आपला कट्टा-गप्पाटप्पा मौजमस्ती

Submitted by र।हुल on 2 July, 2017 - 03:08

नमस्कार मायबोलीकर,
हा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.
एकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...

येथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत Happy

हे वाहते पान आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Belated Birthday Sachinji
गायां भी भारी
बकेट लिस्ट पर उधारी

Hello कट्टेकर्स.. मी मायबोली app वरून लॉग इन आहे. मला इथे नविन लेखन करायला काही पर्याय दिसत नाहिये. काही सांगू शकाल का?

अंजलीताई ईथुन सरळ पुढे जा पुढुन तीन गल्ल्या सोडुन राइटला जा
तिथे एक गणपतीच देउळ आहे अजुन थोड पुढ गेलात की एक लिंबाच झाड आहे तिथे बसलेल्या कुणालाही विचारा ते सांगतील तुम्हाला.

हाय

Hello कट्टेकर्स.. मी मायबोली app वरून लॉग इन आहे. मला इथे नविन लेखन करायला काही पर्याय दिसत नाहिये. काही सांगू शकाल का?>>
अजुन तशी सुविधा दिली नसल्याचे वेमांनी सांगितल्याचे आठवते. मी वापरत नाही त्यामुळे नक्की माहित नाही.

@ के अंजली, मायबोली आपल्या ब्राऊसरवरून लॉगईन करा आणि नवीन लेखन करा. मीसुद्धा मायबोली अँप्लिकेशन वापरत नाही. त्यामुळे त्याविषयी मलाही काही माहीत नाही.

आमच्या लहानपणी.

दसरा म्हण दसरा!
दसरा!
हात पाय पसरा!

पाडवा म्हण पाडवा!
पाडवा!
नीट बोल गाढवा!

Rofl

सर्व 'आपला कट्टे'कर्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!