
~ पण मला वाटतं बरेचजण एक पहिले कोणत्याही लिंगचे होऊ देतील आणि दुसरे त्याच्या विरुद्ध लिंगाचे निवडतील

===
π यांच्या प्रतिसादमधल्या काही मुद्द्यांना अमितव ने उत्तर दिले आहे. सव्यंग, आयुष्यभर समाजावर+पालकांवर burden बनून राहणारी संतती necessary अजिबात नाहीय!

गर्भ कुत्र्याला खाऊ घातले किंवा पूर्वीने तो कचऱ्यात टाकला म्हणून हळहळ मी व्यक्त केली नाही. ते बायोमेडिक्ल वेस्ट आहे, खून नाही. कायदा योग्य केलातर कुत्रा वापर करायची गरज पडणार नाही कारण पुरावे नष्ट करावे लागणार नाहीत.

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड.>>

अनेक अधिकार, जे संपूर्णपणे बाईकडे असावेत, ( लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवावेत का?, लग्न कोणाशी करावे, लग्नाच्या नवर्याशीही कधी शारीरिक संबंध यावेत वगैरे वगैरे)
ते बाईकडे राहतात का? मग हा गर्भपाताचा तरी राहील का? जबरदस्तीने होकार/ नकार घेतला जाणार नाही का?
शिवाय, किती काही झालं तरी ही हत्या आहे. (अनैतिक/ नैतिक, बेकायदेशीर/ कायदेशीर ही स्थलकालसापेक्ष लेबल्स आहेत).

शिवाय, किती काही झालं तरी ही हत्या आहे. >> collection of cells ला काढून टाकणं म्हणजे हत्या नाही. हत्या करण्यासाठी आधी तो 'जीव' असावा लागतो. जीव असण्यासाठी त्याला incubator मधे ठेऊन का होईना श्वास घेता यावा लागतो. तेवढी त्याची फुफुस्स वाढलेली असावी लागतात. त्याला २७-२८ आठवडे लागतात.

आणि एवढे सांगूनही जर ते कोणाला पटत नसेल तर त्यांनी करू नये 'हत्या'. दुसऱ्याला कशाला सांगताय?

अॅमी ..
जोडप्याना अपत्याचे लिंग निवडू द्या. अगदी गर्भधारणा व्हायच्या आधीच! .>>>
>> आपण सुचवलेल्या या उपायावर केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी भाष्य केलं होत.. त्यानंतर राज्याच्या लोकलेखा समितीने गर्भलिंग निदान सक्तीचे करण्यात यावे असा प्रस्ताव विधिमंडळासमोर मांडला होता. अर्थात हा मुदा अजून विचाराधीन आहे.. या बाबीवर साधक बाधक चर्चा घडावी यासाठी मी दैनिक हिंदुस्थानमध्ये "गर्भलिंग निदान To Do oR NOt To dO.. ?
या मथळ्याखाली एक लेख लिहला होता. त्याची लिंक देत आहे..
http://haridasumbarkar.blogspot.in/2017/07/to-do-or-not-to-do.html

गर्भपाताचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा याला अनुमोदन.
जबरजस्तीने होकार / नकार घेतला जाईल ही वेगळी बाब झाली त्यासाठी इतर कायदे, तरतूदी, त्यांची अंमलबजावणी, समाज जागृती उपाय करता येतील.

अ‍ॅमी, तुमच्या पोस्ट्शी सहमत.
>>गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड>> +++

गर्भलिंगनिदान करून एका पिढीने फक्त मुलगेच जन्माला घातले तर याचा एक अनुकूल परिणाम असा होऊ शकतो की अनुरूप मुलींची टंचाई निर्माण होऊन रिवर्स हुंडापद्धत सुरू होईल. मुलीच्या बापाची अगतिकता थोडी कमी होईल. पण पुन्हा मुलींचा घोडेबाजार अथवा लिलाव मांडला जाण्याची शक्यता राहातेच. आज अरब कोट्याधीशांकडून भारतीय मुली खरीदल्या जातातच. म्हणजे मुलीला जोडीदार निवडण्याचा हक्क नाहीच. अवांच्छित गर्भ पाडायचा मात्र अधिकार असेल.
पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर. (श्लेष अथवा विनोद अजिबात इन्टेन्डेड नाही.) अधिकार असो वा नसो तो वापरण्याची/राबवण्याची मुभा जोवर मिळत नाही तोवर तो कागदोपत्रीचा अधिकार बव्हंशी निरुपयोगी ठरेल. म्हणून समाजमानस बदलणे हाच खरा उपाय आहे. दीर्घ कालावधीच खरा, पण या बाबतीत शॉर्ट कट संभवत नाही. कायदे बदलणे आणि ते स्त्रीच्या बाजूने करणे यामुळे शहरी सुशिक्षित स्त्रियांना दिलासा जरूर मिळेल, तसा तो सध्या मिळतोही आहे. पण खरा प्रश्न पुरुषवर्चस्वामुळे गांजलेल्या दबलेल्या कोट्यवधी महिलांचा आहे. कायदे करणे ही खर्‍या उत्तरांना सामोरे जाण्याची कुवत नाही म्हणून शोधून काढलेली एक सरकारी पळवाटच ठरेल. पुरोगामी उदार मानसिकता समाजात रुजवणे हाच वेळखाऊ पण मूलगामी उपाय आहे.

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड>>>> +११
सहमत आहे. पण ऋन्मेष याने जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यात थोडेफार तथ्य आहे हे नाकारून चालणार नाही. पण आता मूळ धाग्याचे विषयांतर होते आहे. प्रो लाईफ आणि प्रो चॉईस असा वाद होतो आहे. वेगळ्या धाग्यावर ही चर्चा जास्त योग्य ठरेल.
बाकी आ.रा.रा. आणि नानाकळा यांचे प्रतिसाद आवडले.

हिरा, चांगला प्रतिसाद.

चीनमध्ये जेव्हा एकच मूल कायदा झाला तेव्हा लोकांनी जास्त मुलगे जन्माला घातले. आता तिथे मुली (उपवर )कमी आहेत त्यामुळे मुलगे त्यांचं मन जिंकायला स्वतःमध्ये सुधारणा करणं, करीयर, उत्तम घर वगैरे जमवून आपल्याला मुलगी हो म्हणावी यासाठी झटत असतात तर मुलीना भरपूर चॉईस असतो असं वाचलं आहे.
पण विकृत देशी मानसिकता अशी की बलात्कार व अपहरण प्रमाण वाढेल अशी भीती. म्हणूनच एकीकडे कुटुंब नियोजन हे सरकारी धोरण आहे, सुरक्षित गर्भपात सरकारमान्य आहे, सरकार उलट प्रोत्साहन देतं तरी स्त्रीभ्रुणहत्या सरकार म्हणूनच रोखत बसलं आहे.

तुम्ही म्हणालात तेच खरं की मुळात पुरोगामी , वेस्टर्न मानसिकता समाजाने आत्मसात करायला हवी. ज्या देशात स्त्रियांना आदर आहे नेमके तेच सर्व देश आज जगात सर्वात पुढे व सुखात आहेत. यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता - अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, आणि आता हळूहळू चीनही.

गर्भलिंगनिदान करून एका पिढीने फक्त मुलगेच जन्माला घातले तर याचा एक अनुकूल परिणाम असा होऊ शकतो की अनुरूप मुलींची टंचाई निर्माण होऊन रिवर्स हुंडापद्धत सुरू होईल. मुलीच्या बापाची अगतिकता थोडी कमी होईल. पण पुन्हा मुलींचा घोडेबाजार अथवा लिलाव मांडला जाण्याची शक्यता राहातेच..>>
>> राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांची घट झाली असून 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे. हि आकडेवारी आज गंभीर दिसत नसली तरी असेच सुरु राहिले तर भविष्यात याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.

पुरोगामी उदार मानसिकता समाजात रुजवणे हाच वेळखाऊ पण मूलगामी उपाय आहे.>>
>>सहमत..
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा..मुलगा म्हणजे लग्नाच्या बाजारातला ब्लँक चेक’.मुलाने अग्नी दिला की मोक्ष मीळितो.. मुलगी लग्न करून सासरी जाणार. मुलगा म्हातारपणी आधार देणार! अशा खुळचट मानसिकतेतून समाज अजूनही सावरलेला दिसत नाही. ग्रामीण आणि अशिक्षित लोकांमध्येच नाही तर शिकल्या सावरलेल्या आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणार्‍या लोकांमध्येही हा समज मोठ्या प्रमाणावर आहे.. त्यामुळे मानसिकता बदल हाच उपाय यावर प्रभावी ठरू शकतो.

{ 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांची घट झाली असून 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे. }

८ टक्के की ०.८ टक्के?

दुसरा धागा काढा आता. इर्रीलिवंट प्रतिसाद यायला लागलेत.<<
>> नक्की.. लवकरच..

>>मला असे वाटते की त्या बाईने गर्भ धारण करण्यास मदत केलेल्या पुरुषाला पैसे मोजावेत आणि गर्भावर पुर्ण हक्क मिळवावा. <<

ऋन्म्या, असं काहि होण्याची शक्यता कमी आहे बट रिवर्स इज ट्रु - म्हणजे पुरुषाने सरोगसी मार्फत मुल जन्माला घालुन त्याचा संपुर्ण हक्क मिळवणं. यात लिगल काँट्रॅक्ट इन्व्हॉल्व्ड आहे आणि प्रेग्नंसी टर्मिनेट करता येत नाहि. नवरा-बायकोत असलं काहि होईल असं वाटत नाहि अन्लेस एक्दम तगडा प्रिनप बनवलेला असेल...

दुसरा धागा काढा आता. इर्रीलिवंट प्रतिसाद यायला लागलेत. >>> नानाकळा हे होणे होतेच कारण लेखकाने धागा सुरवात करुन, पुढे गर्भपात हाच मुद्दा प्रखरतेने मांडला.

आणि एवढे सांगूनही जर ते कोणाला पटत नसेल तर त्यांनी करू नये 'हत्या'. दुसऱ्याला कशाला सांगताय?>>

गर्भपात ही हत्या आहे म्हणून ती करू नये असं माझंही मत नाहीच. मी आधीच्या एका पानावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात माझ्या अगदी डोळ्यासमोर घडलेली एक घटना मी सांगितली आहे. त्या डॉ नी त्या मुलीचा जो गर्भपात केला तो बेकायदेशीर असूनही माझ्या मते १००% नैतिक होता, कारण त्यामागे त्या मुलीचे आयुष्य ( समाजातील प्रस्थापित कल्पनांनुसार) ' वाया' जाऊ नये हाच एकमेव हेतू होता. त्यात कुठेही वाईट हेतू नव्हता. आता हे चांगले/ वाईट वगैरे सापेक्ष शब्द आहेत. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.

हत्या हीदेखील कायदेशीर आणि ( बहुसंख्यांच्या मते) नैतिकही असू शकतेच. निर्भयासारख्या केसमध्ये आरोपींना झालेली फाशीची शिक्षा ही कायदेशीर हत्याच आहे आणि ( माझ्यासह) अनेकांच्या मते नैतिक आहे.

दयामरणाचा ( की इच्छामरणाचा?) कायदा जोवर आपल्याकडे येत नाही तोवर जर कुठल्या डॉ ने एखाद्या पेशंटला दयामरण दिले, तर भले हेतू कसाही असो, तो त्याचा गुन्हाच ठरेल. नैतिक/ अनैतिक हा मुद्दा वैयक्तिक.

विषयांतर झाले असल्यास क्षमस्व. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

डॉ नी त्या मुलीचा जो गर्भपात केला तो बेकायदेशीर असूनही माझ्या मते १००% नैतिक होता, कारण त्यामागे त्या मुलीचे आयुष्य ( समाजातील प्रस्थापित कल्पनांनुसार) ' वाया' जाऊ नये हाच एकमेव हेतू होता. त्यात कुठेही वाईट हेतू नव्हता. आता हे चांगले/ वाईट वगैरे सापेक्ष शब्द आहेत. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.<<
>> अर्थातच, आपण म्हटल त्याप्रमाणे प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात.. पण लेखातील मुलीची घटना थोड़ी वेगळी होती.. या अगोदरच्या एक पोष्ट मधे ती मांडली आहे.. शाररिक दृष्टया अत्यंत कमकुवत असलेल्या मुलीवर गर्भपात करने संयुक्तिक कसे म्हणता येईल? हा माझा प्रश्न आहे.. ज्यामधे मुलीच्या जीविताला धोका असल्याचे स्पष्ट दिसत होते..त्यात गर्भपात करने नैतिक कसा ठरेल?? गर्भपात केल्यानंतर सदर मुलींचा मृत्यु झाला.. मुलीच जीवन तर वाया गेल..मग हे नैतिक की अनैतिक??
लेखातील घटना सांगतोय.. इतर चार दोन उदाहरण देवून त्याची तुलना करु नका.. विनंती आहे..!

पण लेखातील मुलीची घटना थोड़ी वेगळी होती>>
प्रत्येक केसनुसार नैतिक/ अनैतिक हे मत बदलणार. एकदम मान्य!
लेखातील घटना सांगतोय.. इतर चार दोन उदाहरण देवून त्याची तुलना करु नका.. विनंती आहे..!>>
विषयांतर झाले असल्यास खरंच सॉरी! वेगळे उदाहरण देण्यामागील उद्देश असा होता की ' बेकायदेशीर ' गर्भपात हे ' अनैतिक' असतातच असे नाही. असो.

डाऊन सिंड्रोम नको मग मुलगी पण नको असं का नाही? कारण मुलगी असणे हा आजार नाही.>>
गोंधळ वाढतच चालला आहे. मुलगी असणे हा आजार असण्या-नसण्याचा प्रश्नच कुठे आला? मुळात गर्भात असेपर्यंत ती मुलगी काय, माणूसही नाही असं ठरलंय. मग आपल्या मालकीच्या ह्या मेडिकल वेस्टची विल्हेवाट कोणी कशी लावावी हे तरी इतरांनी, सरकारने का ठरवावं? मुलींचा जननदर कमी होत असेल तर तो देशाचा प्रॉब्लेम ज्यांना मुलगी नको आहे त्यांनी का वहावा? भविष्यात एका तरुणाच्या शेजेची सोय व्हावी म्हणून त्यांना हे नको असलेलं ओझं वहायला समाजाने का भाग पाडावं? हे नाही का होत पर्सनल? (मुलगी नको असणे ही माझी मेंटॅलिटी नाही, ज्यांची आहे त्यांच्यावतीने मी बोलतो आहे) जननदर सुधारण्याचे इतरही मार्ग आहेत. ज्यांना जननदराची पडली आहे त्यांनी ठरवून मुली जन्माला घालाव्यात. किंवा सरकारने प्रत्येक मुलीच्या पालकांना टॅक्स क्रेडीट्स, सबसिडी द्यावी. अपंग मूल नको असण्याचं स्वातंत्र्य असावं, पण मुलगी नको असण्याचं मात्र नाही हे पटत नाही.

>>केवळ संततीनियमनाची साधनं वापरायचा आळस आहे म्हणून, आणि कायदेशीर सोय आहे म्हणून बायकोला तीन-तीनदा गर्भपात करायला लावणारे महाभाग आहेत.>> हे पर्सनल नाही वाटत का? कोणी किती वेळा गर्भपात करावा आणि कोणी संततीनियमन वापरावं, का आळस करावा हे ज्याचं तो ठरवेल की!!
करायला 'लावणारे' वर भर असेल तर त्या बायकोला नाही का काही ठरवता येते? का भारतीय असहाय्य सामाजिक/ आर्थिक/ बौद्धिक मागासलेली बायको आहे?>>
तुमच्या आणि माझ्या enlightened समाजात बायकांना जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढं भारतातल्या बहुसंख्य बायकांना नसतं. सर्दी झालेल्या पोराला डॉक्टरकडे न्यावं तितक्या सहजपणे सुनेला गर्भ राहिला की दर वेळी तिच्या मर्जीशिवाय गर्भपाताला घेऊन जाणारी सासू माझ्या माहितीत आहे. अनेक सुखवस्तू आणि शिक्षित अमराठी समाजांत बाईला अजूनही शून्य किंमत असते हे आपल्याला माहित नसावं.
'करायला लावणारे' वर भर अजिबात नाही. 'अडचणीत आलेल्या बिचार्‍या' मुलींबद्दल वाचल्यावर मला तीनचार वर्षांच्या मुलांनासुद्धा शिकवली जाते ती consequences ची कन्सेप्ट आठवते. पण असोच.

पुरुषाने गर्भपात करायला 'लावला' यावर कायदा काय करणार? तर डॉक्टरला पकडणार !!! वा रे वा!>>>
डॉक्टरला पकडावे असं मी तरी म्हणालो नाही.

π यांच्या प्रतिसादमधल्या काही मुद्द्यांना अमितव ने उत्तर दिले आहे. सव्यंग, आयुष्यभर समाजावर+पालकांवर burden बनून राहणारी संतती necessary अजिबात नाहीय!>>>
मोअर गोंधळ! मी गर्भपात 'इव्हिल बट नेसेसरी' आहे असंच म्हणालो होतो, अपंग संतती नेसेसरी आहे असं कधीही म्हटलं नाही.

विषयांतर झाले असल्यास ॲडमिनश्री समर्थ आहे.

हरिदास,
तुम्ही दिलेली ब्लॉगलिंक वाचली. सरकारचा जो काही प्रस्ताव आहे तो पटला नाही.

• गर्भवती महिला मुलीला जन्म देणार असल्यास सोनोग्राफीच्या वेळी तिची नोंद करुन, मुलीचा जन्म होईपर्यंत तिची देखरेख करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. >> जन्म होईपर्यंत देखरेख म्हणजे काय करणार आहेत नक्की? Tracking? मुल जन्माला घालणारे प्रत्येक पालक 'गुन्हेगार/गुन्हा करण्यास उत्सुक' आहेत अशी काही समजूत आहे का सरकारची?

~ सरकारकडे काही डेटा आहे का की लिंगगुणोत्तर बद्दलण्यामागे स्रीगर्भपात हेच एकमेव कारण आहे?
~ बदललेला पुनरुत्पादन pattern हेदेखील कारण असू शकेल का?
~ पुर्वी गर्भनिरोधक साधन नव्हती तेव्हा लोक कोणत्या वयात, कितीदा सेक्स करायचे, त्यातून कितीदा गर्भ राहायचा, त्यातली किती मुलगी असायचे, ते कोणत्या sequence ने जन्मयचे?
~ मातेचे वय १२ ते २० असेल तर मुलगी जन्मायची शक्यता जास्त असते किंवा १० मुलं जन्माला घातली की त्यातली सुरुवातीची मुलगे असतात असा काही pattern आहे का? म्हणजे आता ५३% बायकांना वय २०नंतर मुलं होतात किंवा आता सरासरी २-३ च मुलं जन्माला घालतात त्यामुळे मुलगे गर्भ जास्त असतात असे कारण नाहीच आहे का?

• मुलगी असल्यास गर्भपात होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्याचं प्रस्तावात सुचवलं आहे. स्थानिक पातळीवर गर्भवती आणि तिच्या पतीचा फॉलो अप घ्यावा. त्यांनी चेकअपला गैरहजेरी लावल्यास त्यांच्या घरी जावं, असं म्हटलं आहे. >> पॅरोलवर असल्यासारख हजेरी लावावी लागणार का?

• सोबतच लिंगनिदानानुसार बाळ जन्माला आले अथवा नाही, यावर काटेकोर नजर ठेवणारी विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याचे आहवण सरकारमोर राहील. >> खर्च किती येईल याला?

*गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी याबाबत व्यक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर गदारोळ झाला, आणि असा अधिकृतरीत्या कोणताच प्रस्ताव नसल्याचा खुलासा गांधी यांना करावा लागला होता. >> नक्की काय वक्तव्य होतं? आणि गदारोळ कुठे वाचयला मिळेल?

===
मी म्हणतेय ते आणि हे पूर्ण वेगळे आहे. इथे प्रत्येकाला संभावित गुन्हेगार समजून ट्रॅक करतायत. मी म्हणतेय त्यात लोकांवर विश्वास टाकून, त्यांना पर्याय उपलब्ध करून देऊन, त्यांना योग्य वाटेल ती निवड करायचा अधिकार दिला आहे.

पाय,

मुलींचा जननदर कमी होत असेल तर तो देशाचा प्रॉब्लेम ज्यांना मुलगी नको आहे त्यांनी का वहावा? भविष्यात एका तरुणाच्या शेजेची सोय व्हावी म्हणून त्यांना हे नको असलेलं ओझं वहायला समाजाने का भाग पाडावं? ज्यांना जननदराची पडली आहे त्यांनी ठरवून मुली जन्माला घालाव्यात. किंवा सरकारने प्रत्येक मुलीच्या पालकांना टॅक्स क्रेडीट्स, सबसिडी द्यावी.
>> हा भाग पटला. दोन पेक्षा वरच्या मुलांसाठी दणकून कर लावला पाहिजे आणि दोनच मुली असलेल्या पालकांना सबसिडी+भत्ता द्यायला पाहिजे. गुड आयडीया...

गर्भलिंगनिदान करून एका पिढीने फक्त मुलगेच जन्माला घातले तर >> असे होईल असे का वाटते? मलातर वाटते कि बरीच जोडपी एक मुलगा, एक मुलगी हा पर्याय निवडतील.

मुलींचा जननदर कमी होत असेल तर तो देशाचा प्रॉब्लेम ज्यांना मुलगी नको आहे त्यांनी का वहावा? भविष्यात एका तरुणाच्या शेजेची सोय व्हावी म्हणून त्यांना हे नको असलेलं ओझं वहायला समाजाने का भाग पाडावं? हे नाही का होत पर्सनल? जननदर सुधारण्याचे इतरही मार्ग आहेत. ज्यांना जननदराची पडली आहे त्यांनी ठरवून मुली जन्माला घालाव्यात. किंवा सरकारने प्रत्येक मुलीच्या पालकांना टॅक्स क्रेडीट्स, सबसिडी द्यावी. अपंग मूल नको असण्याचं स्वातंत्र्य असावं, पण मुलगी नको असण्याचं मात्र नाही हे पटत नाही. >> सहमत आहे.

===
'अडचणीत आलेल्या बिचार्या' मुलींबद्दल वाचल्यावर मला तीनचार वर्षांच्या मुलांनासुद्धा शिकवली जाते ती consequences ची कन्सेप्ट आठवते. पण असोच. >> असोच कशाला? Unplanned, unwanted गर्भार मुलगी डॉक्टरकडे आली तर त्यानी काय करावे असे तुमचे म्हणणे आहे? http://www.misalpav.com/node/37743 इथे केलं तसं 'भोग आता आपल्या कर्माची फळं' म्हणायचं का?

===
मी गर्भपात 'इव्हिल बट नेसेसरी' आहे असंच म्हणालो होतो, अपंग संतती नेसेसरी आहे असं कधीही म्हटलं नाही. >> ठीक.

===
विषयांतर झाले असल्यास ॲडमिनश्री समर्थ आहे. >> +१

तिथे वाचले की जेन्डर रेशो असाच राहिला तर पुढची दहा वर्षे १००पैकी ६० मुलांना मुलगी मिळणार नाही... असं झालं तर बरंच होईल... ४० मुलांना मुलगी मिळेल. त्यातल्या ४० टक्क्यांना गर्भधारणेचे इशुज येत आहेत. (१०० पैकी ४० जोडप्यांना गर्भधारणा होतंच नाही) म्हणजे फक्त १०० पैकी फक्त २४ मुलं पुनरुत्पादन करु शकतील. लोकसंख्या वाढ थांबेल.

मानवाने कितीही उड्या मारल्या तरी निसर्ग बरोबर बॅलन्स करतो.

पाय तुमचं म्हणणं पटतंय. सरकारने कायदा सुव्यवस्था राखणे हे त्यांचे बेसिक काम केले तर भलत्या विषयात चोमडेपणा करावा लागणार नाही हे तत्वतः पटतं.
आमच्या देशात सरकार प्रत्येक अपत्यामागे दरमहा (टॅक्सेबल) पैसे देतं, तुम्ही उत्पन्नाच्या कुठल्याही चौकोनात असा. कारण त्यांना अर्थव्यवस्था कायम रहायला (रीड: म्हाताऱ्या लोकाना पेंशन द्यायला Wink Proud ) जास्त मुलं हवी आहेत. तसं मुलगी झाली तर पैसे द्यावे इज गुड आयडीया. फक्त भारतात घोटाळेबाज लोकं काय करतील याचीच भीती वाटते.

तुम्ही दिलेली ब्लॉगलिंक वाचली. सरकारचा जो काही प्रस्ताव आहे तो पटला नाही.<<
>>सहमत, लोकलेखा समितिने जो काही प्रस्ताव मांडला त्यात बऱ्याच त्रुटी आहेत.. तद्वतच त्याचा कायदा करायचा म्हटला तर व्यहार्य होईल का? हा प्रश्न आहे.. म्हणूनच त्यावर उहापोह केला होता.. धन्यवाद

Pages