विज्ञानवाद आणि आस्तिकता

Submitted by नानाकळा on 12 August, 2017 - 23:27

या धाग्याचा संदर्भ मार्च फॉर सायन्स ह्या मूळ धाग्यावरील चर्चेत आहे.

अश्विनी के यांचे म्हणणे असे:
विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

त्यावर माझे उत्तरः
मला म्हणायचे होते की विचारसरणीने विज्ञानवादी - जसे अमितव यांनी म्हटले की रॅशनल विचार - असणे आणि व्यवसायने संशोधक/वैज्ञानिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गाडगेबाबा हे अशिक्षित असून विज्ञानवादी विचारांचे होते, तेच बालाजीच्या पुढे नतमस्तक होणारे इस्रोचे तंत्रज्ञ हे विज्ञानवादी नाहीत. प्रोफेशन म्हणून वैज्ञानिक आहे म्हणजे तो विज्ञानवादी असेलच असे नाही. नास्तिक म्हणजे काही भयंकर क्रूर गोष्ट असल्यासारखी का समजली जाते हे कळत नाही. अज्ञेयवादीपण असू शकतात. मी स्वतः एक अज्ञेयवादी आहे.

नास्तिक, अज्ञेयवादी हे विज्ञानवादी 'असू' शकतात, (असतीलच असे नाही) पण 'आस्तिक हे विज्ञानवादी नाहीतच' असे माझे स्पष्ट मत आहे. यावर पुढे चर्चा झाल्यास इतर सदस्यांची मते जाणून घेण्यास आवडेल...

भारताची मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांसारखी प्रचंड प्रगती न होण्याचे कारण हीच मूलभूत अविज्ञानवादी भूमिका आहे. मूलभूत संशोधनासाठी लागणारे पैसे, सुविधा वगैरे ह्या तर फार नंतरच्या बाबी झाल्या, मुळात त्याची काही आवश्यकता असते हेच बहुसंख्य जनतेला ठावूक नाही. कारण आपला सामाजिक विचार ठेविले अनंते तैसेचि राहावे असा आहे. याच समाजातून येणारे व्यावसायिक संशोधक्/वैज्ञानिक, यांच्यावर कुठेतरी हा पगडा असतोच. त्यामुळे त्यांच्या मूलभूत संशोधकिय मानसिकतेला मर्यादा पडतात. आपण जे 'सरकार मदत करत नाही', 'आपल्या देशात संशोधनाला महत्त्व नाही' हे जेव्हा म्हणतो त्याच्या मुळाशी हीच मानसिकता कारणीभूत असते. एक समाज म्हणून आपल्याला येणार्‍या समस्यांवर समाधान शोधण्यापेक्षा "चलता है, हे असंच असतं, आपण काय करणार,. सिस्टीमच अशी आहे" हे जे विचार उद्भवतात हे पण यातुनच येतात.

हे संपूर्ण उत्तर नाहीये. पुढे चर्चा होइल तसे अधिक लिहित जाईन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे आस्तिक कोणाला म्हणायचं हे सुद्धा नीट बघितलं पाहिजे. वर बसून चांगल्या वाईटाची नोंद ठेवून पुढे माण्साला सुख किंवा दु:खं देणार्या देवाला मानणारा आणि निसर्गांचे नियम बनवणार्या एंटिटिला देव मानणार्याला सुद्धा आस्तिकच म्हणावं लागेल. नं १ टाईपचा देव मानणारा विज्ञानवादी नाही असू शकत.

मी जो लेख वाचला आहे तो मराठीत आहे. घटना १९७२ सालची आहे. अंनिस चे कार्यकर्ते आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उकरून शोध घेणार होते, आतमधे जिवंत समाधी घेतलेली आहे म्हणजे ज्ञानेश्वरांचा हाडांचा सांगाडा तरी असायलाच हवा. यासाठी ते समाधीचं खोदकाम करणार होते. दोन अडीचशे माणसं समाधी उकरण्यासाठी पुण्याहून ट्रक्समधून आळंदीत दाखल झाले. त्यात काही डॉक्टर्स होते तर काही फॉरेनर. त्यावर सदर लेखकाने त्यांना gieger muller counter, thermistor bolometer आणि frequency meter raddar असे तिन instruments तसेच समाधीवर आवरण म्हणून टाकायला लोखंड, पितळ आणि जस्ताचं आवरण(पत्रा वैगरे असावं) वापरून अगदी शास्त्रीय दृष्ट्या दाखवून दिलं की आतमधून बाहेर चैतन्याची स्पंदनं उत्सर्जित होतात. हे सगळे प्रयोग करताना येणारे instruments वरील रिडींग्ज वैगरे ते आलेले अंनिसचे कार्यकर्ते स्वत: घेत होते. शेवटी त्यांच समाधान झालं आणि त्यांनी समाधी उकरणं cancel केलं. सदर लेखक डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल हे retired IAS officer आणि National Chemical Laboratory मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. मी वाचलेला लेख 'अलख निरंजन' दिपावली अंक -२००७ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. जसाच तसा येथे देणं शक्य नाही.

मी आत्ता नेटवर सर्च केलं असता अजून एक प्रसंग हाती लागला तो→→
जसाच तसा कॉपी पेस्ट करत आहे. मायबोलीच्या धोरणांत बसत नसेल तर उडविला जावा.
B D Narayankar
Pune: Just once wouldn’t you love for someone to simply show you the evidence for God’s or cosmic energy’s existence? No arm-twisting. No statements of, “You just have to believe.” Dr Raghunath Narayan Shukla long ago made a scientific attempt to candidly suggest that cosmic energy exists at Alandi. This was later confirmed by none other than great grandson of Alfred Nobel, Klice Nobel when he visited Alandi in 1997 after his foundation identified the presence of cosmic energy through astral survey.
Alandi is located on the banks of the Indrayani River, 25 km east of Pune. Saint Dnyaneshwar, after translating the Bhagavad Gita into Marathi, had attained samadhi in a cave at Alandi. Alandi is a place of pilgrimage and is venerated by many Hindus. A temple complex has been built near the spot of Sant Dnyaneshwar’s samadhi. It is visited by thousands of pilgrims, and in particular, those of the Varkari Sect. On every Kartika Ekadashi (eleventh day of the Hindu month of Kartik), a big festival is held at Alandi, when the Yatra (procession of pilgrims) reaches the town.
Shukla, a retired IAS officer and scientist, proved the existence of cosmic energy at the samadhi by using detecting instruments like Scintilation and Bolometer. The former detects and measures gama rays to x-rays and later detects ultraviolate and infra-red in terms of temperature.
Shukla placed these intruments 50 feet away from the samadhi to detect and measure gama to radar frequencies by covering the samadhi with gold, siolver and zinc filters. “I got different readings for each cover. Surprising I observed highest frequency when the smadhi wasn’t covered at all. Whereas, the frequencies decreased from gold to silver and silver to zinc,” he says.
“The different frequencies suggests that there is a presence of cosmic energy at the samadhi,” Shukla says.
This was later confirmed by Klice Nobel who had visited Alalndi to attend an international religion and science symposium. “Soon after the function, Klice, along with other five Nobel lauretes, told me to arrange a trip to Alandi next morning. We hired a taxi and went there. As soon as Klice and other lauretes saw the samadhi, they rushed to the spot and embraced it. Later they embraced and even talked to two sacred trees in the temple premises,” Shukla recollects.
When Shukla asked as to why he embraced the samadhi, Klice replied: “It had been for six-long years that my foundation had been working on a project identifying cosmic energy spots around the world. We identified 162 such spots in India and Alandi was one of them. Therefore I was eager to visit Alandi.”

आता वरील वैज्ञानिक, mr. klice Nobel आणि बाकी five nobel laureates यांना आपण कुठल्या कैटेगरीत बसवणार आहात?..

@राहुल,
हा प्रसंग व प्रयोग जगातल्या कुठल्याही जर्नलमध्ये प्रकाशित झाला नाही? पिअर रिव्ह्यू नाही? बरं ते जाऊदे, ते कोण क्लाइस नोबेल klais nobel असा उल्लेख आहे तो मनुष्य claes nobel ह्यांचे असे कुठले फाउंडेशन नाही. Cogent emr solution नावाची कंपनी आहे जी रेफिएशन सेफ्टी प्रॉडक्ट्स बनवते. एकुणात तुम्ही दिलेली घटना ही होएक्स प्रकारात मोडणारी दिसते.

माझ्या मते आस्तिकता, धर्मावर विश्वास हे सगळे मनःशांति साठी आहे. कारण मन विशाल, मनाला अमर्याद विचारशक्ति. त्याची शांति सहजासहजी मिळत नाही.

भौतिक शास्त्रात खूप अभ्यास करूनहि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. मनःशांति मिळत नाही. मग ते आस्तिकता काय आहे हे समजून घेतात. जर त्यातून त्यांना मनःशांति मिळत असली तरी त्यांना भौतिक विज्ञानाचे महत्व जास्त वाटते. दोन्ही गोष्टी उपयोगी आहेत पण दोन्ही गोष्टी जागच्या जागी कश्या ठेवाव्या हे त्यांना कळते.

तसेच ज्यांनी धर्माचा खूप अभ्यास केला असतो तेहि भौतिक विज्ञान मानतात, पण ते पूर्ण उत्तर नव्हे असे त्यांना वाटते. त्यांना धर्म महत्वाचा वाटतो. पण पोटाचे विकार का? शरीर अशक्त का? मोडलेला पाय बरा कसा होणार? मग ते धर्म, धर्म करणारे लोक म्हणतात, बघू तरी श्रावणी केली नाही गोमय खाल्ले नाही तर काय होते? उपास नाही केला, अंड घातलेले औषध खाल्ले तर?
दोन्ही गोष्टी उपयोगी आहेत पण दोन्ही गोष्टी जागच्या जागी कश्या ठेवाव्या हे त्यांना कळते.

ज्यांना हे कळत नाही ते दोन्ही गोष्टी एकत्र आणून जगात प्रचंड गोंधळ करून ठेवतात. लिहा मायबोलीवर, बघा लोक कसे भांडतात,
मज्जा न् काय? लै धम्माल!
काही वर्षे अशी धमाल करतील नि मग कळेल हे काही फारसे उपयोगाचे नाही - आपले मन याहून खूप विशाल आहे, आपल्याला विचार करण्याची शक्ति आहे, तर काहीतरी दुसरे करून बघावे.

एकवेळ आत्मा आणि भूत वगैरे असू शकते. मी देखील या प्रकारांवर कधी टोटल अविश्वास दाखवत नाही.
पण देव वगैरेला काही लॉजिक नाही.

@नंद्या४३, सहमत.
>>> ज्यांना हे कळत नाही ते दोन्ही गोष्टी एकत्र आणून जगात प्रचंड गोंधळ करून ठेवतात. लिहा मायबोलीवर, बघा लोक कसे भांडतात,
मज्जा न् काय? लै धम्माल!
काही वर्षे अशी धमाल करतील नि मग कळेल हे काही फारसे उपयोगाचे नाही - आपले मन याहून खूप विशाल आहे, आपल्याला विचार करण्याची शक्ति आहे, तर काहीतरी दुसरे करून बघावे. <<<< +१ काठावर राहून तीर मारणं याला म्हणता येईल!!
मनाची शक्ती प्रचंड आहे त्यामुळेच विज्ञानातले संशोधन करणारे शास्त्रज्ञ नविन काहीतरी शोधतात. एखादा लेखक, कवी सृजनात्मक काहितरी लिहीतो, शिल्पकार शिल्प, चित्रकार चित्र घडवतो, गायक गाण्यात तल्लीन होतो. आणि हे सर्व करण्यासाठी मनाची शांती सर्वाधिक गरजेची असते. ही शांती जर यौगिक साधनेनं कुणाला मिळवता येत असली, कुणाला ती नुसत्या देवदर्शनाने मिळत असली तर त्याला आपल्यासारख्या (तुम्ही-आम्ही, सर्व) काठावर राहून तीर मारणार्यांची हरकत का बरं असावी??? मुद्दा, दोन्ही गोष्टींबाबत आचारविचारांच फक्त तारतम्य हवं. आपल्या कामाप्रती एकनिष्ठा हवी.
विज्ञानात जसे आपल्याला संकल्पनांचं रुपांतर शास्त्रात होण्यासाठी संशोधन करून पुरावे मिळवावे लागतात तसंच आस्तिकतेत सुद्धा नुसते शब्दांचे, पोथीपुराणांचे शुष्क बुडबुडे ही नकोत तर अनुभूती हवी. ही अनुभूति योगसाधनेतून येते असं या मार्गावरून गेलेल्यांनी नोंदवून ठेवलंय. ज्ञानेश्वरांसारख्यांनी तर तो मार्गही समजवलेला आहे.

@ बाबू, तो लेख पुन्हा वाचा लक्षात, समजून घेता येईल.

वरील दोन्ही प्रसंगांबाबतची अधिक सविस्तर माहीती आपल्याला डॉ. शुक्ल च देऊ शकतील.
>>>

तुम्ही वर लिहिलेले काहीच वाचलेले दिसत नाही (व त्या दुसर्‍या बाफंवरचे सुद्धा). या शुक्लांचे संशोधन पीअर रिव्युड नाही, त्याची काय मेथॉडॉलॉजी होती त्यावर अवाक्षर नाही, ते कुठेही मान्यताप्राप्त जर्नलमध्ये प्रसिद्ध झजर्नलमध्ये, त्यातले संदर्भ म्हणजे नोबेलच्या नातवाचे नाव चुकीचे अन त्याच्या नसलेल्या फाउन्डेशनबद्दल काहितरी ठोकलेले आहे, उरलेल्या पाच नोबेल विजेत्यांचे नाव नाही आणि तुम्ही म्हणता की यांनाच विचारा.
उद्या समजा तुम्हाला एखादा रोग झाला तर तुम्ही स्वारगेटजवळ तंबू ठोकून बसणार्‍या वैदूंकडे जाल उपचाराला की मान्यताप्राप्त विद्यालयात शिकलेल्या व त्यानुसार काम करणार्‍या डॉक्टरकडे जाल? शहाणे असाल तर डॉक्टरकडे जाल कारण तो डॉक्टर एक प्रूवन मेथॉडॉलॉजीने बनवलेल्या अभ्यासक्रमात शिकून तज्ज्ञ झाला आहे. स्वारगेट जवळचा बैदू रिस्की आहे. जर जीवाशी खेळ असेल तेव्हा आधुनिक विज्ञान आणि नसेल तेव्हा स्वारगेटचा वैदू!

Couldn't resist writing here. Dr. Shukla worked in a lab where I worked too. His 'research' is not only questionable, but also deceiving. I don't think I can write more about his so-called research. But it's not correct to make opinions based on what Dr. Shukla wrote or said.

मला काही प्रश्न पडले आहेत , आता बाफ निघालच आहे तर विचारते .
१)नेमकं विज्ञानवादी कोणाला म्हणावं ?जस्ट एक सायन्सची डिग्री घेतली आहे म्हणहून माणूस आपसूक विज्ञान वादी ठरतो का ?
२) एखादी व्यक्ती विज्ञान वादी आहे की नाही ह्याचे निकष कोणते
३)आस्तिकतेची व्याख्या काय ? म्हणजे मला स्वतःला रोज रोज पूजा अर्चा कर्मकांड वगैरे जमत नाही. पण काही हिंदू परंपरा मला स्वतःला आणि माझ्या पुढच्या पिढीला माहीत असाव्यात असं वाटत . सणावारप्रसंगी सहभाग असतो ,ते साजरे करायला आवडतात .पण त्याच वेळी विज्ञान हे मानवी प्रगती साठी अत्यावश्यक आहे , कालबाह्य परंपरा काढून टाकल्या पाहिजेत , प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे असं माझं मत आहे . त्यामुळे कधी कधी परंपराप्रिय व्यक्तींबरोबर खटके ऊडतात. मग आता माझा गट कोणता

वरचे प्रश्न वेगवेगळ्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्या आचरणातून पडले आहेत.

जाई, तुमचे प्रश्न अगदी योग्य आहेत, बाफ चा विषयही तोच आहे.

बरेच लोक वैज्ञानिक्/शास्त्रज्ञ म्हणजे लॅब सायन्स्टीस्ट-मदतनीस, शाखेचा विद्यार्थी, विज्ञानसंस्थेत नोकरी करणारा अशा अर्थाने घेत आहेत. व त्यालाच विज्ञानवादी म्हटले पाहिजे असे काहीसे म्हणत आहेत. माझा यावर आक्षेप आहे.

विज्ञानवाद/विवेकवाद ही एक विचारसरणी आहे. शैक्षणिक अर्हता, व्यवसाय, नोकरी किंवा काम नव्हे.

>>it's not correct to make opinions based on what Dr. Shukla wrote or said.<<
Dr. thanks for your valuable opinion. Happy

मी चर्चा वाचलेली नाही. पण तरीही माझे मत देते. खरा विज्ञानवादी हा साशंक असतो. खर्‍या विज्ञानवाद्याला परमेश्वर आहेच किंवा नाहीच हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण वैज्ञानिक दृष्टया काहीच सिद्ध झालेले नाही. सद्ध्या जे माहित आहे त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अजून माणसाला अज्ञात आहेत त्यामुळे सद्ध्या माहित असणारी कोणतीही थियरी ही कधीही आऊटडेटेड होऊ शकते. माझ्या मते साशंक असणे हाच वैज्ञानिक प्रगतीचा आत्मा आहे.

धर्माचे म्हणाल तर धर्म (कोणताही असला तरीही) मॉरली कसे जगावे ते सांगतो. त्याचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही. विज्ञान मॉरली कसे जगायचे ते सांगत नाही. ते फक्त ज्ञान देते. त्याचा वापर मॉरली कसा करायचा हे धर्म शिकवितो. त्यामुळे धर्म (मोरॅलिटी) आणि विज्ञान (ज्ञान) ह्यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे. दोन्ही संकल्पना जर आपल्या डोक्यात सुस्पष्ट असतील तर त्या एकमेकांच्या कामात अडथळे आणणार नाहीत.

त्यामुळे धर्म (मोरॅलिटी) आणि विज्ञान (ज्ञान) ह्यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे.>> विठ्ठल मी सांगितले आहे ना माझ्या प्रतिसादामध्ये "विज्ञान मॉरली कसे जगायचे ते सांगत नाही. ते फक्त ज्ञान देते. त्याचा वापर मॉरली कसा करायचा हे धर्म शिकवितो."

>> धर्माचे म्हणाल तर धर्म (कोणताही असला तरीही) मॉरली कसे जगावे ते सांगतो.

जगातील सर्वच धर्म सर्वसामान्यांच्या डोळ्यात हि एक शिस्तबद्ध धूळफेक नेहमी करत असतात. काय तर म्हणे धर्म नैतिकता शिकवतो, प्रेम शिकवतो, मजहब नही सिखाता आपस में बैर रखना... वगैरे वगैरे सगळे छान छान गोड गोड.

पण जरा त्यावर थोडासा खोलात विचार करून पाहू. मी जेंव्हा "हा आपल्या माणसांचा समूह" म्हणतो तेंव्हा अप्रत्यक्षपणे मी "हा समूह सोडून इतर लोक आपले नाहीत" असा संदेश देत असतो. तेंव्हा आपसूकच त्या इतरांशी स्पर्धा करणे, वर्चस्व गाजवणे, नाते न जोडणे, वैर करणे हे सगळे येतेच कि जे आपण "आपल्या समूहातील" लोकांशी करत नाही. यातूनच झुंडी तयार होतात. आणि मॉरली जगण्याचा संदेश देणाऱ्या धर्माच्या लोकांकडून मग हाणामाऱ्या रक्तपात बलात्कार वगैरे गोष्टी होतात.

पण हे अनेक सो कॉल्ड धर्माभिमानी लोकांच्या लक्षात येत नाही (किंवा काहींच्या येऊनही ते दुर्लक्ष करतात)

>> विज्ञान मॉरली कसे जगायचे ते सांगत नाही.
हा चुकीचा निष्कर्ष आहे. फार कमी वैज्ञानिक असतील जे अनैतिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. निदान माझ्या ऐकण्यात/वाचण्यात तरी उदाहरण नाही. पण अनेक धार्मिक लोक मात्र जरूर आहेत जे अनैतिक धंदे करत असतात.

नैतिक, अनैतिक, प्रेम, द्वेष, खोटेपणा, आपुलकी, वगैरे सर्व गुणदोष माणसांत उपजत नैसर्गिक आहेत. त्यावर कोणताही धर्म वाढ करत नाही की घट करत नाही. विज्ञानवादी विचार किंवा नास्तिकताही तसे काही करु शकत नाही. त्यामुले इनामदार यांच्या धर्माच्या धूळफेकीबद्दल सहमत. नैतिकतेचा माणसाच्या धर्माशी काहीही संबंध् दिसत नाही.

धर्म हि आदिम कल्पना आहे.जेव्हा माणुस भटक्या अवस्थेतून सुसंस्कृत होत होता तेव्हा अपघाताने ही "अडगळ" त्याच्या डोक्यात घुसली.
वर सुमुक्ता म्हणतात की धर्म मॉरॅलीटी शिकवतो,म्हणजे नक्की काय करतो हे त्यांनाही ठाऊक नाही.
मॉरल वागण्यासाठी धर्म आवश्यक आहे हे तिरपागडं लॉजिक लहानपणीच डोक्यात फिट बसवायची व्यवस्था केली जाते.वास्तवात तसे काही नाही.तुम्ही मॉरल आणि निधर्मी एकाचवेळी असू शकता.

वर सुमुक्ता म्हणतात की धर्म मॉरॅलीटी शिकवतो,म्हणजे नक्की काय करतो हे त्यांनाही ठाऊक नाही. >> कृपया वैयक्तिक प्रतिसाद देऊ नये ही विनंती. मला वाद घालायची इच्छा नाही. माझे मत मांडायचे काम मी केले. मला कोणालाही काहीही कन्व्हिन्स करायचे नाही.

हा चुकीचा निष्कर्ष आहे. फार कमी वैज्ञानिक असतील जे अनैतिक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. निदान माझ्या ऐकण्यात/वाचण्यात तरी उदाहरण नाही. पण अनेक धार्मिक लोक मात्र जरूर आहेत जे अनैतिक धंदे करत असतात. >>>Weapons of Mass Destruction कोण बनविते??? अनैतिक धंदे करणारे धार्मिक कसे असतील? ते फक्त स्वतःला धर्मिक म्हणवून घेतात किंवा आपण धर्मिक आहोत असे दाखवितात.

मॉरल वागण्यासाठी धर्म आवश्यक आहे असे मी म्हटलेलेच नाही. पण धर्म नैतिकता शिकवितो एवढेच म्हटले आहे. ती शिकायची की नाही हे माणसे ठरवितात

पोथिनिष्ठ लोकांच्यामागे लागण्यात अर्थ नाही.त्यांना सतिसावित्री,साधूवाण्याची गोष्ट म्हणजे नैतिकतेचे डोस वाटतात.

धर्म नैतिकता शिकवितो एवढेच म्हटले आहे. ती शिकायची की नाही हे माणसे ठरवितात

>> धर्म म्हणजे कोणी एन्टीटी नाही. आदर्शवादावर बेतलेले काही जगण्याचे नियम आहेत. त्यांना कोणी भीक घालत नाही. त्यामुळे लोक मुळातच आम्ही धार्मिक आहोत असे म्हणतात तेव्हा ते एक नंबर दांभिक असतात. जगातल्या सर्व धर्मांच्या नियमात खोटे बोलू नये असे शिकवले जाते. बाकीचे जाऊ द्या, पण ह्या एकाच नियमाची लहानापासून थोरापर्यंत सगळे सतत पायमल्ली करत असतात. तेव्हा जगात कोणताही धर्म शुद्ध स्वरुपात तर नाहीच. आजचा धर्म हा फक्त माणसांच्या आदीम टोळीसदृश्य आहे. ज्यात एका टोळीशी बांधीलकी ठेवणे, तिचे नियम पाळल्यासारखे दाखवणे, दृष्य निष्ठा ठेवणे हे बेसिक कोड ऑफ कन्डक्ट होते ते पाळल्याने एकांड्या व्यक्तीला अनेक लोकांचे सहकार्य व सुरक्षा प्राप्त होत असे. त्यामुळे टोळीचे जे कार्य आहे तेच आधुनिक स्वरुपात मुळ प्रेरणा तशाच राहून धर्म-पंथ ह्यात सुरु आहे.

जगातल्या सगळ्या धर्मसंस्थापकांनी ज्या उद्देशासाठी धर्मस्थापना केल्या ती उद्दिष्टे कोणताही धर्म आचरणात आणत नाही. जे काही आचरण आहे ते टोळीसदॄष्य आहे. तेव्हा टोळीबाज वागणुकीला कोणी धर्म वगैरे मोठी नावे देत असेल तर चुकीचे आहे.

विज्ञान, प्रत्येक घटनेच्या मागील "कारण" शोधायचा प्रयत्न करते. जी "कारणे" डोळ्याला दिसू शकतात किंवा गणित / शास्त्राच्या सूत्रांनी मांडता / सोडवता येतात त्याला आपण शास्त्रीय आणि खरी मानतो.
ज्या घटनेचे "कारण" अशा तर्हेने मांडता येत नाही त्याचे काय करायचे ?
नवीन मॅनेजमेंट मधे एक Why - "Why Analysis" Technique सांगितले आहे.
ते जर इथे वापरले तर असे दिसेल कि जो पर्यंत "उत्तर सांगता येत नाही" हे उत्तर येत नाही ; तो पर्यंत सगळे शास्त्रीय / वैज्ञानिक नियमात बसणारे असते. यालाच कदचित नास्तिक असे नाव देता येइल .
काही घटना तशा घडण्यामागे ( ज्याचे कोणतेही Logical कारण सांगता येत नाही ) नक्की अमूर्त शक्ती - प्रेरणा -चेतना असायला हवी ( ही अपेक्शा पूर्ण शास्त्रीय आहे. कारण "कार्य - कारण" नियमाचे अस्तित्वच फक्त शास्त्राला मान्य आहे !)
त्यापुढे त्या कारणांचा मागोवा घ्यायचे काम करणार्या आणि त्या शक्तीचे अस्तित्व मानणार्या "इतर" विचार धाराना अशास्त्रीय मनले जाते. त्याला आस्तिक मानले जाते. त्याच्याकडे क्शुद्र नजरेने पाहिले जाते . ( त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आस्तिकता मानणारे बरेचसे लोक अंध पणे कर्म कांडाने पछाडले जातात )

कारणे शोधणारा नास्तिकते पासून आस्तिक्ते कडे प्रवास करत असतो. विज्ञाना कडून अध्यात्मा कडे वाटचाल करत असतो.

क्रुपया मांडलेल्या विचारां बद्दल आणि मुद्द्यांबद्दल जरूर लिहावे. विचार व्यक्त करणार्या बद्दल अवमान कारक वैयक्तिक टिप्पण्णी करू नये.

नैतिक, अनैतिक, प्रेम, द्वेष, खोटेपणा, आपुलकी, वगैरे सर्व गुणदोष माणसांत उपजत नैसर्गिक आहेत. >>> प्रेम सोडले तर बाकी सर्व मानवनिर्मीत संकल्पना आहेत. ह्या नैसर्गिक कशा असतील?? नैसर्गिक असतील तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आढलतील ना!!!

सतिसावित्री,साधूवाण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला धर्म वाटत असेल तर तुमचे मर्जी Happy

धर्म कसा काय नैतिकता शिकवतो याचे उदाहरण देऊ शकाल का सुमुक्ता?>> Essential quality or character, as of the cosmos or one's own nature: धर्म ह्या शब्दाचा असा अर्थ मला माहित आहे. अजून काय उदाहरण देणार???

असो. मुळात मला जे म्हणायचे आहे त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. "खरा विज्ञानवादी हा साशंक असतो. खर्‍या विज्ञानवाद्याला परमेश्वर आहेच किंवा नाहीच हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण वैज्ञानिक दृष्टया काहीच सिद्ध झालेले नाही. सद्ध्या जे माहित आहे त्यापेक्षा कितीतरी गोष्टी अजून माणसाला अज्ञात आहेत त्यामुळे सद्ध्या माहित असणारी कोणतीही थियरी ही कधीही आऊटडेटेड होऊ शकते. माझ्या मते साशंक असणे हाच वैज्ञानिक प्रगतीचा आत्मा आहे. "

सतिसावित्री,साधूवाण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला धर्म वाटत असेल तर तुमचे मर्जी
>>> तुम्हाला धर्म म्हणजे काय हे विचारले आहे वरती अनेकजणांनी.त्याचं उत्तर न देता काहीतरी गोलगोल बोलत आहात.
धर्म नैतिकता शिकवतो म्हणजे काय ते सांगा!

नैतिक, अनैतिक, प्रेम, द्वेष, खोटेपणा, आपुलकी, वगैरे सर्व गुणदोष माणसांत उपजत नैसर्गिक आहेत. >>> प्रेम सोडले तर बाकी सर्व मानवनिर्मीत संकल्पना आहेत. ह्या नैसर्गिक कशा असतील?? नैसर्गिक असतील तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आढलतील ना!!!>>>
नैतिक आणि अनैतिक या स्थलकालपरत्वे बदलत राहणार्या संकल्पना आहेत. आजचे अनैतिक कृत्य शंभर वर्षांपूर्वी किंवा शंभर वर्षांनंतर नैतिक असू शकते. त्या मानवनिर्मित आहेत.
खोटे बोलणे प्राण्यांमध्येही असू शकते. चिंपांझींच्या दोन टोळ्यांमध्ये वर्षानुवर्षे शत्रुत्व असल्याची उदाहरणे आहेत.
धाग्याच्या विषयावर-
माझ्या मते तरी आस्तिक्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एकत्र नांदणे शक्य नाही. कारण देवाचे अस्तित्व पुराव्यानिशी निर्विवादपणे सिद्ध कुणीही केलेले नाही. तरीही देवाचे अस्तित्व मानणारी व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी कशी असेल?

Pages