Submitted by मेधा on 29 November, 2016 - 09:29
मागच्या दोनेक वर्षात अॅमॅझॉन वरचे डील्स आणि सोशल मिडियावरचे पीअर प्रेशर यांच्या कृपेने बर्याच घरात इन्स्टंट पॉट नावाचे आखूड शिंगी, बहुदुधी , जड आणि बर्यापैकी जागा व्यापणारे उपकरण आले आहे.
हौशी, होतकरु , सुगरण आणि बिगरी यत्तेतले अशा सर्वांचे या उपकरणावर फार प्रेम दिसते आहे.
इंस्टंट पॉट मधे तुम्ही केलेल्या ( जमलेल्या किंवा न जमलेल्या ) पाककृतींबद्दल लिहायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो मला तेवढीच येते.
हो मला तेवढीच येते. मिपावर लिहिली होती http://misalpav.com/node/25399
आगाऊपणा
आगाऊपणा
इंपॉवर लोक चहा पासून पुरणपोळी
इंपॉवर लोक चहा पासून पुरणपोळी पर्यंत सगळ्ळं करतात. पोळीचा लाडू नक्कीच होऊ शकतो.
माझ्याकडे राईस कुकर आहे, वर
माझ्याकडे राईस कुकर आहे, वर सायोनी टाकलेल्या फोटोसारखा पण मी त्यात फक्त भाताचे सिम्पल प्रकार साधा भात, जीरा राईस, परतलेली खिचडी किंवा पुलाव इतकच करते. बाकी नो फोडण्या, सोते वगैरे.
घरी एक हॅन्ड मी डाउन स्लोकुकर आला आहे. ज्याचं भांडं सिरॅमिकच आहे. पण त्यात छोले, ब्लॅक दाल, चिकन वगैरेला खुप वेळ (7/8 तास) लागतात असं ऐकून आहे. सो इज इट वर्थ इट? काही टिप्स / धागा असेल तर प्लीज शेअर करा.
आता मेन महत्वाचं, इन्स्टंट पॉट. मुलगी (18) युनी ला जाणार आहे. नॉनकेटर्ड विथ किचन अकोमोडेशन आहे. तिला इन्स्टंट पॉटचा किती फायदा होईल. लहान साईझ मिळतो का?
मेधा तुमच्या रेसिपी फायदेशीर आणि टीन्सना करता आणि आवडतील अश्या आहेत, त्या नक्की सांगेन तिला.
प्लीज माहिती द्या.
परवा इं. पॉ. मध्ये आलू मटर
परवा इं. पॉ. मध्ये आलू मटर करत होते. कांडा टोमॅटो सोते मोडवर परतत असताना अचान्क सर्व प्रकरण बम्दच पडलं
मग मी ते इंसर्ट केलेलं स्टीलचं भांडं बाहेर काढलं आणि त्या पॉतम्ध्ये डोकावून पाहिलं तर त्या हॉट प्लेटवर एक प्लॅस्टिकची रिंग जळून चिकटली होती. ती दुसर्याच कोणत्यातरी उपकरणाची असणार पण इं. पॉ. मध्ये पडली आणि ज्या कोणी डिशवोशर अनलोड केल्या त्या व्यक्तीने इं. पॉ. चं इंस्र्ट त्यावर ठेउन दिलं.
तर आता माझा इं. पॉ. काही सुरू होइना. काय मी करू? कसं मी करू?
'बंद पडलं' म्हणजे नक्की कसं
'बंद पडलं' म्हणजे नक्की कसं बंद पडलं? डिस्प्ले चालू आहे का? पॉट काढलं की जो गोल दिसतो आणि गरम होतो तो गरम होतोय का? प्लास्टिक वितळून खाली गेलंय का? (हापिसात बसून) इंपॉ ला काही स्क्रू वगैरे accessible आहेत का आठवत नाही. Apple फोन सारखा dismantal करून कोणी व्हीड्यू टाकला असेल तर तो सर्च करून handy हॅट घालून बघ.
ज्यांना वन डिश मिल खायला आणि त्यासाठी किचन मधलं काम दहा मिनिटात आटोपून तंगड्या वर करून टीव्ही बघायला आवडतो आणि तरीही बेस्ट जेवण आपोआप बनवलेलं हवं असतं त्यांना इंपॉ बेस्ट. टीन्स या व्याख्येत नक्की बसतील.
अमितव, लॉजिक आवडलंय.
अमितव, लॉजिक आवडलंय.
नॉनकेटर्ड विथ किचन अकोमोडेशन
नॉनकेटर्ड विथ किचन अकोमोडेशन आहे. तिला इन्स्टंट पॉटचा किती फायदा होईल. लहान साईझ मिळतो का? >> तिला ऑलरेडी काय काय करता येतं, कितपत आवड आहे हे महत्वाचे. फेसबुक गृप आणि इंपॉ ला वाहिलेले बरेच ब्लॉग्स आहेत टू स्लीव्हर्स आणि मिनिस्ट्री ऑफ करी हे मला माहित असलेले. तिथे बर्याच आयडिया मिळतील.
बिसी बेळे भात, मसाले भात, छोले, राजमा, ब्लॅक बीन सूप, मॅकॅण्ड चीझ, असे प्रकार एकदा दोनदा तिच्याकडून घरी करवून घ्या म्हणजे तिला सवय होइल आणि साधारण घटक पदार्थ किती लागतील याचा अंदाज पण येईल .
तिला नक्कीच आवडतंय थोडंफार
तिला नक्कीच आवडतंय थोडंफार कूकिंग करायला. ब्लॉग्स बघायला सांगते नक्की तिला. धन्यवाद.
नक्की कसं बंद पडलं? डिस्प्ले
नक्की कसं बंद पडलं? डिस्प्ले चालू आहे का? पॉट काढलं की जो गोल दिसतो आणि गरम होतो तो गरम होतोय का? प्लास्टिक वितळून खाली गेलंय का?>>>>> कसं बंद पडलं ते लिहिलय मी. डिसप्ले बंद आहे. प्लग इन केल्यावर ऑन होत नाही. तो जो गोल असतो तो गरम होत नसावा. परत एकदा चेक करते. प्लॅस्टिक वितळलं नव्हतं. ती रिंग जळून काळी पडून त्या गरम होणार्या गोलाला चिकटली होती पण फोर्कने उचलल्यावर सहज निघाली पण.
आज जरा हँडी हॅट घालून बघते. आधी हॅट शोधते.
शुम्पी, मी हे केले असते:
शुम्पी, मी हे केले असते:
- मागची वायर काढुन पुन्हा नीट लावणे व चालु करुन पहाणे (वायर सैल लगलेली असु शकते)
- दुसर्या सॉकेटमधे घालुन पहाणे
- आयपी उलटा करुन हलवणे जेणेकरुन कुठे काही अडकले असल्यास बाहेर पडेल
- एकदा आतुन पुसुन घेणे, वाळवुन मग सुरु करणे
- कोणाच्यातरी आयपीची वायर आणुन त्याने चालु होतो का पहाणे
- कुठे काही ‘रिसेट’ बटन आहे का पहाणे व ते असल्यास ‘रिसेट’ करणे व मग पुन्हा चालु होतो का पहाणे
डिस्मेन्टल करु नकोस. जोडताना नीट नाही झाले तर शॉक बसेल.
सुनिधी +१.
सुनिधी +१.
किचन प्लगला नव्या बिल्डिंग कोड नुसार ट्रिप स्विच असतो. डिस्पेही लागत नसेल तर वेगळ्या प्लगला ट्राय करुन बघ आधी.
३ माणसांच्या कुटुंबाला (२
३ माणसांच्या कुटुंबाला (२ मोठे आणि १ लहान) काय आकाराचा इन्स्टा पॉट घ्यावा?
३ ते ४ क्वार्ट हा एक ऑप्शन दिसतो आहे.
६-७ क्वार्ट हा एक ऑप्शन आहे
टण्या, ३ क्वार्ट्चा पुरावा.
टण्या, ३ क्वार्ट्चा पुरावा. माझ्याकडे ६ चा आहे जो रोजच्या भाजीकरता मोठा पडतो.
३ चा फार लहान होतो असे मला
३ चा फार लहान होतो असे मला वाटते. वरण भात ( २ स्टॅकेबल भांड्यात) करायचा असेल, इडलीचे पीठ आंबवायला, पॉट इन पॉट ऑप्शन वापरत असाल तर ३ क्वार्त्झ मधे ते अवघड जाईल.
मी ५ चा रेकमेन्ड करेन. ५ चा मिळतो ना?
दोन्ही घ्यावेत. उपयोग नक्की
दोन्ही घ्यावेत. उपयोग नक्की होतो. ३ स्वतःला व ६ पार्टीला.
दोन्ही घ्यावेत. उपयोग नक्की
दोन्ही घ्यावेत. उपयोग नक्की होतो. ३ स्वतःला व ६ पार्टीला.
हे उदाहरणार्थ फारच थोर उत्तर वगैरे !
>>>>
३ चा घेऊन पाहतो सुरुवातीला. जमले तर मग पुढे मोठा घेता येईल. आइ वडिल वगैरे आले तर ५क्वार्टचा लागेल असे दिसते
किंमतीत फार फरक नसेल तर एकदाच
किंमतीत फार फरक नसेल तर एकदाच मोठा बरा पडेल. परत परत घेऊन घरात ठेवायचा कुठे असे प्रश्न विचारतात लोक.
आमची आई म्हणते पॉटची साईझ काय खायला मागत नाही, आणि इलेक्टिसिटी पॉटच्या साईझ पेक्षा अन्नाच्या क्वांटिटीवर जास्त डिपेंड असेल.
मला वाटतं दोन, तीन इंस्टांपॉट
मला वाटतं दोन, तीन इंस्टांपॉट त्यांना उपयोगी पडतात जे पोळ्या सोडून सगळं त्यातच करतात. मला अजून तरी फार अॅडिक्शन नाही झालेलं त्यामुळे ६ क्वार्टचा एकच पुरेसा होतो. तो ही ठेवयला जागा नाहीच.
६ क्वार्ट आणि लेटेस्ट मॉडेल
६ क्वार्ट आणि लेटेस्ट मॉडेल चा घ्या. वाटल्यास दोन महिने थांबून ब्लॅक फ्रायडेला घ्या.
आम्ही पहाटे ऑफिसला निघतांना १२ तासांचा डिले लाऊन ठेवतो संध्याकाळी घरी गेल्यावर गरमागरम जेवण ऑलमोस्ट तयार असते.
तो ही ठेवयला जागा नाहीच.
तो ही ठेवयला जागा नाहीच.
>>
ही बोंब तर पहिलाच घेण्याच्या आधी मारण्यात आली आहे
जरा ब्रँड पण सुचवा
टण्या, योगर्ट मोड असलेला घे.
टण्या, योगर्ट मोड असलेला घे. त्यात आंबवणं, दही लावणं प्रकारही करता येतील.
अरे instant pot हाच ब्रँड आहे
अरे instant pot हाच ब्रँड आहे.. Nirma , xerox सारखा
योगर्ट मोड असलेला घे. त्यात
योगर्ट मोड असलेला घे. त्यात आंबवणं, दही लावणं प्रकारही करता येतील
>>>
अजून थोड्या दिवसांनी यात 'अंडे टाकल्यावर उबून कोंबडी बाहेर पडून तिचे तयार बटर चिकन होईल' हा मोड पण येईल बहुतेक
आता तूच म्हणालास म्हणून!
आता तूच म्हणालास म्हणून! नाहीतर आटोमॅटिक का कुंथावं लागतं जोक मारणार होतो
३ चा घेऊन पहातो यामागे काही
३ चा घेऊन पहातो यामागे काही लॉजिक असेल तुझे पण इं.पॉचा खरा उपयोग कसा होतो ते सांगते:
१. प्रेशर कुकर आता वापरलाच जात नाही. साधा वरण भात पण त्यातच करते. शिट्ट्या मोजणे, बारीक करणे वगैरे वेळ जात नाही. ५ क्वा. मधे माझीपूर्वीची कुकर ची भाण्डी बरोबर बसली. ३ क्वा मधे २ डबे किती लहान बसतील/ न बसतील कल्पना नही.
२. पातळ भाजी, रस्से, उसळी आणि सोबत भात हे एकदम करता येते मेन भांड्यात रस्सा/ उसळ आणि त्यावर रॅक ठेवून दुसर्या भांड्यात भात असे लावता येते. आणि ते डीलेड/ कीप वॉर्म ठेवून हवे तेव्हा गरम जेवण रेडी असणे हे फार सोयीचे वाटते . त्या दृष्टीने पण बघून घे साइझ.
३. स्टीम पण यातच करते . स्टँडर्ड १६ इडली चा, ढोकळ्याचाही स्टँड माझ्याकडे आधी होता तोच यात बरोबर बसतो. तसा ३ क्वा. मधे वापरता येणार नाही तुला.
४. इडली डोश्याचे पीठ आंबवताना थोडा मोठा साइज बरा पडतो म्हणजे मिश्रण उतू जात नाही.
योगर्ट सेटींगमुळे मी तर इं.पॉ
योगर्ट सेटींगमुळे मी तर इं.पॉ ला मॅजिकपॉट म्हणते !
इंडीयन दह्याचं विरजण घेऊन आले होते इंडीयाहून येताना , त्यामु़ळे थेट सिंहगडाच्या दह्याची आठव्ण येणारं दही बनतं इन्स्टन्ट पॉटमधे
त्या आधी ग्रीक योगर्ट विरजण लाऊनही झालं होतं, फक्त त्याला जास्तं वेळ लागायचा, देशी विरजण असल्यामुळे ३ तास !
आमच्याकडे तीन क्वार्टचा तीन
आमच्याकडे तीन क्वार्टचा तीन माणसांना पुरेसा होतो. माझी पूर्वीची कुकरची भांडी त्यात मावतात. पण चार लोकांची खिचडी लावायची असेल तर पुरेसा होणार नाही. इडलीचे पीठ चार वाट्यांचे मावते, जास्त ठेवणार असशील तर पुरणार नाही.
भारतिय कुकरसाऱखे मोठा आणी
भारतिय कुकरसाऱखे मोठा आणी छोटा असे आकारमानाने डोळ्याने दिसणारे फरक इन्स्टट पॉट मधे फारसे जाणवत नाही ३ चा वरुन थोडा बुटका आहे बाकी घेराला सेम , प्राइझ वाइ़झ पण फार फरक नाही तेव्हा ५-६ चा घेणे इस्ट
माझ्या मैत्रीणी कडे ३,६ इन्स्टन्ट पॉट आणी रोटीमेकर आहे पोळि-भाजी-भात-वरण सबकुछ ( ई)स्ट्न्ट!
टवणे सर ३ क्वार्टचा घ्या.
टवणे सर ३ क्वार्टचा घ्या. बास होतो. सुरुवतीला बरेच एक्सपीरीमेंट मध्ये वेळ जातो . मी सुरुवातीला मोठा घेतलेला. खुप वापरला नाही. परत मोह होवून ३ क्वार्टचा घेतला आणि आता छान उपयोग होतोय.
पण मी अगदी नेहमी इंपॉ वापरत नाही. माझ्यासाठी जस्ट एक टुल, चेंज म्हणुन वापरायला असाच आहे अजुनही. स्टोव्ह पुसायला लागत नाही एवढाच एक फायदा वाटला मला. भात अजुनही नेहमीच्या कुकर मध्ये करते. कारण सवय. त्यामुळ अजुन डाय हार्ड फॅन नाही.
दही करण , अवन मध्ये सोप वाटल.
इं पॉ मध्ये ट्राय केलेले पदार्थ, पास्ता (सगळ्या प्रकारचे), दाल माखनी, रगडा पॅटीस, पावभाजी ,बीट हलवा , गाजर हलवा , मऊ खिचडी इत्यादी.
रबडी आणि ओटमिल ट्राय करायच आहे.
आभा , मिनिस्टरी ऑफ करी पेज फॉलो करा आणि त्यांची साईट बघा. इंडियन रेसीपी साठी मला उत्तम वाटली साईट. एकही पदार्थ करून बघितलेला बिघडला नाही, मुलीला शुभेच्छा.
Pages