वांग्याचं भरीत (पंजाबी पद्धत)

Submitted by योकु on 17 November, 2017 - 11:34
wangyache punjabi bharit
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- १ मोठं, काळं, चांगलं टंबू वांग. कोवळं आणि टसटशीत असलेलं पाहून घ्यावं. साधारणपणे २५० ग्रॅम भरेल एवढं
- अर्धी/पाऊण वाटी फ्रोजन/ताजे मटार दाणे
- २ मध्यम मोठे कांदे
- १ मोठा टोमॅटो
- २ हिरव्या मिरच्या
- अर्धा चमचा लाल तिखट
- पाव चमचा हळद
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
- तेल
- जिरं
- आवडत असेल/इच्छा असेल तर गरम मसाला पाव चमचा (मी वापरला नाहीय)

क्रमवार पाककृती: 

- वांग्याला सगळ्याबाजूनी टोचे मारून तेलाचा हात लावून खरपूस भाजावं. सुरी खुपसल्यावर आरपार मऊ लागलं म्हणजे झालं ही युक्ती मी खूण म्हणून वापरतो
- वांग भाजून झालं की एका ताटात हे झाकून ठेवून द्यावं
- तोवर बाकी चिराचिरी करून घ्यावी. कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक चिराव्यात. फ्रोजन मटारदाणे असतील तर बाहेर काढून साध्या पाण्यात जरावेळ ठेवून द्यावे
- वांग आता जरा निवलं असेल तर ते सोलून घ्यावं आणि हातानीच मॅश करून घ्यावं
- लोखंडी कढई तापत टाकावी. सणसणून तापली (कढई) की २ पळ्या तेल, जिरं आणि हिंग घालून फोडणी करावी आणि कांदा घालावा आणि मिरचीही घालावी
- कांदा चांगला लाल परतायचा आहे; तसा तो परतल्या गेला की टोमॅटो घालावा. हा मसाला आता तेल सुटेपर्यंत परतायचाय
- मसाल्याला तेल सुटलं की मग निथळलेले मटार दाणे, मॅश केलेलं वांग, हळद, तिखट, मीठ आणि वापरत असाल तर गरम मसालापूड घालावी
- हे सगळं एकजीव होईपत्तोर मोठ्ठ्या आचेवर परतायचं
- २/३ मिनीट मंद गॅसवर झाकण घालून एक वाफ आली की भरीत तयार आहे. कोथिंबीर घालून सजवायचं.
- गरम भरीत, भाजलेली हिरवी मिरची, पोळी, पराठा, भाकरी बरोबर खायचं, शेवटी मसाला छाछ प्यायला विसरायचं नाही.

हा फोटो. यात कोथिंबीर नाहीय कारण ती फ्रीजातून काढून, धूवून चिरायच्या वेळेतच धिस इज अस मध्ये काहीतरी विंटरेष्टिंग चाल्लं होतं सो ती टाकायची राह्यलीच...

Bharit.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजी म्हणून
अधिक टिपा: 

- वांग्याला लवंगा टोचूनही भाजता येतं. वेगळा फ्लेवर + तिखटपणा येतो.
- कांदा-टोमॅटो मसाला नीट तेल सुटेपर्यंत भाजणं आवश्यक आहे
- तिखट, हिरवी मिरची व्यवस्थित घालावी, सपक भरीत तितकंस चांगलं लागत नाही

माहितीचा स्रोत: 
ऑफिसमधला कलीग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या भाजीतला आणि या रेस्पीमध्ल्या फोटोत सेम आयकियाची प्लेट आहे ही नम्र जाणिव या बालकांस आहे. दोन्ही भाज्या वेगवेगळ्या दिवशी केल्या गेल्या आहेत आणि प्लेटही रिस्पेक्टीव दिवशीच धुतल्या गेली आहे...

मस्त रेसिपी Happy योकु ऐक्कत नाहीये अगदी.
एक उगीच लक्षात राहिलेली आठवण - ही रेसिपी फार पूर्वी चंदेरी की तत्सम मासिकात अनिल कपूर ने (?!) दिली होती. तेव्हापासून या भरीताचे नाव मी आणि डीजेने अनिल कपूर भरीत असे ठेवले होते Happy

मस्त. वरच्या पद्धतीने केलेलं भरीत शेम टू शेम पंजाबी रेस्टॉरंटमधल्या बैंगन का भरतासारखं लागतं याची मी ग्वाही देतो.
मी यात मटारऐवजी डाईस्ड मशरूम्स घालतो. त्याने वांग्याचा एकसुरी गिळगिळीतपणा कमी होतो आणि दाताखाली येणारे मशरूम कराकरा चावायला लै मज्जा येते Happy

>> दाताखाली येणारे मशरूम कराकरा चावायला
हे वाचून गम्मत वाटली. मशरूम्स बाबतीत असं वर्णन मी पहिल्यांदाच वाचलं.
(मशरूम्स च्या बाबतीत मीटी टेक्स्चर/बाईट असणे हे माहित होतं. मला कराकरा चावणे ह्याकरता सेलरी आठवते किंवा मग कच्च्या भाज्या)

इथे पूर्णपणे अवांतर ...
आयडी मजेशीर आहे खरा. पूर्वी एक "उपाशीबोका" नावाचा आयडी होता मायबोलीवर. आठवतो का? Lol

च्यामारी. मी काल सेमच जिन्नस असलेलं भरीत बाहेरुन ऑर्डर केलं होतं. त्यात जाडा जाडा चिरलेला कांदा मला जरा वैताग आणतो.
फोटो मस्तय. मी आत्ता भरीतच खाल्लेलं असूनही मला परत भूक लागली.

मस्त दिसते आहे भरित .
वांग्याला लवंगा टोचूनही भाजता येतं. वेगळा फ्लेवर + तिखटपणा येतो. >> मी कधि कधी लसणीच्या पाक़ळ्या टोचून भाजते वांगी . लवंग ट्राय करायला हवं ..

इथल्या तमाम इन्डियन रेस्टॉ. मध्ये मिळणारं बैंगन का भरता असंच असतं फक्त ते वांग भाजत नाहीत तर प्रेशरकुकरमध्ये शिजवतात.

कांदा एकदम बाSSSरीक चिरला असेल तरच आवडतो भरतात.

मस्त .. मी हल्ली असंच करते . दह्यातलं मराठी पद्धतीचं केलंच जात नाही . ह्यात शेवटी कोथिंबीरी ऐवजी पातीचा कांदा ( हिरवा ) घालते. रंग आणि चव दोन्ही छान लागतं.

मस्तच आहे. फोटो पण सॉलिड.

मी साधारण असंच करते पण बरीच addition. टोमाटो, मटार याबरोबर तुरशेंगा दाणे आणि हुरडा मिळतो ना थंडीत त्याचे दाणे हेही टाकते (अर्थात थंडीत हे शक्य) आणि दाण्याचे कुट आणि ओले खोबरंही टाकते. हेमाताईनी लिहिल्याप्रमाणे पातीचा कांदा घालते आणि कोथिंबीरपण घालते. दह्याचे नवऱ्याला फारसं नाही आवडत, असं आवडतं म्हणून असं केलं जातं. ओले हरबरे, तुरशेंगा दाणे मस्त लागतात मटारबरोबर. खूप खरपूस करायचे परतून वांगे, अजून छान लागतं. मसाला मात्र कुठलाच नाही टाकत (गरम किंवा गोडा). लसूण आले मिरची तुकडे घालते फोडणीत आणि तिखटसर करते.

ती लवंगा खोचून वांगे भाजायची आयडिया छान आहे, करून बघेन आता.

२ पळ्या तेल, जिरं आणि हिंग घालून फोडणी करावी>>>>> त्याऐवजीकांदा-लसूण (बारीक चिरलेला) ,हि.मि. घालते.मटार घातला नव्हता.आता तसे करुन बघण्यात येईल.

मस्त, वांग्याच भरीत कसही कधीही आवडतं. मी ह्यात अद्रक लसुण पेस्ट ही टाकते. आणि भाजलेले शेंगदाणे.
लवंग ची आईडिया करुन बघायला पाहिजे, केट च्या प्रेगनन्सी न्युज मधे कोथिंबीर राहीली का? :))

आधीच्या भाजीतला आणि या रेस्पीमध्ल्या फोटोत सेम आयकियाची प्लेट आहे ही नम्र जाणिव या बालकांस आहे. >>>> तुम्ही आयकियातून आणलेल्या प्लेट्स वापरता हे कळ्ळं बरं का Proud

चंदेरी की तत्सम मासिकात अनिल कपूर ने (?!) दिली होती. तेव्हापासून या भरीताचे नाव>>>हो हो. चंदेरीचा दिवाळी अंक होता.

करून बघेन आता या पद्धतीने
मश्रुम करकरीत हे पहिल्यांदाच कळले
मला तरी ते वांग्याइतकेच गिळगीळीत लागतात