"नवीन लेखन" पाहण्याच्या सुविधेत काही बदल
मायबोलीवर हव्या त्या ग्रूपचे सभासद होण्याची आणि फक्त त्याच ग्रूपमधले लेखन पाहता येईल अशी सुविधा अनेक वर्षांपासून आहे. पण तरीही मला नको त्या विषयावरचे लेखन/प्रतिक्रिया पहाव्या लागतात अशी तक्रार नेहमी ऐकण्यात येते. याची दोन कारणे होती.
१) नवे लेखन वर टिचकी मारली तर जी यादी दिसते ती सगळ्या मायबोलीवरच्या सगळ्याच ग्रूपमधल्या धाग्यांची/प्रतिक्रियांची दिसते. फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधले लेखन पाहण्याची यादी होती त्यावर वेगळी टीचकी मारावी लागे. अनेक मायबोलीकरांनी ही सुविधा वापरलीही नाही २) जरी तुम्ही फक्त तुमच्या ग्रूपमधले लेखन पहायचे म्हटले तरी काही लेखन हे सार्वजनिक असल्याने दुसर्या ग्रूपमधलेही लेखन दिसत असे.
आजपासून या सुविधेत काही महत्वाचे बदल करतो आहोत.
पूर्वीप्रमाणेच वर "नवीन लेखन" टिचकी मारायची. तुम्ही ती लिंक बुकमार्क केली असेल तर काहीही बदल करायची गरज नाही. नवीन काही वेगळे करण्याची गरज नाही.
तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल.
तुमच्याकडे जास्त वेळ आहे किंवा या अगोदर पाहिलेले धागे पुन्हा जरा निवांत पहायचे आहेत तर "ग्रूपमधे नवीन" या बटनावर टिचकी मारून त्या धाग्यांची यादी दिसायला लागेल. पूर्वीप्रमाणेच कुठल्या धाग्यावर कुठल्या प्रतिक्रिया नवीन आहेत हे ही दिसेल. इथला बदल म्हणजे फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलेच धागे दिसतील. इतर ग्रूपमधले धागे सार्वजनिक असले तरी दिसणार नाहीत.
तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि सगळ्याच मायबोलीवर काय चाललंय ते वाचायचं आहे, तर पूर्वी प्रमाणेच "मायबोलीवर नवीन" या बटनावर जाऊन ते वाचता येईल. जे मायबोलीवर वाचनमात्र आहेत त्यांच्यासाठी ही by Default यादी असेल. या यादीतला बदल म्हणजे जे गप्पांचे धागे आहेत ते या यादीत दिसणार नाही. जे सभासद नाहीत त्यांना गप्पांच्या धाग्यांवर काय चालले आहे हे पहाण्यात रस नसतो. आणि त्यांना त्या पानावर काय चालले आहे ते कळतही नाही. गप्पांची पाने या यादीतून काढल्यामुळे मायबोलीवर इतरत्र असलेले लेखनाचे धागे जास्त वेळा दिसतील. जे प्रवेश केलेले मायबोलीकर आहेत (Logged in ) आणि ग्रूपचे सभासद झाले आहेत त्याना त्यांची गप्पांची पाने "माझ्यासाठी नवीन" आणि "ग्रूपमधे नवीन" या याद्यांमधे दिसत राहतील.
प्रत्येक वाचकाची नवीन लेखन वाचायची पद्धत आणि अपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकाच प्रकारे काम करणारी सुविधा अपुरी पडत होती. या नवीन बदलांमुळे प्रत्येकाला थोडे आपआपल्या पद्धतीने मायबोलीला भेट देऊन हव्या त्या विषयावरचे वाचन करणे सुलभ होईल.
धन्यवाद.
धन्यवाद.
नविन प्रतिक्रियांसाठी/लेखसाठी "माझ्या साठी नविन"
आणी जे फॉलो करतोय त्यासाठी गृप नविन
समजले
दिवसभराच्या सरावाने जमू
दिवसभराच्या सरावाने जमू लागलेय आणि बदल आवडू लागलेयत.
दोनचार दिवसात अगदीच हात बसून जाईल आणि मायबोलीवर बागडणे सर्वांसाठीच आणखी सुलभ आणि सुखकर होईल.
धन्यवाद, मंडळ आभारी आहे, शुभरात्री
कुछ तो गडबड है दया.
कुछ तो गडबड है दया.
मी नेहमीप्रमाणे नवीन लेखन वर क्लिक करतोय. सकाळी हर्पेनचा धावकाचे मनोगत वाला आणि आत्ता शेरलॉक शापित यक्षवाला धागा तीन वेळा दिसतो आहे यादीत.
मलाही शापित यक्ष दोन दोन दिसत
मलाही शापित यक्ष दोन दोन दिसत होते. पण एकावर टिचकी मारताच दोन्ही उडाले.
वॉव, मस्त. वेमांनी
वॉव, मस्त. वेमांनी सांगितल्यावर झटकन ध्यानात आले. नाहीतर बर्याच उड्या मारत बसायला लागत होत्या.
@ webmaster, एक शंका निरसन
@ webmaster, एक शंका निरसन करावे. 'मायबोलीवर नवीन' ह्यामध्ये काही धागे बिनाग्रुपचे दिसून येतात. अर्थातच आम्ही त्या ग्रुपचे सभासद नसतो. मग मी जरका 'माझ्यासाठी नवीन' follow करीत असेन तर मला तो धागा कधीच दिसणार नाही.
उदा. १) सकाळी मी एक 'मदत पुस्तिका' धागा पाहिला, ज्याला ग्रुप नव्हता.
२) मला वाटतं रंगबिरंगी पान वाल्यांच्याही धाग्यांना ग्रुप नसतो.
मला वाटतं असे ग्रुप नसलेले धागे by default सर्वांना दिसायला हवेत.
शापित यक्ष आणि माबो वरच्या
शापित यक्ष आणि माबो वरच्या चेंज चा काय संबंध(त्याला जास्त कॅटेगरीत टाकले असेल त्यामुळे काय?)
की लेखालाच पुन्हापुन्हा जन्म घेण्याचा शाप आहे?
@सचिन काळे
@सचिन काळे
या अडचणीवर उपाय शोधतो आहे.
@ वेमा, धन्यवाद!
@ वेमा, धन्यवाद!
वेमा, लॉगिन केल्यावर
वेमा, लॉगिन केल्यावर पहिल्यांदा कविता आणि गझल गृप मधून अन सबस्क्राइब केलं. आता एकदम मस्त वाटतंय. राजकारण आणि चालू
भानगडी ( आपलं घडामोडी ) यांचं सदस्यत्व घेतलंच नाही त्यामुळे सर्व काही दृष्टी आड सृष्टी ! आनंदी आनंद गडे .... * आयडी नव्हेत गाण्याच्या ओळी )
प्रत्येक लिंक नवीन टॅब मध्ये
प्रत्येक लिंक नवीन टॅब मध्ये उघडण्याची ही सोय असायला हवी. Same as on www.team-bhp.com
एकच पेज सारखं रिलोड करण्याची यात गरज नाही आणि एका विशिष्ट ठिकाणी स्क्रॉल करून ठेवलेलं असल्यास ते तसंच राहातं.
नाव पोस्ट च्या वरती आणि ठसठशीत पाहिजे याला जोरदार अनुमोदन.
ही सोय आवडली आहे, बरेच नको ते
ही सोय आवडली आहे, बरेच नको ते धागे अदृष्य करता येत आहेत!
How can I unsubscribe for
How can I unsubscribe for particular group. I am not getting, unsubscribe tab.
तुम्ही जिथे ग्रुपचे सभासद
तुम्ही जिथे ग्रुपचे सभासद झाला असाल तीच लिंक सभासदांना unsubscribe करण्यासाठी आहे. उदा.

खरंच फार मस्त वाटतंय. घरातील
खरंच फार मस्त वाटतंय. घरातील अडगळ काढून टाकल्यावर जसे स्वच्छ वाटते, अगदी तसेच ! आता माझा ग्रुप कसा स्वच्छ व सुटसुटीत ☺
Dhanyavad. Saapdala.
Dhanyavad. Saapdala.
माझ्या साठी नविन मधले धागे
माझ्या साठी नविन मधले धागे नविन प्रतिसाद बघून झाल्यानंतर गायब होत नाही.
काल पर्यंत तर गायब होत होते
होताहेत गायब
होताहेत गायब
हो गायब होतात , ते गृप
हो गायब होतात , ते गृप मध्ये नवीन मध्ये दिसत रहातात.
मायबोलीवर कोणकोणते ग्रूप आहेत
मायबोलीवर कोणकोणते ग्रूप आहेत त्याची यादी आहे का कुठे?
वर हितगुजमध्ये. विषयानुसार
वर हितगुजमध्ये. विषयानुसार आणि ठिकाणानुसार.
इथं राजकारण पाहणार नाही, अडगळ
इथं राजकारण पाहणार नाही, अडगळ गेली इ. म्हणणाऱ्या प्रतिसाददात्यांचा राजकीय धाग्यांवरचा वावर पाहणे करमणूक करेल.
माझ्या मोबाईलवर सबमेनू दिसत नाहीये. Any solutions?
@ आ.रा.रा.
@ आ.रा.रा.
कधीच दिसले नाही का या पूर्वी दिसले पण आता नाही?
पूर्वी दिसत असले तर ब्राऊझरची कॅश स्वच्छ करून घ्या. कधीच दिसले नाही तर तुमचा ब्राऊझर , OS सांगा.
कॅश क्लीन केल्यानंतर आता दिसू
कॅश क्लीन केल्यानंतर आता दिसू लागले. धन्यवाद!
एखाद्या लेखकाचे लिखाण
एखाद्या लेखकाचे लिखाण पाहायचेच नाही ह्यासाठी काय करता येईल? जेन्युइन प्रश्न आहे. कारण अनेकांनी तक्रार केल्यावर त्यासंबंधी बदल म्हणून आताची सुविधा आपण दिली आहे. तशी सदस्य ब्लॉक ची सुविधा (अनेकजण काही आयडींबद्दल तक्रार करत असतात म्हणून) होऊ शकते का? मी फक्त तांत्रिक शक्यता विचारत आहे.
नानाकळा , जुन्या मायबोलीत
नानाकळा , जुन्या मायबोलीत ट्री व्ह्यू होता .त्याचा कदाचित उपयोग होऊ शकेल .
@नानाकळा,
@नानाकळा,
तांत्रिक शक्यता आहे आणि त्याबद्दल चाचण्याही करतो आहे. पण त्यामुळे सर्वरवर किती ताण येऊ शकतो यावर ठरवावे लागेल.
वेमा, हे खरंच झालं तर फार बरं
वेमा, हे खरंच झालं तर फार बरं होईल
वेमा, मी जर लॉग इन न करता
वेमा, मी जर लॉग इन न करता बेकरी उघडली तर मला जून्या पोस्ट दिसतात करंट पोस्ट दिसत नाहीत. बहूतेक ३/४ तास जून्या असतात. हे कशामुळे होत असावे ?
फक्त हे बेकरी नाही तर
फक्त हे बेकरी नाही तर मायबोलीवरच्या सगळ्या पानांबाबत आहे. सर्वरवरचा ताण कमी करण्यासाठी हे केले आहे. मायबोलीच्या पानांचा एक स्नॅपशॉट मधून मधून घेतला जातो तोच फक्त वाचनमात्र असलेल्या पाहुण्यांना दाखवला जातो. एकदा ते पान तयार झाले की पुढचे काही तास, डाटाबेसवर काहीच ताण न येता, ते फार पटकन वाचकापर्यंत पोहोचवता येते. जे वाचनमात्र आहेत आणि कधीतरीच मायबोलीवर येतात त्यांना काही तास जुने पाहिल्याने फरक पडत नाही.
Pages