उपकरणं शरणं गच्छामि -गोडाच्या शेवया - साक्षी

Submitted by साक्षी on 5 September, 2017 - 09:21

लागणारा वेळ : ४० ते ४५ मिनिटे
वापरलेली उपकरणे :
अ) यादी १ मधील ढोकळा स्टॅन्ड किंवा इडली स्टँड
आ) यादी २ मधील सोर्‍या
1Upakarane.jpg
साहित्य :
उकडीसाठी :
१) तांदूळ पिठी - १ भांडं भरून (मी अग्रजची वापरली)
२) पिठीइतकेच पाणी
३) साजूक तूप - १ ते १.५ चमचा
४) मीठ - चिमूटभर
रसासाठी :
५) नारळाचं दाट दूध - १ मोठ्ठं भांडं भरून
६) गूळ - १.५ वाटी (गोडाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावा. पण रस थोडा गोडंच करावा. म्हणजे शेवया घातल्यावर योग्य गोड होते.
2Sahitya.jpg
वाढणी : एका व्यक्तीस भरपूर

कृती :
१) नारळाच्या दूधात गूळ मिसळून ठेवा.
२) एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात साजूक तूप व चवीपुरते मीठ घालावे. पाणी खळखळ उकळले की त्यात पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
3Ukad.jpg
ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी व त्याचे उंडे करून घ्यावे.
३) हे उंडे इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यात ठेवावे व १५ मिनिटे उकडून घ्यावे.
4Unde.jpg
४) सोर्‍याला शेवेची चकती लावून उकडलेले उंडे भरा.
५) ज्या वाटीतून खायला देणार (सर्व्ह करणार) त्यात शेव पाडा. त्यावर नारळाचा गोड रस शेवया बुडतील इतका घाला.
5Shevaya.jpg
गोडाच्या शेवया तयार !
6SHevayaReady.jpg
कोकणातल्या लोकांना हा पदार्थ नक्कीच माहित असेल. किती दिवस इथे द्यायचा होता. रविवारी संध्याकाळी डोकं काम करु लागलं आणि लक्षात आलं की हा पदार्थ नियमांत बसतोय. Happy आज शेवटच्या दिवशी मुहुर्त मिळाला इथे देण्यासाठी! Wink

चुकून फोटो मधे तेल घेतलंय. दुर्लक्ष करा.☺

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्स्त!! अगदी आत्ता खावंसं वाटतंय ...
मी पण करते अधून मधून खूपच छान लागतात
इडिअप्पम च्या जवळपास जाणारा

पण मी उलट करते आधी इडलीपात्रात शेवया पडून घेते
(इडली पात्रात केळीचं पण चौकोनी कापून ठेवायचं अन त्यावर शेवया पाडायच्या म्हणजे चिकटत नाहीत)
आणि मग वाफावते आणि मग बाकी दूध वगैरे
आता याप्रमाणे करून पाहायला हवं

मस्त!
कोकणात शेवरोळ्या म्हणतात.ना.दू + गूळ , हे तापवून घेतात,त्यात वेलची पावडर घालायची.

हुश्श!!
या कॅटेगरीत एक एन्ट्री आली.
मी गेले कित्येक दिवस या नियमात बसणारे आणि मला आवडणारे जमणारे काय करता येईल हा विचार करतेय Happy
मी हा पदार्थ खाल्ला नाही पण याबद्दल ऐकले आहे.
मध्ये एका ठिकाणी उकडलेले उंडे ऐवजी नजरचुकीने उकडलेले अंडे वाचून उडाले होते Happy

मस्त रेसिपी
कोकणातल्या लोकांना हा पदार्थ नक्कीच माहित असेल.<< हो. गणपतीत गावी केली होती. भारी लागते.

Aaj mi kelya hotya,,tuzya lekhavaroon sfurtee gheun.Tyat tuup ghalayala visarale.pan ekadam mauu zalya hotya.