इन्स्टंट पॉट पाककृती

Submitted by मेधा on 29 November, 2016 - 09:29

मागच्या दोनेक वर्षात अ‍ॅमॅझॉन वरचे डील्स आणि सोशल मिडियावरचे पीअर प्रेशर यांच्या कृपेने बर्‍याच घरात इन्स्टंट पॉट नावाचे आखूड शिंगी, बहुदुधी , जड आणि बर्‍यापैकी जागा व्यापणारे उपकरण आले आहे.
हौशी, होतकरु , सुगरण आणि बिगरी यत्तेतले अशा सर्वांचे या उपकरणावर फार प्रेम दिसते आहे.

इंस्टंट पॉट मधे तुम्ही केलेल्या ( जमलेल्या किंवा न जमलेल्या ) पाककृतींबद्दल लिहायला हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशर हो, फुटले की बदलावे लागेल. त्याच झाकण मी घेतल्या नंतर महिनाभरातच तोडल. म्हणुन रिप्लेस्मेन्ट शोधली होती. मी स्टील मधेही फक्त त्या आकाराच झाकण मिळाल तर शोधत होते पण शॉर्ट हॅन्डल च मिळाल नाही. मग मी राईस कुकर (सायोचा Lol ) च ट्राय केला, ते बसतय. त्याच हॅन्डल ही रबरचा नॉब आहे त्यामुळे गरम होण्याचा प्रॉब्लेम ही मिटला. Happy

अरे, भांड नाही फुट्ल अजुन.

हो आय पी च स्टिल्च भांड खुप आवडलय मला पण त्या बद्दल मी उशिरा ऐकलं. घेतल अस्त पण सध्या क्लेच मस्त चाललय. भांड तुटल की घेईन Lol

राइस कुकर मध्ये चिकन बिर्याणी छान होते. दम लावून नीट ठेवता येते. खालून जळत नाही.

आय पी मध्ये काहीही फुटण्यासारखं नाही. Happy >> फेसबूकवरच्या ग्रुप मधे दर आठवड्याला निदान एक तरी झाकण किंवा बूड ( इन्स्तंट पॉट्चं ) जळलं आता मी काय करु अशी पोस्ट असते.

आय पी मध्ये काहीही फुटण्यासारखं नाही. Happy >> फेसबूकवरच्या ग्रुप मधे दर आठवड्याला निदान एक तरी झाकण किंवा बूड ( इन्स्तंट पॉट्चं ) जळलं आता मी काय करु अशी पोस्ट असते.

आय पी मध्ये काहीही फुटण्यासारखं नाही. Happy >> फेसबूकवरच्या ग्रुप मधे दर आठवड्याला निदान एक तरी झाकण किंवा बूड ( इन्स्तंट पॉट्चं ) जळलं आता मी काय करु अशी पोस्ट असते.

आय पी मध्ये काहीही फुटण्यासारखं नाही. Happy >> फेसबूकवरच्या ग्रुप मधे दर आठवड्याला निदान एक तरी झाकण किंवा बूड ( इन्स्तंट पॉट्चं ) जळलं आता मी काय करु अशी पोस्ट असते.

हो.
हो मोठा आहे. पण एका माणसासाठी लागणारे जिन्नस वापरले की तेवढेच जिन्नस शिजवतो. Proud
हो. (सॉते मोड)

Yes.

मी मसालेभात, साधा भात वगैरे केला मोठ्या पार्टीसाठी पण गिच्च झाला होता दोन्हीवेळेस.
मसालेभाताची चव चांगली होती म्हणुन खपला नाहीतर भातभात खेळावे लागले असते कितीतरी दिवस.
तुमचे भात छान मोकळे होतात का? कसे?

मिक्स भाजी:
वांगी २
बटाटा १ मोठा
फ्लावर बाउल भर होईल इतका मध्यम आकाराचे तुकडे
टोमॅटो १ मोठा
कांदा १ मध्यम
तेल १ मोठी पळी
लसुन ५/६ पाकळ्या बारीक चिरुन किंवा ठेचुन
मिठ
तिखट १ चमचा (जास्तीचा मालवणी मसाला असल्यामुळे मी हल्ली तोच वापरते आहे)
झाल्यावर वरुन टाकायला कोथिंबीर
सगळे साहित्य कुकर्मधे टाकुन मी ५ मिनीट ऑन करुन ठेवते. स्लो कुकर असल्यामुळे वाफ सुटायला ५ मिनीट लागतात. ५ मिनीटांनी चांगल हलवुन मिक्स करुन घेते. मग अजुन २५ मिनीट ठेवुन भाजी शिजवुन घेते. वरुन कोथिंबीर टाकुन परत एकदा हलवुन झाकुन ठेवते. ई पॉ मधे हिच पाकक्रुती ७ एक मिनीटात होते अस ऐकल आहे. Happy

आय पी मध्ये काहीही फुटण्यासारखं नाही. Happy >> फेसबूकवरच्या ग्रुप मधे दर आठवड्याला निदान एक तरी झाकण किंवा बूड ( इन्स्तंट पॉट्चं ) जळलं आता मी काय करु अशी पोस्ट असते.

तिथली लोकसंख्या पाहता दर आठवड्याला एक म्हणजे अतिशय कमी आहे.

पाया सूप

हैदराबादेत शा घौस नावाच्या रेस्टॉ मधे हे सूप एकदा ट्राय केलं होतं . मसालेदार, पण जहाल तिखट नसलेलं , ब्रॉथी तरिही रिच सूप फार आवडलं होतं.

या शनिवारी इंस्टंट पॉट मधे हे सूप केलं . घरच्या मंडळींना आवडलं. मुलं स्कि ट्रिप वरुन आल्या आल्या सूप आणि नान असं पोटभरुन हादडून खुश झाली.

२ पाउंड मटण पाया.
२ मध्यम लाल कांदे किंवा शॅलट्स
एक पाकीट शान चा पाया मसाला
अर्धा कप दही
८ लवंगा
८ वेलदोडे
१५-१६ काळे मिरी
२ काड्या दालचिनी
२ तेजपानं
२-३ तुकडे जायपत्री
चक्रफूलाच्या दोन -तीन पाकळ्या ( स्टार अनीस)
तेल .
आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून
मीठ.

पाया स्वच्छ धूउन घ्यावे. इंस्टंट पॉट मधे पाया, एक चिरलेला कांदा, आले लसूण , सर्व अख्खे गरम मसाले, मीठ घालून स्लो कूकर मोड मधे ६-८ तास ठेवावे.

वेगळ्या जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून मंद आचेवर दुसरा कांदा ( बारीक स्लाइसेस ) परतून घ्यावा. कांदा ब्राउनिश झाला की पाया मसाला घालून परतून घ्यावा. मिनिट भराने दही घालून परतून घ्यावे. मग कूकर मधला फक्त ब्रॉथ या मसाल्यावर घालून एक उकळी काढावी.
मग पाया पीसेस घालून मंद आचेवर बुडबुडे येतील न येतील असे १० - १५ मिनिटे ठेवावे. लागल्यास अजून थोडे मीठ घालावे.

कूकरमधले कांदे, खडा मसाला वगैरे टाकून द्यावे.

बारीक चिरलेली कोथिंबीर घालर्व, गरम गरम सर्व्ह करावे.

चिकन जिंजर कांजी

डिम सम रेस्टरंत्ट मधे नेहमी आवर्जून घेतले जाणारे हे सूप.

१ वाटी थाय लॉंग ग्रेन राइस
२-३ चिकन थाइज हाडासकट पण स्किन लेस. किंवा कुठलेही बोन-इन, स्किन लेस चिकन पीसेस पाव किलो
आल्याच्या जाडसर चकत्या ५-६
मीठ,

तांदूळ धुवुन घ्यावे. तांदूळ, चिकन, आले + ८-९ वाट्या पाणी घालून झाकण बंद करुन ३०-४० मिनिटे पोल्ट्री मोड वर शिजवावे. प्रेशर उतरल्याच्र चिकन पीसेस श्रेड करुन, हाडे आणि आले टाकून द्यावे.
बोल मधे सूप स र्व्ह करुन त्यावर चवी नुसार सॉय सॉस, तिळाचे तेल, बारीक चिरलेली. कांद्याची पात हे घालावे.

अदिती , स्लो कूकर मधे हाय पॉवर वर ४ तास किंवा लो सेटिंग वर ७-८ तास लागतील कांजी साठी.
प्रेशर कूकर मधे करायचे असल्यास तीन ते चार शिट्या आणि मग मंद आचे वर ८-१० मिनिटे असे ट्राय करा.

मेधा धन्यवाद. हाच धागा शोधत होते पण सर्चमध्ये आला नाही. आता वाचते. आणि थोड्या वेळाने (बरेच) प्रश्न येतील. जे रेग्युलरली (स्लो, इन्स्टंट पॉट आणि राईस कुकर) वापरतात त्यांनी प्लीज माहिती द्या.

क्रीमी चीज पास्ता ,
सॉते वरे सेटींग ठेवून त्यात ऑलिव्ह ऑइल घालून घ्यावे. आता कांदा परतून त्यात बेल पेपर, ब्लॅक ऑलिव्ह्ज, स्पिनॅच, मश्रुम वगैरे घालुन आणखे थो ड परताव. पास्ता घालावा. (न शिजवलेला) आता त्यात पास्ता भिजेल इतपतच पाणी घालावे. प्रेशर कुक मोड हाय आणि सिलिंग तीन मिनिटे. आता क्विक रिलिज करुण चीज घालावे. आता त्यात गार्लिक सिझ्न्ड सॉल्ट कॉस्टको मधले किंवा जो ब्रँड आवडतो तो घालावे. आणि सॉस होईल इतपत दुध (किंवा क्रीम) घालून परत २ मिनिट . परत प्रेशर कुक मोड,हाय ,सिलिंग . १ मिनिटे झाली कि क्वीक रिलिज.
क्रीमी व्हाईट पास्ता तयार.
दुध आणो चीज नको असेल तर तीन मिनिटा ऐवजी चार मिनिटे आणि क्वीक रिलिज केले तरी चालेल. किंवा चीज+ दुधा ऐवजी रेड सॉस घालुन हिच रेसीपी.
ह्या रेसीपी ने पास्ता मऊ शिजतो थोडासा. अगदी al dante हवा असेल तर एक मिनिट कमी करावे लागते.

मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू

साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप

कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल. ते त्या मिश्रणात टाका. तूप किती टाकायचे यासाठी स्वतःची तर्कबुद्धी वापरा. मिश्रण हाताने चोळून / कुस्करुन झाल्यावर त्याचे लाडू बनवा. शक्यतो छोटे आकार घ्या करायला व खायला सोपे जाते.
टीप- एखाद्याला हे मिश्रण लाडू या स्वरुपात आवडत नाही तर अशा वेळी ते तसेच मिश्रण या स्वरुपात ठेवले तरी चालते. ह दूध घालून ही चांगले लागते.
आहे की नाही झटपट पाककृती? आळशी वाचक यात आपापल्या वकूबानुसार यात भर घालू शकतात अथवा उपसाही करु शकतात.

ता.क. ईशाच्या आईने माझी पाककृती चोरली आहे.

Pages