मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय ?

Submitted by विचारजंत on 28 November, 2017 - 12:14

शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते -

बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नावे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बघितल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही .

तरुण मुलांबाबत प्रश्न

१) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता

२) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ?

३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ?

४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे .

कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल

१) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ?
२) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? (
४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही .
५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा).

२-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे .

तरी माझा data सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय

मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात !
आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे )

तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही !

मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .

Group content visibility: 
Use group defaults

https://www.maayboli.com/node/62460
"आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्‍यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत.

याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अ‍ॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे."

कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे
<<
मेहमूद नामक माणसाने कुंवरा बाप मध्ये याचंच मार्मिक चित्रण केलंय

अजय यांनी मराठी माध्यमातून शिकून सिइओ वगैरे झालेल्यांची जी भलीमोठी लिस्ट दिली आहे, त्यातल्या निदान महाराष्ट्रात रहाणार्‍या किती जणांनी *आपल्या* मुलांना आवर्जून मराठी माध्यमात घातलं आहे, ते माहित करून घ्यायला आवडेल. पंचवीस वर्षांपूर्वी यशस्वी होण्यासाठी जेवढं लागत होतं तेवढं आता पुरत नाही. कारण आजच्या युगात सबस्टन्सपेक्षा आत्मविश्वास आणि दिखाऊगिरीला महत्व आहे आणि मराठी माध्यमातल्या मुलांना तिथे थोडा ड्रॉबॅक नाही म्हटलं तरी येतोच. इथे मी ॲव्हरेज मुलांबद्दल बोलत आहे, जिनियसबद्दल नाही. आपल्या आणि आताच्या पिढीदरम्यान जग अफाट बदललं आहे. वीसतीस वर्षांपूर्वीचा मराठी शाळांचा दर्जा आजही तसाच राहिला आहे असं कोणाला वाटत असेल तर ते अजून ऐशीच्या दशकातच वावरत आहेत असं म्हणायला लागेल. आज पुण्या-नागपुरात काम करणार्‍याला उद्या उठून परराज्यात / परदेशात जावे लागले तर मराठी माध्यमात शिकणार्‍या त्याच्या मुलाचा निश्चितच तोटा होईल. आजच्या कट-थ्रोट युगात भाषा जपण्यासाठी ज्यांना मुलांच्या भवितव्याशी तडजोड करायची आहे त्यांनी ती खुशाल करावी.(आणि हिंदी,उर्दू आणि संस्कृत अशा कित्येक भाषांची भेळ जमवून बनलेल्या एका बास्टर्डाइझ्ड भाषेत असं आवर्जून जपण्यासारखं आहे तरी काय? असो)

अजय यांनी मराठी माध्यमातून शिकून सिइओ वगैरे झालेल्यांची जी भलीमोठी लिस्ट दिली आहे, त्यातल्या निदान महाराष्ट्रात रहाणार्‍या किती जणांनी *आपल्या* मुलांना आवर्जून मराठी माध्यमात घातलं आहे, ते माहित करून घ्यायला आवडेल.
>>>>>>

विचार करण्यासारखा मुद्दा आहे !
जर यशस्वी झालेल्यांनी मराठी माध्यमात घातले नसेल तर अयशस्वी झालेले कदापि घालणार नाही.
कदाचित ज्यांचा नाईलाज असतो वा पर्याय नसतो त्यांचीच मुले बहुतांश मराठी माध्यमात शिकत असावेत. काही अपवाद असतातच. त्यांची मोजकी उदाहरणे देण्यात अर्थ नाही

(आणि हिंदी,उर्दू आणि संस्कृत अशा कित्येक भाषांची भेळ जमवून बनलेल्या एका बास्टर्डाइझ्ड भाषेत असं आवर्जून जपण्यासारखं आहे तरी काय? असो) >> wow! Please mind your words. अज्ञानातून प्रकट झालेल्या अशा विचारांची कीव येते! असोच!

वाह्यात यांच्यासारखे टेरिफिकली फ्रॅकचर्ड विचार असलेले बरेच लोक आहेत. मी गेल्या तीन वर्षांपासून जालावर "मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण" या विषयावर लिहीत आहे. अवतरण चिन्हातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा व अर्थपूर्ण आहे. मराठी माध्यम विरोधक हे कधीच समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे.

इंग्रजी चा विरोध कोणीही करत नाही. उच्च शिक्षण ज्या भाषेतून सहज उपलब्ध असेल त्यातून घेतलेच पाहिजे. नीट शिकलो तर सर्वसाधरण आयक्यु असलेला मनुष्य किमान तीन भाषांत प्राविण्य मिळवू शकतोच. त्यामुळे इंग्रजीचा बाऊ करणे गरजेचे नाहीच.

इंग्रजीमाध्यम प्रेमी पालक फार विचित्र अवस्थेत आहेत, त्यांना समजून घेतलं पाहिजेच. पण त्याबरोबर मराठी माध्यम समर्थक काय म्हणत आहेत हेही एकदाचे समजून घ्यावे अशी अपेक्षा आहे.

शिक्षण म्हणजे फक्त पैसे आणि चांगली नोकरी एवढाच संकुचित विचार करणारा लेख
त्याही पलीकडे काही जग आहे का नाही राव ?
आणि IIT, IIM मध्ये शिकून पण असेच विचार असतील तर काय फायदा त्याचा Happy
असाच विचार प्रकाश आमटे, अभय व राणी बंग अशा सारख्या उच्चशिक्षित
लोकांनी केला असता तर ?
>> नानाकळा, आ.रा.रा. ह्यांचे प्रतिसाद पटले

(आणि हिंदी,उर्दू आणि संस्कृत अशा कित्येक भाषांची भेळ जमवून बनलेल्या एका बास्टर्डाइझ्ड भाषेत असं आवर्जून जपण्यासारखं आहे तरी काय? असो)>>>>

अत्यन्त निषेधार्ह्य!!!

>>जर यशस्वी झालेल्यांनी मराठी माध्यमात घातले नसेल तर अयशस्वी झालेले कदापि घालणार नाही.

इंग्रजी माध्यमातून शिकून अयशस्वी झालेले आपल्या मुलांना कुठल्या माध्यमात शिकवत असतील? की इंग्रजी माध्यमातले सगळे सीईओ बनून करोड रुपयांचं प्याकेज घेतात?

जिज्ञासा नक्की आक्षेप काय आहे? मराठीत उर्दू शब्दांची भेसळ नाहीच असं म्हणायचं आहे का? तुम्ही अजून ज्ञानेश्वरांच्या मराठीतून बोलता का? तुमच्या प्रतिसादातल्या इंग्रजीच्या वापरावरून तर तसं वाटत नाही. की बास्टर्डायझशन हा शब्द तुम्हाला अडला? तसं असेल तर खास तुमच्यासाठीः
bas·tard·ize
verb
gerund or present participle: bastardizing
1.
corrupt or debase (something such as a language or art form), typically by adding new elements
एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ हा तुम्हाला परिचित असलेल्या अर्थछटेहून वेगळा असू शकतो हे आता समजलं असेल. कोण अज्ञानातून विचार प्रकट करतं आहे हे आता स्पष्ट व्हावं.
आणि तुम्हाला माझ्याबद्दल कीव वाटते की प्रेम वाटतं हा धाग्याचा विषय नाही. यापुढे प्रतिसादात अनावश्यक व्यक्तिगत टिप्पणी टाळाल ही विनंती.

Thank you for explaining the meaning of the word bastardize and clearing the misunderstanding. I definitely wasn't reading it with this meaning in mind! But I still would not agree with your sentiment about marathi language. No language is pure as such and that can't be a reason to look down upon it or wish for it to be extinct. मला या तुमच्या भावनांची कीवच करावीशी वाटते कारण जी गोष्ट त्या भाषेला समृद्ध करते ती गोष्ट धरून तुम्ही त्या भाषेला (जी तुमची आणि माझी मातृभाषा आहे) खुशाल नष्ट होऊ द्यावे अशी इच्छा व्यक्त करत आहात ही काही फार चांगली स्पृहणीय गोष्ट आहे असं मला मुळीच वाटत नाही.

fact आहे की पुढील 10 वर्षात किती नवीन लोक मराठी शिकणार आहेत जशी आपण शिकलो.. किती नवीन लोकांना पु ल, वपु वगैरे माहीत असणार आहेत. मराठी दर्जेदार साहित्य निर्माण होत राहील पण ते नवीन पिढीकडून नाहीच.
बोलली जाणार नक्की पण लेखन, वाचन खूप कमी असणार आहे.

१) अगदी गेल्या आठवड्यात बोस्टनला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या CTO बरोबर जेवलो. ते फलटणला मुधोजी हायस्कूलमधे मराठी माध्यमात शिकले.
>>
ह्यांचे नाव कळेल काय अजय,फलटण आमच्या सातारा जिल्हातच येते.

मराठीचा अट्टाहास का आहे ते कळले नाही.मला मनोविकार व औषधे याची माहीती हवी होति ,सर्च मराठीत दिला तर मिपावरचे माझेच प्रतिसाद समोर आले.मराठीत यावर एकही लेख नाही याचे आश्चर्य वाटले.
इंग्रजीत शोधले असता काही हजार रिझल्ट व उत्तम माहीती मिळाली.
इंग्रजी मला बोलता येत नाही पण एखाद्या इंग्रजी लेखाचा मतितार्थ समजतो.त्यावरुन मला खूपच फायदा झाला आहे आजपर्यंत.
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे तशी मराठी नाही हे वास्तव स्विकारले पाहीजे.
आणि मराठीचा पुळका येणार्या मराठी साहीत्यीकांचे जावई कुठल्या देशात आहेत आणि त्यांची नातवंडे भारतात कुठे शिकतात याचा धांडोळा घेतल्यास पुतणा मावशीचा पान्हा का फुटतो ते कळेल.

तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त.

पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल.

दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा.

आणि तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा.

पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.
पुढे शाळा संपली.
हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली.
पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला.

दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला.

तिसरा मित्र, तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी, योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला. आणि नंतर तर पहिले २ मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला.

*ही काही काल्पनिक गोष्ट नाही. सत्य कथा आहे.*

पहिला मित्र, अतिशय हुशार, तो म्हणजे, कोकण रेल्वेचे शिल्पकार, E.Radhakrishnan. त्यांना Metro Man, म्हणुनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते.

दुसरा मित्र म्हणजे, T. N. Sheshan. अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS Officer.
भारतीय निवडणुक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

अाणि तिसरा मित्र म्हणजे, K. P. Unnikrishnan. लोकसभेवर सलग ५ वेळा निवडून गेले. पंतप्रधान V.P.Singh यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.

*शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत.*
*उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खुप मोठी असावीत*

आपल्या मुलांना ह्या माध्यामांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.
------ व्हॉट्सप फॉर्वड

*शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत.*
>> अगदी. मग जर - तुमच्या मतानुसार - प्राथमीक शिक्षणात तरी ईंग्रजी की मराठी याने एकुण आयुष्याच्या कर्तुत्वात व यश मापकात फरक पडत नसेल आणि जगभरचे शास्त्रज्ञ प्राथमिक शिक्षणासाठी मातृभाषा सुचवत असतील, तर मग मराठीच का नको?

आपल्या मुलांना ह्या माध्यामांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.
>>
हे वाक्य जेव्हा तुम्ही या लेखासंदर्भात ठळक करता तेव्हा त्याचा अर्थ सोडा ती मराठी ईंग्रजीच घ्या असा होतो. मराठीत उंच उद्दिष्ट ठेवता येत नाहीत का? मराठीत जीवनाच आस्वाद घेता येत नाही का?
तुमचा हा निष्कर्ष कोणत्याही तर्काने किंंवा चर्चेने आलेला नसुन, चिल यार, कायको टेंशन लेनेका या वापरा व फेका मनोवृत्तीतुन आलेला आहे. त्यात लांबचा विचार केलेला नाही.

मराठीत उंच उद्दिष्ट ठेवता येत नाहीत का?
>>
मराठीत आणि इंग्रजी वा कुठल्याही भाषेत उंच उद्दीष्ट ठेवता येत नाहीत,उद्दीष्ट माणसे ठरवतात ,भाषा नाही.
एक शनवारे नावाचे मराठी लेखक होउन गेले ,विदर्भातले.त्यांना असाच मराठीचा दर्जा शाळा वगैरेचा उमाळा आल्याचे सकाळमध्ये वाचल्यावर त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले.त्यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत असतात ,जावई अमेरिकेत स्थाईक आहेत.नातवंडे इंग्रजीत बोलतात हे त्यांनीच त्यांच्या "कोलंबसाची इंडीया "या पुस्तकात लिहिले होते म्हणून पत्र पाठवले.त्याला उत्तर आले नाही.
आता ते बहुढा वारले आहेत त्यामुळे जास्त लिहीत नाही.
इथे एक जोशी नावाचे प्रभृति होऊन गेले ,त्यांनी" इंग्रजी असे आमुची मायबोली "नावाचा धागा उघडला होता.हुजरे गिजरे तिथे होते त्यांचे.तुमची मुले कोणत्या माध्यमात शिकतात असा प्रश्न मी विचारल्यावर हे महाशय गप्प पडले व विषय वेगळ्याच ठीकाणी न्यायला लागले.
मराठीचा उमाळा विशिष्ठ सामाजिक स्तरातील लोकांनाच येतो,यांचा विरोधाभास असा असतो की इतरांनी म्हणजे बहुतजणांनी आपली पोरे मराठी माध्यमात घालावी पण आमची पोरे बाळे सेंट मेरी डोन बॉस्कोत घालून आम्ही त्यांना मोठे झाल्यावर अमेरिकेत पिटाळणार.
भाषा हा उन्नतीचा मार्ग आहे/असु शकतो व सध्या इंग्रजीशिवाय पर्याय नाही.जेव्हा कष्टकरी समाजातला माणुस त्याच्या मुलांना परवडत नसुनहि इंग्रजी शाळेत घालतो तेव्हा मला दुखं कमी व आनंद जास्त होतो.

मराठीत उंच उद्दिष्ट ठेवता येत नाहीत का?
>>
मराठीत आणि इंग्रजी वा कुठल्याही भाषेत उंच उद्दीष्ट ठेवता येत नाहीत,उद्दीष्ट माणसे ठरवतात ,भाषा नाही.
एक शनवारे नावाचे मराठी लेखक होउन गेले ,विदर्भातले.त्यांना असाच मराठीचा दर्जा शाळा वगैरेचा उमाळा आल्याचे सकाळमध्ये वाचल्यावर त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले.त्यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत असतात ,जावई अमेरिकेत स्थाईक आहेत.नातवंडे इंग्रजीत बोलतात हे त्यांनीच त्यांच्या "कोलंबसाची इंडीया "या पुस्तकात लिहिले होते म्हणून पत्र पाठवले.त्याला उत्तर आले नाही.
आता ते बहुढा वारले आहेत त्यामुळे जास्त लिहीत नाही.
इथे एक जोशी नावाचे प्रभृति होऊन गेले ,त्यांनी" इंग्रजी असे आमुची मायबोली "नावाचा धागा उघडला होता.हुजरे गिजरे तिथे होते त्यांचे.तुमची मुले कोणत्या माध्यमात शिकतात असा प्रश्न मी विचारल्यावर हे महाशय गप्प पडले व विषय वेगळ्याच ठीकाणी न्यायला लागले.
मराठीचा उमाळा विशिष्ठ सामाजिक स्तरातील लोकांनाच येतो,यांचा विरोधाभास असा असतो की इतरांनी म्हणजे बहुतजणांनी आपली पोरे मराठी माध्यमात घालावी पण आमची पोरे बाळे सेंट मेरी डोन बॉस्कोत घालून आम्ही त्यांना मोठे झाल्यावर अमेरिकेत पिटाळणार.
भाषा हा उन्नतीचा मार्ग आहे/असु शकतो व सध्या इंग्रजीशिवाय पर्याय नाही.जेव्हा कष्टकरी समाजातला माणुस त्याच्या मुलांना परवडत नसुनहि इंग्रजी शाळेत घालतो तेव्हा मला दुखं कमी व आनंद जास्त होतो.

मराठीत आणि इंग्रजी वा कुठल्याही भाषेत उंच उद्दीष्ट ठेवता येत नाहीत,उद्दीष्ट माणसे ठरवतात ,भाषा नाही.
>>
झाले तर मग. मराठी माध्यमातुन शिकुन मराठी "माणसाने" उंच उद्दिष्ट ठेवावे!

भाषा हा उन्नतीचा मार्ग आहे/असु शकतो व सध्या इंग्रजीशिवाय पर्याय नाही.
>>
उन्नती करण्याची भाषा आणि प्राथमीक शिक्षणाचे माध्यम या दोन्ही एकच गोष्ट नसु शकतात! नसतात! नसल्या तरी काही बिघडत नाही!

झाले तर मग. मराठी माध्यमातुन शिकुन मराठी "माणसाने" उंच उद्दिष्ट ठेवावे!
>>
चालेल की ,तसेही चालेल.पण मग मराठीचाच आग्रह का? इंग्रजी माध्यमात शिकून "उंच उद्दिष्ट " ठेवणार्यांना जर ति उद्दीष्ट गाठायला इंग्रजी भाषेचा ऑक्झीलरी सप्लाय म्हणून उपयोग झाल्यास/होऊ शकल्यास आपल्या पोटात दुखायचे कारण नाही.

Effects of using and teaching with mother tongue language in primary school

This article wants to show how most of the students around the world because of teaching in a language contrary to their mother tongue in first grades of school have found problems in their character, identity, originality and concepts of some words.

https://www.linkedin.com/pulse/effects-using-teaching-mother-tongue-lang...
---

Since 1953, UNESCO has supported children‟s right to learn their mother tongue, and advocated maintenance of linguistic and cultural diversity through language - in - education policies (UNESCO, 1953,2003).

Educational success founded on early learning and schooling in the mother tongue.
A growing body of empirical research and theory on language acquisition and bi/multilingual learning complement a rights based rationale for basing early education in children's mother tongue before introducing a second language as a medium of instruction. In its report, “Strong Foundations: Early Childhood Care and Education”, UNESCO (2007a) points out the overlooked advantages of mother tongue based multilingual education in the early years.

http://www.ecdip.org/docs/pdf/UNESCO%20Summary%202010-1.pdf
---

आजकाल मराठी प्युअर मातृभाषा आहे असा आपला दावा आहे काय.?
मराठीत जवळपास ३० % टक्के शब्द इंग्रजीत आहेत ,हे भाषादारीद्र्य सुधारावे यासाठी आपण व्यक्तीगत पातळीवर काय प्रयत्न करत आहात?
आज मराठी शुद्ध म्हणून अस्तित्वात नसून ती मिंग्लीश या व्याख्येकडे गेली आहे याची आपल्याला कल्पना आहे काय.?
त्यामुळे लहान मुलांना(आजकालच्या) मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेचे एक्स्पोजर आहे.त्यामुळे इंग्रजी माध्यमात टाकल्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाहि.

https://amp.scroll.in/article/859616/a-few-even-cry-why-the-campus-place...

लिंकवर दिलेला लेख वाचला तर असे वाटले की वरच्या 'पॅकेज फाइंडिंग' सारखा एक लेख दहा वर्षांनी लिहिला जाईल कि "आय आय टीचा दर्जा घसरला काय?"

<>
----- ते पद्मविभूषणाने गैरवलेले ई. श्रीधरन आहेत.

अक्कलशून्य यांनी लिहिलेलं "मराठी शाळा बंद पडतात, लोक आपल्या मुलांना मराठी शाळांत घालत नाहीत, असं म्हणणार्‍यांची मुलं मात्र इंग्रजी शाळांत जातात" हे अनेकदा दिसलंय.

मराठी शाळा माध्यम शिक्षणासाठी, भाषा नव्हे हे मरणपंथाला मराठी शाळा मधील शिक्षकांमुळे लागलेले आहे, ही अवकळा या भंपक शिक्षकांमुळे आज आली काही सन्माननीय अपवाद वगळता मुलांच्या खोट्या हजेर्या लावून पगार उकळणारे हे गुरुजन दुसरे काय होणार, बरे या सर्वांची मुळे नातू नाती इंग्रजी शाळेत आहेत यावरून यांची कंपेतेन्सी लक्षात येते, आणि अश्या मराठी माध्यमात शिकून पोटापाण्याचा मिळत नसेल तर काय उपयोग तेव्हा अर्थप्राप्ती क्षमता आणि शैक्षणिक माध्यम याचा खूप जवळचा संबंध आहे, ज्यांना हे पटत नाही त्यांनी मराठी माध्यमात शिक्षण घेऊन कॅम्पस ओलेसमेंत का मिळत नाही याचे खात्रीशीर उत्तर द्यावे, मी स्वतः मराठी शाळेत शिकलो अनित्य मुळे आयुष्यात अनेक संध्याचे नुकसान झाले हा अनुभव आहे, मराठी माध्यम बंद करून ऐच्छिक ठेवावे असे मला वाटते कारण मराठी पोयपण्याला मिळवून देवू शकत नाही हे सत्य आहे, अगदी मराठी शिलेदार शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, छगन भुजबळ इंटरनॅशनल स्कूल, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी सुद्धा इंग्लिश मध्ये शिक्षण देतात, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, भटकर यांनी सुद्धा करिअर किंवा उपजिविकेसाठी इंग्लिश चाच आधार घववा लागला, आठवले म्हणून सांगतो मराठी विज्ञान पुस्तकात पूर्वी कार्बन डआय ऑक्साईड ला करबद्विप्रणील वायू असे लिहिले होते काय बिशाद तुम्हाला सायन्स कळेल, असला ढोंगीपणा बंद करून मराठी माध्यम बंद करून पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान टाळावे असे मला वाटते कारण या सर्व गोष्टी सुधारण्याच्या पलीकडे आहेत

भले शाब्बास. आपल्या अपयशाचे खापर माध्यमांवर फोडणारे पाहिले की धन्य धन्य वाटते.... वरचा स्क्रॉल चा लेख वाचावा.

कँपस प्लेसमेंट म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारे पब्लिक आहे म्हणून इंग्रजी शाळांचा दर्जाहिन धंदा फोफावलाय.

आणि हिंदी,उर्दू आणि संस्कृत अशा कित्येक भाषांची भेळ जमवून बनलेल्या एका बास्टर्डाइझ्ड भाषेत असं आवर्जून जपण्यासारखं आहे तरी काय? असो)>>>>

अत्यन्त निषेधार्ह्य!!! >>> +१११

एक अत्यंत विचारपूर्वक लिहिलेला लेख वाचनात आल्यामुळे जीवन धन्य झाले. आजकाल अशा नाविन्यपूर्ण विषयावर, इतकी प्रगाढ बुद्धिमत्ता, दांडगा व्यासंग, तर्कशुद्ध मांडणी, मुद्देसूद प्रतिपादन आणि भाषेवर प्रभुत्व यांचे समसमा संयोग झालेले लेखन बघायवयास, वाचावयास किंवा ऐकावयास देखील मिळत नाही. लेखन इतके बांधीव आहे की एकही वावगा शब्द आढळला नाही. सांप्रत काळात असे विद्वत्तापूर्ण लेखन मला वाचायला मिळाले हे माझे सौभाग्यच.
लेख कालच वाचला होता परंतु प्रतिसाद देण्यास शब्द सुचत नव्हते त्यामुळे आज देत आहे तरी क्षमस्व.

तळटीप – आजकाल असे अनेक लेख वाचनात येतात तर माझा वरील प्रतिसाद तात्कालिक असला तरी तरी अशा वेळी त्या त्या लेखाखाली हा प्रतिसाद असाच्या असा देण्यास माझी काहीही ना नाही. हा प्रतिसाद प्रताधिकारमुक्त आहे.

मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय ?

==

मुळात लेखाचे शिर्षकच साफ चुकले आहे.
फक्त "मराठी" ऐवजी 'सर्वच माध्यमांतल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय' असे शिर्षक लेखाला हवे होते.

शासनापुढे खरं आव्हान ssc बोर्ड वाचवायचं आहे असे दिसते . माझ्या सोसायटीतील ९० टक्के मुले ICSE /CBSE बोर्डात जातात . SSC बोर्ड डाऊनमार्केट आहे असा समज होताना दिसतोय .
मराठी माध्यमात शिकून पुढे विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण इंग्लिश मधून घेताना अवघड जाते हे खरे आहे . हे मी आधीही कुठे लिहिले होते मायबोलीवरच .त्यामुळे विज्ञान वा तत्सम शिकताना इंग्रजी आवश्यक आहे असे वैयक्तिक मत आहे .

इंग्रजी शाळेत शिकूनही मुलांना मराठी भाषेची गोडी कशी लावता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते.
वर मनिमोहोरनी लिहिले तसे माझी /माझ्या आधीची पिढी जरी मराठी शाळेत शिकली तरीही मुलाना मराठी शाळेत पाठवताना विचार करावा लागेल असे आहे . पण त्याच बरोबर मराठीची नाळ तुटू नये असेही वाटते . अश्या वेळी काय करायचे हा प्रश्नच आहे .

CBSE च काही खरं नाही. मुलं अजिबात इंग्लीश बोलत नाहीत. सगळं informal आणि कधी कधी formal communication हिंदीमध्ये असते.

CBSE च काही खरं नाही. मुलं अजिबात इंग्लीश बोलत नाहीत. सगळं informal आणि कधी कधी formal communication हिंदीमध्ये असते.>> हे असे काही नाही. एखाद्या शाळेवरुन CBSE ला बदनाम करु नका.

मराठी माध्यमात शिकून पुढे विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण इंग्लिश मधून घेताना अवघड जाते हे खरे आहे
>>
जर विद्यार्थ्याने योग्य त्या वयापासुन, इंग्रजीचा योग्य तो सराव केला नसेल तर, हे जगातल्या ईंग्रजेतर सर्व भाषांना लागु होते.

त्यामुळे विज्ञान वा तत्सम शिकताना इंग्रजी आवश्यक आहे असे वैयक्तिक मत आहे
>>
बरोबर. ईंग्रजी भाषेची आवश्यकता आहेच. ती कोणी नाकारत नाही. पण म्हणून (किमान) प्राथमीक शैक्षणीक माध्यम बदलु नये.

इंग्रजी शाळेत शिकूनही मुलांना मराठी भाषेची गोडी कशी लावता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते.
>>
मराठी शाळेत शिकुनही मुलांना उत्तम ईंग्रजी लिहिता, वाचता येणे व न बुजता आत्मविश्वासाने सर्वांसमोर बोलता येणे याची गोडी कशी लावता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते.

>>>>......तात्कालिक असला तरी तरी अशा वेळी त्या त्या लेखाखाली हा प्रतिसाद असाच्या असा देण्यास माझी काहीही ना नाही. हा प्रतिसाद प्रताधिकारमुक्त आहे.>>>>

हर्पेन Happy प्रतिसाद साठवून ठेवला आहे, योग्य ठिकाणी वापरला जाईल

अहो एक शाळा नाही. खूप शाळा पहिल्या आहेत, मुख्यतः महाराष्ट्रात. इथे DPS, गुरुकुल वैगरे ची मुलं बोलतात इंग्लिश कारण cosmopolitan भागात English मुख्य संवादाची भाषा आहे. महाराष्ट्र त मॅडम, मित्र-मैत्रिणी हिंदीत म्हणे. माझा पुतण्या (SSC - convent) आणि भाची(cbse-private) दोघे हिंदी एक्सपर्ट. आजी-आजोबा घरात असल्यामुळे लवकरच मराठीवर आणलं घोडं. हिंदीतून बोलायला इंग्लिश medium मध्ये कशाला जायला पाहिजे!

माझ्या सोसायटीतील ९० टक्के मुले ICSE /CBSE बोर्डात जातात . SSC बोर्ड डाऊनमार्केट आहे असा समज होताना दिसतोय .
<<
महाराष्ट्राची लोकसंख्या = ** कोटी
माझ्या सोसायटिची लोकसंख्या = ** कोटी

गुड सँपल साईझ सर्वे.

मोठी शहरे आणि तथाकथित मोठी शहरे सोडली तर बहुतेक मुलं ssc बोर्ड मध्ये जातात. इन fact आता थोडंफार इंग्लिश माध्यम शाळा वेगळ्या नावाच्या असतात. नाहीतर , होली, फादर, मदर, सिस्टरच. शिवाय, ह्या शाळा स्वस्त पण असतात compared to नॉन- सेंट/होली/ फादर/मदर/सिस्टर इंग्लिश schools

Pages