नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?

१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ?
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?

१५) मिपा वरचा आयडी कुठला ?

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?

१७) कविता, गझला करता का ? का ?

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )

या आता !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल धागा, दिनेशदा! पण माझे थोडे गंभीर की काय ते उत्तर Happy
नीराला दिलेल्या सल्ल्याला अनुमोदन
स्वतःची ओळख उघड करावी की न करावी हा त्या सभासदाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ओळख उघड न करता त्या आडून वैयक्तिक शेरेबाजी करणे, कोणत्याही धाग्यांवर येन केन प्रकारे असंबद्ध पोष्टी टाकून धागा भरकटवणे, असभ्य, अर्वाच्य भाषेत प्रतिसाद देणे या गोष्टींचे कधीही समर्थन होऊच शकत नाही.
तसेच ओळख उघड न करणारा प्रत्येक आय डी डु आयडी (च) आहे अशा संशयाने त्या आय डीला जोखणे, अनुल्लेखाने मारणे तितकेच चुकीचे आहे.
वयाबाबत बोलायचे झाले तर मी इथल्या बर्याच आय डींना गेली ५+ वर्षे virtually ओळखते. त्यांचे लेखन जमेल तेव्हा वाचते आणि सभासद झाल्यापासून जमेल तसा प्रतिसादही देते. तेव्हा प्रोफाईलवरचे माझे माबो वय कमी असले तरी ते फसवे आहे Happy आणि माझ्यासारखे असे अनेक आय डी नक्कीच असतील.
हुश्श! बहुधा इतकी मोठी ही माझी पहिलीच पोस्ट. ( अवांतर: कसा बाई इतरांना इतके लांब लांब लेख आणि एका मागोमाग एक पोस्टी लिहायला वेळ मिळतो?! सदा विचारात पडलेली बाहुली)

२४ च्या उल्लेखावर अजून हशा मिळवता येतो ह्याचा मला कोण अभिमान वाटत आहे.

त्या धाग्यावरील कारवाईत डझनाने आय डी उडाले हे माहीतही नसणारे काही मायबोलीकर आहेत हे पाहून भरून आले. 'मग करता काय तुम्ही इथे' असे विचारावेसे वाटले. Proud Light 1

माबो वर आल्या आल्या पहिला लेख ऋन्मेऽऽष यांचा वाचला होता
>>>>>>
वाह वा धन्य धन्य झाहलो .. खास करून पैलाच लेख माझा वाचूनही माबोवर तुम्ही राहिलात हे ऐकून Proud

'वाचन करायचे.. आवडले की प्रतीसाद द्यायचा. आणि मुख्य कुशंका मनातच ठेवयच्या. या नाही कळल्याने काही बिघडणार नाही' - अनुमोदन

Hi...me MB var navin nahiye, last 4 yr me member ahe pan mala nivval Marathi typing yet nahi mhanun me kahich taku shakat nahi...please help me.

Marathi select kela na...ki velanti, matra, kana barobar yet nahi..ani me off madhe aslya mule marathi font downlode karu shakat nahi.

Kahi upay aslyas suchvave..

Asawari Sad

>>>> google translate मध्ये टाइप करून ते कॉपी पेस्ट करू शकता.
मला पण मायबोली वर टाइप करताना अनुस्वार देता येत नाही, तो कसा देतात?

२४ हे काय असतं ? ते कसे करतात ? हे अजूणही समजल नाही. Uhoh

धमाल आहे.
बर्‍याच जुन्यांना पण चोवीशी माहित नाहीये हे वाचुन आश्चर्य वाटले, Happy

२४ च्या उल्लेखावर अजून हशा मिळवता येतो ह्याचा मला कोण अभिमान वाटत आहे. >>>>>>>> बेफी Happy

google transliterate .. हेच ते ज्याचा उपयोग करुन मी प्रतिसाद द्यायचे..
मग मायबोली मदतसमिती च्या मदतीने देवनागरीत कसे लिहायच याचा सराव करत करत आता भरभर टाईप करते.. विश्वास ठेवा नका ठेवू पण 'ज्ञ' या अक्षराकडे जास्त लक्षच नव्हत दिल उपयोग तेवढा नसायचा तर आणि आत्ता काही दिवसांपूर्वी तो माबो वर टायपाचा शिकली मी Proud

@प्रशू, अनुस्वार देण्याकरिता kMsa अस लिहीलेत की कंस असे शब्द उमटतील त्यातील क वर अनुस्वार दिलेला आहे म्हणजेच अनुस्वार देताना कॅपिटल M चा वापर करावा.

@ आसावरीस, तुम्ही जे इंग्रजीमध्ये टाईप केले आहे त्याच पध्दतीने फक्त तुमच्या सदस्य नावाच्या खाली जिथे भाषेच्या पर्यायाची खिडकी आहे तेथे मराठी हा पर्याय निवडून टाईप करा.

धन्यवाद शब्दाली Happy
मी तुमच्यापेक्षा १ वर्षांनी मोठा(२ वर्षे १० आठवडे :)) असूनही मला हे प्रकरण समजल नव्हत, ती लिंक वाचली, सुरुवातीला विबासं डोक्यावरून गेले पण जेव्हा समजले तेव्हा अशक्य हसलो. Rofl

याला म्हणतात तूम्ही "रोमात" असणे. तसे बरेच जण असतात. ग्लॅडीएटरही हवेत आणि प्रेक्षकही... त्याशिवाय खेळ रंगत नाही.

कळले कळले...२४ उर्फ़ विबासं म्हणजे काय ते कळले. Happy पेटली ट्युब.
कालची अख्खी रात्र, २४ अंक तो विबासं शब्द आणि मामी यांचा लेख.. आलटुन पालटुन कुशी वर वळावे तसे वळवळत होते.
नवरोबा म्हणाला, 'का जागीयेस?' म्हणले, 'विबांस चा विचार करतीये.'
नवरोबा 'ऑक्सफ़र्ड डिक्शनरीत बघ ना. मिळेल तीथे'
त्याला वाटले नविन इन्ग्लिश शब्द. Rofl

मामी मानले तुम्हाला -/\-

नवरोबा म्हणाला, 'का जागीयेस?' म्हणले, 'विबांस चा विचार करतीये>>
निरा, तुमच्या नवर्याला विबासंचा फुफाॅ माहित असता तर कुणाच्या म्हणून भिरभिरला असता की तो. Light 1 Lol

ढिश्शक्लेमरः
मी नवा आयडी नाय काय, पायजे असल्यास प्रोफाईल बघुन खात्री करा (पहले इस्तमाल करें फिर विश्वास (कुमार नाय) करें च्या तालावर. आता उत्तरे
१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
आधी इ-सकाळ, मग मिपा
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
वय वर्षांत आहे
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
कध्धी कध्धीच नाही
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
हाच
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
चानसच नाय
५) कुठल्या कंपूत होता ?
कोणी कंपुत घेतलेच नाही आणी मी पण प्रेत्न नाय केला
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
नाही
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
माबो-माबो, मिपा-मिपा खेळणे
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
हो. अश्याच संस्थळांवरुन
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
हो. हो.
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
थोडा गोंधळ आहे, पण तरीही, नवा धागा म्हणजे ताजा ताजा, नवीन पान म्हणजे जुन्या धाग्यात जोडलेली पुरवणी
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?
अ‍ॅडमिनना विपु/विनंती
१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ?
माझा उपाय-अ‍ॅडमिनचा धागा उघडणे-त्यात लेखकाच्या म्हणजे अ‍ॅडमिन नावावर क्लिक-करा विचारपुस मधे जावुन-खरडायचे जे काय ते.
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?
माझा सदस्य क्रमांक
१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?
कदाचित २ जणांना, काय करणार आलीया भोगासी..... Wink
१५) मिपा वरचा आयडी कुठला ?
बस्स का दिनेश्दा ? Blush
१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?
हे जग्जाहीर आहे. ख्या ख्या ख्या
१७) कविता, गझला करता का ? का ?
नाय बा. जे रवी नाय बघु शकत ते मी बी नाय बघु शकत म्हणुन
१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?
प्रोफाईल मधे फोटोच नाही.
१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?
मी लिहीलेय, आणी त्या बद्द्ल मला शरम नाही
२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )
किती पाहिजेत. ९ तास देवु शकतो Wink काय करणार जनरल शिफ्ट असते नां .

दिनेश,

९५% प्रतिसाद २४ ह्या विषयावर आलेले असल्याने मला नाईलाजाने तुमच्याकडून मानधन उकळावे लागत आहे. तेव्हा दहा हजारापर्यंतचा एक धनादेश पाठवून द्यावात.

नाहीतर हशा मिळवण्याचे कसब तुमच्याकडे कुठले आले?

Light 1

बॉन्ड.. फारच प्रामाणिक हो तूम्ही ( कुणी घेतलं मायबोलीवर !! )

बेफि.. क्वांझाचा चेक ( अंगोलाची करन्सी ) पाठवू काय ? अजून तरी रीव्हर्स गियर नाही टाकलाय हो !!

उत्तरे-
1- हम बचपनसे होशियार है
2- वय 17 वर्षे, माबो वय 10 आ.2 दि.
3- पहिलाच जन्म आहे
4-
5- कुठल्याच नाही
6- नाही
7- खूप काही
8- नाही येत, शिकवा
9- नाही
10- नवीन धाग्याला बांध असतो नवीन पानाला नाही (बहुतेक)
11- admin ना विपू
12- त्यांच्या खात्यात जाऊन
13- माझ्या idत नंबर नाही
14- नाही, भेटायचे आहे
15- इनू
16- विवाह व्हायचाय अजून, त्यानंतर बघू
17- नाही
18- नाही
19- खरं सांगायला लाज वाटत नाही
20- नक्की सांगता येत नाही

Pages