जिओ G भर के ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 September, 2016 - 02:57

काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?

स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.

मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
तर त्या ऊलट रिलायन्स प्लस मोदी कॉम्बिनेशन काहीतरी स्वस्तात आणि फुकटात देतेय तर त्यात नक्कीच गडबड घोटाळा हे माझे मत.

दोघांची टोकाची मते पण सत्य काहीतरी वेगळे असणार. ते जाणून घ्यायला, या जिओ चे फायदे तोटे समजून घ्यायला, आणि आता या निमित्ताने जे युद्ध छेडले जाणार आहे त्याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिपॉझिट फोरफीट केलं तर त्यावर जीएसटी कसा लागेल?

कायद्याने जर डिपॉझिट फोरफीट केलं तर रिलायन्स ला जीएसटी भरावा लागेल. तो ग्राहका कडुन वसुल करो वा न करो.
रिलायन्स कडे दुसरा उपाय आहे की १५०० ही जीएसटी सकट रक्कम आहे असे घोषित करुन २२९ जीएसटी भरुन १२७१ रुपये स्वताकडे ठेउ शकतो. १२७१ च्य १८% २२९ रुपये होतात. दोन्ही रक्कम अ‍ॅड केल्यास १५०० रुपये होतात.

डिपॉझिट फोरफीट केलं, त्याबरोबर फौनही परत घेतला. मग जीएसटी नक्की कशावर? आमचा फोन तूम्हाला एक वर्ष विपरायला दिला त्या सेवेवर? पण ते डिपॉझिटच म्हणताहेत.
मग फोन वापरण्याचा काळ वाढतो, तसं सेवाशुल्क कमी होऊन चालतं का?
कोणी करतज्ञच सांगू शकेल.

तीन वर्षांच्यावर चालण्यासारखे नसतील ते फोन.
आणि फोन.परत नाही केले तर ती विक्री होईल.
पण तीन वर्षांच्यि अलीकडे एक नियम आणि पलीकडे दुसरि हे अजिबात कळत नाहीए.

https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/jio-rings-in...?

एवढ्या स्वस्तात फोन सर्विस देउन सुध्धा जिओ ला मागच्या तीन महिन्यात ५०८ कोटीचा फायदा ! एवढ्या लवकर जिओ फायद्यात येईल असे वाटले न्हवते. फायद्यात असल्याने स्वस्तातली फोन सेवा आजुन काही वर्ष चालु राहायला हरकत नाही .

Pages