इन्स्टंट पॉट पाककृती

Submitted by मेधा on 29 November, 2016 - 09:29

मागच्या दोनेक वर्षात अ‍ॅमॅझॉन वरचे डील्स आणि सोशल मिडियावरचे पीअर प्रेशर यांच्या कृपेने बर्‍याच घरात इन्स्टंट पॉट नावाचे आखूड शिंगी, बहुदुधी , जड आणि बर्‍यापैकी जागा व्यापणारे उपकरण आले आहे.
हौशी, होतकरु , सुगरण आणि बिगरी यत्तेतले अशा सर्वांचे या उपकरणावर फार प्रेम दिसते आहे.

इंस्टंट पॉट मधे तुम्ही केलेल्या ( जमलेल्या किंवा न जमलेल्या ) पाककृतींबद्दल लिहायला हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं टवणे मास्तर, ३चा घ्या आधी. पण तो सेलवर खुप कमी असतो. परवा अमॅझॉनवर होता ४९ ला. कुठे लिहीले ते आठवत नाही. मजा म्हणजे, ६ चा पण तितक्यालाच मिळतो थँक्स्गिव्हिन्गला.

इपॉ च्या प्राइझेस निम्म्यावर आल्यात आताच! सेल वर काय २५-३० डॉलर मधे विकणार का? मी घेतला तेव्हा १०० ला मिळाला होता तरी ७ इन १ च आहे
नतर ९इन१ वैगरे आलेले

इन्स्टंट पॉट मध्ये रगडा आणि चिंच गुळाची चटणी करून बघितले. चिंच गुळाची चटणी इतकी सुंदर कधीच झाली नव्हती. रगडा पण अतिशय उत्तम शिजलेला. आता कायमच इन्स्टंट पॉट मध्ये करेन. chat_0.PNG
पुढचा प्रयोग रिसोटो Happy
आता पर्यंत जमलेले पदार्थ
उंधियु,
मसाले भात
मुग डाळीची खिचडी
बेझिल-ऑलिव्ह- वेजी पास्ता
टोमॅटो मॅरिनारा पास्ता
पावभाजी
बटाट्याची भाजी

एकदम बढिया फोटो सीमा ! आक्खी प्लेट उचलुन घ्यावी फोटोतुन असा.
राजमा, छोले,चिकन पण ट्राय कर आता, भारी होतात सगळे.

इन्स्टंट पॉट मध्ये डीले टाईमर वर कुक केलेल्या पदार्थांच्या चवीत फरक पडतो का? ऑफिसला जाताना तांदूळ पाणी टाकून ठेवल्यावर भात अगदी पटकन शिजत असेल ना? कुकिंग टाईम साधारण किती ठेवावा अशा वेळी? मला इन्स्टंट पॉट घ्यायचाय. 2 मोठे (+2 मोठे व्हिजिटिंग वरचेवर) + 2 लहान साठी किती quart चा बरोबर आहे?

इन्स्टंट पॉट मध्ये डीले टाईमर वर कुक केलेल्या पदार्थांच्या चवीत फरक पडतो का? ऑफिसला जाताना तांदूळ पाणी टाकून ठेवल्यावर भात अगदी पटकन शिजत असेल ना?>>
भात , डिले टाईम सेटिंग मध्ये करण्यासारखा पदार्थ नाही. पाणि घालून ठेवले तर भात गिच्च होईल अस वाटतय.
वृषाली , अग नेहमीप्रमाणे करतो तसेच फक्त इथे ४ मिनिट रगडा शिजवून मग क्वीक रिलिज करायचे आणि मग परत चार मिनिटे. (२ वाटी वाटाण्याला)
चटणीला , मी खजुर्,चिंच आणि गुळ एकत्र करून भिजेल एवढे पाणि घातले आणि ४ मिनिट सिल्ड,हाय प्रेशर. मग झाकण काढून परत थिकनेस नुसार गरम पाणि घातले आणि एक मिनिट सिल्ड करून हाय प्रेशर ठेवले. ते झाल्यावर मग हँड ब्लेंडर ने ब्लेंड केले.

उकडीचे मोदक इन्स्टंट पॉटमध्ये उकडतं का कोणी? उकड आणि सारण नॉर्मल पॅनमध्येच करणार फक्त स्टीम करायला इंस्टापॉट वापरावा असं डोक्यात आलं आहे.

Pages