नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?

१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ?
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?

१५) मिपा वरचा आयडी कुठला ?

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?

१७) कविता, गझला करता का ? का ?

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )

या आता !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
→ whats app वापरायला लागल्यावर तेथेच Google Indic keyboard (आधीचा Google Hindi Input) वापरून

२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
→कारण तिन वर्ष तिन आठवड्याआधी वेमा/admin आम्हाला पावले.

३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
→आं?? स्वत: च कसं सांगणार! कैतरीच प्रश्न Uhoh

३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
→ हाच आहे.

४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
→आठवत नाहीत.

५) कुठल्या कंपूत होता ?
→ 'आहेत?' म्हायचंय काय?

६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
→सतराच होते म्हणून आलो नाही.

७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
→ आपल्याला काय अपेक्षित आहे?

८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
→ आमच्या सचिनकाकांनी शिकवलं.

९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
→ पाकृ जमत नाही म्हणून पास.

१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
→नविन धागा म्हणजे एकदम फ्रेश मट्रेल. नविन पान म्हणजे शिळ्या कढीला नव्यानं उतू आणण्यासारखं.

११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?
→ अजून वेळ आली नाही.

१२) अॅडमिनना विपू कशी करायची ?
→ कधी करायची, असं अभिप्रेत आहे काय? तसं असेल तर मग आयडी उडवायच्या स्पर्धे भाग घ्यावा लागेल! Lol

१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?
→आयडीत नं नाही. लिंकीत आहे. माबोचं ५७१८५ वं बाळ असं म्हणता येईल.

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?
→ हो तर! ऋन्मेषला विचारून बघा. Wink

१५) मिपा वरचा आयडी कुठला ?
→ आहे पण जाऊदे. माबोची सर मिपाला नाहीच!

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?
मामींना विचारा.

१७) कविता, गझला करता का ? का ?
→ हो तर. कविता होतात पण करता पण येतात. का ते आमच्या कट्ट्यावर या मग कळेल.

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?
→ मी लावलाय म्हणजे माझाच!

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?
→ लिहीलेय. का ते विचारलं तर लहानपणापासून जे शिकवलंय त्यानुसार लिहीलंय ते.

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )
→ कितीही.

या आता !!!
धन्यवाद! Happy
Rofl

८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
→ आमच्या सचिनकाकांनी शिकवलं. >>> Lol
हे वाचूनच कळलं होतं राहुल असणार ..आणि तुच निघालास.. Lol

baapre
solid ahe buwa navin membera sathi ragging chi style
(आपले रोमन मध्ये बरे की नै ...सेफ एकदम Happy उगीच मराठी स्वच्छ टायपले तर १ल्याच प्रश्नावर विकेट निघायची )

ूम्हाला पिकासावरून फोटो अपलोडकरता येतात का ? कुठे शिकलात ?→ आमच्या सचिनकाकांनी शिकवलं.>>>हे वाचूनच कळलं होतं राहुल असणार..आणि तुच निघालास..>>> +111 Lol परफेक्ट् राहुल

Lol

नशीब मला कोणी असले प्रश्न विचारले नाहीत, कारण मला आजच हा उलगडा झाला(माबोवरील ८ महिने आणि ३ आठवड्यांनी) की माबोवर असे प्रश्न विचारले जात.

आमच्या सचिनकाकांनी शिकवलं.>>> अरे वा:! माझं नांव माबोवर चांगलंच प्रसिद्ध व्हायला लागलंय की!!! Wink

राहुल, माझा उल्लेख केल्याबद्दल आपले आभार.

प्रश्नावली छान सोडवलीत आपण. Lol

Happy
आपल्या सर्वांना ते २४ माहितीय का?
Rofl

Pages