गोत्र असत का ?

Submitted by महेश ... on 21 June, 2016 - 11:20

सर्वाचि जाहिर मफि मगतो हा धाईसी प्रश्न विचर्तो म्हनुन.

गोत्र खरच असत का हो ? काहि जण् म्हण्तात ब्रम्ह ने हे विश्वा तयार केल . त्यानेच प्रिथ्वि वरति प्रथम पहिल जिव आणला. म्हण्जे आपण सर्व त्यान्चिच मुले . मग आपाप्ल्यत गोत्र वेगल का. आप आपले गोत्र एकच पाहिजे.
गार्ग्य रुशि , भारद्वाज रुशि ह्यन्चे वडिलान्च गोत्र कुथल होत.

एखद्या मनुश्या कडे बघुन आपन त्यच गोत्र का नाहि सान्गु शकत.

समाण गोत्र असणार्या लोकान मध्ये कोनते गुनधर्म सार्खे असतात?

हे पुर्ण विश्वा ब्रम्हा ने तयार केल. ह्याप्रमाणे पश्चिमात्य देशाति ल लोकन्मध्ये गोत्र कुथल्या स्वरुपात आहे.

शास्त्रिय द्रुश्टि कोणतुन कोनि ह्याचे उत्तर देउ शक्लात तर फार मदत होइल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> मुद्दाम असे लिहित असावेत का? <<< होय... स्वतंत्र वेगळी आयडेन्टीटी "जपण्याचा" तो राजरोस मार्ग आहे सध्याचा... Wink हे म्हणजे गल्लोगल्ली दिसणार्‍या "प्रतिष्ठान" ऐवजी "प्रतिष्ठाण" लिहिण्यासारखेच आहे.....
आता "कुणापासुन वेगळे आहोत असे दाखवायचे आहे" ते वेगळे सान्गायलाच हवे का? Lol

लिंबूदा, जर कोणाला गोत्र माहित नसेल तर कोणते गोत्र घेतलेले चालते ? युनिवर्सल डोनर ? कश्यप का ?

प्रश्नाची उत्तरे असतिल तरच मिळतिल ना? साक्षात ब्रम्हाबी याची उत्तरे देऊ शकणार नाहित तेंव्हा मजेशिर प्रतिसादांचा अस्वाद घ्या..

पियू, विपु वाचली, पण "द्यायला" उत्तरच नाहीये माझ्याकडे.... Sad
वेळेअभावी ढीगभर कामे मागे सारली आहेत ति पुढे पुढे करताहेत.
याचा गोत्राशी काय संबंध? Wink

प्राचीन काळी भारतात अनेक ट्राम रुट्स होते. माणूस कोणत्या ट्राम रुटने जातो यावरून Go Tra(m) ठरत असे.

गोत्राचा आणि जीन्सचा फारच शास्त्रिय संबंध आहे.वंश म्हणतात त्याला.निरनिराळ्या वंशाच्या लोकांच्या रक्ताचे नमुने गुपचुप गोळाही केले जातात.वेगवेगळे वंश एकाच अॅडममधून कसे झाले हे कोडेच आहे.

जगातील इतर देशांतील लोकांनाही गोत्र असतील पण बिचारे अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहेत. त्यांना याबाबतचे ज्ञान देण्यासाठी भारतातुन एक टिम पाठवली पाहिजे. खरेतर संपुर्ण जगातील प्रगत देशांशी करार करायला हवा. तुम्ही आम्हाला science,technology यांचे ज्ञान दया. आम्हि तुम्हाला धार्मिक ज्ञान देतो.

गोत्र सर्वानाच असते. माणूस कुठल्या जाती किंवा धर्माचा असो शास्त्र सांगते गोत्र सगळ्यांचं असते. स -गोत्री लग्न करू नये असं सांगतात आणि त्यामागे तथ्य आहे .. आज कुठलंही व्यसन नसलेल्या माणसाला कॅन्सर का होतो.. तृतीय पंथी लोकांची संख्या का वाढली आहे..? ते कशे जन्र्माला येतात. जन्मतः मुल मतिमंद किंवा अपंग का होतात? डॉक्टरांकडे किती तरी अश्या प्रश्नांची उत्तरे नसतात. हे सगळं गोत्राचा विचार न करता विवाह केल्याने होते.

गोत्र सर्वानाच असते. माणूस कुठल्या जाती किंवा धर्माचा असो शास्त्र सांगते गोत्र सगळ्यांचं असते
>>>
थोतांड आहे गोत्र वगैरे. सुज्ञाने विश्वास ठेऊ नये.
गोत्र वगैरेचे नावाने प्रचारकी बोलणार्या व्यक्तीला तुझ्या दहा पिढी आधीच्या पुर्वजाचे पुर्ण नाव सांग असा प्रश्न करावा.काहीतरी घुमजाव करुन पळुन जातात असले लोक.
ऋषीमुनी आपले पुर्वज होते ही लोणकढी थाप आहे.एक तर त्याकाळचे ऋषीमुनी ब्रह्मचारी असायचे,जर त्यांना बाप मानयचे असेल तर ते मुळात ऋषीच नव्हते या कन्लुजनला यायला लागेल.
जवळच्या नात्यात लग्न करु नये हे मात्र खरे.

गोत्राला पूर्वी महत्व होते.बहुधा एका ऋषिकुळातील मुला मुलींनी विवाहाचा विचार एकमेकांबद्दल करुन मनात अभ्यासाच्या वेळी लफडे लोचे उत्पन्न करुन घेऊ नये म्हणून.
हल्ली ऋषी घरी लोक शिकायला जात नसल्याने गोत्राचा वापर फक्त 'पोलाईटली नाही म्हणायचंय' अश्या स्थळांसाठी एक्स्क्युज म्हणून करावा.
समान नात्यात लग्न मात्र करु नये.एखाद्या रोगाचे जीन्स असल्यास दूषित पूल जास्त जास्त दूषित होऊन पुढच्या पिढ्यात जात राहतो.

ऋषी म्हणजे ब्रह्मचारी नव्हेत. मुनी म्हणजे ब्रह्मचारी. ऋषी म्हणजे सायंटीस्ट-संशोधक-एखाद्या विद्याविषयात पारंगत व्यक्ती. इतक्या ऋषींच्या पत्नी आणि त्यांचे किस्से प्रसिद्ध असतांना अक्कलशून्य यांना माहित नाही हे आश्चर्य.

समान गोत्र म्हणजे काय हो?

समाजा माझे आडनाव भिडे आहे,
वडील भिडे, आई परांजपे
वडिलांची आई भावे, आई ची आई साने

म्हणजे माझ्या मध्ये भिडे परांजपे यांचे 50-50% जीन्स आहेत ना?
झालेच तर भावे ,साने यांचे काही जीन्स (पायाभूत मानणे असे की या सगळ्या घराण्यात एकही दत्तक विधान झाले नाहीये, करण दत्तक झाले असेल तर पूर्ण जीन्स पूल बदलेल)

मग मी आज लग्न करताना फक्त भिडे आडनावाचे जे गोत्र असेल त्याचाच विचार का करावा?

* वर दिलेली नावे रँडम आहेत त्यामधे विशिष्ट जाती धर्म आणू नयेत.
** दिलेल्या नावाची गोत्रे माहीत नाहीत, चुकून सगोत्रीय असतील तर वेगवेगळ्या गोत्रांची आडनावे घालावीत.

मुद्दा माझ्यामध्ये झालेल्या 4 गोत्रांच्या भेळीचा आहे, आणि त्याला अनुसरून कोणते गोत्र अव्हॉइड करावे हा आहे , इकडे लक्ष द्या.

सिम्बा, मला वाटतं की भिडे आडनावाचं जे गोत्र असेल त्याच गोत्राशी लग्न करता येणार नाही कारण ते सगोत्र होईल. त्याबाहेर कोणतंही गोत्र चालू शकेल.
आता किती आडनावं एकच गोत्र शेअर करतात वगैरे माहिती नाही.

https://www.wikipedia.org/wiki/Mitochondrial_Eve
सगळ्यांची आई एकच आहे.म्हणजे सगळे भाऊ बहीणच असायला हवेत.माझ्यामते गोत्रातली हवा काढायला एव्हढी लिंक पुरेशी आहे.
मायटोकाँड्रीया काय आधी ते गुगल करुन बघा

तोच माझा मुद्दा आहे,
लोक सगोत्र म्हणजे सेम जीन्स पूल वगैरे लॉजिक देतात,

माझ्या माझ्या मध्ये आई आणि वडिलांचे 50%जीन्स आले असणार आहेत,
मग त्या न्यायाने मातुल घराण्यात लग्न केल्याने सुद्धा 50% सेम जीन्स पुलच आहे,

म्हणून मला तरी सगोत्री विवाह टाळण्या मागे जीन्स पूल वगैरे कारण असेल हे पटत नाही.

गोत्राबरोबर आपल्याकडे महाराष्ट्रात देवक हा प्रकार असतो त्याविषयी कोणाला काही माहिती आहे का ?
सारखं देवक असणाऱ्या कुटुंबात लग्न करत नाहीत गोत्राप्रमाणेच
महाराष्ट्र सोडून बाकी भागात याच्या सारखा काही प्रकार आहे का ?
देवक म्हणजे टोटेम हे मात्र पक्क ..

पाश्चिमात्य लोकांचे गोत्र कोणते ?>> त्यांच्या वाड वडीलांची ओळख पण आम्ही सांगायची का? कुरेशी, ब्रिटिश शाही कुटुंब, हे सगळे तुमच्या आमच्या सारखेच. आमचा त्यांचा रोटी बेटीचा व्यवहार चालतो.

मुस्लिम मुलीने इतर धर्मिय मुलांशी लग्न केल्यास जो बिघडतो तो शास्त्रिय नियम. अशा प्रकारे शास्त्रिय द्रुष्टीकोन जोपासल्यावर अनेक उत्तरे मिळतील.

पाश्चिमात्य लोकांचे गोत्र कोणते ?>> त्यांच्या वाड वडीलांची ओळख पण आम्ही सांगायची का? कुरेशी, ब्रिटिश शाही कुटुंब, हे सगळे तुमच्या आमच्या सारखेच. आमचा त्यांचा रोटी बेटीचा व्यवहार चालतो.

मुस्लिम मुलीने इतर धर्मिय मुलांशी लग्न केल्यास जो बिघडतो तो शास्त्रिय नियम. अशा प्रकारे शास्त्रिय द्रुष्टीकोन जोपासल्यावर अनेक उत्तरे मिळतील.
>>
पुर्विच्या काळी मान्सिक रोग, विक्रुति निर्मान होन्याचे प्रमाण भारतात कमी होते. आज काल अननस साग्तात त्या प्रमाणे पाश्चिमात्य लोकांचे गोत्र शोधत बस्लो आणी आपलेच विसर्लो त्याचे परीणाम दिसत आहेतच.

थोतांड आहे गोत्र वगैरे. सुज्ञाने विश्वास ठेऊ नये.
गोत्र वगैरेचे नावाने प्रचारकी बोलणार्या व्यक्तीला तुझ्या दहा पिढी आधीच्या पुर्वजाचे पुर्ण नाव सांग असा प्रश्न करावा.काहीतरी घुमजाव करुन पळुन जातात असले लोक.
ऋषीमुनी आपले पुर्वज होते ही लोणकढी थाप आहे.एक तर त्याकाळचे ऋषीमुनी ब्रह्मचारी असायचे,जर त्यांना बाप मानयचे असेल तर ते मुळात ऋषीच नव्हते या कन्लुजनला यायला लागेल.
जवळच्या नात्यात लग्न करु नये हे मात्र खरे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अक्कलशून्यजी दहा पिढी आधीच्या पुर्वजाचे पुर्ण नाव माहित नसले आणि गोत्र नमानणारि व्यक्तिचे आपल्याच पुर्वजाच्या नातेवाएकाशि लग्न जुळुन येण्याची शक्यता किति असेल??