जिओ G भर के ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 September, 2016 - 02:57

काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?

स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.

मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
तर त्या ऊलट रिलायन्स प्लस मोदी कॉम्बिनेशन काहीतरी स्वस्तात आणि फुकटात देतेय तर त्यात नक्कीच गडबड घोटाळा हे माझे मत.

दोघांची टोकाची मते पण सत्य काहीतरी वेगळे असणार. ते जाणून घ्यायला, या जिओ चे फायदे तोटे समजून घ्यायला, आणि आता या निमित्ताने जे युद्ध छेडले जाणार आहे त्याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय गोंधळ घालायचा तो घाला, पण दया करा, व्हॉइस फुक्ट करु नका रे!
उलट व्हॉइसचे दर भरपूर वाढवा, लोकांनी दहावेळा विचार केला पाहिजे हा कॉल करु की नको, आणि केला तर थोडक्यात बोलून कॉल कसा आवरता येईल याचा.
उठसुट कोणीही फोन करतं आणि बोलणं आवरता आवरत नाही आजकाल. >> मानव +११११११११११११११११११११११११११११
अक्षरशः माझ्या मनातलं बोललात. लोक तासन्तास बोलत बसतात ते पण बिन महत्वाचं काहीही.

सिटी एरिया आणि गावांगावात नेटवर्क आणि नेट स्पीडही चांगला देतायत पण हायवे आणि रेलवेज कव्हर व्हायचेत अजून. रोड ट्रॅवल करतांना शहर सोडलं की जिओ सरळ मान टाकतं......
मला थोडा वेगळा अनुभव आहे. मुंबईत (म्हणजे शहरी भागात) छान चालत जिओ. गावी जाताना मुंबई- गोवा महामार्गावर महत्वाच्या शहरांमध्ये जसे चिपळूण, कणकवली अशा ठिकाणी जिओ चालते. उलट आत गावात गेल्यावर बंद पडते. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा या ठिकाणी तर मला ४०-४२ Mbps स्पीड मिळाला होता. रेल्वेचे माहित नाही, कारण मी अजूनपर्यंत रेल्वेने गावी गेलो नाही. (हातखंबा हे गावाचे नाव आहे, काही जणांना या चार अक्षरी नावातील केवळ दोनच अक्षरे दिसण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा!!! :P)

बरोबर आहे.. आम्ही पण अनुभव घेतलाय. आईचा जिओ अमदाबादला व्यवस्थित चालतो.. कॉलिंग, नेट इ.. अन सातारला गेली की नेट नाही चालत ..

जिओ त्यांचं नेटवर्क विस्तारतय. पुणे औरन्गाबाद हायवेला पूर्ण चालू असते. मी टॅबवर टीव्ही पहात प्रवास करतो. तसेच गेल्यावर्शी आमच्या पुण्याच्या फ्लॅट मध्ये अर्धा एम्बीपीएस स्पीड नव्हता पण आता जवळ एक टॉवर आल्याने घरात२५ एम्बीपीएस स्पीड मिलतो. मात्र क्वचित काही मिनिटे नेट जाते. पण वायरलेस टेक्नॉलॉजित आपली टेरेन्स लक्षात घेता ते क्षम्य आहे. अजून काही ब्लॉक होल्स आहेत पण ती क्रमाने दूर होतील तेव्हा मात्र जिओ सगळ्याना झोपवेल. जिओ मधे चॉइस नम्बर मिळत नाहीत. जो वाट्याला येइल तो तिरपागडा नम्बर घ्यावा लागतो Sad

{{{ जिओ मधे चॉइस नम्बर मिळत नाहीत. जो वाट्याला येइल तो तिरपागडा नम्बर घ्यावा लागतो}}}

तुमच्याकडे असलेला दुसर्‍या ऑपरेटरचा आधीचा नंबर पोर्ट करुन घेता येईल.

तुमच्याकडे असलेला दुसर्‍या ऑपरेटरचा आधीचा नंबर पोर्ट करुन घेता येईल.
>>>>>
हो, किंवा चॉईस नंबर दुसर्‍याकडून घेऊन मग जिओत शिरता येईला.

जिओ मधे चॉइस नम्बर मिळत नाहीत. जो वाट्याला येइल तो तिरपागडा नम्बर घ्यावा लागतो Sad

>>> मला फारच भारी रायमिंग नंबर मिळालाय नशिबाने.... ३९ ३२९ ६८ ६२८ (इथे ३ आणि ६ च्या ठिकाणी वेगळे अंक आहेत)

आज 'अंधेरीचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने प्रचंड गर्दी होती. (अजूनही आहे, अद्याप विसर्जन झालेले नाही.) मिरवणुकीतून मी घरी आई-बाबांना आणि मग माझ्या एका मित्राला व्हिडीओ कॉल केला लाईव्ह दर्शन देण्यासाठी. एवढी गर्दी असूनही (नेटवर्कवर एवढा लोड असूनही) व्हिडीओ कॉल व्यवस्थित चालू होता. कुठेही अडखळणे नाही की व्हिडीओ ब्लर होणे नाही. नंतर मी मुद्दाम इंटरनेटचा वेग तपासला. एवढा वर्कलोड असूनही ६.७७ Mbps इतका वेग मिळत होता.

मला फक्त जिओची एकच गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे रोजचा 1GB data संपत आला की ही गोष्ट सूचित करणारा एकच संदेश इंग्रजी व हिंदी अशा दोन भाषांतून पाठवतात. कशासाठी??? आम्हाला इंग्रजी काळात नाही असे समजता काय???

जगात काय तुम्ही एकटेच रहाता काय? ज्याना इंग्रजी कळत नाही पण देवनागरी कळते अशांसाठी ती सोय आहे. ईंग्रजांकरता नाही. त्यांनी ग्रेट ब्रिटनला चालते व्हावे....

जिओ आरकॅामचेच टॅावर वापरतात.( थोडे एरसेलचे)

१) जिओचे प्रिपेड नेट प्लान काय आहे? मला पोस्टपेड अजिबात नकोय. त्यात व्होल्ट कॅाल होतील का?
२)पुर्वी प्राइम घेतलेले आणि आता येणय्रा नवीन नंबरांना काय फरक आहे?

जिओला पोस्टपेड नाहीत. प्रिपेड आहेत, सर्व कम्युनिकेशन इन्क्लुडेड आहे, वेगळे पैसे नाहीत.

प्राइम आणि नॉन प्राईम ला डेटा आणि ड्युरेशन मध्ये फरक आहे. ५०० रुपयात प्राईम ला १जीबी डेटा पर डे ३ महिने तर नॉन प्राईमला २ महिने. तसेच एक महिन्याच्या रिचार्जमध्ये २ जीबी/१जीबी फरक अहे.

तरी असं पाहिलंय बहुतेक ठिकाणी की जिओ चे नंबर्स ज्यांनी घेतलेय ते बहुतेक सगळे जणं (प्रीपेड यूजर्स सकट) जिओ हे सेकंडरी नं. म्हणूनच वापरात (भलेही डेटा करता तेच प्रायमरी असेल) ठेवतात. तो नंबर प्रायमरी नंबर म्हणून नाही वापरत........ >>> सहमत .
तसेच नानांच्या व्होडाफोन विषयी पोस्टला +१
हे जिओ येण्यापूर्वी व्होडाफोनवाले अक्षरशः पैसे काढत होते.२८ दिवसाचा प्लॅन १५ दिवसात कसा संपायचा समजायचं नाही. माझे हजार रुपये दर महिन्याच्या खर्च व्हायचा . जिओ वाल्यांनी मार्केट मध्ये कमाल केलीये

हे जिओ येण्यापूर्वी व्होडाफोनवाले अक्षरशः पैसे काढत होते.२८ दिवसाचा प्लॅन १५ दिवसात कसा संपायचा समजायचं नाही. माझे हजार रुपये दर महिन्याच्या खर्च व्हायचा . जिओ वाल्यांनी मार्केट मध्ये कमाल केलीये
नवीन Submitted by जाई. on 10 September, 2017 - 15:3
>>>भिकार₹% आहेत ने एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया वाले.मी तर वाटच बघतोय यांचा कधी डीएसके होतोय ते.

ज्याना इंग्रजी कळत नाही पण देवनागरी कळते अशांसाठी ती सोय आहे.......
मान्य आहे, पण customer preference नावाचा काही प्रकार असतो की नाही??? आणि जर इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधून पाठवायाचेच असतील तर एकाच मेसेज मध्ये खालोखाल दोन्ही भाषेत लिहून पाठवावे ना! जेणेकरून एकच संदेश डिलीट केल्यावर काम होईल. २ वेगवेगळे संदेश (तेही वेगवेगळे header वापरून) पाठवल्यामुळे २-२ मेसेज डिलीट करत बसावे लागतात (दररोज). फोन पण २-२ वेळा वाजत राहतो. (1 GB पैकी 50% data वापरला, यापलीकडे त्या संदेशांमध्ये काहीही महत्वाचे नसते.)

जिओ आरकॅामचेच टॅावर वापरतात.( थोडे एरसेलचे).....
नाही. जिओचे स्वतःचे टॉवर आहेत जे सहज ओळखता येतात. अन्य सर्व कंपन्यांचे टॉवर हे रहिवासी, व्यावसायिक व काहीवेळा चक्क शैक्षणिक इमारतींवर तसेच हॉस्पिटलवर असतात. या टॉवरवर उभ्या आकारातील panel antenna व सोबत गोल ड्रमच्या (ताशा) आकारातील (यांना काय म्हणतात ते माहित नाही) antenna असतात.
जिओचे टॉवर इमारतीवर नाहीत. त्यांचे टॉवर हे सरळसोट उभे जाड (तळाशी सुमारे २ फूट व्यास असणारे व वर जाताना काहीसे निमुळते होणारे) आहेत. व त्यावर केवळ उभ्या आकारातील panel antenna असतात, गोल ड्रमच्या आकारातील antenna नसतात. हे टॉवर एखाद्या मैदानाच्या / उद्यान्याच्या कोपऱ्यात असतात. अशी जागा नाही मिळाली तर रस्त्याच्या मधील Divider वर असतात. (नवी मुंबईत अनेक ठिकाणी आहेत)
रिलायन्सचे (अनिल अंबानीचे) (आरकॉम) टॉवरही सहज ओळखता येतात. यांच्या उभ्या आकारातील panel antenna वर 'Relinace' असा निळ्या रंगात स्टीकर असतो, जो रस्त्यावरूनही दिसू शकतो!
(उद्या फोटो काढून टाकेन दोघा भावांच्या टॉवरचे!!!)

जिओचे स्वतःचे टॉवर आहेत जे सहज ओळखता येतात.

>> हे खरे आहे. जिओ ची टेक्नॉलॉजी वेगळी आहे त्यांना इतरांचे टॉवर वापरता येत नाहीत, जिओ चे टॉवर उभारण्याचं काम मिळालेला एक कॉन्ट्रॅक्टर भेटलेला मागे, तेव्हा सर्व स्क्रॅचपासून सुरु आहे असे कळलेलं.

आजच 'लागलेला नवीन शोध'!
जिओची 'Caller Tune' ही सेवासुद्धा मोफत आहे. (जिओ या सेवेला 'Jio Tune' असे नाव वापरते.)

Screenshot_2017-09-18-21-12-25-225_com.android.mms_.png

कॉलर ट्यून म्हणजे आपल्याला कोणी फोन लावल्यावर पलीकडच्याला ऐकू जाणारे गाणे ना?
आधीही लोकं दुसर्‍यांना गाणे ऐकवायला आपल्या खिश्यातले पैसे का खर्च करायचे हा प्रश्न पडायचा मला
बरंय आता फुकट केलेय तर

कोकणातल्या आमच्या चोरवणे गावी जियो नेट बर्‍यापैकी व्यवस्थित चालते . टॉवर रत्नागिरी कोल्हापूर हाय्वे वर नाणीज मदारी या ठिकाणी (फक्त १ किमीवर) असून स्पीड)जास्तीत जास्त १ ते ४ एमबीपीएस मिळतो . मी नोव्हेम्बर २०१६ मध्ये सिम घेतले व प्राइम मेम्बर असून सध्या २ जीबी पर डे प्लान वापरतो . पण मुख्य अडचण अशी की व्हॉइस कॉल अजिबात रिलायेबल नाहीत . इन्कमिंग आणि आउट्गोइंग दोन्ही कॉल व्यवस्थित होत नाहीत . क्रॉस कनेक्शन्स ही होतात बर्‍याच वेळेस . त्यामुले कॉलिंग साठी नाइलाजाने आयडियाचा ४४६/- प्लान घ्यावा लागला ..

तरी असं पाहिलंय बहुतेक ठिकाणी की जिओ चे नंबर्स ज्यांनी घेतलेय ते बहुतेक सगळे जणं (प्रीपेड यूजर्स सकट) जिओ हे सेकंडरी नं. म्हणूनच वापरात (भलेही डेटा करता तेच प्रायमरी असेल) ठेवतात. तो नंबर प्रायमरी नंबर म्हणून नाही वापरत........ >>> सहमत +१११

रिलायन्स जियो ४जी फुक्कट फोनच्या अटी जाहीर झाल्यात.

फोनमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.
तीन वर्षांच्या आत फोन परत केला, तर डिपॉझिटचा काही भाग सोडावा लागेल , वर जीएसटीही भरावा लागेल.
एका वर्षाच्या आत फोन परत करणार्‍यांना पूर्ण दीडहजार गमवावे लागतील, वर जीएसटी भरावा लागेल.
(हे वाचताना डोक्यात आलं की मग असा मनुष्य तो फोन परत करायला जाईलच कशाला? त्याचं उत्तर पुढे आहे.)
तीन वर्षांनंतर फोन परत करून डिपॉझिट घ्यायला तीन महिन्यांचाच अवधी असेल.तीन वर्षे तीन महिने झाल्यावर, तुमचं डिपॉझिट गेलंच. शिवाय फोनही परत करावा लागेल.
प्रतिवर्षी किमान दीडहजाराचा रिचार्ज केला पाहिजे.
फोनची मालकी रिलायन्सचीच असेल. म्हणजे तुम्ही पुरेसे रिचार्ज करत नाही या कारणासाठीही कंपनी तुमचा प्लान संपवून फोन परत घेऊ शकते.
the user cannot “sell, lease, assign, and transfer or otherwise dispose-of the JioPhone in any manner whatsoever.”
The Company may exercise any other recourse or remedies that it may have, whether in law or in equity.

फोनमध्ये दुसरा कोणताही सिम सध्यातरी चालणार नाही, हे वेग़ळं सांगायला नको.

म्हणजे जर तुम्ही तीन वर्ष आणि फक्त तीन वर्षंच तो फोन वापरणार असाल, तर जसं एम टीएनएल, बीएसएनेलच्या लँडलाइनचा डबा आपल्याघरी असला, तरी आपल्या मालकीचा नसतो, तसला प्रकार. फोनची मालकी तुमची नाही, सबब ती विक्री नाही, सबब नो जी एस टी?

(तीन वर्षांनी डिपॉझिट परत मिळेल, म्हटलंय तिथे जीएसटीचा उल्लेख नाही, यावरून तरी तसाच अर्थ लागतोय)
पण तीन वर्षांच्या आत फोन परत करायचा झाला, तर मात्र जीएसटी लागेल. हा काय प्रकार आहे?
फोन हे गुड (वस्तू) असल्याने त्याच्या वापराच्या सर्व्हिस वर टॅक्स की काय? मग तो तीन वर्षांनी का नाही?
शिवाय फोन ३ वर्षांनी परत करायचा आहे. _

भरत...
कायद्याचा भाषेत... रिलायन्स कडे १५०० रुपये डिपॉजिट आहे, जसे MTNL, महा वितरण कडे असते तसे. ते परत द्यायचे असते. त्यावर जीएसटी लावला जाउ शकत नाही. ३ वर्षात जे प्लॅन वापरेल त्यावर जीएसटी भरला जातो. तीन वर्षानी डिपॉसीट परत केले त्यावर जीएसटी लागणार नाही. कारण फोन फुकट मिळाला आहे. ( याचा अर्थ रिलायन्स नी फुकट दिला असा नाही, त्यानी प्लॅन मधुन पैसे कमवले आणि त्यावर त्यानी जीएसटी घेतला आणि भरला). फुकट मिळणार्या गोष्टीवर कितीही टक्के कर लावा तो शुन्यच असतो.
पण समजा जर दीड वर्षानी फोन परत केला आणि रिलायन्स नी ७५० रुपये परत करायचे ठरवले, तर त्यानी ७५० रुपये तुमच्या कडुन घेतले. (१५०० जमा होते आणि ७५० परत दिले आणि ७५० स्वताकडे ठेवले). तर त्या ७५० रुपयावर, जे त्यानी ठेवले त्यावर जीएसटी द्यावा लागेल.

जर त्यानी १००० रुपये परत केले तर ५०० रुपयावर जीएसटी भरवा लागेल.

पण तीन वर्षांच्या आत जे पैसे परत केले नाहीत, ते काय म्हणून दाखवणार? पेनल्टी. पेनल्टीवर पण कर लागतो का?
डिपॉझिट फोरफीट केलं तर त्यावर जीएसटी कसा लागेल?

{कारण फोन फुकट मिळाला आहे. }
करेक्शन. फोन कधीच तुमच्या मालकीचा होत नाही. तीन वर्षांनीसुद्धा.
बहुतेक तीन वर्षांनीही सगळ्यांनाच फोन परत करायचाय. जे तीन वर्ष संपल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत करतील, त्यांनाच डिपॉझिट परत मिळेल. इतरांना नाही.

आता इतर कंपन्यांनीही (३जी) स्पर्धेत टिकण्यासाठी चांगले प्लान आणलेत.
bsnl : 429₹/३महिने -कॅाल्स फुकट,२जिबि डेटा रोज.
rcom :147₹/महिना
rcom: cutter rs57- १५पैसे/मिनिट कॅाल.
mtnl: combo 199/महिना
वगैरे.
वेगळे ४जी फोन न घेता काम होतय. कॅाल्स साधे होतात का LTE वर याच्याशी देणंघेणं नाही. थोडक्यात २००रु/महिना खर्चात सोशल संपर्क + करमणूक होते.

हे सगळे प्लॅन चांगले आहेत हे खरं
पण नेटवर्क इश्यू येतो हे ही खरं आहे .उदा .माझ्या ऑफिसात एअरटेलच नेटवर्क अजिबात पकडत नाही. स्विच ऑफ असं दाखवत . जिओचे कॉल पण मध्येच कट होतात .

वोडाफोन चे रेड पोस्टपेड प्लॅन्सही चांगले आहेत. ४९९/- मध्ये पहिले ६ महिने १० जिबी डेटा एक्स्ट्रा मिळतोय + प्लॅन मध्ये ६ जिबी डेटा + अनलिमिटेड टेक्सट्स + लोकल-एसटीडी कॉल्स आहेत. डेटा स्पीडस बर्‍यापैकी कन्सिटंट आहे. ८/१० एमबीपीएस अ‍ॅवरेज. नेटवर्कही चांगलं मिळतं बहुतेक सगळीकडे.
मला यांचं माय वोडाफोन अ‍ॅपही आवडलंय. डेटा बॅलन्स निअर रिअल टाईम दाखवतं.

Pages