"नवीन लेखन" पाहण्याच्या सुविधेत काही बदल

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीवर हव्या त्या ग्रूपचे सभासद होण्याची आणि फक्त त्याच ग्रूपमधले लेखन पाहता येईल अशी सुविधा अनेक वर्षांपासून आहे. पण तरीही मला नको त्या विषयावरचे लेखन/प्रतिक्रिया पहाव्या लागतात अशी तक्रार नेहमी ऐकण्यात येते. याची दोन कारणे होती.
१) नवे लेखन वर टिचकी मारली तर जी यादी दिसते ती सगळ्या मायबोलीवरच्या सगळ्याच ग्रूपमधल्या धाग्यांची/प्रतिक्रियांची दिसते. फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधले लेखन पाहण्याची यादी होती त्यावर वेगळी टीचकी मारावी लागे. अनेक मायबोलीकरांनी ही सुविधा वापरलीही नाही २) जरी तुम्ही फक्त तुमच्या ग्रूपमधले लेखन पहायचे म्हटले तरी काही लेखन हे सार्वजनिक असल्याने दुसर्‍या ग्रूपमधलेही लेखन दिसत असे.

आजपासून या सुविधेत काही महत्वाचे बदल करतो आहोत.

पूर्वीप्रमाणेच वर "नवीन लेखन" टिचकी मारायची. तुम्ही ती लिंक बुकमार्क केली असेल तर काहीही बदल करायची गरज नाही. नवीन काही वेगळे करण्याची गरज नाही.

तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल.

तुमच्याकडे जास्त वेळ आहे किंवा या अगोदर पाहिलेले धागे पुन्हा जरा निवांत पहायचे आहेत तर "ग्रूपमधे नवीन" या बटनावर टिचकी मारून त्या धाग्यांची यादी दिसायला लागेल. पूर्वीप्रमाणेच कुठल्या धाग्यावर कुठल्या प्रतिक्रिया नवीन आहेत हे ही दिसेल. इथला बदल म्हणजे फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलेच धागे दिसतील. इतर ग्रूपमधले धागे सार्वजनिक असले तरी दिसणार नाहीत.

तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि सगळ्याच मायबोलीवर काय चाललंय ते वाचायचं आहे, तर पूर्वी प्रमाणेच "मायबोलीवर नवीन" या बटनावर जाऊन ते वाचता येईल. जे मायबोलीवर वाचनमात्र आहेत त्यांच्यासाठी ही by Default यादी असेल. या यादीतला बदल म्हणजे जे गप्पांचे धागे आहेत ते या यादीत दिसणार नाही. जे सभासद नाहीत त्यांना गप्पांच्या धाग्यांवर काय चालले आहे हे पहाण्यात रस नसतो. आणि त्यांना त्या पानावर काय चालले आहे ते कळतही नाही. गप्पांची पाने या यादीतून काढल्यामुळे मायबोलीवर इतरत्र असलेले लेखनाचे धागे जास्त वेळा दिसतील. जे प्रवेश केलेले मायबोलीकर आहेत (Logged in ) आणि ग्रूपचे सभासद झाले आहेत त्याना त्यांची गप्पांची पाने "माझ्यासाठी नवीन" आणि "ग्रूपमधे नवीन" या याद्यांमधे दिसत राहतील.

प्रत्येक वाचकाची नवीन लेखन वाचायची पद्धत आणि अपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकाच प्रकारे काम करणारी सुविधा अपुरी पडत होती. या नवीन बदलांमुळे प्रत्येकाला थोडे आपआपल्या पद्धतीने मायबोलीला भेट देऊन हव्या त्या विषयावरचे वाचन करणे सुलभ होईल.

विषय: 
प्रकार: 

@सोनू
हा या धाग्याचा विषय नाही. पण जर तुम्ही "प्रतिसाद तपासा" वर टीचकी मारली याचा अर्थ तुम्हाला तो प्रतिसाद तपासायचा आहे . त्यामुळे ते बटन सगळा प्रतिसाद/लेखन संपूर्ण दाखवल्यावरच ठेवले आहे. ते आधी ठेवले तर चुकून प्रतिसाद तपासायच्या अगोदर त्यावर टिचकी मारली जाईल. तुम्हाल प्रतिसाद तपासायचा नसेल तर तशी सोय आधीच आहे.
@टीना
पूर्वीसारखेच धागे (गप्पांची पाने सोडून) मायबोलीवर नवीन या बटनावर आहेत की आणि तुम्ही वाचनमात्र असलात तर ते पूर्वीप्रमाणेच दिसते.
" चांगलं लेखन" म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? उलट ज्या मायबोलीवरच्या लेखकांनी नवीन संपूर्ण धागे काढले आहेत ते आता जास्त वेळा वर दिसते आहे.

वेमा/अ‍ॅडमिन

तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल. >>>

लेखक जर धाग्याच्या विषयाला धरून सबंधित विभागात धागे काढणारच नसतील तर 'माझ्यासाठी नवीन', 'ग्रूपमधे नवीन', 'ग्रूपचे सभासद व्हा', 'सभासदत्व रद्द करा' वगैरे सोपस्काराला काय अर्थ ऊरतो?

Pages