माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी च्या मते ऑफीसातील काम म्हणजे नुसतं फाईली इकडून तिकडे नेणे रिसेप्शन इ ठिकाणी चकाट्या पिटणे (आठवा कारेदु!)

झी च्या मते ऑफीसातील काम म्हणजे नुसतं फाईली इकडून तिकडे नेणे रिसेप्शन इ ठिकाणी चकाट्या पिटणे (आठवा कारेदु!) > Proud आणि प्रेझेंटेशन !

मुळात आधी शिरेलीतली हापिसं काम करतात काय ते सांगा
त्या दुराव्यात पण सारखं, मिटिंग, प्रेझेण्टेशन, डिटेल्स आणि ह्या क्लायंट ची फाईल आणि त्या क्लायंट ची फाईल,
हितपण तेच.
आजकाल सर्व कंपन्या ऑलमोस्ट पेपरलेस झालेल्या असूनही शिरेलित मात्रं टेबलावर ढिगाने फायली येउन पडताना दिसतात.
आणि मला आजच्या आज ही फाईल पुर्ण करायची आहे असं म्हणणारं पात्रं ती पुर्ण करतं म्हणजे नक्की काय करतं हा प्रश्न आजतागायत मला पडलेलाच आहे Uhoh Proud

मला आजच्या आज ही फाईल पुर्ण करायची आहे असं म्हणणारं पात्रं ती पुर्ण करतं म्हणजे नक्की काय करतं हा प्रश्न आजतागायत मला पडलेलाच आहे >>> परफेक्ट Lol Lol Lol

मला आजच्या आज ही फाईल पुर्ण करायची आहे असं म्हणणारं पात्रं ती पुर्ण करतं म्हणजे नक्की काय करतं हा प्रश्न आजतागायत मला पडलेलाच आहे >>> दक्षे मी तर त्या दिवसाची वाट पाहून राहिले जेंव्हा राधिका कमळा ला विचारेल किती फायली करून राहीली तू ?

झी च्या मते ऑफीसातील काम म्हणजे नुसतं फाईली इकडून तिकडे नेणे >>> हो हो! याचा अतिरेक म्हणजे खुकखु मधली मानसी. ती सतत फाइल्स इकडे तिकडे करायची किंवा लिहीत/टायपत बसायची Proud

हो हो! याचा अतिरेक म्हणजे खुकखु मधली मानसी. ती सतत फाइल्स इकडे तिकडे करायची किंवा लिहीत/टायपत बसायची >> तरि बरं ती डॉक्टर होती.. तरी तिचं असं फायलीवालं माकड करून ठेवलं होतं.. तिथे बाकिच्यांची काय कथा? Proud

झी वाल्यांनी office office सिरियल लिटरली घेतली बहुधा, हापिस म्हणजे टेबलावर पुठ्ठ्याच्या फाईल्स.

ह्या फाईल-इकड—तिकडं (फाईति) टाईप मधे , कादिप ह्याचा समावेश करा. ती गौरी नाही का, शिवच्या ऑफीसात फाईली द्यायला सारखी जात असते. नाहितर शिव , तिच्या ऑफीस मध्ये फाईली घेवून.
रजा नाहीतर बदल्या पण पाहिजे तेव्हा आणि तितक्या....

कुठला काळ दाखवतात किण जाणे...

राधिकानी परत फराळ संपवणे वगेरे फालतूपणा सुरु केला Angry

काल रेवती त्या पोलिस ऑफिसर प्रज्ञाला म्हणते "मी पण येऊ का?" आता ती गुरुला जाब विचारायला / चौकशी करायला जाणार, पोलिसि खाक्या दाखवणार तिथे रेवती कशाला Uhoh

हो ना.... आता फराळाचं काय मधेच..? झाली की दिवाळी!!!
गुरवाला न देता संपवून टाकला............... इतक्या फालतू गोष्टींनी गुरवाला त्रास होतो तरी कसा....? किति बोअर !
शनाया मात्र टॉप दिसते नेहमीच.... पण इतके शॉर्ट कपडे घालून चालतं का गुरवाच्या ऑफीसात? इतकी कोणती मल्टी नॅशनल कं आहे? काहीतरी फूड रिलेटेड आहे ना?

चला आपणच आता गुरवाच्या कंपनीचं नेमकं काय कामे ते शोधून काढू...नुसतं फाईति करण्या पेक्षा....!!!

मालिका जास्तच भैताड होत चालल्ये.
कालच्या भागात रेवती राधाक्कांना `खुप दिवसांनी तुझ्या हातचे पोपट पोहे खाल्ले ` म्हणाली . असे खरच पोहे अस्तात का? कसे करतात?

रावी , असावेत . नाव ऐकल्यासारखं वाटतयं.
पण सहज गुगल्यावर हे मिळालं Happy
fun.JPG

हो न... मीही नाही ऐकलं कधी! राधाक्का दिवसेंदिवस अधिकाधिक प्रौढ दिसत्येय. अथर्व खूपच लहान दिसतो तिच्या मानाने.
शनाया त्या काळ्या फुलपाखरी टॉप मधे शोभत होती. गुरवाला ज SSS रा बरे दिवस आले आहेत. शनाया ला फाईव्ह स्टार हॉटेल मधे ठेवणारे काही दिवस!!

असं चाललंय काय. पण मला सांगा as a chara शनायाला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही का, किती अपमान केला होता गुरुने तिचा. फक्त पैसा आणि छानछोकी कोणत्याही लेवलला जाऊन हेच तिच्या जीवनाचे ध्येय आहे का.

ह्या! मागे मी लिहीले होते ना की कामातुराणां न भयं न लज्जा! तो गुरु त्यातलाच आहे. त्या शनाया करता इतका भैताड आणी निर्लज्ज दाखवलाय की बास. आजच्या एपि मध्ये तर तो राधिकाला धमकीच देतो की तू शनयाला घरात ठेवुन घेणार नसलीस तर मी पण घर सोडुन जाईन. जा की मग भैताडा, त्या नटवीला पण घेऊन जा बरोबर.
राधिकाने खरच त्याला हाकलायला हवे घरा बाहेर. नवे घर, नवा संसार, शन्याचा नवा नवा सैपाक, नव्या घराचे , नव्या सोसायटीचे भाडे, लाईट-पाणी याचे पण बिल, शन्याचे शॉपिंग असे सर्व घडलेले दाखवले पाहीजे. लय मज्जा येईल रे भो मंग. म्या वाट बघुन र्हायली कवाधरनं!

घर सोडून जाऊदे की. मुलासाठी घरात ठेऊन घेणार असेल तर मुलाच्या डोळ्यासमोर नाही ते अजून घडणार. इतक्या खालच्या पातळीला नवरा गेलेला असताना आणि एक बाबा म्हणून तो नालायक असताना, राधिकाने जा चं सांगायचं. नोकरी जायला हवी आता गुरुची पहिली. ती घालवण्यासाठी राधिकाने प्रयत्न करायला हवेत.

असो as a chara गुरू आणि शनाया दोन्ही मनातून फार उतरलेत मात्र माझ्या अर्थात इथे वाचून. बघायचं डेरिंग नाही माझं. पण मला गुरू रस्त्यावर आलेला, नोकरी गेलेली बघायला मनापासून आवडेल.

आता सवत माझी लाडकी दाखवणार बहुतेक. अजून एक वर्ष तरी संपत नाही.राधिका काही गुरूला जा म्हणून सांगणार नाही त्याने चार बायका आणून ठेवल्या तरी. रसिका आणि सिद्धार्थ चांदेकर याचं अफेअर चालू आहे असं तूनळीवर बघितलं. छान आहेत दोघंही. मुलाला नागपूरला पाठवावं असं राधिका ठरवतेय. असं शैक्षणिक वर्ष चालू असताना कसं पाठवता येईल.

शनाया ला फाईव्ह स्टार हॉटेल मधे ठेवणारे काही दिवस!!>> ओह असं चाललंय का सध्या ? पण भांडण झालेलं ना कश्यावरुन तरी बर्थडे च्या दिवस नंतर बघायचं राहिलंय .. आज बघायला पाहिजे

आजच्या एपि मध्ये तर तो राधिकाला धमकीच देतो की तू शनयाला घरात ठेवुन घेणार नसलीस तर मी पण घर सोडुन जाईन. >> येस्स. राधिकाने त्यालाही घर सोडून जायला सांगितलं. बरं वाटलं जरा.

सिद्धार्थ रसिका फोटो मी पण बघितले, छान दिसतायेत दोघेही. पण खरंच अफेअर आहे की एखादी मुवि येणार दोघांची काय माहिती. हल्ली प्रमोशन साठी पण असं पसरवतात.

Pages