"नवीन लेखन" पाहण्याच्या सुविधेत काही बदल

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीवर हव्या त्या ग्रूपचे सभासद होण्याची आणि फक्त त्याच ग्रूपमधले लेखन पाहता येईल अशी सुविधा अनेक वर्षांपासून आहे. पण तरीही मला नको त्या विषयावरचे लेखन/प्रतिक्रिया पहाव्या लागतात अशी तक्रार नेहमी ऐकण्यात येते. याची दोन कारणे होती.
१) नवे लेखन वर टिचकी मारली तर जी यादी दिसते ती सगळ्या मायबोलीवरच्या सगळ्याच ग्रूपमधल्या धाग्यांची/प्रतिक्रियांची दिसते. फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधले लेखन पाहण्याची यादी होती त्यावर वेगळी टीचकी मारावी लागे. अनेक मायबोलीकरांनी ही सुविधा वापरलीही नाही २) जरी तुम्ही फक्त तुमच्या ग्रूपमधले लेखन पहायचे म्हटले तरी काही लेखन हे सार्वजनिक असल्याने दुसर्‍या ग्रूपमधलेही लेखन दिसत असे.

आजपासून या सुविधेत काही महत्वाचे बदल करतो आहोत.

पूर्वीप्रमाणेच वर "नवीन लेखन" टिचकी मारायची. तुम्ही ती लिंक बुकमार्क केली असेल तर काहीही बदल करायची गरज नाही. नवीन काही वेगळे करण्याची गरज नाही.

तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल.

तुमच्याकडे जास्त वेळ आहे किंवा या अगोदर पाहिलेले धागे पुन्हा जरा निवांत पहायचे आहेत तर "ग्रूपमधे नवीन" या बटनावर टिचकी मारून त्या धाग्यांची यादी दिसायला लागेल. पूर्वीप्रमाणेच कुठल्या धाग्यावर कुठल्या प्रतिक्रिया नवीन आहेत हे ही दिसेल. इथला बदल म्हणजे फक्त तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलेच धागे दिसतील. इतर ग्रूपमधले धागे सार्वजनिक असले तरी दिसणार नाहीत.

तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि सगळ्याच मायबोलीवर काय चाललंय ते वाचायचं आहे, तर पूर्वी प्रमाणेच "मायबोलीवर नवीन" या बटनावर जाऊन ते वाचता येईल. जे मायबोलीवर वाचनमात्र आहेत त्यांच्यासाठी ही by Default यादी असेल. या यादीतला बदल म्हणजे जे गप्पांचे धागे आहेत ते या यादीत दिसणार नाही. जे सभासद नाहीत त्यांना गप्पांच्या धाग्यांवर काय चालले आहे हे पहाण्यात रस नसतो. आणि त्यांना त्या पानावर काय चालले आहे ते कळतही नाही. गप्पांची पाने या यादीतून काढल्यामुळे मायबोलीवर इतरत्र असलेले लेखनाचे धागे जास्त वेळा दिसतील. जे प्रवेश केलेले मायबोलीकर आहेत (Logged in ) आणि ग्रूपचे सभासद झाले आहेत त्याना त्यांची गप्पांची पाने "माझ्यासाठी नवीन" आणि "ग्रूपमधे नवीन" या याद्यांमधे दिसत राहतील.

प्रत्येक वाचकाची नवीन लेखन वाचायची पद्धत आणि अपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एकाच प्रकारे काम करणारी सुविधा अपुरी पडत होती. या नवीन बदलांमुळे प्रत्येकाला थोडे आपआपल्या पद्धतीने मायबोलीला भेट देऊन हव्या त्या विषयावरचे वाचन करणे सुलभ होईल.

विषय: 
प्रकार: 

प्रत्येक मालिकेवर धागा निघालाच पाहीजे असा नविन नियम केला आहे का ? Happy मालिकेवरचे धागे असा नविन गृप करण्याइतके उदंड धागे झाले आहे.

वेमा,
ज्या काही सुविधा करताय आणि त्याबद्दल वेळेची पदरमोड करुन जे कष्ट घेताय त्याबद्दल धन्यवाद.
सुरुवातीला समजायला थोडी कठीण पडली पण ही सुविधा छान आहे.

सदस्य ब्लॉकची सोय शक्य होत असल्यास त्यास माझे अनुमोदन. अनावश्यक आणि अतार्किक (अर्थातच प्रत्येकाच्या वैयक्तिक मतानुसार) वाचण्यापासून लोकांना मुक्ती मिळू शकते.

जल्ला मेला, इंडिव्हिज्युअल सदस्य ब्लॉक करायची सोय देताय,
तशी धागे पण ब्लॉक करायची सोया द्या की,
त्या लिस्टित टाकलेला धागा come what may तुम्हाला दिसणार नाही,
पूर्वी दुसऱ्या बिल्डिंग मधला माणूस आमच्याच बिल्डिंगीत राहायला आलाय, एकाच बिल्डिंगीत राहून त्याचे तोंड बघायचे नसेल तर ही सोह कमी येईल Happy

Mi ekhaya group madhe nahi Tari tya group madhale likhan mala maaybolivar Navin tab madhe vachayla disle.
Mi maaybolivar Navin tab click kela Karan je likhan group Baher aahe (mhanje kontyach group madhe nahi) te vachayche hote.

तशी धागे पण ब्लॉक करायची सोया द्या की
>>>>
ही सोय आवडेल.
एखाद्या ग्रूपमध्ये काही धागे आवडीच्या विषयांवर असतात तर काही नावडीच्या विषयांवर जिथे मी कधी आयुष्यात जाणार नसतो. आता होते काय, भले नावडीचे १० असो आणि आवडीचा एकच तरी त्यासाठी तो ग्रूप जॉईन करून सारे झेलावे लागतात. त्यामुळे वरची सोय मिळाली तर १० वेळा क्लिक करावे लागेल पण पहिल्या पानावर जास्तीत जास्त आवडीचे धागे दिसत राहील

>>वेमा,
>>ज्या काही सुविधा करताय आणि त्याबद्दल वेळेची पदरमोड करुन जे कष्ट घेताय त्याबद्दल धन्यवाद.
>>सुरुवातीला समजायला थोडी कठीण पडली पण ही सुविधा छान आह

मी ही हेच म्हणतो !

बाबू- ज्युनिअर मास्टरशेफ ( मुसली टोमॅटो बाउल) - गार्गी
पाककृती आणि आहारशास्त्र, मायबोली गणेशोत्सव २०१७ बाबू 27
27 नवीन 13 September, 2017 - 15:37
बाबू- ज्युनिअर मास्टरशेफ ( मुसली टोमॅटो बाउल) - गार्गी
पाककृती आणि आहारशास्त्र, मायबोली गणेशोत्सव २०१७ बाबू 27
27 नवीन 13 September, 2017 - 15:37

एका धावकाचे (म्हणजे माझेच Proud ) ‘मैत्री’ खातर आवाहन
खेळाच्या मैदानात, ध्यासपंथी पाऊले हर्पेन 349

एका धावकाचे (म्हणजे माझेच Proud ) ‘मैत्री’ खातर आवाहन
खेळाच्या मैदानात, ध्यासपंथी पाऊले हर्पेन 349

वेमा, 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रूपमध्ये नवीन' ह्या पानांवर डबल दिसणारे धागे दोन ग्रूप्सचे मेंबर आहेत म्हणून डबल दिसत आहेत. तेच धागे 'मायबोलीवर नवीन' ह्या पानावर एकदाच दिसतात.
त्यांना ईतर धाग्यांसारखे एकाच योग्य ग्रूप मध्ये हलवल्यास त्यांचे 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रूपमध्ये नवीन' ह्या पानांवर डबल दिसणे बंद होईल असे वाटते.

>>तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि सगळ्याच मायबोलीवर काय चाललंय ते वाचायचं आहे, तर पूर्वी प्रमाणेच "मायबोलीवर नवीन" या बटनावर जाऊन ते वाचता येईल>>

यातलं काहीच दिसत नाही. प्रवेश केला/ नाही तरी.
सगळा गडबडगुंडा झालाय.

आता ग्रुपमध्ये सभासद आहे ते दिसते माझ्यासाठी नवीनमध्ये -' तुमच्या ग्रुप्समध्ये काही नवीन नाही.'

जुन्या एकच अनुक्रमणिकेत प्रतिसादसंख्येत एकूण/नवीन हे येतच होते तेच बरे होते.

विंडोज फोन ओपेरा मिनी आणि IE ब्राउजर वापरतो.
काही बदल झाला तर ठीक अथवा महिन्याभराने पाहिन.

@srd,
" तुमच्या ग्रुप्समध्ये काही नवीन नाही" हे जे दिसते त्या खाली या दोन लिंक्स दिसत आहेत का?
१) मी सभासद असलेल्या सगळ्या ग्रूपमधले लेखन (नवे + आधी पाहिलेले)
२) सगळ्या मायबोलीवरचे लेखन (माझे ग्रूप + इतर ग्रूप + नवे + आधी पाहिलेले)

यातली २ क्रमांकाची लिंक आहे त्यावर टिचकी मारली तर पूर्वीचीच अनुक्रमणिका दिसते त्यात काही बदल नाही. हे चालते का ते सांगा. सध्याची सोय जास्तीची नवीन सोय आहे. पूर्वीची सोय काढून घेतली नाही.

बदल मस्त आहे, आवडला. लक्षात यायला थोडा वेळ लागला पण आले लक्षात. आता एखादा धागा समोर नकोय पण ग्रुप सोडायचा नसेल तर जस्ट धाग्यावर एक टिचकी मारली की झाले. तो धागा समोरून गायब. Happy परत कोणी त्यावर प्रतिसाद देईतो तो धागा दिसणार नाही.

लॉग इन केले नसताना मीच काही मिनिटांपूर्वी टाकलेला प्रतिसाद आता का दिसत नाहीय याचे कोडे पडलेले, ते का हे वर वेमांचा प्रतिसाद वाचून कळले. (मी सहसा लॉग आऊट करत नाही पण नेट वीक असेल तर गुगल मला फक्त लाईट वर्शन दाखवते ज्यात लॉग इन नसते)

आता एखादा धागा समोर नकोय पण ग्रुप सोडायचा नसेल तर जस्ट धाग्यावर एक टिचकी मारली की झाले. तो धागा समोरून गायब. >>> टिचकी मारली की धागा उगडेल, मग बंद करायचा, मग गायब असं म्हणायचंय का?

वेमा,
राजकारण भारतात काढलेला आणी सार्वजनिक kelela धागा कोनाकोणाला दिसेल?
१) फक्त ग्रुप मेम्बर्स ना?
२) सर्व maayboli सभासदांना "माय्बोलीवर नवीन" tab वापरून .
३) कि १+ २+ ROM, लोग्ड इन नसलेल्या वाचकांना सुद्धा ?

sorry तुम्ही मागे संगीतलेलेत पण माझा गोंधळ झाला.

माबो वरची सध्याची सुविधा ऑउटलउक च्या 'फोल्डर स्ट्रक्चर' 'न्यु मेल्स इन फोल्डर्स' आणि 'टोटल अनरिड मेल्स' शी रिलेट केल्यास फास्ट समजते कंसेप्ट असा स्वानुभव.

इथे दिल्याप्रमाणे -
१) माझ्यासाठी नवीन
Link:https://www.maayboli.com/my_not_read#

२) ग्रुपमध्ये नवीन
लिंक:https://www.maayboli.com/new4me_group

३) मायबोलीवर नवीन

लिंक:https://www.maayboli.com/new4_all

यांपैक क्र ३ ची लिंक उघडल्यास सर्व लेखन दिसेल का?
--

वेबमास्टर, क्रमांक ३ ची लिंक ओपेरा मिनि ब्राउजरमध्ये ( विंडोज फोनमधला ) काही लेखन दाखवत नाही. हा ब्राउजर https नाही हे मी विसरलो आणि मायबोली आता https आहे. शिवाय हा ब्राउजर विंडोज स्टोरमधूनही काढला आहे त्यामुळे अपडेट होत नाही. हे थोडे सविस्तर लिहिले कारण आणखी कोणाला हा प्रश्न पडू शकतो.

ही क्रमांक ३ लिंक अपेक्षित अनुक्रमणिका Internet Explorer IE 11 मध्ये बरोबर चालत आहे. धन्यवाद.

हो सचिन, वाचायची गरज नाही, नुसता उघडला की आपण परत बॅक करायचे, की कटकट गेली, कोणी नवा प्रतिसाद देईतो.

आज मी https://www.maayboli.com/node/34998 या धाग्यावर प्रतिसाद दिला तरीही धागा वर का नाही आला.

कुठेच दिसत नाहीये तो, सपुर्ण मायबोलीवरील नविन लेखन मध्येतरी किमान दिसायला हवे ना

@VB
कळवल्याबद्दल धन्यवाद. त्या प्रकारची पाने खूप पूर्वी केली असल्यामुळे राहून गेली होती. पण आता ती चूक दुरुस्त केली आहे. दिसायला लागले आहे.

@Srd,
तुम्ही ज्या लिंक्स दिल्या आहेत त्या सध्या चालल्या तरी त्या कधी कालबाह्य होतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्या बुकमार्क करू नका असे मी सुचवेन. बुकमार्क करायचे असेल तर ही लिंक वापरा जी बदलली नाही किंवा बदलायचा विचार नाही.
https://www.maayboli.com/new4me_all
(ही लॉगीन आणि लॉग आऊ ट केले असले तरी चालते.)
तिथून हव्या त्या बटनावर टिचकी मारा. बटनामागची लिंक बदलू शकेल म्हणूनच ती बूकमार्क करू नका.

>>हा धागा बंद करतो आहे. कृपया एकच सर्वसमावेशक धागा न करता जशी गरज पडेल तसे त्या त्या विषयावर, निर्णयावर वेगळा धागा सुरू करा.<<
या धोरणाला अनुसरुन घटनेवर्/निर्णयावर स्वतंत्र धागा काढणे हे ओवरकिल होणार नाहि का? टिपिकली एखाद्या घटनेवर बोटावर मोजण्याइतकेच प्रतिसाद असतात, मग असे स्वतंत्र धागे काढण्यात काय हशील? शिवाय फ्रॉम डेटाबेस स्टँडपॉइंट, इट वुड इंक्रिज बर्डन ऑन डेटा स्टोरेज, सर्च/रिट्रिवल, मेंटेनंस एट्सेट्रा.

हां एक शक्यता आहे - नविन धागा काढायच्या उदासिनतेमुळे/कंटाळ्यामुळे (संन्माननिय अपवाद वगळता) धागे कमी निघतील, वाद/राडे रोडावतील. हा साइड इफेक्ट गृहित धरलांय का?.. Happy

१) कृतज्ञता
गुलमोहर - ललितलेखन दीपा जोशी >>>> हा धागा मला माझ्यासाठी नविन या ग्रुपमधे एकदा दिसतोय..
पण ग्रुपमधे नविन आणि मायबोलीवर नविन या ग्रुप्समधे २ दिसतायत...

२) बुलबुले येती आमच्या घरा >>> हा धागा पण ग्रुपमधे नविन या मधे २ दिसतोय...

प्रतिसाद तपसा वर क्लिक केल्यानंतर सेव्ह व प्रतिसाद तपासा एकदम तळात कुठेतरी जातं. प्रतिसादासाठी आणि नविन लेखन साठी पण. लेखनाच्या चौकटीजवळ आणता येईल का?

मला हा बदल अजिब्बात आवडला नाहिए...
आधी निदान सर्व्धाग्यांवर नजर तरी टाकता यायची..आधीच चांगल लेखन दिसेना झालय त्यामुळे बरेचदा मानुस रोमात असतो त्यात आणखी साध्या सरळ ब्राउजिंग ला बदलवून फिल्टर्स लावल्यामुळे बरेचदा बाकी धागे नजरेखालुन जात नाही.. Sad

Pages