वैद्यकीय 'मेवा'!

Submitted by अँड. हरिदास on 8 December, 2017 - 07:08

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!doctor-new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैच्याकै लेख आहे!
आ.रा.रा. आणि त्यांना समर्थन देणाऱ्या सगळंयाच पोस्ट आवडल्या!

===
गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. >> असलं काही लिहू नका हो. अडचणीत आलेल्या अविवाहित मुलींना जगणं अजून मुश्किल करत आहात तुम्ही.

त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. >> तो MTP 1971 कायदा अस्तित्वात आला तेव्हा भारतात सोनोग्राफी मशिन्सच नव्हती आणि स्त्रीगर्भपात वगैरे मुद्देही नव्हते हे तुम्हाला माहित असेल.

मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. >> त्या डॉक्टरांचं भलं होऊ दे! अडचणीत आलेल्या मुलीला मदत करत असतील तर चांगलंच आहे _/\_

===
हीरांनी उल्लेख केलेल्या टाइम्स मधील लेखाची लिंक
https://m.timesofindia.com/india/1-6-crore-abortions-a-year-in-india-81-...

इतर परिस्थिती नॉर्मल असताना केवळ स्त्रीलिंगी आहे म्हणून गर्भपात करणे, करवणे, त्यात साहाय्यकारी होणे, त्यासाठी जबरदस्ती करणे हे सर्व गुन्हे आहेतच. पण फसवल्या गेलेल्या अथवा क्षणिक मोहाला बळी पडलेल्या कुमारीमातांची समाजाच्या दृष्टीने लांच्छनास्पद मातृत्वातून सुटका करणे हे एथिकली योग्य आहे असे मला वाटते. अर्थात बेजबाबदार मातृत्वातून सुटका होऊ शकते हे दिसले की असा बेजबाबदारपणा वाढू शकतो आणि त्याचा भार अथवा दुष्परिणाम समाजाला सोसावा लागू शकतो. यासाठी एकल मातृत्व, विवाहपूर्व अथवा अविवाहित मातृत्व हे समाजमान्य व्हायला हवे. हे व्यभिचारी मातृत्व नव्हे. परदेशांतून अशी मान्यता मिळाल्यामुळे तिकडे ही समस्या फारशी उरलेली नाही.
आपल्याकडचे समाजमन इतके बदलायला खूपच वेळ लागेल शिवाय सध्या समाजमन उदारमतवादापासून दूर जात चालले आहे. पण जीवनपद्धती समाजमानसिकतेशी irrespective अशी स्वत:च्या गतीने बदलते आहे. उच्च शिक्षण, स्थैर्य मिळवताना लग्नाची वये वाढताहेत, तरुणांची लैंगिक उपासमार होते आहे. लग्नपूर्व सेक्स समाजमान्य नसले तरी सार्वत्रिक होऊ पाहाते आहे. हा सगळा रेटा मानसिकता बदलवण्यास भाग पाडेलच.
फक्त कधी, हे तूर्तास अनुत्तरित आहे.

असलं काही लिहू नका हो. अडचणीत आलेल्या अविवाहित मुलींना जगणं अजून मुश्किल करत आहात तुम्ही.<<
>>यावर काही तात्विक आक्षेप असेल तर टाका..नाहीतर अपवादात्मक स्थितित सोडून कायद्यालाही मी जे लिहल तेच अपेक्षित आहे.

1971 कायदा अस्तित्वात आला तेव्हा भारतात सोनोग्राफी मशिन्सच नव्हती आणि स्त्रीगर्भपात वगैरे मुद्देही नव्हते हे तुम्हाला माहित असेल.<<

>> सोनग्राफी मशीन नसतील पण गर्भपात होते.. अवैध गर्भापात होते.. त्यातून मृत्यु होत होते.. म्हणुन कायदा करावा लागला. साधी बाब आहे.. गरज नसताना कायदा केल्या जाईल का??

पण फसवल्या गेलेल्या अथवा क्षणिक मोहाला बळी पडलेल्या कुमारीमातांची समाजाच्या दृष्टीने लांच्छनास्पद मातृत्वातून सुटका करणे हे एथिकली योग्य आहे असे मला वाटते.<<
>>इथिकली च नाही तर कायदा ही याला मान्यता देतो.. फ़क्त असे गर्भपात प्रशिक्षित आणि यासाठी प्रमाणित डॉक्टर यांच्याकडे योग्य त्या संपूर्ण तपासन्या करुण केले जावेत, अस कायदा म्हणतो..त्यासाठी प्रोसेस आहेत.

> त्या डॉक्टरांचं भलं होऊ दे! अडचणीत आलेल्या मुलीला मदत करत असतील तर चांगलंच आहे <<
>> आता याला काय म्हणाव..??? डॉक्टरांच् भल होऊ दया..मग डॉक्टरांच् भल करण्यासाठी काय आता अवैध गोष्टींना समर्थन द्यायच?? उद्या तुम्ही म्हणाल अहो त्या सोनाग्राफी वाल्यांच् भल होऊ दया.. मग काय लिंग परिक्षणाला आणि स्त्री भ्रूण हत्येला परवानगी द्यायची??
कैच्याकै काहीही..?

यावर काही तात्विक आक्षेप असेल तर टाका..नाहीतर अपवादात्मक स्थितित सोडून कायद्यालाही मी जे लिहल तेच अपेक्षित आहे. >> कायदा बनवणारेदेखील माणूसच आहेत. त्यातदेखील चूका असू शकतात.

• तुम्ही जी पहिली केस दिली आहे लेखात त्यात लिंगसापेक्ष गर्भपाताचा प्रश्न होता का?
• ती मुलगी विवाहित होती का?
• असली तरी मुल संभाळू शकेल अशी शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती होती का त्या जोडप्याची?
• गर्भपात न करण्याइतकी शारीरिक कमजोर असलेली मुलगी पूर्ण काळ गर्भार राहून डिलिव्हरी करू शकते का?
• गर्भपात हा नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा जास्त रिस्की असू शकतो का?

===
सोनग्राफी मशीन नसतील पण गर्भपात होते.. अवैध गर्भापात होते.. त्यातून मृत्यु होत होते.. म्हणुन कायदा करावा लागला. साधी बाब आहे.. गरज नसताना कायदा केल्या जाईल का?? >>
• कोणाचे मृत्यू होत होते? मातेचे ना? आणि ते का होत होते? unhygienic शस्त्र, अप्रशिक्षित वैदू?
• मातेचए मृत्यू होऊ नयेत म्हणून कायदा केला असेल तर मग " गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे." हे सगळे काय आहे?

===
मग काय लिंग परिक्षणाला आणि स्त्री भ्रूण हत्येला परवानगी द्यायची??
कैच्याकै काहीही..? >>
https://www.youthkiawaaz.com/2017/12/the-preconception-prenatal-diagnost...

अर्थात बेजबाबदार मातृत्वातून सुटका होऊ शकते हे दिसले की असा बेजबाबदारपणा वाढू शकतो आणि त्याचा भार अथवा दुष्परिणाम समाजाला सोसावा लागू शकतो. यासाठी एकल मातृत्व, विवाहपूर्व अथवा अविवाहित मातृत्व हे समाजमान्य व्हायला हवे. हे व्यभिचारी मातृत्व नव्हे. परदेशांतून अशी मान्यता मिळाल्यामुळे तिकडे ही समस्या फारशी उरलेली नाही. >>
आपल्या लोकसंख्येचादेखील विचार करावा कायदे बनवताना. ती जी टाइम्सचा लिंक आहे त्यात लिहलंय कि
दरवर्षी ४.८ कोटी गर्भधारणा होतात.
आणि त्यातल्या निम्म्या unplanned असतात ie २.४ कोटी.
गर्भपात १.६ कोटीचे होतात.

या वरच्या unplanned पण 'हत्या नको' दबावाखाली जन्माला घातलेल्या ०.८ कोटी मुलांचा भार कशाला हवा समाजावर, देशावर, साधनसंपत्तीवर दरवर्षी?

http://www.misalpav.com/node/39110 इथेदेखील काही चर्चा झाली आहे ती वाचून पहा.

• २० आठवडे हे लिमिट कसे आले ते लिहिले आहे.
• त्या लिमिटनंतरही गर्भपाताची गरज का पडू शकते अशा केसेस लिहिल्या आहेत.
• कॅनडा, चीन आणि व्हिएतनाम मधे गर्भपात कधीपर्यंत करावा यावर काहीच लिमिट का ठेवले नाहीय?
• बाकीच्या विकसीत देशातही २४-२६ आठवडे लिमिट का आहे?
• २७-२८ आठवडेपर्यंत गर्भ viableच नसताना त्याला जीव का म्हणताय?
• भविष्यातल्या स्त्रिया जन्माला घालाव्या म्हणून वर्तमानातल्या स्त्रियांची शरीरं publicly कंट्रोल का करताय?

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड.
अॅमीना सहमत.

आता ही चर्चा प्रो लाईफ आणि प्रो चॉईस वळणावर गेली आहे. मी सोशली लिबरल आहे आणि तुम्ही कॉन्झर्वेटीव्ह आहात. यापुढे आपली मते एकमेकांना पटणे शक्य नाही. या मुद्द्यावर शेवटची पोस्ट.
बाकी,
भारतात आता कॉन्डोमची जाहिरात कधी करावी यावर निर्बंध यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यात 'डाऊन सिंड्रोम' डिटेक्ट झाले तरीही गर्भपात करू देऊ नये असा कायदा लवकरच पास होऊ घातलाय.
त्याचवेळी आईसलँड मध्ये डाऊन सिंड्रोम समजल्यावर गर्भपाताला परवानगी (सक्ती नाही) असल्याने तो आजार इरॅडिकेट होऊ घातलाय.

तुम्ही जी पहिली केस दिली आहे लेखात त्यात लिंगसापेक्ष गर्भपाताचा प्रश्न होता का?
• ती मुलगी विवाहित होती का?
• असली तरी मुल संभाळू शकेल अशी शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थिती होती का त्या जोडप्याची?
• गर्भपात न करण्याइतकी शारीरिक कमजोर असलेली मुलगी पूर्ण काळ गर्भार राहून डिलिव्हरी करू शकते का?
• गर्भपात हा नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा जास्त रिस्की असू शकतो का?

पहिली केस लोणार ची.. मुलगी १५ वर्षाची
५ महिन्याची गर्भवती.. यागोदरच्या प्रतिसादात ही स्पष्ट केले आहे की जिल्हा शल्य चिकत्सक यांच्या तपासणी टीम ने जाहिर केले आहे की सदर मृत मुलीवर गर्भपात करने नुसते अवैध नाही तर मानवतेच्याही दृष्टीने चुकीचे होते. सदर मुलगी या क्रियेसाठी शाररिक दृष्टया बिलकुल तैयार नव्हती संबदित डॉक्टर ने तात्काळ जिल्हा रुग्नाल याशी संपर्क करुण तिला त्याठिकानि दाखल करायला हवे होते.. जरी केस लिंग सपेक्षतेची नसली तरी एका जीवाचा प्रश्न होता.. आणि आपण उपस्थित करत असलेल्या मुद्द्यापेक्षा एकाद्याच्या जीवाची किंमत नक्कीच जास्त असू शकेल!! असो, समोर असे की जर त्या मुलींचा अवैध गर्भपात करण्यात आला नसता आणि तिला योग्य उपचार मिळाले असते तर यातून काहीतरी मार्ग निघाला असता. एकतर निषणात् डॉक्टर यांच्या हस्ते तिची सर्जरी झाली असती किंव्हा तिला डिलवरी साठी सक्षम बनविल्या गेले असते.. त्यानतर होणाऱ्या अपत्याचे काय?? तर यावरहि पुढे अनेक मार्ग आहेत. पण त्या मुलींचा जिव वाचला असता.. मुलगी वाचली असती तर तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला गेला असता.. इथे, बदनामी झाली असती.. समाजाने स्वीकारले असते का?? हे पुळचट मुद्दे बिनकामचे आहेत.. जिव वाचला असता.. तो चुकीच्या मोहापायी मारला गेला.. या प्रकरणाला आज २०-२२ दिवस होत आहेत.. अजुन कुणाचीच जमानत नाही..हे त्यामुळेच..

मातेचए मृत्यू होऊ नयेत म्हणून कायदा केला असेल तर मग " गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे." हे सगळे काय आहे?

>> त्याच अस आहे.. गर्भ हा सजीवच असतो.. यात काही शंका नाही.. आणि हा सजीव मारन्याची परवानगी कशी दिली जाते तर.. यागोदर एका प्रतिसादात मी गर्भापत कोणत्या अवस्थेत केला जातो ते स्पष्ट केले आहे.. एक जिव वाचविण्यासाठी म्हणजेच आईचा जिव वाचविण्यासाठी गर्भापत करण्याची परवानगी आहे.. मेडिकल दृष्टया आवश्यक प्रकरणात असे निर्णय घेतले जातात..

ऍमी, मस्त पोस्ट्स.

हरिदास, तुम्ही फार गोंधळले आहात. नक्की मुद्दा काय - सर्व प्रकारचे गर्भपात बंद व्हावेत आणि अतिरिक्त लोकसंख्येच्या दबावाखाली भारत इंडियन ओशनमध्ये बुडून जावा - सगळे प्रॉब्लेम कायमचेच सम्पतील.

की फक्त स्त्रीलिंगपरीक्षा आणि त्यांनंतरच्या गर्भपाताला विरोध आहे? जगातील अनेक वेस्टर्न देशात जेंडर आधी सांगायला बंदी नाही. पण तिथे मुली पोटात मारत नाहीत. कारण तिथे समाज स्त्रियांना आदराने वागवतो. दोन महिन्याच्या मुलीवर बलात्कार फक्त भारतात होत असावेत. मग कोणी पालकांनी विचार केला की त्यापेक्षा पोटातच सहा महिने आधीच मुलीला संपवू तर ते नराधम? का देश जबाबदार या प्रकाराला?
म्हणजे लिगली पालक व डॉक्टर गुन्हेगार हे माहीत आहे पण समाज मानसिकता सुधारल्याशिवाय काही सुधारणार नाही.

खरंतर काही वर्ष या प्रकाराला लीगल परवानगी द्यावी. बघावं काय होतं ते. देश ठप्प पडेल , पुरुष जमातीवर रेप होऊ लागतील आणि जग मुस्लिम किंवा आफ्रिकन देशांइतकीही किंमत देणार नाही तेव्हा मे बी अक्कल येईल.

दोन महिन्याच्या मुलीवर बलात्कार फक्त भारतात होत असावेत. मग कोणी पालकांनी विचार केला की त्यापेक्षा पोटातच सहा महिने आधीच मुलीला संपवू तर ते नराधम? का देश जबाबदार या प्रकाराला?
>>>>>>>>

आपला देश आपला समाज मुलींनी सुरक्षित जगण्यायोग्य नाही म्हणून त्यांना गर्भातच मारून टाकणे योग्य आहे याचे समर्थन कसे होऊ शकते ?
पचायला जड जातेय ! Sad

हरिदासच का? मला तर सगळेच गोंधळलेले वाटतात या विषयावर.
पोटातला गर्भ, ज्याचं हृदय चालू आहे, तो जन्म होईपर्यंत सजीव नसतोच असं एकीकडे मानायचं आणि दुसरीकडे तो गर्भ डॉक्टरने कुत्र्याला खायला घातला म्हणून हळहळायचं. म्हणजे मर्डर करायला हरकत नाही, पण प्रेताची विल्हेवाट मात्र ठीक लावायला हवी, असंच का?
गर्भहत्येच्या सगळ्या केसेस 'अडचणीत आलेल्या' मुलींच्या असतात असं वाटतंय? केवळ संततीनियमनाची साधनं वापरायचा आळस आहे म्हणून, आणि कायदेशीर सोय आहे म्हणून बायकोला तीन-तीनदा गर्भपात करायला लावणारे महाभाग आहेत.
डाऊन सिंड्रोमवालं मूल नको आहे म्हणून गर्भहत्या जस्टिफाय होत असेल तर मुलगी आहे म्हणून सुद्धा का होऊ नये? मुलींना जगण्याचा हक्क आहे तर डाऊन सिंड्रोमवाल्या बालकाला का नाही? (आता कोणीतरी 'तुम्हीच संभाळा मग त्या मुलांना' असं म्हणत येईल. मी केवळ तात्विक पातळीवर प्रश्न विचारतो आहे. उत्तर माझ्याकडेही नाही) आणि गर्भपातामुळे डाऊन सिंड्रोम 'एरॅडिकेट' होत नाही. तो काही साथीचा आजार नाही. हे थोडक्यात 'गरीबांना संपवून गरीबी संपवण्यासारखं' आहे.
समाजाला सर्वच नकोश्या मुलांचा प्रॉब्लेम सोडवता येणे शक्य नाही म्हणून कायदेशीर मान्यता मिळालेलं एक नेसेसरी इव्हिल आहे हे. पण नेसेसरी असलं तरी इव्हिल आहेच, हे सत्य आहे.
गर्भहत्येला मान्यता असावी, पण ती 'स्त्रियांचा हक्क' म्हणून नाही, तर एका न सोडवता येणार्‍या कोड्याचं सोल्युशन, म्हणूनच.

डाऊन सिंड्रोमवालं मूल नको आहे म्हणून गर्भहत्या जस्टिफाय होत असेल तर मुलगी आहे म्हणून सुद्धा का होऊ नये?
>>>>

डाऊन सिण्ड्रोमवालं अपत्य =\= मुलगी अपत्य.

जाऊन झोपतो आता मी .....

जाता जाता अवांतर(?) .. फार वर्षांपूर्वी मी मायबोलीवर लेख लिहिला होता - "मला मुलगीच हवी" (नंतर लिंक शोधून देतो) - त्यात मला मुलगीच का हवी याची प्रामाणिक कारणेही दिली होती. आजही मी त्या मतावर / आवडीवर ठाम आहे. मला मुलगीच हवी आहे.

...... फक्त फरक ईतकाच, मुलगा झाला तर मी त्याला मास्णार नाही !

पाय,
https://www.cbsnews.com/news/down-syndrome-iceland/
१८ व्या आठवड्याच्या जवळपास जी अल्ट्रासाउंड होते ज्यात लिंग समजू शकते त्यातच क्रोमोझोम डिफेक्ट समजू शकतो (८५% विथ प्रोबॅबिलिटी इ.) तर तेव्हा बऱ्याचश्या देशात फीटसचं लीगल गर्भपात वय (२० आठवडे) झालेलं नसतं आणि गर्भपात शक्य असतो. बाकी भारतात सोनोग्राफी
करतच असतील ना? त्यात त्या टेक्निशिअनला आणि तुम्ही उपस्थित असाल तर तुम्हाला जेनेटल्स दिसतीलच ना?

डाऊन सिंड्रोम नको मग मुलगी पण नको असं का नाही? कारण मुलगी असणे हा आजार नाही. भारतात तो आजार बनला आहे, आणि म्हणूनच लोकं कायद्याने होत नाही म्हणून बेकायदा ते करायला जातात. रादर म्हणूनच सोनोग्राफी, आणि डॉक्टरला पकडणे ही वर वर मलम पट्टी आहे हे वर अनेक लोकांनी म्हटलं आहेच. आजारावर इलाज करायचा असेल तर मुलगा/ मुलगी यातील सामाजिक अंतर संपणे अर्थात लोकशिक्षण इ. लॉंग टर्म उपाय हवेत.
डाऊन सिंड्रोम होईल अशी क्रोमोझोमची जुळणी होऊ नये म्हणून काही इंजेक्शन इ. तयार झाले तर ते खरे उच्चटन असेल हे मान्यच. अशा मुलांना जन्मू न देणे हे समूळ उच्चटन नाही हे समजतंय. त्याच प्रमाणे हृदय, मेंदू किंवा इतर अवयवांत काही सिरीयस व्यंग आहे अशा केसेस मध्येही डॉ. प्रेग्नन्सी टर्मिनेट करायचा सल्ला देतात. हा चॉईस भावी पालकांना असायलाच हवा.

>>केवळ संततीनियमनाची साधनं वापरायचा आळस आहे म्हणून, आणि कायदेशीर सोय आहे म्हणून बायकोला तीन-तीनदा गर्भपात करायला लावणारे महाभाग आहेत.>> हे पर्सनल नाही वाटत का? कोणी किती वेळा गर्भपात करावा आणि कोणी संततीनियमन वापरावं, का आळस करावा हे ज्याचं तो ठरवेल की!!
करायला 'लावणारे' वर भर असेल तर त्या बायकोला नाही का काही ठरवता येते? का भारतीय असहाय्य सामाजिक/ आर्थिक/ बौद्धिक मागासलेली बायको आहे? पुरुषाने गर्भपात करायला 'लावला' यावर कायदा काय करणार? तर डॉक्टरला पकडणार !!! वा रे वा!

बाकीच्यांचे माहित नाही पण मी, अमितव आणि सनव हे तिघेतरी गोंधळलेलो नाहीय!

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड.

हाच आमचा स्टँड आहे.

===
अमितव, बाकीच्या पोस्ट्सना सहमती.

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा.
>>>>

मला असे वाटते की त्या बाईने गर्भ धारण करण्यास मदत केलेल्या पुरुषाला पैसे मोजावेत आणि गर्भावर पुर्ण हक्क मिळवावा. हे तात्विकदृष्ट्याच नव्हे तर कायदेशीर दृष्ट्याही योग्य राहील आणि कोणावर अन्याय होणार नाही. त्या गर्भावर हा अन्याय असू शकतो पण जन्म घेतल्याशिवाय त्याला कुठलीही कायदेसुविधा देण्यात येऊ नये.

अवांतर - धागा मजेशीर वळणावर आला आहे. प्रत्येकाला असे वाटतेय की तो स्वत: सोडून ईतर सारे गोंधळलेले आहेत. पण बहुधा फक्त मलाच प्रामाणिकपणे असे वाटतेय की मी स्वत: गोंधळलेलो आहे Happy

पैसे मोजवेत इ. लिहून चर्चा भरकटवून विकृत गम्मत बघू देणार नाही. इतरांनी ही असल्या कमेंट इग्नोर मारा अशी विनंती.

>>गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड.

+१

पैसे मोजवेत इ. लिहून चर्चा भरकटवून विकृत गम्मत बघू देणार नाही.
>>>>>

स्त्रीच्या पोटातील गर्भावर स्त्री पुरुष, नवरा बायको दोघांचा हक्क असतो. म्हणजे त्या निर्मितीमागे दोघे असतात. तुम्हाला (ज्या कोणा पुरुषाला ) सबसिडी स्वेच्छेने सोडतात तसे तो हक्क सोडायचा असेल तर तो सोडा. पण आमचा हक्क का नाकारत आहात?

उद्या माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे लग्न झाले. आम्ही दोनचार वर्षांनी एक मूल प्लान केले. गर्भधारणा झाली. त्यानुसार मी स्वप्ने बघायला सुरुवात केली. त्यानुसार माझे इन्वेस्टमेट प्लान केले. त्यानुसार मी माझे करीअर, माझी नोकरी, राहते घर कुठे असावे ईत्यादी निर्णय घेतले. आणि अचानक एके दिवशी तिला वाटले की नको याने आपली करीअर स्पॉईल होईल. मी गर्भपात करते. तर तो निर्णय मी अगदी शून्य मुकाटपणे मान्य करावा?

बरं मी उद्या या मुद्द्यावर डिव्होर्स फाईल केला तर पोटगीही मलाच द्यावी लागेल...

ऋ. तुझा मुद्दा घेऊन वेगळा धागा काढ. तुझी केस कौटुंबिक कलहांतर्गत येते. विषयांतर आहे. प्लिज वेगळा धागा.... एवढा हा वरचा प्रतिसाद उचलून काढलास तरी चालेल...

गर्भपाताचा अधिकार गर्भधारीत स्त्रीला असावा असे वाटते.अनवाँटेड प्रेगनंसी टाळता यावी म्हणून काँट्रासेप्टीव वापरावेत.
ता.क.-- सध्या "ब्रह्मचर्य हेच जीवन विर्यनाश हा मृत्यु असे तत्वज्ञान असणार्या षंढांच्या ताब्यात देश आहे,त्यांनी म्हने कंडोमच्या जाहीरातीवर बंदी घातली आहे.षंढांचा ज्या गोष्टींशी संबंधच नाही त्या बद्दल निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे काय?

नानाकळा, वर चर्चा चालू होती की गर्भाबाबतचे सर्व हक्क स्त्रियांनाच असावेत त्याचे खंडन करायला म्हणून ते उदाहरण दिले आहे. याऊपर कौटुंबिक गृहकलहावर वेगळा धागा काढायची सध्या तरी मला गरज वाटत नाही. आमच्यापुरता आम्ही एग्रीमेंट करून हा प्रॉब्लेम सोडवला आहे Happy

सनव
"हरिदास, तुम्ही फार गोंधळले आहात. नक्की मुद्दा काय - सर्व प्रकारचे गर्भपात बंद व्हावेत आणि अतिरिक्त लोकसंख्येच्या दबावाखाली भारत इंडियन ओशनमध्ये बुडून जावा - सगळे प्रॉब्लेम कायमचेच सम्पतील.<<
>> माझ्या मते गोंधळ आपला झालाय.. मुद्दा अवैध गर्भपाताचा आहे.. लेखातही प्रतिसादातही मी तेच मुद्दे मांडतोय.. पण झालाय काय की. परदेशातील नियमांशी तुलना करुण संभ्रम निर्माण होतोय..

Submitted by π on 14 December, 2017 - 02:02<<
>> ही प्रतिक्रया मूळ मुद्द्याला स्पर्श करते..

गर्भपात क धि ही ... नोट... क_धि_ही करण्याचा संपूर्ण अधिकार गर्भ राहिलेल्या बाईला असावा. त्याचे कोणतेही कारण कोणालाही देण्याची तिला गरज नसावी. पिरीयेड.> >>>>> टिंग टांग! हेच मी त्या टपराट खुकखु च्या धाग्यावर लिहिलेलं तर काय एकेक पोस्ट आलेल्या.

टिंग टांग! हेच मी त्या टपराट खुकखु च्या धाग्यावर लिहिलेलं तर काय एकेक पोस्ट आलेल्या. >> हेच मी त्या पूर्वी पटेल केस नंतर एका पुरोगामी साईटवर सांगायचा प्रयत्न केलेला तर काय एकेक फोबियाग्रस्त उच्चमध्यम वर्गातले पुरुष थयथयाट करायला लागले Angry

Pages